Login

तुझी मिठी

Precious hug

ओठांवर बोट ठेवून
नजरेने कैद केलंस
मिश्किल हसून गालात
पुरतं घायाळ केलंस

लटका माझा राग सख्या
तुझ्या डोळ्यांत विरघळला
अवखळ बावऱ्या प्रीतीला
माझ्या खळीचा इशारा

नेहमी असंच करतोस
लाडात येऊन हरवतोस
तुझ्या मुग्ध,गंधित श्वासाने
दिवसा चांदणे फुलवतोस

वाटतं बघत रहावा असाच
तुझा मर्दानी देखणा रुबाब
मिठीत तुझ्या विरघळावं
काळवेळाचं नसावं भान

सौ.गीता गजानन गरुड.