प्रवास एकटीचा भाग - 35
लग्नाचे सगळे विधी छान पार पडले , सगळ्यांचे जेवणही झाले . आता फक्त जो प्रत्येक मुलीला नकोसा असतो तो क्षण जवळ आला होता .
" पाठवणी " , मुलीची पाठवणी म्हटले की तिचे आईवडील खूप हळवे होतात . पण इकडे प्रियाचे मम्मी पप्पा तर एकदम बिनधास्त होते . त्यांना माहिती होते की आपली मुलगी सगळं काही व्यवस्थितपणे सांभाळून घेईन , त्यामुळे काळजीच काही कारण नाही .
किरण प्रियाची फ्लाईट रात्री दोन वाजता होती , त्यानुसार त्यांनी सगळी आवराआवर केली . प्रियाने लग्नाचा सगळा साज उतरवून ठेवला , सगळे दागिने व्यवस्थित बांधून ठेवले . फक्त गळ्यात मंगळसूत्र तेव्हढे ठेवले , आणि साधीच साडी घातली . ती कितीही साधी राहिली तरी तिच्या चेहऱ्यावरचं तेज काही कमी नव्हत .
रूममधील सगळं आवरून आई तात्या , सुधाकर आणि वेदिका खाली आले बॅग घेऊन . किरणच सुद्धा आवरलेलंच होत , तो प्रियाची वाट बघत बसला होता . प्रिया पण येईलच थोड्या वेळात म्हणून वेदीकाने सांगितले .
प्रियाच्या बॅग घेऊन तिचे दोन्ही भाऊ खाली आले ,त्यांच्याही डोळ्यात पाणी दाटून आले होते . प्रिया पण तिच्या मम्मी पप्पांसोबत खाली आली . प्रियाला खूप रडायला येत होते , अस वाटत होतं ती आधी खूप रडलेली असावी इतके तिचे डोळे लाल झालेले दिसत होते . तिचे पप्पा तर अगदी लहान मुलासारखे तिला गोंजारत होते , सगळ्या मामी मावशी रडत होत्या पण तिची मम्मी मात्र खंबीर दिसत होती .
त्या तिला समजावून सांगत होत्या , पण तो क्षणच असा असतो की प्रत्येक जण हळवा होतो . प्रियाच्या डोळ्यातले पाणी थांबायचं नाव घेत नव्हते . वेदिकाला ही ते बघवल नाही आणि नकळत तिच्याही डोळ्यात पाणी आले .
प्रत्येक मुलीला आपलं माहेर सोडून सासरी जावेच लागते , पण का ???
ह्याच उत्तर अजून तरी कोणाला देता येत नव्हतं . नियमच लावून दिला होता जणू जगाने तसा . त्यामुळे प्रत्येक मुलीला आपले आईबापाचे घर कितीही आवडते असले तरी एक ना एक दिवस तिला सासरी जावेच लागते , जगाची रितच न्यारी म्हणावी .
ह्याच उत्तर अजून तरी कोणाला देता येत नव्हतं . नियमच लावून दिला होता जणू जगाने तसा . त्यामुळे प्रत्येक मुलीला आपले आईबापाचे घर कितीही आवडते असले तरी एक ना एक दिवस तिला सासरी जावेच लागते , जगाची रितच न्यारी म्हणावी .
प्रियाचे पप्पा तात्यांजवळ आले , त्यांना हात जोडून म्हणू लागले .
" हमारी प्रिया थोडी जिद्दी हैं , आप संभाल लेना उसे . कुछ गलती हो जाए तो दिलं बडा कर के माफ कर देना ".
त्यांना इतकं अस हळवं होतांना पाहून तात्यांनी त्याचे जोडलेले हात हातात घेऊन सांगितले ...
" आप चिंता मत करो , प्रिया समझदार हैं . हमारे घर मे उसे वही मान सन्मान मिलेगा जो यहा पे मिलता हैं . हम उसे हमेशा खुश रखेंगे ".... किरणही पुढे बोलला .
" पापा , आपका जब भी मन करे प्रियासे मिलने का तो आ जाना दिल्ली बेझिजक . नहीं तो हम आएंगे आपके पास ".
त्यांनी सगळ्यांनी आपापल्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला , पण शेवटी तो ही एक मुलीचा बाप होता . मुलगी सासरी जातांना ज्या यातना तिच्या वडिलांना होतात त्या कोणालाच शब्दांत व्यक्त न करता येण्यासारख्या आहे .
अखेर सगळ्यांचा निरोप घेऊन दोघेही नवरदेव नवरी फुलांनी सजवलेल्या गाडीमध्ये जाऊन बसले .
किरण प्रियाची जोडी निघाली एयरपोर्टला जाण्यासाठी . बारा वाजत आले होते , पोहोचायला निदान अर्धा तास तरी लागणार होता . त्यामुळे लवकरच सगळ्यांचा निरोप घेऊन आता मिसेस प्रिया किरण कुलकर्णी निघाली होती सासरी .
किरण प्रियाची जोडी निघाली एयरपोर्टला जाण्यासाठी . बारा वाजत आले होते , पोहोचायला निदान अर्धा तास तरी लागणार होता . त्यामुळे लवकरच सगळ्यांचा निरोप घेऊन आता मिसेस प्रिया किरण कुलकर्णी निघाली होती सासरी .
रात्रीची फ्लाईट होती त्यामुळे गाड्यांची गर्दी जास्त नव्हती , लगेचच अगदी पंधरा मिनिटांत ते पोहोचले . फ्लाईट एकदम वेळेवर होती . महाराष्ट्र मध्ये पोहोचायला निदान चार तास लागणार होते . म्हणजे पहाटे पहाटे ते पोहोचणार .
विमानात बसल्यावर खाली बघतांना वेदिकाला खूप मजा येत होती . येतांना दिवसाची फ्लाईट होती तर आता रात्रीची फ्लाईट होती , त्यामुळे तिला दोन्ही अनुभव घेता आले . घरी गेल्यावर खूप सारी तयारी करावी लागणार होती वेदिकाला , त्याची काळजी ती आताच करत बसली होती .
संपूर्ण प्रवासात प्रिया किरणला बिलगून शांत बसली होती , त्यानेही तिचा हात सोडला नव्हता . धरलेला हात आणखी घट्ट करत त्याने तिला जवळ कुशीत घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला . रडून रडून डोळे सुकले होते तिचे , डोकं ही दुखायला लागले होते . तरी पण तिच्या डोळ्यातून काही पाणी थांबायचं नाव घेत नव्हते . अधूनमधून काही आठवण आली की लगेच डोळे भरून येत होते तिचे , किरण तिच्या डोळ्यातील पाणी हलकेच रुमालाने पुसत होता .
लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यात एक नविन वळण असते . ते नवीन घर , नवीन माणसं , अनोळखी जग सगळं तिला आपलंसं करायचं असत तिच्या स्वभावाने . पण त्या नवीन घरात एक हक्काचा माणूस म्हणजे तिचा नवरा , प्रत्येक गोष्टीत तो आहे सोबत ही जाणीवच पुरेशी असते .
संपूर्ण प्रवासात किरण प्रिया त्यांच्या नव्याने सुरू झालेल्या संसाराचा विचार करत होते . त्यांचा जॉब , घर , गाडी आणि पुढे जाऊन मुलं ह्या सगळ्याचा विचार करून ते आताच खूप आनंदी होत होते .
स्वप्नात बघितलेल्या सगळ्या गोष्टी आज खऱ्या अर्थाने घडल्या होत्या , आणि ते ही इतक्या लवकर ... दोघांना अजूनही हे स्वप्नवतच भासत होते . विचार करता करता पोहोचले होते ते महाराष्ट्रात , पण प्रियाचे डोळे बंद होते . त्याने हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हटले ," मिसेस किरण ... उठो घर अभी आने ही वाला हैं ".
सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा