Login

प्रतिक्षा फक्त तूझीच भाग ३०

“मग नीरजच टेन्शन का घेत आहात?” रक्षा “तो ही तर तुमचाच मुलगा आहे ना? मग त्याचे विचारही तुमच्यासारखेच असतील ना. आज अश्विनीला तुम्ही थांबवलं म्हणून तो थोडीच तुमच्यावर रुसून बसेल.”
मागील भागात.

त्या दोघांना अस बघून रक्षा आणि तन्वी दोघीही टेन्शनमध्ये आल्या. तन्वी नीरजच्या खोलीत गेली. तर रक्षा त्यांच्या खोलीत विकासजवळ गेली.

“काय झालं?” रक्षाने विकासजवळ बसून त्याच्या हातावर तिचा हात ठेवत प्रेमाने विचारले.


तस विकासने रक्षावर एक नजर टाकली आणि दीर्घ श्वास घेतला. एक ते दोन मिनिटाचा थांबा घेत त्याने आज जे घडलं ते सगळचं तिला सांगून दाखवलं.

हे सगळ ऐकून तिलाही खूप धक्काच बसला.

आता पूढे.

“बर मला सांगा,” रक्षा समजावण्याच्या सुरात बोलली. “तिथे अश्विनी होती म्हणून इतकं टेन्शन आलं की तिच्या जागी दुसरी कोणती मुलगी असती तरी इतकचं टेन्शन आल असत?”

“हा काय प्रश्न आहे का?” विकास आठ्या पाडून बोलला. “तिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती तरी मला तेवढचं टेन्शन आलं असतं. त्या आपल्या कंपनीत कामाला येतात. जोपर्यंत त्या आपल्या कंपनीत आहेत. तोपर्यंत त्यांच्या सुरक्षिततेची जबादारी आपली असते आणि ती नेहमीच रहाणार.”

“मग नीरजचं टेन्शन का घेत आहात?” रक्षा हलकेच स्मित करत बोलली. “तो ही तर तुमचाच मुलगा आहे ना? मग त्याचे विचारही तुमच्यासारखेच असतील. आज अश्विनीला तुम्ही थांबवलं म्हणून तो थोडीच तुमच्यावर रुसून बसेल.”

तसा विकास तिच्याकडे चमकून बघू लागला. नंतर त्याला शेवटी शेवटी अश्विनी नीरजला कशी भांडली? ते आठवलं आणि ते खुदकन हसले. आता रक्षा त्याला बारीक डोळे करून बघू लागली. आता तिचाही काही गैरसमज व्हायच्या आधीच त्याने अश्विनी त्यांची बाजू घेत नीरजला कशी भांडली? ते तिला सांगून दाखवलं. मग काय? ती देखील खळखळून हसायला लागली.

इकडे तन्वी नीरजच्या खोलीत पोहोचली. तर नीरज त्याच्या खोलीतल्या छोट्याश्या बाल्कनीमध्ये उभा होता. बाहेर पडत चाललेला अंधार आणि त्या अंधारात वाहणारी थंड हवेची झुळूक याचा तो अनुभव घेत होता. सध्या तरी मन शांत करण्यासाठी तो एकच उपाय त्याला दिसला होता.

“दादा.” तन्वीने काळजीने त्याला हाक मारली.

तसा विचारात हरवलेला नीरज वास्तवात आला. तिचा तो काळजीचा आवाज त्याला अजून टेन्शनमध्ये टाकून गेला.

“काय झाल बच्चा?” नीरज पटकन तिच्याजवळ येत बोलला. “काही टेन्शन आहे का? की काही प्रोबेल्म झालाय?”

तसा तन्वीने कपाळावर हात मारून घेतला. “मला वाटलं तू टेन्शनमध्ये आहेस. म्हणून तुला बघयला मी आली आहे.”

तसा नीरज हलकेच हसला आणि तिला त्याच्या कवेत घेतलं.

“काय झाल ते तर मला माहित नाही.” तन्वी हळूच बोलली. "पण बाबाही टेन्शनमधेच घरी आले. तेही त्यांच्या खोलीत जाऊन बसले आहेत. तुही इकडे आला. तुलाही माहिती आहे ना की तुम्ही दोघेही अगदी सारखेच आहात. मग तरी असे वागता?”

आता नीरज चमकून तिच्याकडे बघू लागला. ती लहान असूनही अगदी आई होऊन त्याला ती समजावून सांगत होती. ते बघून तिच्यावर त्याला खूपच प्रेम येऊ लागलं. त्याने हलकेच तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले. “मोठी झालीस रे बच्चा.”

तशी तन्वी हलकीच हसली. “चल खाली, दोघे लैला मजनू आपली वाट बघत असतील.”

तसा नीरज खळखळून हसला आणि दोघे भाऊ बहिण खाली जायला निघाले. ते खाली पोहोचलेचं होते की दोघांना रक्षा आणि विकास जेवणाच्या टेबलावर हलक्या आवाजात बोलताना दिसले. त्यात रक्षा खूपच लाजत होती.

ते बघून नीरज मोठ्याने हसायला लागला. त्याच हसण बघून तन्वीलाही हलक हलक हसायला येत होत. तर रक्षा आणि विकास दचकूनच दोघांना बघायला लागले.

नीरज हसतच तन्वीला सोबत घेत त्यांच्यासोबत जेवणाच्या टेबलावर जाऊन बसला.

“तने, आज माझ्याकडून तुला आईस्क्रीम.” नीरज अजूनही हसत होता.

रक्षा आणि विकास दोघेही त्याला विचित्र नजरेने बघायला लागले.

“तनु बोलली होती की..” नीरज पुढे काही बोलणार तोच तन्वीने त्याचा हात दाबला. पण नीरजला कुठे शांत बसवलं जात होत. “ती बोलली की खाली चल लवकर. आपले लैला मजनू आपली वाट बघत असतील आणि खाली आलो तर ....” नीरज अजून हसायला लागला.

तस रक्षाने विकासवर डोळे वटारले. कारण विकास रक्षासोबत रोमांटीकच बोलत होता. “बोलली होती ना.” आता मात्र रक्षा खरोखरचं जरा चिडून बोलली.

“आई अगं,” नीरज हलकेच हसत बोलला. “प्रेमाला वय नसत. मी तर म्हणतो तुम्ही आता मस्त फिरा. काम काय मी बघून घेईल.” नीरज विकासकडे बघून बोलला.

रक्षा आणि विकास नीरजकडे बघतच राहिले. पुढच्याच क्षणाला विकासने नीरजला हलकेच मिठीत घेतलं.

“खूप टेन्शन आल होत रे.” विकास जरा भावूक झाले.

“मी पण सॉरी,” नीरजही भावूक होऊन बोलला. “उगाच तुमचा राग आला. आता आपण प्रत्येक फ्लोरला आपला एक सिक्युरिटी गार्ड ठेवूया. जो त्या पूर्ण फ्लोरवर त्याची नजर ठेवेल.”

“ठीक आहे,” विकासनेही लगेच दुजोरा दिला. “जस तुला योग्य वाटत. अस पुन्हा होताच कामा नये.”

टेन्शनमधलं वातावरण निवळून ते सगळेच हसत खेळत गप्पा मारात जेवायला लागले. जेवण झाल्यावर झोपायला जाणार तोच नीरज जरा खट्याळ झाला.

“आई बाबा.” नीरज त्यांच्या घरातल्या पायऱ्यावर गेला आणि खट्याळ होत बोलला. “तुम्ही सांगितलं नाही की फिरायला कुठे जाणार?”

दोघेही गोंधळून बघत राहिले.

“नाही म्हणजे तशी तिकीट बुक करायला.” नीरज हलकेच हसत बोलला. “देवदर्शनाची की ह...” नीरज पुढे काही बोलणार तोच किचनमधून एक स्टीलचा ग्लास बरोबर त्याच्या पायाजवळ येऊन नाचायला लागला. तस तो पोट धरून हसत त्याच्या खोलीकडे पळून गेला.

“आई सोबत अशी मस्करी करतोस?” रक्षा किचनमधून ओरडल्या.

“नाहीतर काय उगाच आमच्या संपत्तीमध्ये वाटा.” तन्वीनेही वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले.

तशी रक्षा तिच्या बोलण्याचा अर्थ लावू लागली. तोपर्यंत ती पण तिच्या खोलीकडे पसार झाली. नंतर तो सगळा राग घरातल्या त्या गरीब माणसांवर म्हणजेच नवऱ्यावर निघाला.

“हे ना तुमचेच लाड आहेत.” रक्षा उगाच चिडून बोलू लागली. “तुमच्यामुळेच इतकी शेफारली आहेत ते दोघे.”

“मलाही नीरजचा बोलन पटतय.” विकास विचार करत बोलले.

“काय?” रक्षा आठ्या पाडून बोलली. “अहो ह्या वयात ह..” बोलता बोलता ती थांबली.

“मला चालेल.” विकास त्याचे डोळे मिचकावत बोलला.

“आपला मुलगा लग्नाच्या वयाचा झाला आहे तिकडे बघा आधी.” रक्षा उगाच राग दाखवू बघत होती. “चालले फिरायला.”

“फिरायला नाही गं,” विकासही आता खट्याळ झाला. “हनी..”

तस रक्षाने पटकन त्याच्या जवळ जात त्याच तोंड दाबल. “एकदम चूप.” त्या गडबडीत रक्षा विकासच्या खूपच जवळ आली होती.

घराच्या आणि त्यांच्या संसाराच्या राहाड्यात त्यांना आता एकमेकांच्या जवळ यायलाच जमत नव्हत. जबाबदारीच्या थराची हलकीशी धूळ त्यांच्या प्रेमाच्या थरावर साचली होती. ती आज नीरजच्या ह्या मस्करीमुळे उडवली गेली होती.

“तू इतक्या जवळ आलीस तर कस व्हायचं माझ.” विकास रक्षाच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने बोलला.

तशी रक्षा लगेच त्याच्यापासून बाजुला सरकली. “तुम्हालाही निमित्तच लागतं.” एवढं बोलून ती परत तिच्या कामाला लागली. इकडे विकासही हलकेच हसत त्याच्या बायकोला टक लावून बघत राहीला.

आपल्या नवऱ्याची आपल्यावर असणारी नजर बायकोलाही जाणवली. तशी ती परत किचनमधून मागे वळूनही न बघता बोलली. “जा आपल्या रूममध्ये. माझ झाल की येईल मी.”

ती सरळ सरळ त्याला हॉलमधून हाकलतच होती. मग विकासही हसतच त्यांच्या खोलीकडे निघून गेला.

दुसरा दिवस उजाडला. आज अश्विनीला सुट्टी दिल्याने ती आज निवांतच उठली. बऱ्याच दिवसांनी तिला अशी शांत झोप लागली होती. आजचा पूर्ण दिवस ती तिच्या आईसोबत घालवणार होती.

आज अश्विनी घरीच असल्याने तिची आई आज गप्पपणे हॉलमध्ये बसून होती. कांता मावशी तिच्या आईकडे बघून मिश्कील होत हसत होती. तर तिची आई आठ्या पाडून कांता मावशीला बघत होती. ’ती अश्विनीला काही सांगणार तर नाही ना?’ हे सतत तिच्या डोक्यात फिरत होत.

पण कांता मावशीने अश्विनीला काहीच सांगितलं नव्हत. आधीपासून कामाची सवय होती शरीराला. मग ते शरीर शांत बसून राहण्यातलं नव्हत. कांता मावशी देखील हलकी फुलकीच काम करायची त्यांना परवानगी देत होती. पण आज तर तेही करायची मुश्कील होती.

आज सकाळचा चहा नाश्ता तर कांता मावशींनी बनवला होता. पण दुपारचं जेवण मात्र अश्विनी बनवणार होती. दुपारी मस्त टीव्हीवर एक मुव्ही आणि फक्त आराम. रात्रीच जेवणही अश्विनी बनवणार होती आणि रात्री आईसक्रीम खात खात आईच्या कुशीत गप्पा मारत निवांत पसरून घ्यायचं. असा काहीसा दिवसभराचा कर्यक्रम अश्विनीने ठरवला होता.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all