प्रवास एकटीचा भाग - 36
नवरदेव नवरी पोहोचले एकदाचे त्यांच्या घरी , नुकतीच पहाट झालेली होती त्यामुळे गावात थंड आणि शांत वातावरण होते . कोंबडे आरवत होते , पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती . नुकत्याच मोगर्याच्या कळ्या उमलून त्यांचा मंद सुवास दरवळत होता . काहींच्या अंगणात सडा रांगोळी घातलेली दिसत होती .
दारापुढे येताच आईंनी प्रियाला आणि किरणला तिथेच थांबवले . वेदिका आणि आई घरात जाऊन तयारी करू लागल्या .
" वेदू , मापट कुठे ठेवलस ग ??? "
आई किचनमधून वेदिकाला विचारू लागल्या .
आई किचनमधून वेदिकाला विचारू लागल्या .
वेदीकाने त्यांना सांगितले , " आई आपण निघायच्या वेळेसच मी तयारी सगळी तयारी करून ठेवली होती गृहप्रवेशाची . हे बघा ताट पण तयार आहे ओवाळायचं , फक्त दिवे लावून घेऊ त्यात आणि मापट पण मी भरून ठेवलं आहे ".
" वेदू , किती करतेस ग . इतकं सगळं लक्षात ठेवून कस बरं सगळं जमत तुला ? "
" जमत हो आई , बरं चला नव्या सूनबाईला अस किती वेळ ताटकाळत उभं करणार बाहेर ".
दोघीही बाहेर गेल्या , आईंनी दोघांवरुन भाकर तुकडा ओवाळून बाहेर टाकला आणि दोघांना ओवाळून घेतले . वेदीकाने तांदळाचे भरलेले माप दारात ठेवले ते उजव्या पायाने ओलांडून घरात ये म्हणून तिला सांगितले .
" आ आ , पण त्याआधी एक उखाणा होऊन जाऊ द्या भाऊजी , लग्नात प्रियाने घेतला होता आता मात्र तुम्हांला घ्यावाच लागेल . त्याशिवाय मी सोडणार नाही घरात तुम्हांला ".
" वहिनी , काय हो तुम्ही पण . मला नाही जमायचा उखाणा वैगरे ".
" अस कसं भाऊजी , आई सांगा ना तुम्ही ".
" बरं मी फक्त तीच नाव घेईन हं .... प्रिया ".
" बस्सस इतकंच , तुम्ही पण ना ".
त्या दोघांचं ऐकून प्रियाला हसू येत होतं . नाव घेऊन झालं , माप ओलांडल आता प्रियाने उजवा पाय पुढे टाकत लक्ष्मीच्या पावलांनी प्रियाने घरात प्रवेश केला .
सगळ्यात पहिले देवघरात जाऊन पाया पडल्या मग पुन्हा आई आणि तात्यांना नमस्कार केला जोडीने .
थोडा वेळ आराम केला सगळ्यांनीच पण वेदिकाला मात्र काही केल्या आराम करता येत नव्हता . ती आपली काही ना काही कामं काढून भरभर आवरत होती , जणू काही सगळा भार तिच्याच डोक्यावर आहे .
दुपारी देवाला जाऊन यायचं होत , तात्यांनी सांगितले की ते नाही येणार तुम्ही सगळे जाऊन या . थोडे दमले होते ते त्यामुळे घरी राहून आराम करणार होते .
ज्योतिबा , नवीन लग्न झालेले जोडपी सगळ्यात पहिले तिकडेच जातात देशनाला . तिथे नेहमीचे पुजारी होतेच , घरातून निघतांना त्यांना फोन करून नैवैद्याच करायला सांगितलं म्हणजे गेल्यावर जास्त वेळ लागणार नाही . जोतिबा नंतर कोल्हापूरच्या देवीला जाऊन मग घरी यायचं होत , हे सगळं एका दिवसात झालं पाहिजे होत . त्यामुळे वेदीकाची आवराआवर चालली होती .
" वेदू , आग तात्या नाही म्हणताय यायचं देवाला . त्यांना जरा थकवा आलाय प्रवासाचा . आपण जाऊन येऊया सगळे संध्याकाळ पर्यंत ".
" हो आई , मी केलीये सगळी तयारी . तुम्ही आवरून घ्या तुमचं तोपर्यंत मी प्रियाला तयार करते ".
वेदू खरंच हुशार होती , सगळं कसं अगदी व्यवस्थित लक्षात ठेवून करत होती . आईंना खूप आधार होता तिचा , ती आल्यापासून त्या खरंच खूप निवांत झाल्या होत्या .
वेदीकाने देवीसाठी ओटीच सामान काढून ठेवलं , हिरव्या रंगाची काठपदराची साडी ठेवली त्यात तांदूळ , हळदीकुंकू आणि ओटीच सगळं सामान ठेवलं . पुजारीला देण्यासाठी एका पिशवीत शिधा बांधून ठेवली .
किरणच्या रूममध्ये तो एकटाच आवरत होता , त्याला सुधाकर जाऊन सांगून आला आणि वेदिकाच्या रूममध्ये प्रिया आराम करत होती . तिला वेदीकाने तयार व्हायला सांगितले आणि साडी नेसायची होती त्यामुळे थोडा वेळ लागणार म्हणून आत्ताच पिना वैगैरे पण बाजूला काढून ठेवायला सांगितल्या . तोपर्यंत वेदिका चहा पाण्याचं बघत होती .
सगळ्यांचा चहा नाश्ता झाला आणि प्रियाला छान तयार करून वेदिका ही देवाला जायला तयार झाली . दोघीही जावा जावा सुंदर दिसत होत्या , प्रियाने लाल रंगाची साडी नसली होती तर वेदीकाने पिवळ्या रंगाची साडी नसली होती . दोघीही हळदीकुंकू दिसत होत्या , खूप छान जमायचं त्या दोघींचं . जावा नसून मैत्रिणी सारख्या बोलत होत्या दोघीही .
सगळं सामान घेऊन सुधाकरने गाडीत ठेवलं तरीपण ह्या बायकांचा पत्ता नव्हता . किती वेळ लावता तयार व्हायला काय माहिती अजून . इतक्यात आई तयार होऊन बाहेर आल्या ,
" सुधाकर , ह्या पाण्याच्या बाटल्या ठेव रे आपल्या गाडीत ".
" आई , ह्या दोघी बघ ग तयार झाल्यात का . पुन्हा उशीर होईल आपल्याला ?"
" असू दे रे , नवीन लग्न झालंय मग वेळ तर घेणारच ना त्या तयार व्हायला ".
अस म्हणेपर्यंत दोघीही सोबतच बाहेर आल्या ,
" चला निघायचं का आता आपण ", गाडीत बसत वेदिका बोलली .
" किती वेळ लावता वहिनी तुम्ही तयार व्हायला , इतका मेकअप करायचा असतो का ??"
किरण मुद्दाम वेदिकाला चिडवण्यासाठी बोलत होता , खरं कारण तर त्याला माहिती होत . प्रियालाच साडी नेसता येत नाही म्हणून वहिनी तिला तयार करत होती आणि त्यामुळे तिला आवरायला वेळ झाला .
किरण मुद्दाम वेदिकाला चिडवण्यासाठी बोलत होता , खरं कारण तर त्याला माहिती होत . प्रियालाच साडी नेसता येत नाही म्हणून वहिनी तिला तयार करत होती आणि त्यामुळे तिला आवरायला वेळ झाला .
" हो मग , तुम्ही दोघे इतके छान तयार व्हाल आणि मग मी कशी मागे राहू ". वेदू पण मुद्दामच बोलली किरणला .
हे दिर भावजयी म्हणजे दोघेही अगदी मनमोकळेपणाने बोलायचे एकमेकांसोबत . वेदीकाने खूप साथ दिली होती किरणला त्यांचं लग्न जमवतांना . त्यामुळे किरणला तिचा खूप आदर होता , ती त्याच्यापेक्षाही वयाने लहान होती पण मानाने त्याच्यापेक्षा मोठी होती मोठ्या भावाची बायको म्हणून .
लहान वयातच लग्न झालं तरीपण सगळं अगदी छान सांभाळायची . कोणाला काय पाहिजे कोणाला काय आवडत याची नीट काळजी घ्यायची . सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईचा भर हलका झाला ते वेदिकाच्या येण्याने .
लहान वयातच लग्न झालं तरीपण सगळं अगदी छान सांभाळायची . कोणाला काय पाहिजे कोणाला काय आवडत याची नीट काळजी घ्यायची . सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईचा भर हलका झाला ते वेदिकाच्या येण्याने .
वेदिका म्हणजे आईचा आधार होती , सून नसून मुलगीच होती त्यांची . कोणी जर आईंना विचारले की ही तुमची मुलगी आहे का ? तर वेदिका खुशाल हो म्हणून टाकायची आणि आई पण काहीच बोलायच्या नाही मग .
सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा