Login

प्रतिक्षा फक्त तूझीच भाग ३१

दाराची बेल वाजताच कांता मावशीने दार उघडलं. तिने तर त्यांना ओळ्खल नाही पण आता बसलेल्या अश्विनीच्या आईने त्यांना ओळखल आणि आत बोलावलं. अश्विनीच्या आईला ते तिघेही जरा रागातच दिसत होते. अश्विनी मात्र किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. बेलचा आवाज तिनेही ऐकला होता. म्हणून अश्विनी कोण आल? ते बघायला हॉलमध्ये आली. त्यांना बघून अश्विनीचा राग परत उसळून आला.
मागील भागात.

आज अश्विनी घरीच असल्याने तिची आई आज गप्पपणे हॉलमध्ये बसून होती. कांता मावशी तिच्या आईकडे बघून मिश्कील होत हसत होती. तर तिची आई आठ्या पाडून कांता मावशीला बघत होती. ’ती अश्विनीला काही सांगणार तर नाही ना?’ हे सतत तिच्या डोक्यात फिरत होत.

पण कांता मावशीने अश्विनीला काहीच सांगितलं नव्हत. आधीपासून कामाची सवय होती शरीराला. मग ते शरीर शांत बसून राहण्यातलं नव्हत. कांता मावशी देखील हलकी फुलकीच काम करायची त्यांना परवानगी देत होती. पण आज तर तेही करायची मुश्कील होती.

आज सकाळचा चहा नाश्ता तर कांता मावशींनी बनवला होता. पण दुपारचं जेवण मात्र अश्विनी बनवणार होती. दुपारी मस्त टीव्हीवर एक मुव्ही आणि फक्त आराम. रात्रीच जेवणही अश्विनी बनवणार होती आणि रात्री आईसक्रीम खात खात आईच्या कुशीत गप्पा मारत निवांत पसरून घ्यायचं. असा काहीसा दिवसभराचा कर्यक्रम अश्विनीने ठरवला होता.

आता पूढे.

दुसरीकडे नीरजच्या वागण्यात आज काहीच उत्साह नव्हता. आज अश्विनी ऑफीसला येणार नव्हती. तिला रोज बघायची सवय झालेल्या त्याला आजचा दिवस फक्त कामात काढावा लागणार होता. ऑफिसमध्ये कामाने थकलेला नीरज अश्विनीला बघून फ्रेश होत होता. त्यासाठी तो विनाकारण त्यांच्या कॅन्टीलाही जात होता. पण आजचा पूर्ण दिवस कसा काढायचा? हा प्रश्न त्याला पडला.

शेवटी कामही महत्वाच म्हणून तो त्याच आवरून ऑफिसला निघून गेला. आज निघताना मात्र तो शहाण्या बाळासारखा निघाला होता. काय करता? कालचा राग अजूनही रक्षा त्याला दाखवत होती.

पण त्याचा आजचा पडलेला चेहरा बघून रक्षा, तन्वी आणि विकासला एका बाजूला हसू पण येत होत आणि दूस-या बाजूला त्याची काळजीही तितकीच वाटत होती. कारण तिने नकार दिला तर हा तसाच रहाणार होता आणि ते घरच्यांना कधीच बघवलं जाणार नव्हत. विकास आणि रक्षाने तर त्यांचा दूसरा प्लॅनही तयार ठेवला होता. ज्याची भनक ना नीरजला होती आणि नाही अश्विनीला.

विकास आज मुद्दाम घरी थांबला होता. आजचा पूर्ण दिवस त्याला त्याच्या बायकोसोबत घालवायचा होता. एवढी वर्ष एकही तक्रार ना करता रक्षाने सगळ काही संभाळल होत. म्हणून आता तिच्या वाट्याचा वेळ द्यायला विकासने ठरवलं होत.

अश्विनी आजही ऑफिसला न आलेली पाहून रेवा आणि संतोषला टेन्शनच आल.

आज त्यांचा मुख्य मॅनेजर देखील मुंबईच्या ऑफिसला गेला होता. त्यामुळे आजची जबाबदारी डेप्युटी मॅनेजर तनिषवर आली होती. तिचं कोणालाही न कळवता ऑफिसला सुट्टी घेण हे तनिष याला आवडलं नाही. त्यात काल जी मुंबईच्या ऑफिसला घटना घडली, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही अफवा त्या वाशीच्या ब्रांचलाही पोहोचल्या होत्या. त्यात ह्या तनिषने नकारात्मक अफवेवर विश्वास ठेवला आणि तो खरं भासवण्याचं काम माया आणि मनीषाने केलं. इतकं सगळ ऐकून तनिषला अश्विनीचा रागच आला आणि त्याने सरळ त्यांच्या सीईओला म्हणजेच नीरजला फोन लावून अश्विनीची मीठ मसाला लावून तक्रार करायाला सुरवात केली.

आधीच अश्विनी आली नाही म्हणून वैतागलेला तो, तनिषचे अश्विनीवरचे असे बिनबुडाचे आरोप ऐकून अजूनच रागाला आला.

“काल तू मुंबईच्या ऑफिसला होतास?” नीरजने त्याचा राग आवरत त्याला कडक आवाजात विचारलं.

“अम्म,” तनिष जरा चाचरत बोलला. “ते आलं ऐकायला म्हणून.”

“तू होतास का तिथे बघायला?” नीरज आता आवाज चढवतं रागातच विचारू लागला.

तशी तनिषची बोबडीच वळली. “त... ते... ती आज न सांगता आली नाही ना.” तनिषने परत तोच मुद्दा उचलून धरला.

“मी दिली आहे तिला सुट्टी,” नीरजचा सूर अजूनही तसाच होता. “तुला काही प्रोब्लेम?’

“न.. नाही सर.” तनिष त्याला आलेला घाम पुसत बोलला.

“मग?” नीरज

“पण ते आपल्या बाकी स्टाफवर कालच्या गोष्टीचा परिणाम...” तनिष पुढे काही बोलणार तोच नीरजचा रागातला आवाज गरजला.

“यु आर फायर्ड.” नीरजचा राग आता संयमाचा पलीकडे गेला. तिच्याबद्दल अस काही तो ऐकून घेऊच शकत नव्हता. “ज्या माणसाला एखाद्या मुलीच्या स्वाभिमानापेक्षा फक्त पैसा महत्वाचा वाटतो. तो माणूस आमच्या कंपनीत काम करण्याच्या लायकीचा नाही. तू सामान आवर आणि गेट लोस्ट.” एवढ बोलून नीरजने फोन ठेवूनही दिला.

इकडे तनिष तर हे सगळं ऐकून सुन्नच झाला. त्याला आता काय करावं? तेच सुचत नव्हते. भर एसीमधेही त्याला घाम फुटला होता. आपण उगाच त्या दोघींचं ऐकून घेतलं. अस त्याला आता वाटायला लागलं. तसा त्याने लगेच त्यांच्या मुख्य मॅनेजरला फोन लावला आणि आता जे काही झाल ते त्यांना सांगून दाखवलं. त्यावेळेस तो नेमकी सुहास यांच्यासमोर बसला होता.

नीरजने तनिषला कामावरून काढून टाकल्याच मुख्य मॅनेजरने सुहास यांना सांगितले. तस त्यांनी त्यांचा फोन स्पीकरवर टाकायला लावला आणि त्यांना जे झाल ते सगळचं समजून गेल. यावर त्यांनी फक्त नकारार्थी मान हलवली.

ते बघून मुख्य मॅनेजरनेही तनिषला ‘आता काहीच होऊ शकत नाही.’ असे सांगितले आणि फोन ठेवून दिला. मग तनिषही नाईलाजाने त्याच सामान आवरून तिथून जायला निघाला. जाता जाता तो माया आणि मनीषाला भांडायला विसरला नाही.

तनिषला तडकाफडकी काढून टाकल्याने त्या ब्रांचचा पूर्ण स्टाफच हादरून गेला. माया आणि मनीषाही धक्का लागल्यासारखं जाणाऱ्या तनिषला बघत राहिल्या. त्यांना आता अश्विनीवर खूपच राग यायला लागला. पण सध्यातरी त्या काहीच करू शकत नव्हत्या.

“काय जादू केली आहे तिने?” माया मनीषाला बघून वैतागून बोलली.

“बघ ना,” मनीषाही तिच्या कपाळाला हात लावत बोलली. “नशीब त्याने आपल नाव घेतलं नाही. नाहीतर आपणही...” मनीषा बोलता बोलता थांबली. कारण या विचारानेच दोघींना घाम फुटला होता.

आज ते पूर्ण ऑफिस शांततेत काम करत होत. साधी गप्पा मारायचीही कोणाची हिम्मत झाली नव्हती.

तर दुसरीकडे अश्विनीने आजचा पूर्ण दिवस तिच्या आईसोबत घालवला. आजचा दिवस छान गेला म्हणून दोघी मायलेकी आणि कांता मावशी खूपच आनंदात होत्या. पण संध्याकाळी मात्र अश्विनीची छोटी काकू आणि काका त्यांच्या घरी येऊन पोहोचले.

केदारला त्याच्या कर्माची शिक्षा देऊन त्याला घराबाहेर फेकल्यावर नीरजने सरकारी रुग्णवाहिकेला फोन करून त्याला सरकारी दवाख्यान्यात पोहोचविण्याची व्यवस्था केली. केदार तिथे पोहोचल्यावर त्याला त्याच्या घरच्यांचा फोन नंबर विचारण्यात आला. त्याच्या बायको आणि मुलीने तर त्याच्याशी संबंध तोडले होते. म्हणून त्याने त्याच्या बहिणीला फोन लावून जे झाल त्यात मीठ मसाला लावून सांगितलं. ते ऐकूनच ती आता अश्विनीला भेटायला आली होती.

दाराची बेल वाजताच कांता मावशीने दार उघडलं. तिने तर त्यांना ओळखलं नाही पण आता बसलेल्या अश्विनीच्या आईने त्यांना ओळखलं आणि आणि त्यांना बोलावलं. अश्विनीच्या आईला ते तिघेही जरा रागातच दिसत होते. अश्विनी मात्र किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. बेलचा आवाज तिनेही ऐकला होता. म्हणून अश्विनी कोण आल? ते बघायला हॉलमध्ये आली. त्यांना बघून अश्विनीचा राग परत उसळून आला.

“आता काय बाकी आहे?” अश्विनी जरा कडक आवाजात विचारू लागली.

“काय बाकी आहे म्हणजे?” छोटी काकूही रागात बोलली. “काय करून ठेवलं आहेस माझ्या भावाचं?”

“त्याने काय केल ते नाही दिसलं का?” अश्विनी विसरूनच गेली होती की तिने आईला काहीच सांगीतलं नव्हत.

“काय केल त्याने?” छोटी काकू “फक्त विचारपूस करत होता ना.”

“खरचं तुम्हाला त्याच्या चुका दिसत नाही की त्या बघायच्याच नाहीयेत.” अश्विनी चिडून बोलली.

“तुझे जुने धंदे माहिती आहेत ना मला.” छोटी काकू चिडून बोलयला लागली.

“तेव्हा तू बघायला आलेली का?” अश्विनीने आता आवाज चढवला. “तेव्हाही त्याने जे सांगितल तेच खरं मानलस ना. मग तुला स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाहीये.”

“बघितलं का तुमची भाची कशी चुरचुरू बोलत आहे.” छोटी काकू तिच्या नवऱ्याकडे बघून बोलली.

“त्यांना कधी बोलायची संधी दिलीस का?” अश्विनी तिरकस हसत बोलली. “बायकोपुढे बैल झाला आहे त्यांचा.”

“अश्विनी.” काका रागात ओरडले.

“शपथ घेऊन बोला हे खोट आहे ते.” अश्विनी त्यांच्या डोळ्यात रोखून बघत बोलली. “काकुच्या भावाने तुमच्यासमोर एकदा मला नको तिथे स्पर्श केला होता. तरी तुम्हाला काकुसमोर बोलता आलं नव्हतं. याला काय बोलणार?”

“काय चालू आहे ते मला कळेल का?” अश्विनीची आई जरा मोठ्याने बोलल्या.

तोपर्यंत काकूंच्या मोबाईलवर एक फोन आला. पहिले तर त्यांनी तो रागात कट केला. पण पुन्हा पुन्हा तो आल्याने त्यांनी तो उचलला.

त्याच्यावरच बोलण ऐकून त्यांचा चेहरा पांढराफटक पडला. तश्या त्या लगबगीने अश्विनीची माफी मागू लागल्या.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all