प्रवासी पक्षी
सतीश राव बँकेच्या कामासाठी बाहेर गेले होते ते घरी आले.
सुरेखा ताईं त्यांना एक जाडजूड पाकीट देत म्हणाल्या” अहो हे तुमच्या नावाने आले आहे”..

‘ पाहू कोणी पाठवलं? एअरमेल दिसतंय.’
‘ अहो मिलिंद चा पत्ता आहे त्यावर'!
मिलिंद चे पत्र? सतीश राव चमकले! पत्र लिहिण्याचे काय कारण? फोन वर बरेचदा बरेच बोलतो विडियो कांन्फरेंस ही करतो! मग?
‘अहो आधी जेवून घ्या बरं मग सावकाश पहा मला क्लब मध्ये जायचं आहे मिटींग आहे म्हणून. !’
जेवण होताच सुरेखा बाई आवरून बाहेर निघाल्या…

सतीश रावांनी पाकीट उघडलं !
आत मध्ये सुरेख अक्षरात “
“प्रिय बाबा सप्रेम नमस्कार, पत्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आपण बरेचदा मोबाईलवर व्हिडिओ कॉल करतो पण मग पत्र लिहिण्याचे काय प्रयोजन ?
मनातल्या बऱ्याच गोष्टी फोनवर नाही सांगता येत म्हणून हा प्रपंच !तुम्ही समजून घ्याल असा विश्वास!”
सुरेख अक्षरात लिहिलेले पत्र, सतीश रावांना थोडं कौतुकही वाटलं अजूनही मुलाचे अक्षर तेवढेच सुरेख आहे! ,लहानपणी कितीतरी वेळा शुद्धलेखन आणि सुलेख लिहून घेताना “छडी लागे छम छम” करावे लागले त्याचाच फायदा !

त्यांनी पुढे वाचायला सुरुवात केली…
“बाबा काल रोहनला शाळेत पोहोचवायला गेलो होतो तो आता चार वर्षाचा झाला .इथे मुलांना स्कूलच्या गेटपर्यंत सोडायचं असतं .रोहन कार मधून उतरला मीही उतरलो माझा हात सोडून तो गेटच्या आत गेला, मी मात्र तिथेच कारपाशी उभा त्याला पाहत होतो. पहिल्यांदाच तोशाळेत जात होता मलाच हुरहुर वाटत होती पण मी ती चेहर्यावर दिसू दिली नाही.
माझा मुलगा स्ट्रॉंग आहे तो घाबरणार नाही असे मनात वाटत होते पण तेवढ्यात त्याने मागे वळून पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर माझ्यापासून दूर जाताना चे भय दिसत होते.
मी पटकन कार मध्ये बसलो मला त्याच्यात मीच दिसत होतो.
गाडी चालवताना मला आठवलं जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा शाळेत सोडायला आला होता…

.सकाळी सकाळी आईने मला उठवले आंघोळ घालून शाळेचा युनिफॉर्म चढवला,
” बघ बघ नवीन बॉटल ,नवीन बस्ता, टिफिन सर्व किती छान आहे ना? आणि तुझ्या आवडीचा खाऊही दिला आहे “असे म्हणत ती मला प्रोत्साहित करत होती पण जेव्हा बाबा तुम्ही मला क्लास रूममध्ये सोडून जायला निघाला मी तुमचा हात घट्ट धरून ठेवला होता! तिथल्या सगळ्या अनोळखी वातावरणाची मला भीती वाटत होती काही मुलं रडत ही होती ते पाहून मलाही रडू येत होतं.
पण मी स्वतःला सावरले तरी दोन थेंब गालावर ओघळलेच…
हेच दुःख मला तेव्हा ही जाणवल होतं ,जेव्हा पुढच्या शिक्षणासाठी म्हणून मी विमानात बसत होतो आपला देश आपली माणसं सगळ्यांना सोडून जायचं या सगळ्याच दुःख !
पण तेव्हा ही मी स्वतःला सावरलं.

तुमचाचेहऱा माझ्या प्रगतीच्या कौतुकाने ऊजळला होता.
माझ्या जायच्या दोन दिवस आधी तुम्ही काकांशी फोनवर बोलत होता, तेव्हा तुमच्या बोलण्यात एक अभिमान जाणवत होता जणू पहा माझा मुलगा मी त्याला बाहेर देशात शिक्षणाला पाठवतो आहे आता पहाच तो कसे डॉलर कमावून आणतो,आणि इथे त्याच्या योग्यतेची नोकरी कुठे?
सतीश रावांना आठवले,त्यांचे मित्र सुधाकर म्हणाले ही होते “अरेएकच मुलगा तो इतक्या दूर गेल्यावर कधी भेटणार? शेवटी मरताना पाणी पाजायला ही येणं जमणार नाही.”
तेव्हा आपण आपल्या आनंदात किंवा एका तर्हेच्या गुर्मीत होतो पहा माझा मुलगा कुठे आणि ह्यांची मुल कुठे?”

पुढे मिलिंद ने लिहिले होते” मी इथे आलो पण् तेव्हा मला आपला देश आपली माणसं सोडून यायचं काय दुःख असतं ते प्रकर्षाने जाणवलं!
संध्या समयी पक्षी जेव्हा आपल्या घरट्याकडे धाव घेताना पाहायचो तेव्हा मलाही आपल्या घराची खूप आठवण यायची आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची सवय आठवायची. कितीतरी वेळा वाटायचं सगळं सोडून परत याव! आईची तुमची खुप आठवण यायची पण ते शक्य नव्हते!
हळूहळू मी सावरलो, इथल्या वातावरणाची सवय होऊ लागली. जवळ जवळ वर्षभराने मी परत आलो पण तेव्हाही मला माहीत होतं की मला परत इथेच यायचं आहे.
जसा जसा काळ पुढे सरकत गेला मला इथे आवडायला लागल इथे माझी नौकरी होती भरपूर पगाराची, इथली स्वच्छता, कामाचा आवाक, डिसिप्लिन हळूहळू अंगवळणी पडल.
मी हळूहळू इथला झालो.

माझं लग्न तुमच्या पसंतीने मी केलं. बायको नंदिनी तिलाही इथेच यायचं होतं माझ्यासोबत. तिची ही नौकरी होती. लग्नानंतर दोन-तीन वेळा आम्ही भारतात आलो सुट्टी काढून. दोन्ही घरी म्हणजे सासर माहेर दोन्हीकडे आमचा खूप पाहुणचार झाला पण आतून मनात कुठेतरी आपण पाहुणे आहोत ही भावना जाणवायला लागली.
आमचं ग्रीन कार्ड बनलं आणि खऱ्या अर्थाने आम्ही विदेशी नागरिक झालो. बाबा तुम्ही आणी आई काही महिन्यांकरता येथे येऊन राहून गेला, मी तुम्हाला कायम इथेच राहण्याचा आग्रह केला पण तुम्हाला इथे करमत नाही म्हणून तुम्ही तो टाळला.
हळूहळू आपल्यातलं अंतर वाढत गेल. मध्यंतरी आईला बरं नव्हतं तेव्हा मी आलो होतो त्यावेळेस तुमचं म्हणणं की मी आता तिथलं सर्व सोडून भारतात परत याव मला अचंबित करून गेलं .
बाबा तुमचं बालपण कोकणात लहानशा गावात गेल, हे तुम्ही अनेकदा वर्णन करून सांगितलं. तुमचं शेत, गाई म्हशी होत्या, अंब्या नारळाची वाडी होती किती जरी झाड तुम्ही आपल्या हाताने लावली व त्यांना मोठे केलं.
एखादं लहान रोपट एका कुंडीतून दुसऱ्या जागी लावताना थोडी काळजी घ्यावी लागते मग ते सहजपणे वाढते पण् एखाद्या मोठ्या झाडाला जर जमिनीपासून वेगळं करून दुसरीकडे वाढवण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चितच कोमेज ते किंवा वाळते..
तुम्ही माझ्या भावना माझी मनस्थिती समजून घ्या! इथे पाय रोवूनउभे राहण्यासाठी मला किती धडपड करावी लागली.इथल हवामान, खानपान हे सर्व सवयीचं करून मी आता या स्थितीत पोहोचलो आहे आता परत फिरणे अशक्य वाटते.
माझी मुलं इथेच जन्मली त्यांची इथली नागरिकताही आहे त्यांचे शिक्षण , रहाण्याच्या खाण्याच्या सवयी,आवड निवड इथल्या लोकांसारख्या आहे.ते ही तयार होणार नाहीत
तेव्हा परतीचा मार्ग खुंटला वाटतो, आता हाच देश मला आपला वाटतो.नंदिनी चाही विचार घ्यावा लागेल,नौकरी सोडून मला नाही वाटत ती तिकडे खुश राहिलं.

बाबा तुम्हीही गाव सोडून नोकरीनिमित्त मुंबईला स्थायिक झाला नंतर आजी आजोबाही आपल्यातच होते.
पुढे माझी मुलं मोठी होतील, तेही वेगळे राहतील. इथे तसेही आईबाप मुले एकत्र नसतात .मी पण त्यावेळी ह्याच भावनिक गुंत्यात असेन ज्यात तुम्ही अडकला आहात.मला वाटतं म्हातारपणी माणसं जास्त भावनिक होतात

.पत्र वाचता वाचता सतीश रावांना आठवले त्यांचे बाबाही एकदा म्हणाले होते “सतीश आपली शेतीवाडी गाय गुर हे सगळं तुलाच सांभाळायचं आहे मग कशाला शहरात जायचा हट्ट करतो पण तेव्हा मोठा पगार आणि मुंबई सारखं पॉश शहर आपल्याला खुणावत होतं मग आपल्या वडिलांनी पण नाद सोडला व आपण मुंबईत स्थायिक झालो पुढे वाडी जमीन विकून आई-बाबा आपल्याकडे कायमचे आले. सुरवातीला त्यांनाही इथे करमत नसे.
पुढे मिलिंद ने लिहिले होते” तुम्ही मला समजून घ्या तुमची संपत्ती घर याचा मला मोह नाही तुम्ही आहात तोपर्यंत ते सर्व तुमचेच मग ते तुम्ही तुमच्या व आईच्या इच्छेने दान करू शकता.

मी माझ्या भावना पत्रातून मांडल्या, त्या चूक की बरोबर माहित नाही. चुकल्यास मला माफ करा …
पत्र पूर्ण होताच सतीश रावांना जाणवलं मिलिंद त्याच्या जागी बरोबरच आहे आपण त्याला इथे बोलावणे बरोबर नाही. जरी तो आपल्यासाठी आला तरी ते रोप आता इथे रुजणार नाही अवेळीच कोळपून जाईल, तेव्हा आता परत फिरणे म्हणजे अरत्र न परत्र असेच होईल तेव्हा “तू जिथे राहशिल तिथे सुखाने राहा “असा मजकूर लिहिण्यासाठी त्यांनी कागद ,पेन हातात घेतला…..
—----------------------------------------------

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा