विषय - प्रेमकथा
प्रवास एकटीचा भाग - 38
नवीन नवरदेव नवरीचे देव देव करून झाले , आता घरात त्यांच्या हाताने सत्यनारायण पूजा घातली म्हणजे सगळं काही छान पार पडलं . तसेच प्रिया आणि किरण त्यांच्या संसार सुरू करायला मोकळे .
उद्याच सकाळी सत्यनारायण पूजा करूया म्हणून गावातल्या गुरुजींना फोन करून कळविले . त्यांनी सकाळी दहा वाजता पूजा करून म्हणून सांगितले आणि तयारी करायला सांगून ठेवले म्हणजे आणखी उशीर नको व्ह्यायला .
वेदीकाने जे जे सामान लागत पूजेला , ते ते सगळं काही व्यवस्थित एका बाजूला देवघरासमोर काढून ठेवले . पूजेची सगळी यादी तिला माहिती होती , तसेच प्रसादासाठी काय काय आणि किती प्रमाणात लागत ते ही माहिती होत . कारण तिच्या माहेरी असतांना ती आईला सगळं काही करू लागायची .
" आई प्रसादासाठी लागणारे दूध सकाळी लवकर आणावे लागेल , तेव्हढे तात्यांना सांगा तुम्ही . ते सकाळी लवकर उठून आणून देतील मला ".
" हो हे बरं केलंस तू ... प्रसादाची जबाबदारी तूच घेतलीस ते , आणखी काय पाहिजे तुला आत्ताच सांग . काजू , बदाम , किसमिस आहेत का घरात बघून घे एकदा ".
" बाकीच , सगळं आहे आई फक्त दूध आणावे लागेल ".
" वेदू , मी काय म्हणते तुझ्या आई वडिलांना सांगते का पूजेला यायला . लग्नाला नाही जमले आपल्याला सांगायला त्यांना , पण निदान पूजेला या म्हणावं . तू फोन लावून बोलून घे मग मला दे बोलायला , मी पण बोलून घेते त्यांच्याशी ".
आता वेदिकाच्या माहेरी पण सांगून झाले पूजेला या म्हणून , कारण त्यांनी कोणालाच लग्नाला नेले नव्हते आणि कोणाला सांगितले ही नव्हते . त्यामुळे निदान सत्यनारायण पूजेला तरी सांगू म्हणून तात्यांना विचारले . तर त्यांनी आजूबाजूच्या बायकांना बोलव म्हणून सांगितले आणि आई खुश झाल्या .
वेदीका पूजेची तयारी आणि प्रसाद ती स्वतः करणार होती . आता आज सगळेच दमले होते प्रवास करून त्यामुळे लवकर झोपले , लग्नाच्या गडबडीत गेले चार पाच दिवस झोपच झाली नव्हती कोणाची . पण आज मात्र चांगली झोप लागलेली , सकाळी सात वाजले तरी कोणीच लवकर उठले नव्हते . फक्त तात्यांनी उठून दूध तेव्हढे आठवणीने आणून ठेवले किचनमध्ये .
आईंना तात्यांनी उठवले , आईंनी वेदिकाला उठवले . मग वेदीकाने स्वतःचे आवरून झाल्यावर सगळ्यांना उठवले . सुधाकरला केळीचे खांब आणायला पाठवले आणि वेदू बसली पूजा मांडत .
चौरंग ठेवला त्यावर लाल कोर वस्त्र घातले , बाजूने रांगोळी काढून ठेवली . आता केळीचे खांब आणले की सुधाकरला बांधायला लावायचे म्हणून वेदिका प्रसाद करायला किचनमध्ये गेली .
आईंनी तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी केली . अर्धा स्वयंपाक तयार झाला होता त्यांचा . डाळ भाताचा कुकर झालेला , मेथीची भाजी केली , कणिक मळून ठेवली .... आता बाकीच वेदू बघून घेईन म्हणून आई जरा बाहेर वाऱ्याला बसल्या . वय झालं होतं त्यांचं त्यामुळे जरा काम केले की त्यांना दमायला व्हायचं .
प्रिया वेदिकाच्या रूममध्येच होती अजूनही . तीच आवरून झालेलं होत पण तिला साडी घालायला जमत नव्हती , आणि वेदिकाला सांगायचे तर ती पण कामात होती म्हणून तिला काय करावे कळतं नव्हते . आई बाहेरून आवाज देत होत्या प्रियाला , तयार झालीस तर बाहेर ये म्हणून , पण तिला कसे बाहेर जाऊ कळत नव्हते .
वेदीकाने प्रसादाचा रवा साजूक तुपात मंद आचेवर भाजायला घेतला आणि त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बघून आली . तर प्रिया अंगाभोवती कशीबशी साडी गुंडाळून बसून होती . तिला तसे पाहून वेदिकाला खूप हसू आले .
" मुझे आवाज लगानी थी ना प्रिया , मैं पेहेना देती तुमको साडी ", तिची साडी नीट करत वेदिका तिच्याशी बोलत होती .
" अरे वहिनी आप कितना करोगे , सुबह से तो काम मे लगे हो आप . और मैं ऐसेही बैठी हूं यहा , अच्छा नहीं लगता बार बार आपको बुलाने के लिये ".
" अरे उसमे क्या हैं , मुझे आदत हैं इतने काम की . अच्छा चलो जलदी आओ तुम्हे तैयार कर देती हूं , गुरुजी आते ही होंगे पूजा के लिये ".
वेदीकाने प्रियाला छान साडी नेसवून दिली , प्रियाने खूप भारी भारी सिल्कच्या साड्या आणल्या होत्या तिच्यासोबत . त्यातलीच एक गडद लाल रंगाची साडी घातली प्रियाला , थोडे दागिने घालून दिले आणि प्रिया सुंदर तयार झाली . किरणला पण लगेच तयार होऊन बसायला सांगितले , तो बिचारा तसाच साध्या कपड्यांवर बसलेला त्यालाही पुन्हा कुर्ता पायजमा घालायला सांगितले .
गुरुजी बरोबर दिलेल्या वेळेत हजर झाले , आल्या आल्या त्यांना चहा पाणी दिले आणि लगेच पूजा करून घेऊ म्हणून पूजेची मांडणी करू लागले .
सगळं व्यवस्थित मांडून झाल्यावर नवरदेव नवरीला बोलवा म्हणून सांगितले . किरण प्रिया जोडीने पूजेला बसले त्याआधी त्यांची पुन्हा उपरण्याने प्रियाच्या साडीला गाठ बांधली आणि सत्यनारायण पूजा सुरू झाली .
गुरुजी जस सांगतील तसे किरण करत गेला आणि त्याच्या हाताला हात लावून प्रियाला बसायला सांगितले . एक तासाभरात पूजा झाली होती .
" वेदू , आग तुझे आईवडील कधी पोहोचताय जरा फोन लावून बघतेस का ??" आईंनी काळजीने विचारले , कारण आता फक्त आरती बाकी होती .
येतीलच आई आता ते पाच मिनिटात आताच फोन केलेला मी आईला . वेदू अस म्हणताच तिचे आईवडील आले होते घरात . तात्या आणि ते बाहेर गप्पा मारत बसले आणि तिची आई किचनमध्ये आली . आल्या आल्या त्यांना वेदीकाने चहा करून दिला .
वेदीकाची आई वेदिकाला बाजूला करून प्रसाद बनवू लागली . आईच ती , आपल्या लेकीचे तेव्हढेच एक काम हलके होईल म्हणून त्या तिला मदत करत होत्या .
बाहेर प्रसाद आणि पंचामृत बनवून नेऊन ठेवले . सगळे आरतीला उभे राहिले आणि त्यानंतर तीर्थ प्रसाद ही घेतला घरातल्यांनी .
आईंनी लगेच आजूबाजूला जाऊन त्यांच्या मैत्रिणीला सांगून आल्या तिर्थप्रसादाला या म्हणून .
बाजूच्या बायका घाईघाईत आवरून आल्या , तोपर्यंत वेदिकाच्या आईने सगळ्यांना आहेर दिला होता .
त्यांनी पहिले तात्या आणि आईंना संपूर्ण पोशाख दिला आणि नंतर सुधाकर वेदिकाला दिला . नव्या नवरी नवरदेवला पण दिला तसेच प्रियाला त्यांनी कुंकुवाचा चांदीचा करंडा आणला होता . तो प्रियाला खूप आवडला .
त्यांनी पहिले तात्या आणि आईंना संपूर्ण पोशाख दिला आणि नंतर सुधाकर वेदिकाला दिला . नव्या नवरी नवरदेवला पण दिला तसेच प्रियाला त्यांनी कुंकुवाचा चांदीचा करंडा आणला होता . तो प्रियाला खूप आवडला .
" अहो ताई , इतकं सगळं कशाला आणत बसल्या तुम्ही सगळ्यांसाठी ".
आईंनी त्यांना असे बोलल्या बरोबर त्याही म्हणाल्या वेदिकाच्या सासूला " लेकीच्या सासरी येतोय मग रिकाम्या हाती कस येणार बरं ".
आजूबाजूच्या बायकांही आल्या लागलीच , त्यांनी तीर्थ प्रसाद घेतला आणि नवरदेव नवरीला आशीर्वाद दिला . सोबत त्यांनी प्रियासाठी पायातील जोडवी आणली होती . ती प्रियाच्या हाती देत त्यांनी तिला उखाणा द्यायला सांगितला , तिनेही तोच उखाणा घेतला जो वेदीकाने तिला शिकवला होता .
"नवीन सुनबाई अगदी सुंदर आहे हं कुलकर्णी बाई तुमची ".
बायका लगेच आईंना बोलल्या , " हो ना नशीबवान आहे मी खूप , इतक्या सुंदर देखण्या आणि हुशार सुना भेटल्या मला दोन्हीही ".
बायका लगेच आईंना बोलल्या , " हो ना नशीबवान आहे मी खूप , इतक्या सुंदर देखण्या आणि हुशार सुना भेटल्या मला दोन्हीही ".
" हो ना , वेदू तर सगळं काही सांभाळून घेते तुमची . तिच्यासारखी सून तर प्रत्येक सासूला मिळो ".
लेकीच्या सासरी तीच कौतुक ऐकून आईवडिलांना एक वेगळाच आनंद होतो , जो वेदिकाच्या आई वडिलांना खूप झाला होता . त्यांना अभिमान वाटत होता त्यांच्या मुलीचा .
सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा
जिल्हा - सांगली , सातारा