प्रवास एकटीचा भाग - 24
एक आठवडा असाच बाहेर फिरण्यात गेला . घरासाठी बरंच काही सामान घेऊन झालं होतं दोघांचं . पण आता ते नीट लावायला ही पाहिजे होत .
जितकं घेतलं ते जसेच्या तसे फक्त आणून ठेवले होते घरात . एका रूममध्ये ठेवून दिले होते सगळे सामान . त्याचाच पसारा खूप दिसत होता . सुट्टीच्या दिवशी लावायचं ठरवलं पण किरणला एकट्याला जमणार होते का ते सगळे .
प्रिया तर हवीच होती , तिच्या मदतीने आणि तिच्या मनाप्रमाणे काही झाले नाही तर मॅडमला राग भरपूर यायचा . म्हणून त्याने प्रियाला बोलवून घेतले फ्लॅटवर .
प्रिया आधीच उतावीळ , ती तर बहाणाच शोधायची त्याच्याजवळ येण्याचा . त्याच्या सोबत वेळ घालवण्याचा .
दोघांना एकमेकांची सोबत खूप आवडायची . कामं कमी आणि गप्पाच जास्त व्हायच्या . यातही प्रियाचं जास्त चालायचं . तिच्यासोबत बोलण्यात तर कोणी जिंकूच शकत नव्हते .
शनिवारी सकाळी किरणने प्रियाला फोन करून बोलवून घेतले . असेही ती येणारच होती .
" किरी , तुम फोन ना भी करते तो भी मैं आज आनेवाली ही थी ".
" अरे वाह , मतलब आज सब कुछ काम हो जाएगा ".
" और नहीं तो क्या , अब वक्त कम हैं हमारे पास . जलदी जलदी करना पडेगा सब काम ".
" हा , एक काम करो . तुम ये किचन का सामान लगा दो सारा . बर्तन , मिक्सर और जो कुछ भी हो ".
" हा , पर किरी हमे फ्रीज भी तो लेना बाकी हैं अभी ".
" वो सब बादमे देखते हैं ना प्रिया . अभी जो कुछ हैं पेहेले उसे तो लगा दे ठीक से ".
" हा , तुम पेहेले एक इलेक्ट्रिशिय को बुलवाके सारे प्लग लगवा दो . पंखे , हिटर , फॅन ये सब कुछ लगवा लो आज ही ".
" हा , अच्छा हुआ याद दिला दिया . अभी फोन करके पुछता हूं उसको ".
" पुछो नहीं किरी , उसको बोलो आज ही करना हैं सब कुछ ".
" अरे हा बाबा , कर लेगा वो ".
दुपार झाली तरी इलेक्ट्रिशियन अजून आलेला नव्हता . प्रिया किरणकडे बघून नुसती चिडत होती . किरण बिचारा सगळं सामान नीट लावत होता हॉलमध्ये .
तोपर्यंत प्रियाचं किचनमधील सगळं आवरून झालेलं होत . काम इतकं झालं होतं की दोघांना कडकडून भूक लागलेली .
इतक्यात बेल वाजली आणि जेवणाचं पार्सल घेऊन कोणीतरी आलं . किरणने ते सगळं घेतलं आणि त्याला बिल दिलं , सोबत टीप पण दिली .
" प्रिया , आओ चलो खाना खाते हैं . प्लेट लेके आना ".
" अरे तुम्हे कैसे पता मुझे भूक लगी थी ?"
" तुम्हारा चेहरा देख के , और जब तुम्हे भूक लगती हैं तो तुम घुस्सा बोहोत करती हो . इसलीये पता चल जाता हैं ". किरण तिला हसत हसत बोलत होता .
" किरी , कुछ भी बोलते हो तुम . जाओ अब पानी लेके आओ तुम ".
किरणने मशरूम ग्रेव्ही , गार्लिक नान , जीरा राईस आणि दाल तडका मागवला होता . सगळं काही प्रियाच्या आवडीच होत , दोघेही पोटभर जेवले .
जेवल्यावर थोडी सुस्ती आली आणि दोघे तिथेच सोफ्यावर थोडा वेळ आराम करत झोपले . इतक्यात पुन्हा बेल वाजली .
" अब कौन आया , देखो तो किरी ".
किरणने दरवाजा उघडला आणि समोर एक वीस बावीस वर्षांचा मुलगा उभा होता .
" सर आपने बुलाया हैं ना , पंखे और गिझर बिठाने के लिये ".
" अरे हा हा , आओ . कितनी देर लगा दि भाई . कबसे इंतजार कर रहे हैं ".
" हा सर अभी कर देता हूं , बस एक घंटा लगेगा सिर्फ ".
तो मुलगा त्याच त्याच काम करू लागला . किरणने त्याला कुठे कुठे काय बसवायचं आहे हे सगळं समजावून सांगितलं आणि सोबतच खिळे आणि हँगर पण लावून घेतले .
तो म्हटल्या प्रमाणे खरंच तासाभरात सगळं झालंही होत लावून .
आता घर कस अगदी नीटनेटकं दिसत होतं . दोघांनी ठरवलं त्याप्रमाणे सगळं तसच झालं होतं .
तरी सुद्धा प्रियाला काहीतरी कमी जाणवत होती .
" किरी चलो ना अब सब लग चुका हैं , बस फ्रीज बाकी हैं वो देखने चलते हैं ".
" प्रिया अभी इस महिने और कुछ मत बोलो . घर भी तो जाना हैं . वहा पे भी शादी के लिये कुछ खर्चा तो होगा ना , बात को समझो ".
" अरे तुम्हे कौन केह रहा हैं , घर हम दोनोंका हैं तो दोनोंको देखना पडेगा ना . इतना सब कुछ तो तुमने ही किया हैं . अब मेरी बारी ".
प्रिया बरोबरच तर बोलत होती . तिला आता जर नाही म्हटले असते तर पुन्हा तीच लेक्चर सुरू होईल . त्यापेक्षा गपचूप गेलेलं बरं , अस म्हणून किरण तयार झाला .
संध्याकाळी दोघेही एका मोठ्या शोरूममध्ये गेले . तिथे बरेच फ्रीज बघितले . एक सिल्व्हर कलरचा फ्रीज खूप आवडला प्रियाला , तिने तोच निवडला .
" चलो हो गया ना अब सब तुम्हारे किचन का ".
" अरे अभी इतनी जलदी कहां ", अस म्हणून प्रियाने एक ओव्हन पण चॉईस केले .
फ्रीज आणि ओव्हन आता फार गरजेचे झाले होते . किमान ऑफिस वाल्या जोडप्यांना तरी , कारण ऑफिसमधून आल्यावर इतकं सगळं घरातलं काम जमणार नव्हते प्रियाला . त्यामुळे तिने स्वतःला आराम व्हावा आणि वेळ वाचावा यासाठी त्या सगळ्या वस्तू घेतल्या होत्या .
खरंच ऑफिसचे कामं आणि घरातील कामं सांभाळून घेणं इतकं सोपं नसत , खूप धावपळ होते . ज्या बायका हे दोन्ही कामं अगदी उत्तम रीतीने पार पाडतात त्यांच खरंच कौतुक करावंसं वाटत मला .
किरणला खरंच कौतुक वाटत होतं प्रियाचं , आणि त्याच्या आईच . कारण त्याची आई पण एक शिक्षिका होती . शाळा , घर आणि मुलं सांभाळून घेत संसार केला त्यांनी . आम्हांला लहानाच मोठं केलं , चांगलं शिकवून स्वतःच्या पायावर उभं केलं . आणि आता मला हव्या त्या मुलीशी लग्न लावून देताय , खरंच खूप भाग्यवान समजतो मी स्वतःला की मला असे आईवडील मिळाले . त्यांच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे .
तिकडे किरणच्या आईने प्रियाच्या मम्मीला फोन करून सर्व विचारून घेतले . तारीख फिक्स झालीच आहे तर बाकीचे कार्यक्रम कसे करायचे हे सगळं ठरवायला हवं ना .
कारण ते त्यांच्या पद्धतीने करतील केरळी आणि हे महाराष्ट्रातील पद्धतीने करणार . त्यामुळे प्रियाची मम्मी वेगळी तयारी करत होत्या आणि किरणची आई त्यांची वेगळी तयारी चालू होती , त्यांच लग्न दोन्ही पद्धतीने होणार होत .
नशीबवानच समजायला हवं किरण आणि प्रियाला , त्यांचे दोघांचे आईवडील त्यांच्या सुखासाठी सगळं काही करायला तयार होते . सगळं अगदी ते म्हणतील तस चाललं होतं . त्यांचं नशीब म्हणावं की आईवडील चांगले आणि समंजस समजावे हेच कळत नव्हते . पण काहीही म्हणा दोघांचं प्रेम मात्र खुप होत एकमेकांवर , आणि शेवटपर्यंत ते असच टिकून राहावे .
सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा
जिल्हा - सांगली , सातारा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा