मागील भागात.
पुढच्या काही क्षणात तन्वीने सांगितल्याप्रमाणे नीरज धावतच येताना दिसला. फरक फक्त इतकाच होता की तन्वी काहीतरी हातात घेऊन पूढे पळत होती. तर नीरज तिच्या मागे पळत तिला चिडून आवाज देत होता.
“तने ते माझ आहे,” नीरज जरा चिडून बोलत होता. तर तन्वी त्याला तिचं वस्तू दाखवून हसून चिडवत होती.
पुढच्या काही सेकंदातच ते दोघ भाऊ बहिण त्या जेवणाच्या टेबलाभोवती गोल गोल फिरू लागले.
आता पूढे.
अश्विनी जेव्हा त्याला रोखून बघत मागे फिरली, तेव्हाच तिचा रुमाल तिच्या हातातून सटकून खाली पडला होता. मागे वळल्या वळल्या ती खुदकन हसताना तिचा तो हात तिच्या तोंडावर हलकेच ठेवला होता. त्याच हातात रुमाल असल्याच अश्विनी विसरून गेली आणि तोच तिच्या हातातून सटकून खाली पडला. तोच रुमाल नीरजने पटकन उचलून स्वतःच्या खिशात ठेवला.
आता फ्रेश झाल्यावर तिच्याच आठवणीत असताना त्याला त्या रुमालाची आठवण आली. मग त्याने त्याच्या पँन्टच्या खिशातून तो रुमाल काढला आणि त्याला बघतच बसला. त्याला बघता बघता किती वेळ झाला? हे त्यालाच समजल नव्हतं.
जेव्हा तन्वी त्याच्या खोलीजवळ पोहोचली तेव्हा तिला त्याच्या खोलीच दर उघडचं दिसलं. तिने आता वाकून पाहिलं तर नीरज एका रुमालाला हातात घेऊन त्याला बघत गालातच हसत त्या बेडवर पसरला होता.
‘आम्हाला वाट बघायला लावून स्वतः मस्त वहिनीच्या स्वप्नात हरवला काय?’ तन्वी मनातच बोलू लागली. आता तिचा भाऊ एका मुलीच्या रुमालाला बघून हसत आहे म्हटल्यावर तो रुमाल तिच्या वहिनीचा असल्याचे तिला समजून गेले होते. मग तिला खट्याळपण सुचला आणि ती हलक्या पावलांनी नीरजच्या बेडजवळ पोहोचली.
नीरज मात्र त्या रुमालाला सारखाच आलटून पालटून बघत होता. त्याच काही दूसरीकडे लक्षच नव्हतं. पुढच्या काही सेकंदात काय झाल? ते काही त्याला समजल नाही. पण तो रुमाल त्याला आता तन्वीच्या हातात दिसायला लागला. मग तो त्याच्या विचारातून जाणीवेत आला आणि आठ्या पडून तन्वीला बघू लागला.
“दे मला.” नीरज त्याचा हात पूढे करून हलक्या आवाजात बोलला. कारण त्याला समजून गेलं होत की त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली होती आणि त्याची ती लाडकी लहान बहिण त्याचा पुरेपूर फायदा उचलणार होती. “त्या बदल्यात मी तुला नवीन मोबाईल घेऊन देईल.”
“अंह,” तन्वीचा खट्याळपणा सुरू झाला. अशी सोन्यासारखी संधी तर ती कधीच सोडणार नव्हती. “वहिनीचा रुमाल आहे हा. हो ना?”
तन्वी हलकेच हसत तिची पावलं हळू हळू मागे टाकायला लागली. तस तसा नीरज तिच्याजवळ जात एक एक पावलं टाकू लागला.
“ते तुझ्या कामच नाही.” नीरज स्वतःवर नियंत्रण मिळवत बोलला.
“असं कसं कामाच नाही.” तन्वी हळू हळू त्याच्या खोलीच्या दाराजवळ पोहोचली. ती तो रुमाल उंचावून त्याला दाखवू लागली. “त्या महागड्या मोबाईलपेक्षाही याची किंमत सर्वात जास्त आहे. ते तर समजलं पाहिजे ना सर्वाना.” तन्वीच्या डोळ्यात आसुरी स्मित उतरलं.
“नाही हं,” नीरज तिला प्रेमाने समजावू लागला. “माझी लाडकी बहिण ना तू?”
“अंह,” तनवी त्याला चिडवत हसून दाखवू लागली. “आता लाड फक्त वहिनीचे.” एवढं बोलून तन्वी पटकन त्याच्या खोलीच्या बाहेर पडली आणि त्या घरात एका मागे एक आवाज घुमू लागले.
“आईऽऽऽऽ” तन्वी जोरजोरात हसून ओरडू लागली.
“तनेऽऽऽऽ“ तिच्यापाठी नीरज तिच्या नावाचा जप करत होता.
तसेच जप करत, पळत, हसत, चिडत ते दोघेही जेवणाच्या टेबलाभोवती फिरू लागले.
“एकदम शांत.” रक्षा त्या दोघांचा चाललेला गोंधळ बघून एकदमच ओरडली.
तेव्हा कुठे नीरजला तो खाली पोहोचल्याचे समजले आणि त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले.
“काय चालू आहे?” रक्षा दोघा बहिण भावाकडे बघून विचारू लागली.
“हे बघा.” तन्वी हातातला रुमाल त्या दोघांना दाखवत बोलली.
“त्याच काय?” विकास त्या रुमालाकडे बघत बोलले. “साधा रुमाल तर आहे तो.”
“तोच रुमाल हातात घेऊन आपला श्रावणकुमार त्या रुमालाच्या स्वप्नात हरवला होता.” तन्वी दात काढून बोलत होती. तर नीरज नकारार्थी मान हलवत त्याच्या जागेवर बसला. असाही आता तिला थांबण्याची वेळ निघून गेली होती.

“हा लेडीज रुमाल त्याच्या हातात?” रक्षाही गोंधळून विचारू लागली.
“अरे अजून समजलं नाही का?” तन्वी तिच्या डोक्याला हात लावत बोलली. “हा वहिनीचा रुमाल आहे” तन्वीने या रुमालाचा एक कोपरा दाखवला. “हे बघा त्यावर ‘ए’ पण लिहिलेला आहे आणि त्यालाच बघण्याच्या नादात आपण सर्व उपाशी थांबलो होतो.” आता तिने तिचे हात तिच्या कमरेवर ठेवले.
“एवढचं आहे तर सांग तस.” विकास “आपण सरळ तिच्या घरी तिला मागणी घालायला जाऊ.”
“एवढं सोप असत तर मी आधीच नसत सांगितलं का?” नीरज विचार करत बोलला. “काका बोलले होते की तिच्या आयुष्यात खूप उलथापालथ झाली आहे. म्हणून अशी तिच्यावर लग्नासाठी मला जबरदस्ती नाही करायची. आधी मलाच तिला समजून घेऊदेत. तिच्याकडून होकार येउदेत. त्याआधीच तुमच्या स्वप्नांना अपेक्षांचे कारंजे नका लाऊ. अजून तिची एक मैत्रीण आहे तिलाही मला शोधायचं आहे.”
“मग तू डिटेक्टीव एजन्सी का सुरु करत नाहीस?” तन्वी हसतच बोलली.
यावर बाकी तिघे तिला रोखून बघू लागले. मग तिला जाणवलं की ही गमतीची गोष्ट नक्कीच नव्हती. मग तिने तिची जीभ चावत नीरजला सॉरी बोलली.
“एक काम कर,” विकास विचार करत बोलले. “उद्या तिला मुंबईच्या मुख्य ऑफिसला बोलावून घे. तिच्याशी जरा बोलायचं आहे.”
“ठीक आहे.” नीरज “पण तुमच्या लग्नाच्या भावनांना आवर घालून भेटा.”
“मी तुझा बाप आहे,” विकास बारीक डोळे करून बोलले. “मी कामाच्या वेळी काम करतो तेच तुझ्या अंगात उतरलं आहे.”
“तेच ना तुमचेच गुण माझ्यात उतरले आहेत.” नीरजने आता रक्षाकडे बघून हलकेच डोळे मिचकावले.
तसा रक्षाला त्याच्या बोलण्याचा रोख समजून आला.
“गाढवा,” रक्षाने लगेच तिच्याच बाजूला बसलेल्या नीरजचे कान ओढले आणि लटक्या रागात बोलू लागली. “आई सोबत अशी मस्करी करतोस?”
“तेच ना बाबांचे गुण,” नीरज आता खळखळून हसला. “दुसर काय?”
“हे ना सगळं तुमच्यामुळे.” रक्षाने विकासकडे पाहिलं.
“आता मी काय केल?” विकासने त्याचे खांदे उडवले.
“काय केल म्हणजे?” रक्षा आठ्या पाडून बोलली. “जागा बघत नाही, वेळ बघत नाही आणि कधीही सुरु होता.”
“काय सुरु करतात?” तन्वी खट्याळ सुरात बोलली.
“लहान आहेस,” रक्षा तिच्या टपलीत एक चापट मारत बोलली. “गपचूप जेवण कर. लगेच काय सुरु करतात म्हणे?” शेवटी शेवटी ती तोंड वाकड करत बोलली.
अश्याच हसत खेळत गप्पा मारत त्यांची जेवण आटपली. पण तो रुमाल काही तन्वीने नीरजला दिला नाही. शेवटी रात्री तिच्या आवडीचा आईसक्रीम आणि पिझ्झाच्या वशिल्यावर नीरजला तो रुमाल मिळाला होता. अर्थात हे सगळ रक्षाच्या नकळत आणून दिलेलं होत.

रात्री जेवणानंतर बाहेरच आणून खाण हे कोणत्याही आईला कधीच आवडत नसतं आणि जरी आणलच तर नंतरचे चार ते पाच दिवस त्यावर बडबड ऐकून घेणे हे तर शास्त्रच असत. म्हणूनच रक्षाच्या नकळत हे सगळं नीरजने तिला आणून दिल. नंतर तो त्या रुमालाला कवटाळून घेत झोपी गेला.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा