प्रेम रंग -3 अंतिम

प्रेमाचा रंग

अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर डॉक्टरांना यश आलं. किशन शुद्धीवर आला. आई वडील आणि मेघना त्याला भेटायला गेले. त्याला इतक्यात सगळं काही सांगितलं नाही..त्याची पूर्णपणे बरं होण्याची वाट सगळे बघत होते.

ती मात्र अजूनही तिथेच होती. तिच्या घरी कळलं तसं तेही हॉस्पिटलमध्ये आले. कुणा अज्ञात इसमाला मदत केली एवढंच समाधान त्यांना होतं.

संध्याकाळी किशनला उठता आलं. एक फेरफटका मारायची परवानगी घेऊन तो आईचा हात धरून चालत होता. त्याचं लक्ष शेजारच्या वार्ड कडे गेलं.

तिथे त्याला ती दिसली..आईच्या लक्षात आलं..आता किशनला सगळं सांगून टाकावं असं तिने ठरवलं पण...

किशनने बघून न बघितल्यासारखं केलं..तो तिथून निघाला.. आई त्याला काही बोलणार तोच मेघना तिथे आली..आईच्या हातातून तिने त्याचा हात घेतला आणि त्याच्या वॉर्ड कडे घेऊन गेली..

2 दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला..निघतांना त्याला शेजारी रक्ताने माखलेला कपडा दिसला.त्याला तो कपडा ओळखीचा वाटत होता..खूप आठवल्यानंतर त्याचा लक्षात आलं..

"हा तर...तिचा कुर्ता..."

त्याला सगळं आकलन व्हायला लागलं..तेवढ्यात त्याची आई तिथे आली..

"होय...तीच होती तुला जीवनदान देणारी..."

"म्हणजे??"

"स्वतःच्या जीवावर उदार होऊन तिने तुझा प्राण वाचवला..जिला तू अर्ध्यावर सोडून दिलंस तिने तुला मृत्यूच्या दाढेतून परत आणलं.."

आईने सगळी हकीकत सांगितली...किशनच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं...अपराधीपणाची जाणीव त्याला होत होती...

मेघनावर भाळून त्याने तिचा विश्वासघात केला होता, पण आज मेघना तिथे नव्हती...त्याच्यासोबत अखेर तीच उभी राहिली होती...

"आई...तिला कसं वाटतंय आता?? मी पाहून येऊ का?"

"गेली ती निघून..तिच्या प्रेमाचा रंग तुला कधी कळलाच नाही, पण तिने मात्र तिच्या शाश्वत प्रेमाचा लाल रंग तुझ्या नसानसात भरून गेली.."

"पण आई...मेघना चा रक्तगटही B निगेटिव्ह आहे ना??"

आई आणि किशन एकमेकांकडे बघतच राहिले...

त्याक्षणी किशनला आपण काय गमावलं याची सर्वात जास्त जाणीव झाली ....

कदाचित हीच शिक्षा होती,

त्याच्या विश्वासघाताची...

समाप्त

🎭 Series Post

View all