Login

प्रवास एकटीचा भाग - 25

प्रेम आंधळं असतं पण ते निभावणं आपल्या हातात असतं


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 25


              किरण प्रियाचं घर आता मस्त सजल होत . दोघांची ही खूप मेहनत होती ह्यामागे . कधी एकदाची इथे राहायला येतेय अस झालं होतं प्रियाला . कारण किरण एकटाच तिथे राहत होता आणि प्रिया दुसरीकडे मुलींसोबत राहत होती अजूनतरी .

थोड्याच दिवसांत तिलाही इथेच यायचं आहे राहायला , पण बस थोडेच दिवस ... अस म्हणून ती स्वतःलाच समजावत होती .

लग्न झाल्यावर तर ती येणारच होती तिथे राहायला , सगळं कसं अगदी तिच्या मनासारखं घडत होतं . म्हणजे ती करूनच घेत होती तस . तितकी हट्टी तर ती आधीपासूनच होती .

आता लग्नाची तारीख जवळ येत होती . घरी निदान दहा दिवस अगोदर तरी जावेच लागणार होते .

मम्मीचा सारखा फोन यायचा तिला , लग्नाची खरेदी म्हणजे निदान महिनाभर आधी तरी करावी लागते . पण आता तर अगदी पंधरा दिवस उरले होते . त्यामुळे
घरून फोन चालूच होते सारखे .

इथून घरी जाण्या अगोदर प्रियाने तीच रूमवर असलेलं सगळं सामान त्यांच्या नवीन घरात आणून ठेवलं होतं . म्हणजे लग्नानंतर पुन्हा त्रास नको ह्यासगळ्याचा . आधीच सगळं सेट असलं की कस मग नंतर जास्त गडबड नाही होणार .

किरणला पण पटलं ते , त्याच्या मदतीने सगळं सामान आणून घेतलं तिच्या रूममधून .
कपड्यांच्या तर चार बॅग होत्या आणि ते ही मोठ्या मोठ्या , किरण तर ते बघूनच शॉक झाला .

" प्रिया , इतना क्या भरके रखा हैं इसमे . कितना भारी हैं ये बॅग ".
किरण बिचारा तोंड वाकड तिकडं करत तिची जड बॅग उचलत बोलला .

" अरे उसमे कपडे ही तो हैं , ये दो बॅग मैं सलवार कुर्ती हैं और वो जो तुमने उठाई हैं उसमे जीन्स टीशर्ट हैं ".

" अरे बापरे , इतने कपडे . करोगी क्या तुम इन सबका ".

" अरे क्या करूगी मतलब , कपडे हैं मेरे . अलमारी मे ठीक से रखना हैं मुझे . आओ चलो तुम भी मदत करो मेरी ".

" मैं अब नहीं कुछ कर सकता , मैं थक गया हूं . तुम्हारी भारी भरकम बॅग उठाके ही ".

" लो , अभि से हार मान ली तुमने . आगे जाके क्या होगा मेरा हे भगवान ". प्रिया डोक्याला हात लावून बोलली .

" अभि से भगवान को क्यो याद कर रही हो , अब तुम्हारा भगवान मैं ही हूं ".

" अच्छा ... तो भगवान जी , मेरे लिये एक कप चाय बना दोगे प्लिज ".

" हा बालिके , जरूर . बस पाच मिनिटं रुक जाओ ".

अस म्हणून हसत हसत किरण किचनमध्ये गेला आणि त्याने खरंच दोन कप चहा बनवून आणला .

तोपर्यंत प्रियाचे बऱ्यापैकी कपडे सगळे लावून झाले होते कपाटात .
राहिलेले त्यांनी दोघांचं कपाट नीट व्यवस्थित लावून घेतलं .

झालं , आता सगळं काही व्यवस्थित होत . घर पण छान तयार आहे आणि लग्न पण होणार आहे .

    आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत आपण लग्न करून संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवणं , जीवनात
ह्यापेक्षा जास्त आनंद तो दुसरा काय . 

" प्रिया , तूम घर कब जानेवाली हो ?"

" मम्मी तो बोल रही हैं , की कल ही आजाओ , पर मैने छुट्टी सिर्फ दो हफ्ते की ली हैं . उससे ज्यादा मिलेगी भी नहीं मुझे ".

" वैसे मुझे भी ज्यादा दिन छुट्टी नहीं मिलेगी . हम दोनो एक जैसे ही तारीख पे छुट्टी लेते हैं ऑफिससे , क्या केहेती हो ".

" हा किरी , बात तो तुम ठीक ही कर रहे हो . कल ही ऑफिस जाके हम बता देते हैं . और शादी के लिये आओ ये भी बोल देते हैं ".

" किरी , तुम बताओ तुम कब जाओगे घर ?"

" मैं जाऊंगा घर , पर एक हफ्ता पेहेले ही ".

" बस एक हफ्ता पेहेले , फिर तुम्हारी शॉपिंग कब करोगे ".

" अरे मैं बस एक थ्री पीस सूट लुंगा और एक रेडिमेड कुर्ता . बस इतनी ही करनी हैं शॉपिंग , ज्यादा कुछ नहीं चाहीए मुझे ".

" अरे ऐसें कैसे किरी , मैं जो पेहेनने वाली हूं उसपे तुम्हे मॅचिंग लेना पडेगा , अभि से बता देती हूं ".

" तो तुम पेहेले कर लो अपनी शॉपिंग , बादमे मैं मेरा देखता हूं ".

" हा मैं जाऊंगी दो दिन के बाद घर , तब कर लेंगे हम सब कुछ ".

" और तुम कुछ अलग मत लेना , मैं जो बोलूंगी वही लेना ".

" हा , मेरी माँ . तुम जो बोलोगी मैं वही करुंगा . अब बस या कुछ और भी हैं ".

" किरी .... प्रिया किरणच्या जवळ येत बोलली .
दो महिने पेहेले कितनी टेंशन थी हमे . और आज देखो सब कुछ ठीक हो गया . हमारी शादी होने वाली हैं किरी . मुझे तो ये सब एक सपने जैसे लग रहा हैं ".

" सपना क्यू , मैं सामने खडा हूं तुम्हारे ".
किरण तिच्या आणखी जवळ जात बोलला " तुम कहो तो सपने से जगा दु तुम्हे ".

" हट , कुछ भी ". प्रियाने त्याचा हात झटकत त्याला दूर लोटले .
पण लगेच तीच त्याच्या जवळ गेली आणि किरणने तिच्या कपाळाला किस करत दोघांनी एकमेकांना घट्ट मिठीत घेतले .

दोघांचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार होत . लग्नाची गोड स्वप्न बघत किरण आणि प्रिया आपापल्या घरी जाण्याची तयारी करत होते .


सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली सातारा

🎭 Series Post

View all