Login

प्रवास एकटीचा भाग - 32

प्रेम आंधळं असत पण ते नात शेवटपर्यंत निभावणं आपल्या हातात असत


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा - भाग 32


कुलकर्णी मंडळी पोहोचली एकदाची लग्नाच्या हॉल पर्यंत . तिथे बाहेर बर्याच पाहुण्यांनी गर्दी केली होती , फक्त किरणला बघायला . त्यांचा जावई एक मराठी मुलगा आहे , हे कळल्यावर तर सगळेच पाहुणे बाहेर आले .

सगळ्यांनी शुभेच्छा सोबत पुष्पगुच्छ हारतुरे देत सगळ्यांच जोरात स्वागत केलं . त्यांना सगळ्यांना चहा नाश्ता देण्यात आला , आणि रात्रीच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला सांगितले . प्रत्येकाला त्यांचे रूम दाखवायला स्वतः प्रियाचे भाऊ हजर होते . ते दोघेही त्यांच्या पप्पांच अर्ध काम बघायचे . भाऊ असतातच बहिणीच्या लग्नात ही सगळी कामं करायला पुढे .

किरणला तर पोहोचता क्षणी कधी एकदा प्रियाला बघतोय अस झालं होतं . त्याची भिरभिर नजर सगळीकडे फिरत होती , पण शोधत मात्र फक्त प्रियाला होती .

" किरण , क्या हुआ .... कुछ चाहीए तुम्हे . या किसीका इंतजार कर रहे हो क्या ". प्रियाच्या पप्पांना पण समजले होते की किरण प्रियाला शोधतोय .

" प्रिया अभी शामको आएगी यहा , संगीत का प्रोग्राम हैं तो वो तैयार होके ही आएगी " ,तब मिलना उसे .

" हा पापाजी , मैं वो अपना रूम देखा रहा था .  किधर हैं ???" किरणने मुद्दाम दुसरंच काही तरी विचारलं म्हणजे प्रियाला बघता येईल . पण प्रिया तर तिच्या रूममध्ये असणार , आता रूममध्ये कसे जायचे त्याचा विचार करू लागला .

" अरे विचार करायची काय गरज आहे , वहिनी आहे ना आपली . आता तीच घेऊन जाऊ शकते मला प्रियाकडे ". मनातल्या मनात बोलत किरण वहिनी कडे आला , आणि तिला सगळं काही सांगितलं .

मग काय निघाले दोघेही प्रियाची रुम शोधायला . खूप शोधले पण प्रियाची रूम काही सापडली नाही .

त्याने खिशातून फोन काढला आणि लगेच प्रियाला मेसेज केला .

किरण - प्रिया कहां हो तुम ??

प्रिया - यही पे हूं , तुम्हारे आस पास .

किरण - प्रिया अभी तुम मजाक मत करो , प्लिज जलदी बता दो कहां हो तुम . मैं कबसे देख रहा हूं , पर तुम कही नहीं हो यहा पे .

प्रिया - मेरा दुल्हा राजा आ गया मुझे लेने के लिये , हाय ....आज मैं बोहोत ज्यादा खुश हूं किरी .

किरण - मैं भी , अब जलदीसे बता दो कहां हो तुम .

प्रिया - अरे थोडा तो सबर करो किरी , हम अभी थोडी ही देर मे मिलने ही वाले हैं ना . बस और थोडी देर वेट करलो किरी .

किरण - क्या यार तुम भी .

       
किरणला प्रियाला बघायचं होत , पण आता तीच त्याला थोडावेळ थांबायला सांगत होती . त्यामुळे त्याचा पडलेला दिसला . पण आता कार्यक्रम आहे त्यावेळी तर प्रिया येणारच होती , म्हणून तो ही तयारी करायला गेला .

         प्रिया त्याला थोड्याच वेळात भेटणार होती , आणि ते ही मस्त मेकअप करून . आजकाल संगीत मेहेंदी असे बरेच कार्यक्रम करतात लग्नाच्या आधी . सगळे जण हसी मजाक करतात , एकत्र नाचतात , गाणी म्हणतात .... आणि खूप सारी मजा करतात .

आई आणि तात्यांना एक सेपरेट रूम होती , तसेच सुधाकर आणि वहिनीला सुद्धा . किरणची तर स्पेशल रूम होती नवरदेवाची , त्यालाही आता तयार व्हायचे होते कार्यक्रमासाठी .

       सात वाजून गेले आता संगीत कार्यक्रम लवकरच सुरू होणार होता . किरणने पण त्याचा थ्री पीस सूट घातला , फिकट आकाशी रंगाचा शर्ट आतमध्ये घातला जेणेकरून तो प्रियाला मॅचिंग होईल . हा रंग खूप खुलून दिसत होता त्याच्यावर .

वहिनी आणि आई दोघींना तयार करायला त्यांनी एक पार्लरवाली मुलगी पाठवली होती . आई तर काही मेकअप करून घेत नव्हती . पण वहिनी मात्र खूप छान तयार होऊन खाली आली होती .

वेदीकाने डिझायनर साडी घातली होती फिकट अबोली रंगाची , संपुर्ण साडीवर डायमंड चमकत होते . केसांचा मेसी बन बांधून त्याला एक छोटुशी डायमंडची नाजूक फुलांची क्लिप लावली . वेदिकाला मॅचिंग होईल असाच ड्रेस सुधाकरने ही घातला होता , कारण वेदीकाने त्याचे कपडे चॉईस करून घेतले होते . सुधाकरने थ्री पीस घातलेला , पण आतला शर्ट त्याने वेदिकाच्या साडीला मॅचिंग होईल असाच घेतला होता . आता हे दोघेही नवरदेव नवरी पेक्षा कमी दिसत नव्हते .

किरण , तात्या आई आणि सुधाकर वहिनी सगळे तयार होऊन खाली आले . वेदीकाने दोन डायमंडचे ब्रोच घेतले होते किरण आणि सुधाकरसाठी , ते त्यांना दोघांना तिने कोटच्या एका बाजूला लावून दिले .

हॉलमध्ये जाऊन ते सगळ्यात पुढे बसले . अर्धे लोकं जमले होते तर बाकीचे अजून तयार होत होते , तशी बरीच गर्दी जमली होती .

एक छानसं गाणं वाजल आणि प्रिया तिच्या मम्मी पप्पांचा हात पकडून हॉलमध्ये आली , टाळ्यांचा कडकडाट झाला . खूपच जास्त सुंदर दिसत होती ती , तिने ही फिकट आकाशी रंगाचा वन पीस घातला होता . त्यात प्रिया एकदम क्युट दिसत होती , छोटीशी बाहुली सारखी . डोक्यावर एक छोटुसा डायमंडचा क्राऊन , हातात डायमंडच्या बांगड्या , गळ्यात नाजूक डायमंड नेकलेस घातलेला होता . ती जस जशी पुढे चालत येत होती , तसा किरण तिच्याकडे बघून उठून उभा राहिला . तिने सुद्धा त्याला बघताच चेहऱ्यावर एक मोठ्ठी स्माईल आली .

     किरण प्रियासाठी एक वेगळी खुर्ची ठेवली होती . त्यावर दोघेही एकमेकांजवळ बसले . सगळ्यांच्या नजरा दोघांवरच खिळून होत्या . दोघेही अगदी एखाद्या राजकुमार राजकुमारी सारखे दिसत होते .

पहिले खुप सारे फोटोज काढले दोघांचे , दोघांच्या आईवडिलांना बोलवून त्यांच्या सोबत पण काढले मग नंतर बाकीच्यांसोबत पण काढले . इतक्या फोटोत स्माईल देऊन देऊन तोंड दुखून आलं होतं दोघांचं .

आता मस्त एक एक करून सगळ्यांचे डान्स होते . पहिले प्रियाच्या सगळ्या चुलत बहिणींचा डान्स होता मग सगळ्या भावांनी एकत्र डान्स केला . काही गाणी त्यांच्या भाषेतील होती आणि काही हिंदी गाणी होती . पण खूप मजा येत होती , प्रियाने सुद्धा किरणसाठी एक स्पेशल डान्स केला . तो बघून तर किरणला तिच्यातील आणखी एक टॅलेंट समजलं .

सगळ्यात शेवटी तर प्रियाच्या मम्मी पप्पांनी पण डान्स केला , तो ही एका जुन्या गाण्यावर ...
" आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर " .... गाणंही इतकं भारी निवडलं होत की सगळेच नाचायला लागले त्यांच्या सोबत .

       किरणला पण त्यांनी त्यांच्यात सामील करून घेतलं . किरण तर वेड्यासारखा नाचत होता , नाचता कुठे येत होतं त्याला . तो आपला गणपती डान्स करत होता सगळ्यांमध्ये . त्याला बघून सगळेच हसायला लागले .  किरण प्रिया आणि तिचे घरचे सगळेच खूप मजा करत होते पण आई आणि तात्या लांबूनच त्यांना बघून टाळ्या वाजवत होते .


तेव्हाच किरण आणि प्रियाने एकमेकांना त्यांची साखरपुड्याची अंगठी घातली . किरणने तर गुडघ्यावर बसून प्रियाला अंगठी घातली तेव्हा सगळे जण जोरजोरात ओरडायला लागले ... किती तो उत्साह होता सगळ्यांचा . सगळ्यांनी त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून आशीर्वाद दिला .

संगीत कार्यक्रम आणि त्यातच साखरपुडा तर खूप भारी झालेला . आता उद्या सकाळी हळद होती , त्याचीच तयारी चालू होती खाली . सगळे नाचून नाचून दमले त्यामुळे पटकन जेवून आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले .

किरणला तर सारखी प्रियाच दिसत होती , कित्ती सुंदर दिसत होती ती . त्याच्या आयुष्यात आलेल्या एखाद्या परी सारखी . जादूची कांडी फिरवली आणि सगळं आयुष्य एकदम बदलून गेलं होतं किरणच . दोघांची जोडी कायम अशीच राहू दे , प्रत्येक जण त्यांना असाच आशीर्वाद देत होते .



सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all