प्रवास एकटीचा भाग - 29
लग्नाची खरेदी म्हटलं की वेळ तर लागणारच . पण किरणची खरेदी सुद्धा जवळपास सगळीच झालेली होती . मुलांना तसं काय लागत म्हणा , त्यांना रेडिमेड कपडे मिळाले की भारी काम होत त्यांचं . आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रियाला मॅचिंग होतील असे कपडे मिळाले शेवटी . नाहीतर संपूर्ण लग्नात तिने राग राग केला असता किरणचा . आणि हे सगळं किरणला नंतर झेलावं लागलं असत ही गोष्ट वेगळी .
म्हणून त्याने तिला आधीच सगळे घेतलेल्या कपड्यांचे फोटो काढून पाठवुन दिले . त्याचे घेतलेले ड्रेस तसे चांगलेच होते पण तरीही प्रियाला त्याचा हळदीचा कुर्ता पायजमा आवडला नाही , म्हणे खूप साधा वाटतोय . आता सिल्कचा गोल्डन ड्रेस आणि त्यावर एका बाजूला मस्त डायमंड पॅच लावलेलं होत , पण तरी सुद्धा प्रियाला तो आवडला नाही . काय करावं आता , किरणला जाम टेंशन आलेलं .
नवीन घ्यायला जावं तर तितका वेळही नाहीये आता . करावं तरी काय आता , विचार करत बसलेला किरण डोक्याला हात लावून .
" काय झालं भाऊजी , काही झालंय का ?"
" वहिनी , आता हा ड्रेस मॅच होत नाहीये म्हणे प्रिया तिच्या ड्रेसला . दुसरा घे म्हणतेय ती , आता कुठून आणू मी ".
तिचा ड्रेसचा फोटो दाखवत किरण वेदिकाला बोलला .
तिचा ड्रेसचा फोटो दाखवत किरण वेदिकाला बोलला .
" नवीन ड्रेस आणायची काय गरज आहे भाऊजी , आपण तिच्या ड्रेस सारखी तिला मॅच होईल अशी ओढणी घेऊया फक्त . मग होऊन जाईल मॅच , काय म्हणता ".
" गुड आयडिया , वहिनी यु आर ग्रेट . माझं काम वाचलं ". अस म्हणून किरण आनंदाने उड्या मारू लागला .
" बरं मी काय म्हणते , इथे गावातल्या एका दुकानात बघून येते मी . हवं तर तुम्ही पण चला सोबत . आवडली तर लगेच घेऊन टाकू मग ".
" ओके , चला लवकर ".
आईला सांगून दोघेही ऍक्टिव्हा वर निघून गेले . आणि ओढणी घेऊनच आले घरी .
आईला सांगून दोघेही ऍक्टिव्हा वर निघून गेले . आणि ओढणी घेऊनच आले घरी .
घरी येताच किरणने ड्रेस पूर्ण घालून बघितला , त्यावर गळ्याभोवती ओढणी टाकून बघितली .
" वाह , काय हिरो सारखे दिसताय भाऊजी तुम्ही . प्रियाने तुम्हांला अस पाहिलं तर बघतच राहील ती तुम्हांला ".
" काहीही काय वहिनी , आग आज तुझ्यामुळे वाचलो बघ मी . नाहीतर माझं काही खरं नव्हतं "
हे ऐकून तर वेदिका खळखळून हसायला लागली .
" भाऊजी , किती घाबरता हो तुम्ही तिला ".
" अहो तुम्हांला नाही माहिती कशी आहे ती , सगळं परफेक्ट लागत तिला ".
" हम्मम , पण आता झालं ना सगळं मॅच . मग आता तुमची बॅग भरायला घ्या . सगळे ड्रेस व्यवस्थित ठेवा , विसरु नका काही ".
" हो , रात्री जेवलो की आपण भरू बॅगा . मला तुमची मदत लागेल . त्यामुळे तुम्ही लवकर आवरा तुमचं ".
" हो , आवरते मी लवकरच . बरं काय खाणार तुम्ही आता ".
" तुम्हांला आवडेल ते बनवा , मला तर काहीही चालेल ".
" हा पण त्याच्या आधी तुमच्या नवऱ्याला फोन करून घ्या , निघाला का तो विचारा त्याला . आज रात्री निघणार होता तो ".
" हो भाऊजी , करते मी त्यांना फोन ". असे म्हणून वेदिका निघून गेली .
घरात प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने तयारीला लागला होता .
रात्री जेवणं झाल्यावर वेदिका सगळं किचनमधील आवरत होती . तेव्हढ्यात आई आल्या ,
" वेदू , तू राहू दे आवरायचं . मी बघते इथलं , तू पहिले किरणची बॅग भरायला घे बरं ".
" हो आई , हे काय इतकं किचन ओटा साफ झाला की जातच होते मी ".
" तू आधी बॅग भर जा , इथलं मी करून घेते ". आईने सांगितल्यावर वेदिका पटकन पदराला हात पुसून निघून गेली .
" भाऊजी , झाली का तयारी ".
" वहिनी , तुझ्याशिवाय माझं काहीच होणार नाही . लवकर ये आणि हे इतके कपडे भरायचे आहेत बॅगेत ". किरण बेडवर ठेवलेले कपडे दाखवत बोलला .
" अहो इतके कपडे कशाला न्यायचे आहेत . तुमचे लग्नात घालायचे घ्या फक्त आणि त्याव्यतिरिक्त फक्त दोन साधे ड्रेस घ्या . हे इतके घेऊन जायची काहीच गफज नाहीये ".
" बरं , अस म्हणताय तुम्ही . पण मला लागतात वहिनी इतके , म्हणजे झोपतांनाचा तर ड्रेस घालणार ना मी माझा . मग बाकी हे दोन ड्रेस तर राहतात बॅग मध्ये भरायचे ".
" तुम्ही थांबा बरं जरा , मी भरते बरोबर ". अस म्हणून वेदिकाने आधी लग्नाचा ड्रेस , मग साखरपुड्याचा , हळदीचा आणि मेहंदीचा ड्रेस ठेवला . अजून किरणने जवळपास पाच जोडी ड्रेस घेतले होते . त्यातले वेदीकाने जे लागतात तितकेच घेतले आणि बाकीचे पुन्हा कपाटात ठेवुन दिले .
वेदीकाने एक धोतर पण घेतलं होत किरणसाठी आणि एक टोपी . जेव्हा मराठी पद्धतीने लग्न होईल तेव्हा घालता येईल म्हणून तिने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती .
खरंच वहिनी असावी तर अशी , वेदिका कडे बघून तर कोणालाही असेच वाटेल . ती होतीच तशी खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ . ती घरात आल्यापासून आईला खूप आराम मिळत होता आणि तात्यांना वेगवेगळं खायला मिळत होते त्यामुळे त्यांची मजा होती . खूप कमी वेळात सगळ्यांना तिने आपलंसं केलं होतं . ती नसली की आईला काहीच सुचत नसायचं . प्रत्येक कामात किंवा खरेदीला ती हवीच असायची .
किरणच्या लग्नाचं जवळपास सगळं एकट्या वेदीकाने सांभाळून घेतलं होत म्हणून बरं , नाहीतर इतक्या कमी वेळात आईला एकटीला हे बिलकुल शक्यच नव्हतं . वेदिका पण अगदी आपुलकीने सगळं करत होती .
सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा
जिल्हा - सांगली , सातारा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा