Login

प्रेमाची वीण - भाग -3

Premachi Vin
- भाग - 3

( मागील भागात आपण पाहिलंत - रीचा तू घरी प्रेग्नेंसिबद्दल सांगूनच इथे यावंसं अशी अट नेहाला घालते - आता पुढे )


       दुसऱ्या दिवशी रविवार असतो, त्यामुळे सुट्टी असल्याने सगळे घरीच होते, नेहा ठरवते आज रात्री जेवून झाल्यावर घरी कसंही करून सांगतेच. पण ती खूपच घाबरलेली असते. पण आता निर्णय घेतलाच आहे तर पुढच्या परिणामांना सामोरं जायलाचं हवं, असं ती मनातल्या मनात म्हणते. आई - बाबा सहजासहजी हे सगळं स्वीकारणार नाहीत किंवा प्रचंड आकांड - तांडव करतील याची तिला कल्पना होती, पण तरीही हिंमत दाखवून नेहा आईशी बोलायला जाते.


     रात्री जेवण झाल्यावर आई किचनमध्ये तिची घरची कामं आवरत असताना नेहा तिला जाऊन बोलते आई मला तुमच्या सर्वांशी काहीतरी बोलायचं आहे, आई म्हणते सर्वांशी एकत्र काय बोलायचं आहे, कुठला मुलगा पसंत केला आहेस कि कायं, नेहाच्या डोळ्यात अश्रू येतात ती बोलते, आई, बाबांना पण सांग आपण एकत्र बसून बोलूया...

   
         सगळे रात्री नेहाच्या खोलीत येतात, नेहा धीर करून सगळं सांगते, बाबा हे सगळं ऐकून तिला मारायलाचं धावतात. पण आई त्यांना पकडते आणि बोलते एवढ्या मोठ्या मुलीवर हात उचलू नका, बाबा बोलतात अबोरशन नाही करणार म्हणजे.... तू काय बोलते आहेस ते तुला तरी कळतंय कां... समाजात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीस मुलं वाढवायचे असेल तर चालती हो घरातून.. कोणाकोणाला उत्तर द्यायची आम्ही तुला हे मुलं पाडावंच लागेल, समजलं तुला, नेहा रडून बोलते नाही मी हे पाप करणार नाही, प्लिज बाबा मला समजून घ्या...


       नेहाची आई पण तिला खूप समजावते, पण नेहा कोणाचंचं ऐकत नाही, मग बाबा बोलतात असं असेल तर तू माझ्यासाठी आजपासून मेलीस, निघून जा इथून कुठेतरी दूरवर... आम्ही नातेवाईकांना सांगू, ती नोकरीसाठी बाहेरगावी गेलीय, आणि आयुष्यात पुन्हा माझ्याशी कधीही बोलू नकोस... तुझं तोंड मला दाखवू नकोस.


       नेहा बोलते बाबा मी दोन दिवसांनी माझ्या मैत्रिणीकडे बंगलोरला जाणार आहे, मी जाणार आहे निघून...आई हे ऐकून खूप रडते आणि बोलते नेहा तुला वाटतंय तेवढं हे आईपण निभावणं सोप्प नाही आहे कसं करशील तू...


        घरात खूप वादावादि होते, बाबा आईलाच ओरडू लागतात बघ आपण हिला स्वातंत्र्य दिलं ना त्याचेच हे परिणाम आहेत, हिला मोकळीक दिली आणि हिने आपलीच इज्जत चव्हाट्यावर आणली, बघ आता तूच तिचे लाड केलेस ना, हिला पिकनिकला पाहिजे तिथे पाठवत होतो कारण कां तर असूदेत मुलगी मोठी आहे तिला तिचं बरं - वाईट कळतंय, पण बघ आता काय करून बसलीय तुझी लेक....


      बघ हीच मित्रांबरोबर फिरणं, हिंडण आता किती महागात पडलंय, बरं ही त्या मुलाचं नाव पण सांगत नाही आहे - हिने नाव सांगितलं असतं तर मी त्याला जबरदस्तीने हिच्याशी लग्न करायला तयार केलं असतं. त्याला नाईलाजाने कां होईना पण हिच्या गळ्यात माळ घालायला लावली असती मी, पण ही मुलगी त्याचं नाव पण लपवतेय...


        बाबा खूप बडबडून, रागवून दुसऱ्या खोलीत झोपायला जातात, भाऊ पण रागवून बाहेर हॉलमध्ये जातो, नेहा आणि आई दोघीच रूममध्ये उरतात, तिची आई तिला हरप्रकारे समजावून सांगते, पण नेहा बोलते आई मला कोणीतरी समजून घ्या ना प्लिज... आई मी नोकरीं करेन, बाळाला सांभाळेन प्लिज मला ही लढाई माझ्या हिमतीवर लढूदेत ना, मी रिचाबरोबर बोलून दोन दिवसात इथून जाईन, आई प्लिज तू तरी मला कधीतरी भेटायला येत जा ना प्लिज...


     आई बोलते, अगं ते अजिबात शक्य नाही आहे, मुंबईवरून बाबांना न सांगता मी एकटी बंगलोरला कधीच येऊ शकत नाही. बाबा तुझं नाव ही ह्यापुढे घरात काढून देणार नाहीत, त्यांचा राग तुला माहित आहे ना, ते खूप चिडलेत तुझ्यावर... आई बोलून झोपायला निघून जाते... नेहा ती पूर्ण रात्र रडून घालवते.


     दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं वातावरण पूर्ण बदललेलं असतं, घरात पूर्ण शांतता असते,नेहाबरोबर कोणीच बोलत नाही, ती तिचं आवरून ऑफिसला निघून जाते.


    नेहा ऑफिसला जाताना रिचाला कॉल करते, आणि घरी काय घडलं ते सगळं सांगते - रीचा बोलते, कोणते आई - वडील हे सगळं सहन करतील, तुला ते कसे माफ करू शकतील, त्यांच्या मनावर खूप मोठा आघात झाला असणार, एक वेळ आई माफ करेल कारण आई चं ती, मुलीवर संकट आलेलं असताना ती कशी शांत राहील, पण मला वाटलंच होतं तुझे बाबा हे ऐकून तुझ्यावर खूप चिडतील, पण त्यांना अंधारात ठेवून तुला माझ्याकडे ठेवून घेणं मला योग्य वाटतं नव्हतं.


      नेहा रडायला लागली आणि बोलू लागली खरंच सगळ्यांना दुखावून मी खूप मोठी चूक करतेय पण तरीही ह्या निष्पाप जीवाचा त्यात काय दोष, त्याला पाडून टाकावंसं मला मनापासून पटत नाही आहे, ज्या माझ्या मित्रामुळे हे सगळं घडलं त्याने माझी थोडीशी हे मुलं ठेवण्याबद्दल साथ जरी दिली असती ना तरी मी हे पेलून नेलं असतं, पण असो माझं नशीबचं वाईट... त्याने तर घाबरून मला मी हे त्याला सांगितल्यापासून एक कॉल ही केलेला नाही.


      रीचा बोलली बरं तू रडणं बंद कर आता, आणि मी काय सांगते ते ऐक - मी माझ्या मिस्टरांशी बोलली आहे ते चालेल बरं असं बोललेत, पण ते पण म्हणालेत ते टूरवरून यायच्या आधी तू माझ्या घरातून निघून जायचंस, हे सगळं मान्य असेल तरचं ये दोन दिवसांत...


     आणखीन एक - मी माझ्या मैत्रिणीशी तुझ्या नोकरीबद्दल बोलले आहे, तिच्या हॉस्पिटलमध्ये ती तुला नोकरीवर ठेवायला तयार आहे. तुला आता पंचेचाळीस हजार पगार आहे पण माझी मैत्रीण तुला फक्त वीसचं हजार पगार देऊ शकते. आणि तिचं हॉस्पिटल असल्यामुळे तुझी डिलिव्हरी पण तिथे सुखकर होईल.


      ती माझी खास मैत्रीण आहे म्हणून मी तुझ्याबद्दल सगळं सांगून तिला तयार केलं आहे, त्यामुळे इथे नीट राहायचं, तुझी गुर्मी, मोठेपणा, फटकळपणा मी चालवून घेणार नाही. माझ्या एका शब्दावर तीने तुला तू गरोदरपणात नोकरीं द्यायची तयारी दाखवली आहे, त्यामुळे नीट राहा..नेहा हो बरं मी राहीन नीट आणि मी परवा तुझ्याकडे येते असं बोलून फोन ठेवते.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ह्या सगळ्या ओढवलेल्या परिस्थिमुळे नेहा कशी काय सगळं सांभाळून बाळाला वाढवते ते )