मागील भागात.
‘नक्कीच काहीतरी उचापती केलेली दिसत आहे या दोघींनी.’ अश्विनी मनातच विचार करत किचनकडे जाऊ लागली. त्या दोघींना ती जाऊन सरळं सरळं काय केलं? ते विचारणार होती.
ती किचनमध्ये जाऊन काही बोलणार तोच तिच्या आईने तिच्या हातात चहाचा कप दिला आणि तिला सरळ नाश्त्यासाठी टेबलाकडे पाठवलं. तेही तिला बोलायची एकही संधी न देता तिच्या हाताला पकडून तिच्या आईने तिला टेबलापर्यंत पोहोचवले.
आपल्या आईच असं वागणं बघून अश्विनी पुरती गोंधळून गेली. आजवर काम करत नाही म्हणून तासभर प्रवचन देणारी आई, आज चक्क मला बसायला लावत आहे. हा विचारच तिला स्वस्थ बसवून देत नव्हता.
आता पूढे.
अश्विनी तिच्या विचारात असताना तिच्या समोर तिच्या आवडीचा नाश्ताही आला. तसा तिने एक सुस्कारा सोडला आणि नाश्ता करायला सुरवात केली. तिचा नाश्ता आटपेपर्यंत तिचा दुपारचा जेवणाचा डब्बाही तयार होऊन तिच्या पुढ्यात येऊन बसला. बाकी सगळं तर आधीच आवरलेलं होत. मग तो डब्बा घेऊन ती तिच्या ऑफिससाठी निघाली.
तर दुसरीकडे नीरजच्या कालच्या शंकेच समाधान दुसऱ्या दिवशीच्या सकाळीही झालं नव्हत. पण तरी तो आज जरा चांगलच आवरून त्याच्या कामावर जायला निघाला. तो निघत असताना बाकी घरातले त्याला बघत होते. ते त्याला बोलले तर काही नाही. पण गालात मात्र हसत होते. नीरजने याकडे सरळ दूर्लक्ष केल आणि त्याच्या कामावर निघून गेला.
अश्विनी तिच्या कॅबिनजवळ पोहोचली. त्या केबिनच दार उघडताच ती आतमध्ये गोंधळून पाहू लागली. कारण तिची कॅबीन आज तिला खूपच वेगळी दिसत होती. त्या केबीनवर नजर फिरवता फिरवता थी केबीनच्या आत आली. तिने तिच्या कॉलेजला असताना विशाखाला जशी तिची केबिन रंगवून सांगीतली होती. ती अगदी त्याप्रमाणेच आता दिसत होती.
“समस्या तर आपली परीक्षा घ्यायला येतात. आपण त्याच टेन्शन घ्यायचं नाही. फक्त बिनधास्त सामोरे जायचं.” ....
अश्विनीला मागून आवाज आला तस तिने मागे वळुन बघीतल. तर त्या केबिनच्या दारात नीरज उभा होता. त्याच्या हातात फुलांचा गुच्छ होता. आधीच गोंधळलेली ती नीरजला बघून अजून गोंधळून गेली.
“कॉलेजला असताना तू बोलली होतीस.” नीरजने आता हिम्मत करुन बोलायला सुरवात केली. कारण हे सगळेच ऐकल्यानंतर ती काय प्रतिक्रिया देईल? हे त्यालाही माहीत नव्हतं. “आधी कमवायला शिक. आयुष्यात काहीतरी करुन दाखवं. मग मी विचार करेल.”
“कॉलेजला असताना तू बोलली होतीस.” नीरजने आता हिम्मत करुन बोलायला सुरवात केली. कारण हे सगळेच ऐकल्यानंतर ती काय प्रतिक्रिया देईल? हे त्यालाही माहीत नव्हतं. “आधी कमवायला शिक. आयुष्यात काहीतरी करुन दाखवं. मग मी विचार करेल.”
हे सगळं ऐकून अश्विनी चांगलीच शॉकमध्ये गेली.
“हा बघ मी तुझ्यासमोर उभा आहे. ईनामदार कंपनीत कामाला आहे. ते ही पर्मनंट. आता करशील विचार माझा?” नीरजने त्याचे हात पसरले.
अश्विनीला तर आता काय बोलावं? तेच कळत नव्हतं. अश्यातला भाग नव्हता की तो तिला आवडत नव्हता. पण तिचा भूतकाळ तिला पाठीमागे ओढत होता.
“बोल ना?” नीरज जरा तिच्याजवळ येत बोलला.
तशी अश्विनी दोन पावलं मागे झाली. ती खूपच अस्वस्थपणे तिची नजर इकडे तिकडे फिरवत होती.
“काही कमी आहे का माझ्यात?” नीरजने पुढे बोलायला सुरवात केली. “इतके दिवस मी तुझ्या सोबत होतो. काही चुकलं का माझ? की मी अजूनही तुझ्या लायक झालो नाहीये.” नीरज आता काकुळतीला येऊन बोलला.
ते मात्र अश्विनीला बघवल गेल नाही. “न.. नाही, तुझ काहीचं चुकलं नाही. खरं तर मीच तुझ्या लायक नाहीये.” अश्विनी मान खाली घालून बोलली.
“का?” नीरजने जाणून प्रश्न विचारला.
“नाही सांगू शकत.” अश्विनी तिची नजर चोरत बोलली.
तसा नीरज अजून पुढे झाला आणि काल हॉस्पिटलमध्ये जे काही केदार बोलला होता त्याची व्हिडिओ चालू करून तिच्यासमोर धरली. केदारच्याही नकळत त्याने ती व्हिडीओ काढली होती. ती पूर्ण व्हिडिओ बघून अश्विनीला मोठा धक्काच बसला. त्यात केदार जे काही बोलत होता त्यावर तिला लगेच विश्वास बसतही नव्हता. पण ती बेशुध्द पडली होती ही गोष्टही तेवढीचं खरी होती.
“तू अजूनही पवित्र आहेस.” नीरजच्या आवाजात आत्मविश्वास झळकत होता. “जरी काही झालं असत तरी त्याने मला काहीच फरक पडला नसता. हा सगळा उद्योग फक्त तुझ्या मनातली अपराधाची भावना दूर करण्यासाठी केला. मी तुझ्या मनावर प्रेम केल आहे. शरीर काय? ते तर एका वयानंतर झिजून जात. पण मन, ते मात्र नेहमीच जस आहे तस राहत. आता बोल, करशील माझ्याशी लग्न?” नीरजने अश्विनीच्या डोळ्यात बघून विचारलं.
आता अश्विनीच्या डोळ्यासमोरून आतापर्यंत नीरजचा सगळचं वागण झरझर फिरलं. विकास आणि सुहासने नीरज बोलण ऐकण, विकासच्या केबिनमध्ये गेल्यावर तिथल्या विकासच्या फोटोफ्रेमवर अर्धा रुमाल टाकून ती फ्रेम नेहमीच झाकून ठेवलेली असण, मी त्या संकटात सापडलेली असताना त्याच लागलीच तिथे पोहोचण, एवढचं काय? तर तिथलं माझ आणि केदारचं बोलण ही त्याला समजण, शेवटी ही रेनोव्हेट केलेली केबिन ह्या सगळ्या गोष्टी तिला एकच सांगत होत्या की तो नक्कीच कोणी साधी व्यक्ती नाहीये. त्यामुळे ती नीरजला बघत राहिली होती.
हा तो नीरज तिला दिसत नव्हता. जो तिच्यासोबत कॉलेजला होता. आताचा समोर उभा असलेला नीरज तिला पूर्ण अनोळखी वाटत होता. शेवटी हिम्मत करून तिने बोलयला सुरवात केली.
“माझ्या फक्त दोन प्रश्नाचं उत्तर दे.” अश्विनी स्वतःला सावरत बोलली.
“हा बोल.” नीरजला तिच्याकडून अशीच अपेक्षा होती.
“विशाखा कुठे आहे?” अश्विनीने नीरजकडे रोखून पाहील. “आणि तू नक्की कोण आहेस?”
तसा नीरज हलकाच हसला. “वाटलचं मला, ही कल्पना विशाखाची आहे ते बरोबर ओळखशील. शोधायला गेल तर देवही भेटतो. ही तर फक्त माणुस आहे. तिच्यासोबतही तुझी भेट घालून देईल आणि मी माझी ओळखही करुन देईल. पण पहीले माझ्या प्रश्नाच उत्तर दे. कारण मला माझ प्रेम माझ्या ओळखीवर नाही तर माझ्या प्रेमाने मिळवायचं आहे.”
अश्विनी पूर्ण गोंधळून गेली होती. एकीकडे प्रेम नावानेच भीतीही वाटत होती आणि दुसरीकडे त्याचा सहवासही आवडायला लागला होता. काय करु? याच विवंचनेत ती अडकली होती. त्यासोबत तिला तिच्या आईची ही काळजी लागलेली होती.
“आईंची चिंता तू करु नकोस.” नीरजला तिच्या मनातली चलबिचल ओळखली. “त्या आपल्या सोबतच राहतील.”
अश्विनी आता हाताची घडी घालून त्यालाच बघू लागली. तो तिला इथपर्यंत ओळखू लागला होता. याचचं तिला आश्चर्य वाटत होत. लोक काय म्हणतील? याच तिला काहीच देण घेण नव्हतं. पण मग त्याच राहणीमानही उच्चभ्रू दिसत होत. त्याच्या स्टेटसला, त्याच्या घरच्यांना मी आवडेल का? हा विचार आता तिच्या मनात नाचायला लागला.
“माझ्या आईला तू आधीच आवडली आहेस. ती तर कधीच तयार आहे.” नीरजने अश्विनीच्या मनातलं ओळखून तिला अजून एक शॉक दिला. “आणि माझ्या आयुष्यात तुझ्या येण्याने माझ स्टेटसला अजून चार चाँद लागतील.”
अश्विनी त्याला तिचे डोळे मोठे करून बघायला लागली. ‘ह्याला काय मनातलं ओळखायला यायला लागल की काय?' ती मनातच विचार करत बोलली.
“विशाखा कुठे आहे? कारण या सर्व गोष्टी फक्त तिलाच माहीत होत्या.” अश्विनीने परत तोच प्रश्न उचलून धरला.
“बोललो ना, तिची भेट मी तुला घालून देणारचं आहे.” नीरजने तिच्यासमोर तिच्या आवडीचा चाफ्याच्या फुलांचा गुच्छ धरला.
आता मात्र अश्विनी हळूहळू पाघळायला लागली. तिचं हृदय जोरजोरात धडकू लागल. तिचं मन तर ते स्वीकारायला सांगत होत. पण तिची बुद्धी अजूनही तिला अडवत होती.
“जगात भेटणारी प्रत्येक मुल सारखीच नसतात. काही तुझ्या वडीलांसारखी पण असतात. जे बायकोला, मुलीला योग्य तो सन्मान आणि आदर देतात. आता त्यांची जागा तर मी भरुन काढू शकत नाही. पण किमान त्यांच्यासारखंच तुला नक्कीच सूखात ठेवेल.” नीरज तिचा चेहरा वाचत बोलला.
वडीलांच्या आठवणीने अश्विनीचे डोळे जरा भरुन आले. त्यांच्यासोबत घालवलेले प्रेमाचे क्षण तिच्या डोळ्यासमोरून धावू लागले.
“प्लीज यार, एक संधी तर दे.” नीरज आता तिच्यासमोर थेट त्याच्या घुडघ्यावर बसला. “आय स्वेअर, तुला तक्रारीची एकही संधी देणार नाही.”
अश्विनी अजूनही काहीच बोलत नाही ते बघून नीरज परत पुढे बोलायला लागला. “मी तुला कॉलेजला असतानाच बोललो होतो की मी फक्त तुझीच वाट बघेल आणि तेव्हापासून ह्या वेड्या मनाने आजवर फक्त आणि फक्त तुझीच प्रतीक्षा केली आहे.”
एवढं सगळं ऐकून अश्विनीची बुद्धी काम करायचीच थांबली.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा