Login

प्रवास एकटीचा भाग - 39

प्रेम आंधळं असतं पण ते नातं शेवटपर्यंत निभावणं आपल्या हातात असते


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 39



           सत्यनारायणची पूजा छान झाली आणि सगळ्यांच जेवणही झाले . पूजेचा प्रसाद खुप छान झाला असे सगळे वेदिकाला सांगत होते .

वेदिका बिचारी सकाळपासून सगळं आवरत होती . थोडावेळ फक्त दुपारी आई वडिलांसोबत बोलत बसली . खूप दिवसांनी त्यांची भेट झालेली त्यामुळे तिला किती बोलू आणि किती नाही असे होत होते .

तिच्या आईने तिच्यासाठी काय काय आणले होते ते ती दाखवत बसलेली , तिला दिलेल्या साडीसोबत त्यावर मॅचिंग बांगड्या आणि बरंच काही घेऊन आलेली जे वेदिकाला आवडत होते . लाडक्या एकुलत्या एक लेकीसाठी पिशवी भरून खाऊ आणलेला , मुलगी कितीही मोठी झाली , तीच लग्न झालं तरी आईवडील लेकीसाठी तिच्या आवडीचं लक्षात ठेवून सारं काही आणत असतात . वेदिका इतकं सगळं पाहून एखाद्या लहान मुलीसारखी खुश होत होती .

" वेदू , इकडे ये बाळ ". आईंनी तिला जवळ बोलवून घेतलं .
तिला एक सुंदर साडी आणून दिली तिच्या आईला देण्यासाठी . वेदीकाने हळदीकुंकू लावून आईला साडी दिली आणि सुधाकरने तिच्या वडिलांना पोशाख देऊन टावेल टोपी दिली . दोघांनी त्यांच्या पाया पडल्या आणि नवीन जोडप्याने सुद्धा .


दुपारी सगळे गप्पा मारत बसलेले . संध्याकाळचा चहा घेतला आणि वेदीकाचे आईवडील घरी जायला निघाले .

आईवडील केव्हाही भेटायला आले तरी निघतांना लेकीच्या डोळ्यात पाणी दाटून येतेच , मग लग्नाला कितीही दिवस किंवा वर्ष झालेले असो .

" वेदू , येतो बाळ . सगळ्यांना असंच सांभाळून घेत रहा आणि अशीच आनंदी रहा ". असे म्हणून वेदीकाच्या वडिलांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि आईवडील  घरी जायला निघाले .

वेदिकाला मात्र भरून आले होते , ते गेल्यावर वेदिका लगेच तिच्या रूममध्ये गेली . थोडयावेळाने शांत झाल्यावर बाहेर आली . तेव्हा समजत होते तिच्या डोळ्यांवरून की , ही नक्कीच रडली असणार .


सकाळपासून नेसलेल्या भारी साडीत प्रियाला कसतरी व्हायला लागले , वेदिकाला तिची चलबिचल समजत होती म्हणून तिने तिला तिची घरात घालायची हलकी फुलकी साडी नेसायला दिली आणि हळूच सांगितले की रात्री झोपतांना तू गाऊन घालून झोपू शकतेस , पण रूमच्या बाहेर यायचं नाही .

वेदीकाच बोलणं ऐकून प्रियाला खूप बरं वाटलं , आणि तीच हसायलाही आलं . पण वेदिका खुपच काळजी घेत होती प्रियाची , प्रियालाही तिचा स्वभाव खूपच आवडला . काल रात्री दोघीही बऱ्याच वेळ गप्पा मारत बसल्या होत्या . दोघी जावा नसून मैत्रिणी सारख्या राहत होत्या , वेदिका तिला खूप सांभाळून घेत होती .

किरणही आला त्यांच्यात गप्पा मारायला , वेदिका मुद्दाम कामाचा बहाणा करून बाहेर निघून आली त्यांना बोलायला वेळ मिळावा म्हणून .

" किरी , हमारी छुट्टी खतम हो रही हैं परसो तो फिर हमको जाना पडेगा कल ही ".

" प्रिया , मैने और चार दिन की छुट्टी ले की हैं . तुम्हारी और मेरी औरसे बता दिया हैं ऑफिस मैं . इसलीये तुम चिंता मत करो ".

" ओ थॅंक्यू किरी , मुझे चाहीए ही थी और छुट्टी . मैं बोहोत ज्यादा थकवाट मेहसुस कर रही हूं , अभी मुझे आरामसे रेहेना हैं ".

       दोघेही एकमेकांकडे बघत हसत होते आणि वेदिका येऊन म्हणाली ," बास झालं भाऊजी आता बाहेर जाऊन गप्पा मारत बसा तुम्ही . तोपर्यंत मी प्रियाला तयार करते ".

वेदीकाने प्रियाला एखादी साधीच पण सुंदर साडी घालायला आणली होती . तिला ती नेसायला सांगितली आणि थोडासा हलकासा मेकअप सुद्धा करायला लावला आणि तोपर्यंत ती बाहेर आवरायचं म्हणून निघून आली .

वेदीकाने प्रियाला तिच्याच बेडरूममध्ये बसवून ठेवले होते आणि किरणला बाहेर सोफ्यात गप्पांमध्ये गुंतवून बसवून ठेवले .

       इकडे वेदिका आणि सुधाकर त्यांचा बेडरूम सजवत होते . बेडवर छानशी नविन बेडशीट अंथरली त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी बेडच्या मधोमध एक बदामाचा आकार काढला आणि त्यात किरणचा के आणि प्रियाचा पी लिहून कॅडबरी पण ठेवली . संपूर्ण रूममध्ये सुवासिक मेणबत्त्या लावल्या . दोघांचा एक छानसा फोटो प्रिंट करून आणला आणि तो ही बरोबर बेडच्या वरती लावून घेतला . वेदीकाने टीव्हीमध्ये दाखवतात अगदी तसाच रुम सजवला होता . ती अजूनही काही राहिलंय ते बघत होती , इतक्यात सुधाकरने तिला जवळ ओढून घेतले .

" अहो , काहीही काय . आपण आपल्या बेडरूममध्ये नाहीये , भाऊजींच्या बेडरूममध्ये आहोत . जरा तरी भान ठेवत जा हो ".

वेदिका खरं तर चिडली होती , पण तिचा राग म्हणजे थोडावेळा पुरताच असतो . नंतर ती स्वतःहून बोलायला जाते सुधाकर जवळ , हे त्यालाही माहिती होते त्यामुळे तो ही तिच्यावर न रागावता तिच्या प्रेमाची वाट बघायचा .

पण आज किरण आणि प्रियाची बेडरूम सजली होती . आजपासून त्यांची वैवाहिक आयुष्याला खरी सुरुवात होणार होती .  वेदीकाने साधीच पण खूप सुंदर सजवली होती त्यांची रूम , तिच्या मनाप्रमाणे तिला जमेल तशी .  थोडी भीती वाटत होती तिला कारण प्रिया मोठ्या घरातली होती , तिला गावाकडची साधी राहणी आवडते की नाही आवडत ह्याची तिला माहिती नव्हती . पण तिने तिच्या परीने सगळे व्यवस्थित केले होते .

किचनमध्ये येऊन तिने त्या दोघांसाठी मसाला दूध तयार केले केशर घालून . दोन काचेच्या ग्लासमध्ये ते दूध भरून ती त्यांच्या बेडरूममध्ये बेडजवळच्या टीपॉय वर झाकून ठेवून आली .

आता सुधाकरने पहिले किरणला जा झोपायला म्हणून सांगितले ,

वेदीकानेही प्रियाला सांगितले , " आता आज आमची बेडरूम मोकळी करा म्हणून , आणि तुमच्या बेडरूममध्ये झोपायला जा असे सांगितले ".

प्रियाला आणि किरणला कळून गेले की ह्यांनी काहीतरी तयारी केली असणार . किरण पहिले बेडरूममध्ये गेला त्याला रूम बघून पहिले तर हसू आले , इतकी सगळी तयारी केली होती .

         नक्कीच वहिनीने केलं असणार हे सगळं , त्याला लगेच समजलं होत . पण प्रिया बेडरूममध्ये आल्यावर  तिला बघून त्याला खूप आनंद झाला . खुश होऊन त्याने तिला लगेच जवळ ओढले .

आ आ ..... आता पुढे काय होईल ते बघूया पुढच्या भागात , लवकरच घेऊन येतेय थोड्यावेळात .... तोपर्यंत वाट बघा .




सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all