प्रवास एकटीचा भाग - 37
" ज्योतिबाच्या नावानं चांगभल " , असा जयघोष करत गाडी निघाली कोल्हापूर मार्गे .
प्रियाला तर साडीमध्ये खूप गरम होत होते त्यामुळे तिने एसी वाढवला , पण वेदिकाला एसी ने लगेच सर्दी व्हायची . पण तरीही वेदू काहीच बोलली नाही , कारण प्रियाचा त्रास बघवत नव्हता तिला . साडीमध्ये बिचारी कशीबशी बसलेली होती , तिला साडी नेसायची सवय नव्हती तरी सुद्धा ती सावरत होती स्वतःला . तिची साडी थोडी भारी होती त्यामुळे त्यात गरम पण खूप होत होते . म्हणूनच वेदिकाने तिच्यासाठी एसी सुरू राहू दिला , पण थोड्याच वेळात तिला शिंका यायला सुरू झाल्या .
वेदूच्या शिंका ऐकून किरणने स्वतः एसी बंद केला आणि थोडा वेळ खिडक्या उघडल्या , थोडी बाहेरची मोकळी हवा घेण्यासाठी . किती एकमेकांना सांभाळून घेत होते सगळेच , हे बघून आईंना खूप भरून यायचे . त्या मनातल्या मनात म्हणायच्या " देवा ह्यासगळ्यांना असेच एकोप्याने राहू दे " , असे म्हणून हात जोडायच्या .
वेदू ने प्रवासात खायला त्यांच्या मागच्या अंगणातल्या झाडाचे मस्त पोपटी रंगाचे पेरू तोडून आणले होते . घरात बनवलेला पोह्यांचा चिवडा घेतला होता , ते एक एक करून सगळ्यांना देऊन ती सुद्धा खात होती . गप्पा मारत मारत गाणी ऐकत प्रवास सुरु होता .
किरण आणि प्रिया जोडीने बसलेले , दोघेही एकमेकांचा हात हातात धरून एकमेकांनाच बघत होते . प्रियाने हलकेच किरणच्या खांद्यावर डोकं टेकवले आणि डोळे मिटून शांत बसली .
पोहोचायला साधारण दोन तीन तास लागून गेले , पण वेळेत पोहोचले . मंदिरात जास्त गर्दी नव्हती हे एक बरे झाले , नाहीतर धक्काबुक्की व्हायची . मंदिरात पोहोचायच्या आधीच " ज्योतिबाच्या नावानं चांगभलं " असा जयघोष प्रत्येकाच्या तोंडून ऐकू येत होता .
पुजारी काकांना तिथे फोन करून बोलावून घेतले , ते ही पाच मिनिटांत तिथे हजर झाले . त्यांनी नैवैद्य बनवून आणलेला होता , पूजेच सगळं साहित्य ही तयार होत . पुजारी काका निघाले मंदिरात आणि त्यांच्या मागे आम्ही सगळेच निघालो .
तिथला संपूर्ण परिसर गुलालाने गुलाबी झालेला , मंदिराच्या परिसरात आजूबाजूला भव्य मंडप बांधलेले होते . पांढरा शुभ्र घोडा उभा होता , एक मोठी विहीर होती . प्रिया हे सगळं बारकाईने बघत होती , तिला हे नवीन होत .
मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचताच अंगावर काटे उभे राहिले , "ज्योतिबाच्या नावानं चांगभलं " अस प्रियाच्या तोंडून आपोआप निघू लागल . भारावून गेली होती ती देवाच हे रूप पाहून . डोळे बंद करून दोघेही देवापुढे नतमस्तक झाले . सुधाकर वेदिका त्यांनी दोघांनी दर्शन घेतले , आईने तर लोटांगण घातले देवासमोर , कारण आमचे कुलदैवत आहे ते . दर्शन खूप छान झाले आणि सगळे बाहेर आलो .
पुजारी काका ही आमच्या सोबतच बाहेर आले , त्यांनी त्यांच्या घरी नेलं . तिथली घरं अगदी छोटी छोटी आणि एकमेकांना अगदी खेटून होती . पण घरामध्ये सगळ्या सोयी होत्या .
त्यांच्या घरात पुरणपोळीचा घमघमाट सुटला होता , त्या वासाने किरणची भूक आणखी चाळवली . तो प्रियाला सांगत होता .
" प्रिया , यहा का खाना खा के देखना . बोहोत ज्यादा टेस्टी होता हैं . हम हमेशा आते हैं तो इतके यहा ही रुकते हैं और खाना खाते हैं ".
" हा किरण पता हैं मुझे , और ये टेस्टी क्यू नहीं होगा . भगवान का प्रसाद होता हैं ये ".
" हा प्रिया , पर इतके हाथ मे कुछ अलग ही टेस्ट होती हैं . हम घर मे भी ऐसें ही बनाते हैं पर ऐसा स्वाद बिलकुल नहीं आता ". वेदू पण बोलली .
" अरे वहिनी , आप भी तो कितना टेस्टी खाना बनाती हो ".
प्रिया हिंदी बोलली पण तिने वहिनी म्हटले होते , ते वेदू ला खूप आवडले .
" प्रिया , अब तुम्हे मराठी सिखनी पडेगी ".
वेदू बोलली तस तिला आई म्हणाल्या , " आता ही जबाबदारी पण तुझी आहे वेदू . तू सगळं काही तिला शिकवायचं आहे . आपल्या घरातले सणवार , सगळे सोहळे , सणवार , आपण काय काय करतो कशी देवांची पूजा वैगरे करतो हे अगदी सगळंच . तुझ्या सारखच तिलाही सगळं जमायला हवं ".
" हो आई , मी सांगेन तिला सगळं काही . मुळातच प्रिया हुशार आहे त्यामुळे तिला जास्त काही सांगायची गरज नाही . करेन ती बरोबर हळूहळू सगळं , आणि किरण भाऊजी आहेतच की सांगायला तिला ".
गप्पा मारत जेवणं उरकल्यावर पुजारी काकांना घरून आणलेला सगळा शिधा दिला आणि त्यांची दक्षिणा ही दिली . जोडीने पाया पडून झाल्या आणि त्यांनी नवीन जोडप्याला एक ज्योतिबा देवाची खूप सुंदर अशी मोठ्ठी फ्रेम भेट म्हणून दिली .
आता गाडी निघाली कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला . ते जवळच असल्यामुळे पोहोचायला वेळ लागला नाही . तिथेही खूप छान आरामात दर्शन झाले . देवीचे ते सजवलेले रूप पाहून डोळे दिपून गेले होते . बाहेरच भव्य पटांगण आणि तिथे असलेल्या दुकानांमध्ये गर्दी बघून प्रियाला कुतूहल निर्माण झाले .
वेदिका प्रियाला घेऊन गेली एका गर्दी कमी असलेल्या दुकानात , तिथे बरेच दागिने होते . त्यातले काही वेदीकाजवळ होते . तिने प्रियाला सगळे सांगितले , तिला जे जे आवडले ते सगळे घेतले . कोल्हापुरी संपूर्ण साज घेतला , कोल्हापूरला हे सगळं खूप छान मिळतं त्यासाठीच इथे बायका जास्त गर्दी करतात .
देवदेव करून झाले , फिरून झालं , एका ठिकाणी थांबून जेवण पण झालं आता घरी जायला संध्याकाळ झाली होती . थंड वातावरण झाले होते , संध्याकाळच्या वेळी आकाशात छान केशरी रंग पसरला होता . गावाकडचे इतके सुंदर वातावरण प्रिया पहिल्यांदाच अनुभवत होती .
सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा
जिल्हा - सांगली , सातारा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा