मुंबईचा पाऊस म्हणजे न सांगता अचानक येणारा आणि येईल तेव्हा एकाच दमात धो-धो बरसून मुंबईची पार तुंबई करून जाणारा. पावसाच्या अश्या अचानक येण्याने आणि सर्व रस्ते पाण्याने तुंबल्याने रस्ते बंद होऊन ट्रॅफिक जॅम होणे, लोकांची रस्त्यात अडकून आबदा होणे हे नेहमीचेच झालेले आहे. आजदेखील नेहमीप्रमाणे पाऊस असाच काही अंदाज न देता अचानक आला आणि सर्व रस्ते पाण्याने तुडुंब भरले. रस्त्यात पाणी साचल्याने सर्व गाड्या एकाच जागेवर थांबून ट्रॅफिक जाम झाले. तितक्यात एक रिक्षावाला त्याची रिक्षा बंद करून आत बसलेल्या पॅसेंजरला म्हणतो,
"मॅडम पुढे पाणी साचल्याने रस्ता बंद आहे, एकतर तुम्ही साईड साईड ने फुटपाथवरून चालत जावा किंवा मग पाणी ओसरेपर्यंत जवळपास कुठेतरी आसरा घ्या. रिक्षा काही आता पुढे जाणार नाही."
हा संवाद होऊन एक वीस-बावीस वर्षांची तरुणी रिक्षातून बाहेर पडते. तिचा गोरापान रंग, अंगात वनपीस पार्टीवेअर ड्रेस, पायात हाय हिल, खांद्यावर मोकळे सोडलेले केस आणि हेवी मेकअप पण चेहऱ्यावर त्रस्त भाव अशी ती रिक्षातून उतरून साईडला असलेल्या एक दुकानाच्या समोर ताडपत्रीच्या केलेल्या छपराखाली जाऊन थांबते. त्या ताडपत्रीच्या बारीक बारीक छिद्रांमधून टपटप पाण्याचे थेंब तिच्या अंगावर पडू लागतात. आजूबाजूची गर्दी आणि अंगावर टपटपणार्या थेंबांमुळे बहुदा तिचा अगोदरच त्रस्त असलेला चेहरा अजूनच त्रस्त होतो. तिथेच पावसामुळे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या कारमधून हे सर्व पाहताच तो लगबगीने कारमधून खाली उतरतो. तिला पुन्हा एकदा निरखून पाहतो आणि काहीश्या विवंचनेतच तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो,
"एक्स्क्यूज मी मॅडम... या पावसाचा जोर पाहता तो तासभर तरी असाच बरसेल आणि रस्त्यावर साचलेले पाणी निचरायला पुन्हा तासभर तरी लागेल. सो... तुम्ही पुढचे दोन तास तरी असे गळक्या आडोश्याला गर्दीत उभे न राहता समोर असलेल्या कॉफीशॉपमध्ये आसरा घ्या. ईट विल बी बेटर फॉर यु."
अचानक असे येऊन फुकटचा सल्ला कोण देतंय अश्या नजरेने ती त्याच्याकडे पाहते तर तिच्या समोर उभा असलेला उंच, अंगात टक्सीडो सुट, पायात पार्टीशुज, त्याच्या अंगातून येणारा घमघमणार परफ्युमचा सुगंध, दिसायला हॅन्डसम असे त्याला पाहून ती जुजबी प्रतिसाद देत म्हणते,
"ओके... थँक्स"
त्यांची नजरानजर होते तेव्हा तिचे डोळे लाल झालेले त्याला दिसतात. तो पुन्हा काही बोलणार याआधीच ती तिचे हिल्स पाण्यात भिजून खराब होऊ नये म्हणून हातात घेत कॉफीशॉपच्या दिशेने चालू लागते. पाच मिनिटांनी पावसाचा जोर अजून वाढल्यामुळे तो देखील कॉफीशॉपमध्ये जातो. आतमध्ये एका टेबलासमोर तिला बसलेली पाहतो आणि साईडला असलेल्या एका खिडकीजवळ जाऊन उभे राहून बाहेर पाऊस पाहत थांबतो.
ती एकटी बसून काहीसा विचार करत असते, तिला आज घडलेला प्रसंग आठवतो. आज कॉलेजच्या पास आऊट होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे ठेवलेल्या गेट टूगेदर पार्टीला ती गेलेली असते. तिकडे तिचा कॉलेजपासून असलेल्या बॉयफ्रेंडला एक दुसऱ्या मुलीसोबत एकमेकांना किस करताना तिने पाहिलेले असते. हे पाहून त्यांना काहीही न समजू देता ती परस्पर पार्टीक्लबमधून रडत रडत बाहेर पडलेली असते. रिक्षा करून घरी जात असताना या पावसात अशी अडकते, हे सर्व आठवून ती पुन्हा रडू लागते. तिला असे रडताना पाहून तो पुन्हा तिच्याजवळ जातो आणि तिच्या हातात टेबलावर ठेवलेला टिश्यूपेपर देत म्हणतो,
"तुम्ही शांत व्हा... पाऊस थांबेल थोड्या वेळात मग घरी जाऊ शकता. ही जागा सेफ आहे, काळजी करू नका आणि असे रडू नका."
तो पुन्हा तिच्यासोबत बोलायला आलेला पाहून ती जरा सावरून बसते. तिने रडणे थांबवताच तो पुन्हा साईडला असलेल्या खिडकीजवळ जाऊन उभा राहतो. त्याच्या बोलण्यात काळजी व अदब पाहून आणि तिच्याशी बोलताना त्याची नजरदेखील खाली पाहून त्याच्याबद्दलची भीतीवजा शंका थोडी दूर होते. कॉफीशॉपमध्ये असलेल्या गर्दीमुळे बसायला जागा न मिळाल्याने तो असा उभा राहिलेला आहे हे तिच्या लक्षात येते, मग ती वेटरला सांगून तिच्या टेबलासमोर असलेल्या रिकाम्या खुर्चीवर बसायला त्याला बोलावते.
तो येऊन बसता बसता तिला थँक्स म्हणतो आणि कॉफीसाठी विचारतो. ती मानेनेच होकार देते. कॉफी आल्यावर तो तिच्याकडे कप सरकवत म्हणतो,
"तुम्ही मघाशी रडत होतात म्हणून मी तुम्हाला शांत करण्यासाठी आलो होतो, तुमचे डोळे अजूनही लाल आहेत, तुम्ही पावसामुळे इथे अडकलेले आहात म्हणून रडत आहात का?"
कॉफीचा घोट घेऊन ती जरा आता शांत झालेली असते, थोडं रिलॅक्स फिल करत ती त्याला म्हणते,
"हो... ते तर आहेच आणि माझा एक पर्सनल प्रॉब्लेम पण झालेला आहे, त्यामुळे जरा डिस्टर्ब आहे. आय एम फाईन नाऊ"
विषय बदलावा म्हणून ती त्याला म्हणते, "हा मुंबईचा पाऊस म्हणजे माझ्यासाठी एक शिक्षाच असते, नको तेव्हा नेमका येतो. मला तर बिलकुल आवडत नाही हा पाऊस, मग असे अचानक भिजायला, अडकून पडायला होते. आम्हा लेडीजला तर या गोष्टीचा फार त्रास होतो... तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचे आहे ते."
यावर तो म्हणतो, "आय कॅन अंडरस्टॅन्ड युवर प्रॉब्लेम, पण तुम्ही जे आत्ता पावसाला नावे ठेवलीत आणि तुम्हाला पाऊस बिलकुल आवडत नाही असे म्हणालात ते मला अजिबात पटलेले नाही. मी तुमच्या मताशी सहमत नाही."
दोघांमध्ये आता अनकम्फर्डनेस जाऊन ते गप्पा मारू लागतात. तिला त्यासोबत फ्रेंडली आणि सेफ वाटू लागते. त्याचा स्वभावदेखील तिला आवडतो. अश्याच तासभर गप्पा झाल्यानंतर ते बाहेरील परिस्थितीचा आढावा घेतात. एव्हाना पाऊस थांबलेला असतो आणि रस्त्यावरील साचलेले पाणीसुद्धा वाहून गेलेले असते तसेच वाहतूक सुद्धा सुरू झालेली असते म्हणून ते दोघे आता उठण्याचा तयारीत असतात तेवढ्यात तो तिला विचारतो,
"तुम्ही कुठे जात आहात? हवे तर मी ड्रॉप करेल, माझी गाडी आहे बाहेर."
ती मनात असा विचार करते की, आता घरी जाण्यापेक्षा पुन्हा पार्टीमध्ये जायचे आणि श्रेयसला जाब विचारायचा, मी असे रडत बसून त्याचे काही बिघडणार नाही. असा विचार करून ती म्हणते,
"मी अंधेरीमधील क्लब18 या पार्टीक्लबला जात आहे, तिकडे आमच्या कॉलेजची गेट टूगेदर पार्टी आहे."
यावर तो म्हणतो, "मीसुध्दा तिकडेच जात आहे, मी पण हिंदुजा कॉलेज बॅच 2019 चा स्टुडन्ट आहे. मी तुम्हाला ओळखतो म्हणूनच तुम्हाला अश्यावेळी एकटे पाहून बोलायला आलो होतो."
ती आश्चर्याने त्याच्याकडे निरखून पाहत म्हणते आपण तर एकच बॅचचे आहोत की, बहुतेक आपले डिव्हिजन वेगवेगळी असतील म्हणून मी कधी पाहिले नसेल. पण तुम्ही मला ओळखता हे का नाही सांगितले इतक्या वेळेपासून? कसयं ना आपण एकाच कॉलेजमध्ये शिकून तिकडे न भेटता आज अश्या ठिकाणी भेटलो, ते ही कॉलेजच्या पार्टीला जाताना. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. बाय द वे माझं नाव \"शुभ्रा\" तुमचं नाव काय? आणि आपण एकमेकांना अहो जाओ न बोलता एकेरी बोलूयात... चालेल ना ?"
"हो चालेल की, मी समीर... समीर शिंदे, मी \"सी\" डिव्हिजन मध्ये होतो आणि तू \"ए\" डिव्हिजन मध्ये होतीस, मला आठवतंय. मी मुद्दाम आपली ओळख नाही सांगितली. सोड ते, चल निघुयात आपण पार्टीला."
असे म्हणून दोघेही कॉफीशॉपमधून बाहेर पडून समोर उभ्या असलेल्या समीरच्या कारमध्ये जाऊन बसतात. गाडी सुरू करून निघाल्यावर समीर शुभ्राला विचारतो,
"इफ यु डोन्ट माईंड, बट कॅन आय आस्क यु समथिंग? तू मघाशी कॉफीशॉपमध्ये बसून का रडत होतीस? आणि काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम झाला आहे असे म्हणालीस?"
ती नकारात्मक मान हलवत उत्तर देते. "विशेष काही नाही रे... नथिंग सिरीयस"
तिचा पुन्हा सिरीयस झालेला चेहरा पाहून तो म्हणतो, "शुभ्रा...! तुझ्या चेहऱ्यावरून तर पाहताच समजून येतंय की यु आर स्टील डिस्टर्ब, अशी येणार आहेस का पार्टीला. प्लिज टेल मी... यु कॅन ट्रस्ट मी."
त्याच्या अश्या पुन्हा विचारण्याने ती एकदा त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहते आणि म्हणते "आता तुला म्हणून सांगते, तू \"सी\" डिव्हिजन मध्ये होतास म्हणजे श्रेयसला ओळखत असणारच, माझं आणि श्रेयसचे कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकमेकांवर प्रेम आहे, त्याच्या वेगळेपणावर मी भाळले होते. तो माझ्यासाठी कविता करत होता. खूप इम्प्रेस केले त्याने मला तेव्हापासून. कॉलेजमध्ये कोणाला हे माहिती नव्हते की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. आज पार्टीला मी येणार नाही असे त्याला खोटेच सांगितले आणि त्याला जाऊन सरप्राईज देणार होते. मी जेव्हा पार्टीला पोहचून त्याला शोधू लागले. शोधता शोधता पार्टी हॉलच्या पाठीमागे गेले तिथे आपल्याच कॉलेजमधली आमची फ्रेंड शनया आणि तो एकमेकांच्या मिठीत होते आणि एकमेकांना किस करत होते. त्यांना असे पाहून मला समजलेच नाही की आता काय करावे, मी त्यांना पाहिले असे कळू न देता परस्पर तिकडून बाहेर निघून आले आणि थेट घरी जात होते. कॉफीशॉपमध्ये हे सर्व आठवून मला पुन्हा रडायला आले होते. माझे डोळे रडून त्यामुळेच लाल झालेले आहेत. पण आता मी ठरवलंय की असे घरी न जाता पुन्हा पार्टीमध्ये जाऊन श्रेयसला जाब विचारायचा. म्हणून आता पुन्हा तिकडे जाण्याचा निर्णय घेतला."
समीर सर्व ऐकून शुभ्राकडे पाहत म्हणतो, "श्रेयस आणि कविता काय म्हणतेस तू? त्याला तर अजिबात कविता वगैरे यायच्या नाहीत. शनया सोबत तो कसा काय असा? कारण तीला मी ओळखतो, त्यांचे असे कधी यापूर्वी मी पाहिले किंवा ऐकलेही नाही. आणि श्रेयसने तुझ्यासोबत असे केले तर? मी तर समजत होतो की...."
तो पुढे काहीच बोलत नाही
तो पुढे काहीच बोलत नाही
ती समीरकडे पाहत म्हणते, "काय झालं समीर तुला काही माहिती आहे का याबद्दल? असेल तर प्लिज मला सांग"
"होय... पण मी तुला आत्ता काही सांगत नाही, आपण तिकडे जाऊयात आधी, बघच तू आता आज काय होणार आहे तिकडे" असे म्हणत समीर गाडीचा स्पीड वाढवतो.
दोघेही पार्टीमध्ये पोहोचतात तेव्हा श्रेयस एका बाजूला ड्रिंक करत बसलेला असतो. शुभ्रा त्याला पाहून जाब विचारण्यासाठी त्याच्या दिशेने जाऊ लागते तोच समीर शुभ्राचा हात पकडून तिला थांबवतो आणि म्हणतो,
"थांब शुभ्रा... तो नशेत आहे, थोडा वेळ थांब, सर्वांसमोर गोंधळ नको."
"थांब शुभ्रा... तो नशेत आहे, थोडा वेळ थांब, सर्वांसमोर गोंधळ नको."
इकडे पार्टी रंगात आलेली असते. पार्टीहॉलच्या एक बाजूला असलेल्या स्टेजवरून एक अनाऊन्समेंट होते की, "आता कोणीही स्टेजवर येऊन आपली काहीतरी कला सादर करावी आणि पार्टीमध्ये अजून रंगत आणावी, गाणे, डान्स, स्टॅन्डअप कॉमेडी, कविता, शायरी काहीही करू शकता." समीर थोडावेळ मनात काहीतरी विचार करतो आणि शुभ्राकडे पाहतो, तिला नजरेने स्टेजकडे पाहायला खुणावून तो स्टेजवर जातो. माईक हातात घेऊन म्हणतो,
"गुड इव्हीनिंग फ्रेंड्स, मी समीर शिंदे... आपल्यासमोर माझी स्वलिखित कविता सादर करणार आहे, मी ही कविता माझ्या आवडत्या व्यक्तीसाठी लिहिली होती. होप तुम्ही एन्जॉय कराल."
"गुड इव्हीनिंग फ्रेंड्स, मी समीर शिंदे... आपल्यासमोर माझी स्वलिखित कविता सादर करणार आहे, मी ही कविता माझ्या आवडत्या व्यक्तीसाठी लिहिली होती. होप तुम्ही एन्जॉय कराल."
सर्वजण त्याला येएए... असा आवाज करून हात उंचावून चिअरअप करतात. शुभ्रादेखील त्याला थम दाखवून रिस्पॉन्स देते. तसा तो पापण्यांची उघडझाप करून डोळ्यांनेच तिला थँक्स म्हणतो. आणि कविता बोलायला सुरुवात करतो.
बोलायचं असते खूप तुझ्याशी
पण शब्द सुचत नाहीत
मनी अंतरीचे भाव माझे
ह्या गगनात मावत नाहीत
पण शब्द सुचत नाहीत
मनी अंतरीचे भाव माझे
ह्या गगनात मावत नाहीत
नजर माझी भिरभिर
सतत तुलाच शोधते
माझ्या मनी वसली आहेस
क्षणात मला उमजते
सतत तुलाच शोधते
माझ्या मनी वसली आहेस
क्षणात मला उमजते
दूर अंतर जरी असले
तुझ्या नि माझ्या असण्यात
जगाने पाहिले का कधी
तुटलेले राधा कृष्णाला प्रेमात
तुझ्या नि माझ्या असण्यात
जगाने पाहिले का कधी
तुटलेले राधा कृष्णाला प्रेमात
अजून बरंच काही सांगायचंय
पण शब्द सुचत नाहीत
मनी अंतरीचे भाव माझे
ह्या गगनात मावत नाहीत
पण शब्द सुचत नाहीत
मनी अंतरीचे भाव माझे
ह्या गगनात मावत नाहीत
ही कविता ऐकून शुभ्रा स्वप्नात हरवते, तिला कॉलेजचे जुने दिवस आठवतात. कॉलेजची ब्युटीक्वीन असलेल्या शुभ्रावर सर्व कॉलेज फिदा असते, रोज कोणी ना कोणी तरी मुलगा तिला प्रपोज करतच असे. या सगळ्या प्रपोजलला ती सरसकट धुडकावून टाकत असे. पण एके दिवशी तिच्या बेंचवर कोणीतरी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली तिला सापडते. आणि समीरने आत्ता स्टेजवर सादर केलेली कविता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेली असते. शेवटी नावाच्या ऐवजी फक्त \"एस\" असे अक्षर लिहिलेले असते. या चिठ्ठीनंतर तिला तिच्या बॅगमध्ये, गाडीवर, बेंचवर, तिच्या नेहमी बसायच्या कट्ट्यावर, कधी नोटबुक मध्ये अश्या अनेक चिठ्ठ्या सापडतात. त्यात फक्त तिच्यासाठीच लिहिलेल्या कविता असे. जवळजवळ तीन महिने हा खेळ चालू होता. तिच्याकडे जवळपास २०-२५ चिठ्ठ्या साठलेल्या होत्या. शेवटची चिठ्ठी मिळाली त्यात असा मजकूर होता की,
प्रिय शुभ्रा,
आजपर्यंत मी तुझ्यासाठी अनेक कविता लिहिल्या आणि तुला चिठ्ठ्यामार्फत छुप्या पद्धतीने पाठविल्या, तुला हा सर्व प्रकार आवडला की नाही मला माहिती नाही. म्हणून मी आता तुला जास्त त्रास न देता समक्ष भेटून तुला माझ्या फिलिंग्ज सांगणार आहे. स्वतःला रिविल करून माझ्या मनावरचा आलेला ताणदेखील कमी करणार आहे कारण मला आता असे करणे सहन होत नाही. आता जास्त काही न लिहिता मी तुला उद्या आपल्या कॉलेजच्या गार्डनमध्ये कॉलेज संपल्यावर ६ वाजता भेटण्याचे ठरवलेले आहे. तू पण नक्की ये मी वाट पाहेन.
\"एस\"
आजपर्यंत मी तुझ्यासाठी अनेक कविता लिहिल्या आणि तुला चिठ्ठ्यामार्फत छुप्या पद्धतीने पाठविल्या, तुला हा सर्व प्रकार आवडला की नाही मला माहिती नाही. म्हणून मी आता तुला जास्त त्रास न देता समक्ष भेटून तुला माझ्या फिलिंग्ज सांगणार आहे. स्वतःला रिविल करून माझ्या मनावरचा आलेला ताणदेखील कमी करणार आहे कारण मला आता असे करणे सहन होत नाही. आता जास्त काही न लिहिता मी तुला उद्या आपल्या कॉलेजच्या गार्डनमध्ये कॉलेज संपल्यावर ६ वाजता भेटण्याचे ठरवलेले आहे. तू पण नक्की ये मी वाट पाहेन.
\"एस\"
ठरल्याप्रमाणे शुभ्रा वेळेत तिकडे पोहोचते तेव्हा गार्डनमध्ये श्रेयस तिची वाट पाहत बसलेला असतो. तुला चिठ्ठ्या पाठवणारा तो मीच अशी कबुली देऊन तिची माफी मागतो आणि तू खूप आवडते असे सांगतो. तिला प्रपोज करतो. तिला त्याच्या कविता खूपच आवडलेल्या असतात आणि त्याची प्रेम व्यक्त करण्याची अशी वेगळी पद्धत खूप भावलेली असते. ती सुद्धा त्याचे प्रेम स्वीकारून त्याच्या सोबत आजपर्यंत रिलेशनशिपमध्ये असते. या सर्व आठवणी शुभ्राच्या डोळ्यांसमोर स्पष्टपणे तरळून जातात. तोपर्यंत इकडे समीरची कविता संपलेली असते आणि आणि टाळ्यांच्या आवाजाने ती पुन्हा भानावर येते. त्याला सर्वजण अजून एक कविता म्हणायची विनंती करतात तेव्हा तो मग पुन्हा माईक ऑन करतो आणि पुढची कविता म्हणतो,
तुझा हसरा चेहरा
सदैव डोळ्यासमोर असावा।
सदैव डोळ्यासमोर असावा।
तुझा सहवास नेहमी
माझ्या भोवती दरवळावा।
माझ्या भोवती दरवळावा।
जीवनाच्या वाटेवर
तुझी सावली बनून चालावे।
तुझी सावली बनून चालावे।
तुझ्या गोड गप्पांमध्ये
मन रमून जावे।
मन रमून जावे।
तुझ्या स्वप्नात मन
बावरे होऊन फिरावे।
बावरे होऊन फिरावे।
असेच कायम तुझ्या
प्रेमात डुंबत रहावे।।
प्रेमात डुंबत रहावे।।
हीसुद्धा कविता ऐकून शुभ्रा आता पूर्ण हादरतेच कारण की या कविता श्रेयसने तिच्यासाठी लिहिलेल्या असतात आणि मुख्य म्हणजे ह्या कविता फक्त श्रेयस आणि तिलाच माहिती असतात. या कविता समीरला कश्या काय समजल्या आणि तो तर म्हणाला की या स्वरचित आहेत. असा प्रश्न शुभ्राला पडतो. कविता म्हणून झाल्यावर समीर स्टेजवरून खाली उतरतो तेव्हा शुभ्रा त्याच्याकडे पळतच जाते आणि प्रश्नार्थक मुद्रेने त्याकडे पाहून विचारते,
"समीर... या श्रेयसने माझ्यासाठी केलेल्या कविता तुला कश्या काय माहिती आणि तू तर म्हणतोय की या तू लिहिल्या आहेस. नक्की काय खरं मला कळेल का, विचार करून माझं डोकं आता बधिर होऊ लागले आहे."
समीर म्हणतो, "आता नीट लक्ष देऊन ऐक, तुला अनेक चिठ्ठ्यामधून कविता पाठवणारा आणि त्या दिवशी तुला शेवटची चिठ्ठी लिहून भेटायला बोलावणारा तो \"एस\" म्हणजे मी एस फॉर समीर."
शुभ्रा समीरकडे गोंधळलेल्या नजरेने पाहते आणि पुढे काय म्हणतोय ते लक्ष देऊन ऐकू लागते.
"प्रथम मी जेव्हा तुला कॉलेजमध्ये पाहिले तेव्हा तू अचानक आलेल्या पावसात भिजलेली होतीस, तुझी ओढणी आणि हातातले पुस्तक सावरत या पावसामुळे स्वतःची होणारी फजिती पाहून त्रासलेली दिसत होतीस. तुला तेव्हा पाहून मी तुझ्याकडे आकर्षित झालो कारण तू तेव्हाही अशीच खूप सुंदर दिसत होतीस. कॉलेजमध्ये येता-जाता तुला पाहून हळूहळू मी तुझ्या प्रेमात पडलो... एकतर्फी प्रेमात. आज जेव्हा तू कॉफीशॉपमध्ये पुन्हा पावसाला नावे ठेवत होतीस तेव्हा आठव मी तुला काय म्हणालो.... की, \"आय कॅन अंडरस्टॅन्ड युवर प्रॉब्लेम\" मला आधीपासूनच माहिती आहे की तुला पाऊस आवडत नाही."
"तर मुद्द्यावर येतो की, त्या सर्व कविता मी स्वतः तुझ्यासाठी लिहिलेल्या होत्या आणि त्याची नोंद माझ्या पर्सनल डायरीमध्ये नेहमी करत होतो. शेवटच्या चिठ्ठीविषयी पण मी डायरीमध्ये लिहिलेले होते. आपण समोरासमोर पहिल्यांदा भेटणार म्हणून त्या दिवशी मी आनंदात होतो आणि मनातून जरा घाबरलेलो देखील होतो. बहुतेक त्याच विचाराने अचानक माझं डोकं खूप दुखू लागले आणि मी झोपी गेलो ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच उठलो. श्रेयस आणि मी हॉस्टेलमध्ये रूमपार्टनर होतो. सकाळी उठल्यावर श्रेयसने मला विचारले की, काल काय झालं होतं तुला? डोकं दुखते म्हणून झोपलास तो थेट आत्ता उठतोय. तू शांत झोपला होतास म्हणून मी पण तुला काही उठवले नाही. आता तब्येत बरी आहे ना तुझी? बरं वाटत नसेल तर आराम कर किंवा डॉक्टरांकडे जाऊन ये. मी आलो असतो सोबत पण मी आज जरा बाहेर जात आहे. सम्या मी एक सिक्रेट तुला सांगतो नीट ऐक... ए डिव्हिजनची शुभ्रा माहिती आहे ना... तिचं आणि माझं अफेअर चालू आहे. आज आम्ही दोघे बाहेर फिरायला जाणार आहोत. कॉलेजमध्ये कोणाला काही माहिती नाही आमच्याबद्दल, तुही कोणाला काही सांगू नकोस. मी आता रात्रीच येईल असे म्हणून तो निघून गेला."
शुभ्रा समीरकडे एकटक पाहत तो जे काही सांगतोय ते लक्ष देऊन ऐकते, तिचा उडालेला गोंधळ तिच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दिसतो. समीर पुढे म्हणतो,
"त्या दिवशी श्रेयसकडून हे सर्व ऐकून मी तर एकदम रडकुंडीला आलो. तुमचे आधीपासूनच एकमेकांवर प्रेम होते आणि मी अज्ञानामध्ये काहीही चौकशी न करता तुझ्यावर एकतर्फी प्रेम करू लागलो. तुझ्याविषयी मनातील भाव कवितेमध्ये लिहून तुला मी पाठवलेल्या चिठ्ठ्या पाहून तुला किती त्रास झाला असेल याचा मी अंदाज बांधत बसलो. एक वेळ असे वाटले की बरे झाले काल मी झोपी गेलो, नाहीतर तु सर्वांसमोर माझा अपमान केलेला मला सहन झाला नसता. मला असे नाकारलेले पचनी पडले नसते. त्या दिवशी बहुतेक मी रागात माझी डायरी कुठे फेकली की काय पण मला पुन्हा ती दिसलीच नाही, मी भानात नव्हतोच मुळी. तुमच्या प्रेमाच्यामध्ये मी नादानपणे येऊन खूप मोठी चूक करत होतो म्हणून आता यापुढे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही असे ठरवून मी पुन्हा कॉलेजला रेग्युलर कधी आलोच नाही. श्रेयस तुला भेटत होता... तुम्ही एकमेकांना गिफ्ट देत होतात... फिरायला जात होतात हे सर्व मला श्रेयसकडून कळत होते. त्यानंतर होस्टेलच्या रूममध्येच बसून मी अभ्यास केला आणि परीक्षा दिली. तो थेट आज गेट टूगेदरचे ईन्हव्हीटेशन मिळाल्यामुळे पार्टीला येत असताना तुझ्यासोबत रस्त्यात गाठ पडली. तुझ्यासोबतची माझी अशी ओळख म्हणून मी कॉफीशॉपमध्ये आधी तुला ओळखतो असे काही सांगितले नाही, काय सांगणार होतो ना मी तेव्हा."
"हे असे आहे पण मला एक गोष्ट खटकत आहे की मला आत्ताच तुझ्या तोंडून समजले श्रेयसने तुझ्यासाठी कविता केल्या आणि तेव्हापासून तू त्याच्या प्रेमात पडलीस. बट या कविता तर मी तुझ्यासाठी केलेल्या होत्या. त्याला कसे काय समजले या कवितांविषयी? मला याचा काही अंदाज येत नाहीये. हे श्रेयसच सांगू शकेल... चल आता आपण हे सर्व त्यालाच विचारुयात." असे म्हणून समीर शुभ्राला घेऊन श्रेयस बसलेल्या टेबलाकडे जातो. समीर आणि शुभ्रा या दोघांना एकत्र समोर पाहून श्रेयसची पूर्ण नशाच उतरते. तो चाचपडतच शुभ्राला विचारतो,
"शुभ्रा... तू आणि इथे? आज तर तू येणार नव्हतीस ना पार्टीला... आणि या समीरसोबत कशी काय आलीस?"
शुभ्रा श्रेयसला शनयासोबत पाहिलेला प्रसंग सांगते आणि रडत रडत विचारते, "श्रेयस... तू का असा वागलास? माझ्यासोबत का असा प्रेमाचा खोटा खेळ खेळालास?"
समीर सुद्धा त्याला विचारतो की, "मी केलेल्या कविता तुला कश्या माहिती आहेत? आणि तू त्या स्वतः केल्यास असे शुभ्राला का संगीतलेस?" शुभ्राच आणि तुझं एकमेकांवर प्रेम कधीपासून आहे? आत्ताच्या आत्ता आम्हांला याचे उत्तर दे"
आता समीर आणि शुभ्रा या दोघांसमोर आपली पोलखोल झालेली पाहून श्रेयस खाली मान टाकून सर्व सांगू लागतो,
"समीर आपण रूममेट होतो, मला एकदा तुझी डायरी तुझ्या बेडवर दिसली म्हणून मी सहजच चाळली तर त्यामध्ये तुझ्या कविता होत्या आणि त्यात तू शुभ्रावरचे प्रेम व्यक्त केलेले होतेस. शेवटी तू एका चिठ्ठीविषयी लिहिलेले होतेस. त्यात शुभ्रासाठी तू अज्ञात व्यक्ती होतास आणि आता तू स्वतःला रिविल करून प्रेमाची कबुली समक्ष भेटून देणार होतास. कॉलेजच्या इतर मुलांप्रमाणे मलादेखील शुभ्रा आवडत होती. मी मनाशी एक प्लॅन केला आणि तुझी डायरी वाचून झाल्यावर मी ती चोरून लपवली. दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता मुद्दाम कोल्ड्रिंक्स मागवले आणि त्यात झोपेच्या गोळ्या टाकून तुला प्यायला दिले. पिल्यानंतर तुझे डोळे जड झाले ते तुला काही समजले नाही, डोकं दुखतंय असे म्हणून तू झोपून गेला. तसा मी उठून आवरले आणि कॉलेजच्या गार्डनमध्ये शुभ्राची वाट पहात बसलो. डायरी वाचून झाल्यामुळे मला सर्व कल्पना आलेली होती त्यामुळे निर्धास्त होतो. फक्त एकच भिती होती की शुभ्राला खरंच कविता आणि तुझी ही छुपी पद्धत आवडली असेल की ती फटकारायच्या उद्देशाने येणार आहे. पण होईल त्याला सामोरे जाऊयात असे ठरवून मी वाट पाहत बसलो. शुभ्रा आल्यानंतर मी तिला खोटी माहिती सांगितली की, मी तिच्यासाठी कविता केल्या आणि लपून छपून पाठविल्या तसेच माझं तिच्यावर प्रेम आहे असे सांगून तिला प्रपोज केले. शुभ्राला तुझ्या कविता आणि त्या अश्या छुप्या पद्धतीने तिच्यापर्यंत पोहोचवण्याची स्टाईल खूप आवडलेली होती. तिनेही होकार दिला आणि आमच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. तिला मी कॉलेजमध्ये आपल्याबाबत कोणालाच सांगू नकोस असे बजावले होते. शुभ्रा... तुझ्याविषयी मला आकर्षण होते म्हणून मी हा उद्योग केला. आणि समीर मला माफ कर तुझी डायरी अजूनही माझ्याजवळ आहे. त्यातल्याच कविता मी अधेमधे शुभ्राला मेसेजवर पाठवत असतो. मला काही कविता वगैरे जमत नाही. तिने अनेकवेळा नवीन काहीतरी लिही असे सांगूनही मला तसे काही जमले नाही."
श्रेयसचे हे बोलणे ऐकून शुभ्रा तर रडूच लागते. समीरच्या सुद्धा हावभावात बदल होऊन त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसू लागतो. शुभ्रा पुन्हा त्याला विचारते,
"आणि शनयाचे काय? तिच्यासोबत कधीपासून तू असा रिलेशनशिपमध्ये आहेस ? ते पण सांग."
"आणि शनयाचे काय? तिच्यासोबत कधीपासून तू असा रिलेशनशिपमध्ये आहेस ? ते पण सांग."
श्रेयस पुन्हा बोलू लागतो, "मी कॉलेजला असल्यापासूनच शनया आणि शुभ्रा दोघांना डेट करत आहे आणि आज माझे पितळ उघडे पडले आहे. मी तुम्हा सर्वांचा अपराधी आहे मला क्षमा करा. पण एक गोष्ट आता खरी सांगतो माझं शनयावर मनापासून प्रेम आहे. तिला यातले काहीच माहिती नाही. तुम्ही प्लिज तिला काही सांगू नका. तुम्ही दोघे मला देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. यापुढे तुमच्या दोघांच्या आयुष्यात कधीच येणार नाही." असे बोलून श्रेयस त्या दोघांसमोर हात जोडून उभा राहतो.
इतका वेळ सर्व ऐकत असलेली शुभ्रा डोळे पुसत त्याला बोलते, "श्रेयस बरं झालं मला वेळीच तुझे खरे रूप समजले. आता माझे तुझ्याशी काही घेणेदेणे उरलेले नाही, तू शनया किंवा अजून कोणाच्याही पाठीमागे जा मला काही फरक पडत नाही. आजपासून आपले सर्व संबंध संपले पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नकोस आणि समीरला त्याची डायरी परत कर."
समीर सुध्दा श्रेयासवर रागावून बोलतो, "तू मित्र आणि प्रियकर म्हणायच्या लायकीचा नाहीसच पण माणूस म्हणून तरी लाज बाळग. जा त्या शनयाकडे जा आणि तिला तरी असे फसवू नकोस. नाहीतर तिला आत्ताच सर्व सांगतो मी. जा इकडून नाहीतर माझा पारा अजून चढेल."
"मी नाही शनयासोबत कधी असे वागणार. प्लिज तू तिला काही सांगू नकोस. मी आता निघतो इथून" असे म्हणत स्टेजजवळ उभ्या असलेल्या शनयाला घेऊन श्रेयस क्लबच्या बाहेर निघून जातो.
आता गेट टूगेदर पार्टी संपलेली असते. सर्व मित्रमंडळी हळूहळू क्लबमधून बाहेर पडत असतात. समीर आणि शुभ्रा दोघेही घडलेल्या प्रकारातून स्वतःला सावरत क्लबच्या बाहेर पडतात. समीरच्या मनातील भावना शुभ्राला अश्या तऱ्हेने समजल्यामुळे ती त्यासोबत नजर न मिकवता आणि दोघेही ऑकवर्ड होऊन एकमेकांशी काहीही न बोलता चालत असतात. बाहेर पुन्हा हलका पाऊस सुरू झालेला असतो. पार्किंग मध्ये जाता जाता समीर शुभ्राला म्हणतो,
"पाऊस पुन्हा चालू झाला आहे... शुभ्रा मी तुला घरी सोडतो. कुठे राहतेस तू?"
यावर शुभ्रा चेहऱ्यावरचे हावभाव लपवत म्हणते, "नको... मी जाईन कॅब करून. आधीच उशीर झाला आहे, तुला अजून उशीर नको."
समीरला तिचा ऑकवर्डनेस जाणवतो. स्वतःची चूक मान्य करत तो तिला बोलतो, "सॉरी शुभ्रा... माझ्या एका चुकीमुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागला. माझ्या चुकीमुळे तुझ्या आयुष्यात श्रेयससारखा फसवा व्यक्ती आला. या सर्वाला मीच कारणीभूत आहे. मला माफ कर प्लिज..."
शुभ्राच्या मनात आता समीरने तिच्यासाठी केलेल्या कविता, तिच्यावर असलेले प्रेम, त्याचा समजूतदारपणा अश्या गोष्टी आठवून चलबिचल चालू झालेली होती. आज तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगातून तिला एकटे एकटे वाटून स्वतःला सावरत तिला समीर विषयी प्रेमभावना उत्पन्न होते. ती मनात विचार करू लागते की, याचे आपल्यावर एवढे प्रेम असूनही त्याने माझा विचार करून स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला. मी एकटी असताना व सत्यापासून अनभिज्ञ असताना देखील त्याने अंतर ठेवून स्वतःच्या भावनांना प्रकट केले नाही. अजूनही तो माझ्याच मनाचा विचार करून काळजीपोटी निस्वार्थपणे मला सोबत करत आहे. असा मुलगा शोधून क्वचितच सापडेल. त्याने त्याच्या मनातल्या भावना क्लबमध्ये सत्य पडताळताना का होईना पण बोलून दाखवल्या आहेत. आता माझी बारी आहे समीरला यावेळी असे निराश नाही होऊ द्यायचे. असा विचार करत ती समीरला म्हणते,
"थांब समीर... मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचे आहे. समीर मी तुझ्या कवितेवर पूर्वीपासूनच प्रेम करत आलेले आहे. पण आज आपण पावसात अडकलेलो असताना एक अनोळखी व्यक्ती म्हणून, त्यानंतर एक ओळखीचा बॅचमेट म्हणून, क्लबमध्ये श्रेयस समोर मला सपोर्ट करत एक मित्र म्हणून खरच खूप आवडला आहेस. तु माझ्यावर एवढ्या आधीपासून प्रेम करतोस पण गैरसमजातून तू माझ्यासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलास. याचा आदर करत आज मी तुला स्वतःहून प्रपोज करते... समीर आय लव्ह यु... माझा प्रियकर होशील का?"
शुभ्राच्या अश्या अनपेक्षित प्रपोजने समीर एकदम खुश होत शुभ्राचा हातात हात घेऊन तिला रिस्पॉन्स देतो, "येस शुभ्रा... आय लव्ह यु टू... आय रिअली व्हेरी लव्ह यु...मी अजूनही तुझ्यावर तितकेच प्रेम करतो."
तिचे दोन्ही हात हातात घेत तिच्या डोळ्यात डोळे घालून समीरने तिच्यासाठी पूर्वी केलेली चारोळी तिला म्हणून दाखवतो.
पाहता तुजला नेहमी
करतो मी चिंतन
कोण जास्त बोलके
तुझे ओठ की नयन
करतो मी चिंतन
कोण जास्त बोलके
तुझे ओठ की नयन
तेवढ्यात जोरात वीज चमकते, ढग गडगडतात आणि जोराचा पाऊस चालू होतो. तशी शुभ्रा समीरला बिलगते आणि दोघेही त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार असलेल्या पावसात चिंब होऊन भिजतात. आज पहिल्यांदाच तिला पाऊस मनापासून आवडतो. पावसाचे आभार मानत ती समीरच्या कुशीत अशीच मनसोक्त भिजत राहते.
"पावसाने सुरूवात झालेल्या प्रेमाची कबुली पावसातच मिळाली आणि आपले प्रेम असेच प्रत्येक पावसात बहरू दे." असे म्हणत समीर तिला अजूनच घट्ट मिठी मारतो. आणि त्यांच्या जीवनात एका नवीन वर्षा पर्वाची सुरुवात होते.
(✍️ © एकांतप्रिय प्रशांत ०७.०७.२०२१)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा