मागील भागात.
नीरजचे हात तर त्याला मारण्यासाठी खूप शिवशिवत होते. पण आता त्याला अश्विनीला भेटायची घाई झाली होती. त्याच्यावर एक तुच्छतेची नजर टाकून तो तिथून बाहेर पडला.
त्याच्या सिक्युरिटीने अश्विनीला कुठे बसवलं होत ते आधीच त्याला सागितलं होत. म्हणून नीरज तसाच त्या रेस्ट रूममधेच गेला.
आता पूढे.
तिथल्या आराम खुर्चीवर अश्विनी तिचं डोक मागे टेकून बसली होती. तिचे डोळे बंद होते. त्या महिला सिक्युरिटीने अश्विनीला लागलीच एनर्जी ड्रिंक आणून दिली होती. ती पिल्यामुळे तिला आता चांगलीच तरतरी यायला लागली होती. नीरज लगेचचं तिच्याजवळ गेला. पण तिच्यापासून थोड लांबच उभा राहून तिला आवाज देऊ लागला.
“अश्विनी.” नीरजचा आवाज काळजीयूक्त होता.
नीरजचा काळजीने भरलेला आवाज ऐकून अश्विनीने तिचे डोळे उघडले. त्याला तिथे पाहून अश्विनीला जरा आश्चर्यचं वाटलं. ती त्याला गोंधळून बघत राहिली. ते बघून नीरज पुढे काही बोलणार तोच त्या रेस्टरुममध्ये त्यांचा एक सिक्युरिटी गार्ड आला.
“सर त्याच काय करायचं?” सिक्युरिटी गार्डनेही जरा कडक आवाजातच विचारलं होत. तो घडलेला प्रकार त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहीला होता. म्हणून त्यालाही केदारचा जरा जास्तच राग आला होता.
“काय करायचं म्हणजे?” नीरजच्या डोळ्यात परत राग उतरला. “अश्या माणसासोबत काय करायचं ते माहिती नाही का तुला? ज्या हाताचा वापर केला ते हात..” नीरज बोलता बोलता थांबला. बाकी त्याचा इशारा समजून तो सिक्युरिटी गार्ड तिथून चालला गेला.
अश्विनी हा सगळा प्रकार डोळे फाडून बघत राहिली. ‘हा नक्की कोण आहे?’ हा प्रश्न तिला पडला.
“तू ठीक आहेस ना?” नीरजच्या आवाजाने अश्विनी तिच्या विचारातून बाहेर आली.
“अँ?” अश्विनी गोंधळून गेली. नंतर लगेच स्वतःला सावरत बोलली. “ह.. हो ठीक आहे मी. अश्या माणसाला मी हॅण्डल करू शकते.” अश्विनी तिच्या डोक्याला स्वतःच्या हाताने दाबत बोलली.
“हो, पाहिलं ना मी.” नीरज जरा चिडून बोलला. “एकच कानाखाली मारून त्याच्या मारण्याची वाट बघत बसली होतीस.”
तशी अश्विनी त्याला चमकून बघू लागली. कारण जे काही घडलं ते फक्त त्यांच्या दोघांत होत. मग नीरजला कस काय सगळं समजलं? हे तिच्यासाठी आता एक कोडच झालं. ती बारीक डोळे करून नीरजला काही विचारणार तोच त्या रेस्टरूमचा दरवाजा परत उघडला गेला. सुहास आणि विकास दोघेही तिथे आले होते.
केदारला त्याच्या कामावरून काढल्याच पत्र त्याच्या ऑफीसवरून त्याला इथल्या ऑफिसला पाठवण्यात आल. तेच त्याला देऊन परत सबनीस यांच्याशी चर्चा करून ते इथे आले होते.
“बेटा,” सुहास यांनी तिच्याजवळ जात तिला काळजीने आवाज दिला. “बरी आहेस ना? सॉरी गं. मी तुला उगाच थांबवलं. थांबवलं नसत तर अस काही घडलच नसत.” सुहास अपराधिक भावनेने बोलू लागले. त्याला विकास यांनीही दुजोरा दिला.
ते कुठे नीरजची मजा घेत होते आणि कुठे ह्या गोष्टी घडून गेल्या होत्या.
“तुम्ही का सॉरी बोलत आहात?” अश्विनीला खूपच वाईट वाटल. “आता तुम्हालाही कुठे माहित होत की तो माणूस कोण आहे? त्याचा स्वभाव, वृत्ती कशी आहे? माहित असतं तर त्याला उभं तरी केल असत का?”
तसे ते दोघेही हलकेच हसले आणि त्या तिघांच्या गप्पा सुरु झाल्या. त्या नादात नीरज एका बाजूला सारला गेला. त्या तिघांना तो हाताची घडी घालून तोंड वाकड करतच बघू लागला.
थोड्यावेळाने विकासची नजर नीरजवर गेली आणि ते त्याला बघून बोलू लागले. “झाल ना आता. तू जाऊ शकतोस.”
तसा नीरज त्यांना रोखून बघू लागला. त्यांनी तिला तिथे थांबवल्याचा राग त्याला आता आला होता. तो काही बोलणार तोच अश्विनी त्याला बोलू लागली.
“नीरज त्यांना का रागात बघत आहेस? त्यांची काहीच चुकी नाही यात.” अश्विनी चिडून बोलू लागली. “सुहास सरांनी तुला फक्त काही दिवस सीईओ केल होत. याचा अर्थ असा नाही की तू त्यांना असा रागात बघशील. तुझ्यापेक्षा मोठे आहेत ते.”
झालं, नीरजने मनातच कपाळवर हात मारून घेतला. तर तिकडे विकास आणि सुहास मनातच खूप हसत होते. नीरजच्या रागाला कोणीतरी लगाम लावणारी जी भेटली होती.
नीरजने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिथून सरळ बाहेर पडला. असही तिथे थांबून त्याचा काहीच फायदा नव्हता.
अश्विनी देखील थोडावेळ तिथे बसून विकास आणि सुहास यांचा निरोप घेत तिच्या घरी जायला निघाली. तिला निघत असताना बघून विकास यांनी त्यांचा एक सिक्युरिटी गार्ड गाडीचा डाईव्हर म्हणून तिच्यासोबत पाठवला.
नीरजने सांगितल्याप्रमाणे त्याच्या सिक्युरिटीने केदारचे हात तोडले आणि सरळ त्याला रस्त्यावर फेकून दिल होत. त्याने रागाच्या भरात तिला परत त्रास देऊ नये म्हणून तिच्या घरापर्यंत तो सिक्युरिटी गार्ड पाठवला होता. अश्विनीला जरा ते विचित्र वाटलं. पण त्या दोघांच्या समाधानासाठी ती यावर काहीच बोलली नव्हती.
मग अश्विनी ऑफिसच्या केबिनबाहेर पडणार तोच विकासने अश्विनीला उद्यासाठी सुट्टी देखील दिली. यासाठी तर ती नाहीच बोलत होती. पण त्या दोघांनी तिला ती जबरदस्ती घायला लावली.
तिकडे वाशीच्या ऑफिसमध्ये मात्र वेगळेच तर्क वितर्क लावले जाऊ लागले. अश्विनीच सतत मुंबईच्या मुख्य ऑफीसला जाण बऱ्याच जणांना रुचत नव्हत. त्यात नीरज ज्या वेगाने तिकडे गेला होता. ते बघून बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यांना काय झालं? ते तर माहिती नव्हत. पण उगाच त्यांच्या मनाला येईल ते ठरवून ते मोकळे होत होते.
ते सगळ ऐकताना संतोष आणि रेवाला खूपच कसतरीच झाल होत. कधी एकदा खर काय ते बाहेर येत. ह्याचीच ते दोघेही वाट बघत होते. किमान ती उद्या आली तर तिला काही विचारता तरी येईल. हा विचार करून ते दोघेही त्यांच्या कामाला लागले.
अश्विनी तासाभरात तिच्या घरी पोहोचली. तिच्यासोबत आलेल्या त्या ड्राईव्हरला देखील तिने आदराने तिच्या घरात बोलावून घेऊन आली. तिच्यासाठी तो एवढ्या लांब आला होता. म्हणून त्याला किमान चहा तरी घेण्यासाठी तिने त्याला आग्रह धरला. तो आग्रह मात्र त्याला मोडता आला नाही.
तो चहा घेऊन गेल्यावर तिच्या आईने त्याच्याबद्दल अश्विनीला विचारले देखील. पण अश्विनीने फक्त तो तिला सोडायला आला होता. एवढंच तिला सांगितल. बाकी काहीच तिला सांगितलं नाही. नाहीतर तिने टेन्शन घेऊन परत तिचा बिपीचा त्रास वाढवून घेतला असता.
नीरजही त्याच्या घरी जरा रागातच पोहोचला होता. काही केल्या त्याच मन शांतच होत नव्हत. आजच्या घटनेत विकास आणि सुहास यांची काहीच चूक नव्हती. हे देखील त्याच्या मनाला पटत होत. कारण केदारने त्यांच्या डोळ्यातही धूळ फेकली होती. हा भाग नव्हता की तिथे अश्विनीच होती. प्रश्न हा होता की त्यांच्या ऑफिसमध्ये एवढी सिक्युरिटी असूनही एका महिलेची सुरक्षितता धोक्यात आली होती. असा कोणीही येऊन काहीही करू लागलं तर? हे त्याला टेन्शन आल होत.
आज विकासही जरा टेन्शनमधेच घरी आले होते. अश्विनीचा विषय होता. त्यामुळे नीरज नक्कीच रागात असेल. याची खात्री त्यांना होती. जसा नीरज आज आल्या आल्या त्याच्या खोलीकडे निघून गेला. तसे विकासही त्यांच्या खोलीत गेले.
त्या दोघांना अस बघून रक्षा आणि तन्वी दोघीही टेन्शनमध्ये आल्या. तन्वी नीरजच्या खोलीत गेली. तर रक्षा त्यांच्या खोलीत विकासजवळ गेली.
“काय झालं?” रक्षाने विकासजवळ बसून त्याच्या हातावर तिचा हात ठेवत प्रेमाने विचारले.
तस विकासने रक्षावर एक नजर टाकली आणि दीर्घ श्वास घेतला. एक ते दोन मिनिटाचा थांबा घेत त्याने आज जे घडलं ते सगळचं तिला सांगून दाखवलं.
हे सगळ ऐकून तिलाही खूप धक्काच बसला.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा