#प्रवास
एका अशाश्वत प्रवासाची सुरुवात तर केलीय.. सोबत कोण असणार आहे रहाणार आहे याची चिंता सध्या तरी नाहीये.. स्वतःचं अस्तित्व जपणं इतकंच असतं तर ते ही मान्य होतंच पण सोबत सगळेच हवे असतांना दोन पावलं मागं येऊन थांबण समाधानाचे कित्येक ऋतु झेलतं
.. माझा प्रवास कुठेतरी संपेलच पण प्रामाणिक असण्याची किंमत स्वाभिमानाला पणाला लावून दिलेली नाही हे समाधान खूप मोठं असेल.. आठवणींची लोलकं अंतर्मनातली द्वंद्व आणि अस्थिरता परावर्तित करणारी पण काळाचे आवर्त त्यांना ही भेदणारे. एक स्वच्छ ,पारदर्शी ,शुभ्रपण घेऊन येणारे..आनंदाचा तो ही ऋतु झेलणारे..
मार्गस्थ होण्याची ग्वाही देणारे..
हमखास रस्ते ..सोप्या सरळ मार्गाचे..
©लीना राजीव.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा