मागील भागात.
“पण तुला का घाई?” नीरजच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभ राहील.
“निदान ती तरी माझ्या टीममध्ये येईल. नाहीतर तुमच्या बापलेकांपुढे माझ काहीच चालत नाही.” रक्षा तोंड वाकडं करत बोलली.
“वाह काय आई आहे.” नीरजच्या चेहऱ्यावर विचित्र भावना उमटल्या गेल्या. “हे काय कारण आहे का?”
“अरे,” रक्षा आता जरा गंभीर झाली. “योग्य वयात लग्न झालेली चांगली असतात आणि तुझ तर वय पण होत चाललं आहे. ती चुलत दादाची मुलगी किती मागे लागली होती तुझ्या, माहिती आहे ना?”
तिची आठवण काढताच नीरजच्या चेहऱ्यावर बारा वाजले. कारण तिने नीरजच्या आयुष्यात दखल देत त्याचे फक्त बारा वाजवायचे बाकी ठेवले होते.
आता पूढे.
नीरजचा तो बारा वाजलेला चेहरा बघून रक्षाने बोलायला सूरवात केली.
“तुला एकदा चागंल्या हातात सोपवलं ना की आम्ही मोकळे.” रक्षा “भाऊजी बोलले होते. बराच संघर्ष केला आहे तिने तिच्या आयुष्यात. त्या संघर्षातून उभी राहत तिने तिच्या हिमतीने सगळं काही मिळवलं आहे. संघर्षातून तावून सुलाखून निघालेल्या अश्या मुली कोणत्याही हिऱ्यापेक्षा कमी नसतात.”
“अरे बाप रे,” नीरजने त्याच्या कपाळाला हात लावला. “अजून कशात काही नाही आणि आई तर आतापासूनच तिची बाजू घ्यायला लागली. माझ काही खरं दिसत नाही.” नंतर नीरजने वर पहिले. “देवा वाचव रे तुझ्या गरीब लेकराला.”
“आला मोठा शहाणा, म्हणे गरिबाला वाचव.” रक्षाने नीरजची ती नौटंकी बघून त्याच्या पाठीत हलकीच चापट मारली. “चल जेवायला. की तिला बघूनच पोट भरणार आहेस.”
तस नीरजने रक्षाकडे रोखून पाहीले. ते बघून रक्षा हलकेच हसल्या. मग नीरजच पण हसू निघालं आणि हसतच तिच्यासोबत जेवायला गेला.
आजही जेवताना तन्वीने नीरजला चिडवायची एकही संधी सोडली नव्हती. आज तर तिला सोबती म्हणून रक्षाही संधीच सोन करत होती. हेतू इतकच की नीरजने लवकर काहीतरी हालचाल करावी. त्यांच्या घरात एक चांगली मुलगी सून म्हणून यावी. नीरजचं आयुष्य स्थिरावलं जाव. तो एकदा त्याच्या आयुष्यात सुखी झाला की ते दोघे आई वडील निवांत होणार होते.
हा, ही गोष्ट वेगळी की, नीरजच लग्न झाल की तन्वीच्या आयुष्याच टेन्शन घेणार होते. तिचं लग्न होत नाही तोवर ‘आम्हाला नातू पाहिजे.’ याच टेन्शन ते दोघ घेणार होते. नातू झाला की त्याच सगळं आवरण, संभाळण. हे झाल की ते निवांत होणार होते. थोडक्यात काय की आई वडील कधीच निवांत होत नाहीत. आपण कितीही म्हटलं तरी ते कधीच आपल्या लेकांचे आणि लेकीचे विचार कररण सोडणार नव्हते.
आता ही गोष्ट नीरजलाही माहिती होती आणि त्याबद्दल त्याने थोडीजरी चेष्टा केली असती. तर त्यालाही त्यांचे पुढचे सगळेच हट्ट आत्ताच ऐकायला लागले असते. म्हणून तो गालातच हसत जेवण करत राहीला.
जेवण झाल्यावर नीरज परत त्याच्या खोलीत निघून आला. यावेळेस नाही त्याला रक्षाने हटकले आणि नाही विकासने अडवले. तन्वीही तिच्या खोली अभ्यासासाठी निघून गेली. विकास मात्र रक्षाच किचनमधलं काम आटपेपर्यंत हॉलमधेच बसून त्यांचा मोबाईल चाळत बसले.
नीरजने सुहास यांनी पाठवलेली माहीती वाचायला सुरवात केली.
कॉलेजचे डे संपल्यानंतर ज्या मुलाचा अश्विनीने भर मैदानात पाणउतारा केला होता. त्या मुलाने सुडाच्या भावनेने तिच्या घरी जाऊन तिचीच बदनामी केली होती. त्या मुलाच्या अश्या अचानक वर्तनाने तिच्या आई-वडीलांना त्याचा प्रचंड मानसिक धक्का बसला.
त्यातल्या त्यात तिच्या मोठ्या बहीणीनेही आधीच घरातून विरोध असताना घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे त्या घरात आधीच तिला आणि तिच्या आईला घालून पाडून बोललं जात होत. एकत्र कुटुंब असल्याने तिचे दोन काका-काकु, त्यांची मुल, आत्या हे सगळेच एकाच घरात रहात होते. असही आत्तापर्यंत त्या पूर्ण घरात फक्त तिच्या त्या दोन्ही काकांच्या मुलांचेच खूप लाड होत होते. त्या दोघी परक्याच धन म्हणुन सतत दुर्लक्षित राहीलेल्या होत्या.

घरतल्या प्रेमाला मुकलेली अश्विनीची मोठ्या बहिणीने तिचं प्रेम बाहेर शोधलं आणि ती सरळ घरातून निघून गेली होती. असही घरात रोज गुदमरून जगण्यापेक्षा तिला त्याच्यासोबत जाऊन संसार थाटण जास्त सोप वाटल होत. म्हणून तिच्या बहीणीच्या अशा वागण्याने घरातल्यांचा त्यांच्यासोबतच्या वागण्यात आता बराच बदल झाला. आधी त्यांच्या मागे बोलणा-या काकु आणि आत्या आता सरळ सरळ त्यांच्या तोंडावर बोलू लागल्या होत्या.
त्यात ह्या मुलाने केलेल्या तमाशामुळे अश्विनीच्या वडीलांचा काही दिवसानंतर ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. त्याला जबाबदार म्हणून अश्विनी आणि तिच्या आईलाच धरण्यात आलं होते.
त्यानंतर अश्विनी आणि तिच्या आईला त्यांच्याच घरात मोलकरणीसारखे वागवू लागले. दुसऱ्या कोणाचा आधारही नसल्याने त्या दोघी ते सर्व गपचूप सहन करत राहिल्या.
एके दिवशी अश्विनीच्या छोट्या काकुच्या भावाने अश्विनीवर त्याला ती नादाला लावत असल्याचे तिच्या काकूला सांगितले. यावर अश्विनी काहीच बोलली नव्हती. कारण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नव्हते. तसा तिच्या काकूचा राग अनावर झाला आणि तिने ह्या दोघींना त्या घरातूनच हाकलून दिले.
अश्विनीला त्या घरापासून कधीच प्रेम मिळाल नव्हत. जे काही होत ते तिची आई आणि बाबा एवढ्यापुरतीच मर्यादीत होत. तिला तिच्या बहिणीमूळे तिच्या आई वडीलांना सतत टोमणे बसल्याचा रागही त्या मोठ्या बहिणीवर होता. त्यामुळे अश्विनीने त्या घराकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता आईला सोबत झेत सरळ घराबाहेर पडली होती.
घरातून बाहेर पडल्यावर त्या दोघी अश्विनीच्या मावशीकडे गेल्या. तिलाही आपल्या बहीणी आणि भाचीबद्दल खूपच वाईट वाटलं होत. अश्विनीची मावशी आणि तिचा नवरा मनाने चांगले होते. त्या दोघांची पुढची तजवीज होईपर्यंत त्यांनी त्या दोघींना तिथेच रहाण्याची विनंती केली होती.

काही दिवसांनी ज्या मुलाने अश्विनीच्या घरात तमाशा घातला होता, तो तिथे आला आणि तिची माफी मागू लागला. आता ते कस घडलं? हे अश्विनीला समजलं नव्हत. तिने फक्त त्याचा सुजलेला चेहरा पहिला होता. त्यापुढे ती काहीही बोलायच्या मनस्थितीत नव्हती. अश्विनीच्या मावशीने त्या मुलाला अश्विनीच्या घरी जाऊन त्यांनाही काय ते खरं सांगायला लावलं.
त्या मुलाने अश्विनीच्या घरी जाऊन जरी खरं - खोट काय ते स्पष्ट केल होत. तरी संपत्तीमध्ये अजून कोणाचा हिस्सा नको म्हणून कोणीही अश्विनी आणि तिच्या आईला त्यांच्याच घरी परत बोलावलं नव्हत. वरून तिच्या काकाचे कान भरायला तिचा भाऊ होताच. तेव्हापासुन अश्विनीने मनाने कमी आणि बुध्दीने जास्त वागण्याचे ठरविले होते.
अश्विनीने तिची परीक्षा तर दिली होती. अभ्यास तर काही झालेला नव्हता. फक्त आधीचे जे वाचन झाले होते. त्यावरच तिने परीक्षा दिली होती. तरीही ती चांगल्या मार्कांनी पास झाली होती. नंतरचे एक ते दोन महीने तसेच गेले. या दरम्यान तिने एक छोटीशी नोकरी पण शोधली होती. तिच्या स्वप्नांच्या मागे धावण्याच्या वयात तिला आतापासून नोकरी करताना बघून तिच्या मावशीला वाईटच वाटतं होत. पण किती दिवस आपण आपल्या मावशीवर ओझं बनून रहायच? म्हणून अश्विनीने हा पर्याय निवडला होता.
काही दिवसांनी तिच्या वडीलांच्या भविष्य निर्वाह निधी बाबत अश्विनीच्या आईला समजले. अश्विनीच्या वडिलांचे मित्र आणि त्यांची बायको त्यांना रस्त्यात भेटले असताना त्यांनी अश्विनीच्या आईच्या कानावर त्याबद्दल माहीती टाकली. तस त्यांच्या आधीच्या घरी त्याबद्दलच पत्र तर गेल होत. पण अश्विनीच्या त्या घरातल्या माणसांनी त्याबद्दल अश्विनी व तिच्या आईला काहीच कळवले नव्हते.

क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा