भाग -अडुसष्ट.
बाप लेक मग बराच वेळ बोलत बसले. तिने त्याला आपल्या पेंटिंग्स दाखवल्या. त्यातील बारकावे बघताना तो हरखून जात होता. स्वीटीला आर्ट आवडावे म्हणून त्याने कितीदा खटाटोप केला होता पण तिला कधीच त्याच्यात रुची नव्हती. आणि त्याची प्रीती त्याचे कलागूण घेऊन जन्माला आली, हे त्याला ठाऊकही नव्हते.
त्याला असे अचानक गप्प झालेले बघून प्रीतीने खुणेनेच 'काय झाले' म्हणून विचारले. 'काही नाही' म्हणून त्याने मान हलवली. भूतकाळ विसरून आता केवळ वर्तमानावर फोकस करायचा असा त्याने मनात निश्चय केला आणि मग आपसूकच त्याचे ओठ रुंदावले.
"बाबा, मला ना तुमच्या लग्नाचे खूप मोठे सेलेब्रेशन करायचे आहे." प्रीतीचे बोलणे ऐकून तो मंद हसला.
"तुला वाटते का की याची काही गरज आहे?" तो.
"येस! ऑफ्टरऑल आप्पासाहेबांच्या सोनियाचे लग्न असेल. मग ते राजेशाही असायला नको का?" ती.
"सोनियाला अशी दिखाव्याची कधी आवड नव्हती. चमक धमक, झगमगाट या पासून ती दूर रहायची म्हणून तर पाहताक्षणीच प्रेमात पडलो होतो तिच्या. ती गर्भश्रीमंतांची लेक आहे हे सुरुवातीला मला कुठे ठाऊक होते?" तो.
"पण तरीही सोनप्रीतची सीईओ आहे ती. तिच्या आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण सेलेब्रेट तर करावाच लागेल ना." ती.
"तुम्हा मुलांना वाटेल तसं करा. मला फक्त सोनियाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून ऑफिशियली आम्ही नवराबायको आहोत हे जाहीर करायचे आहे. एकमेकांचे तर आम्ही पूर्वीपासूनच आहोत." मोहन.
"मला लग्नात शालिनी ऑंटीला बोलवायचे आहे." मोहनच्या चेहऱ्यावरवरचे भाव टिपत प्रीती म्हणाली.
"व्हॉट?"
"होय! आणि सोबत आबांना पण. तुमच्यावर रागावले आहेत ते. पण जेव्हा प्रत्यक्षात भेटतील तेव्हा राग वितळेल कदाचित." ती.
"प्रीती, आबा खूप दुखावलेत गं. मी घरातून बाहेर पडल्यापासून इतक्या वर्षात एकदाही माझ्याशी बोलले नाहीत. आता तर मी फोन करणे देखील सोडून दिले आहे." तो.
"माहितीये मला. मी त्यांना बघितले आहे. तुमच्या नावाचा उल्लेख जरी झाला तरी ते चिडतात. पण जेव्हा तुम्ही त्यांना मिठीत घ्याल ना तेव्हा मनातील सगळे गैरसमज दूर होतील. बाबा, एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे?" प्रीतीची नजर त्याच्या नजरेला भेदत होती.
"तू म्हणतेस तसे झाले तर चांगलेच आहे. सगळं ठीक होणार असेल तर मलाही ते हवेच आहे ना."
आबांच्या आठवणीत तो जरासा हळवा झाला.
आबांच्या आठवणीत तो जरासा हळवा झाला.
"तर ठरलं मग. उद्याच मिहीर अंकलच्या मदतीने त्यांच्या भटजीकडून एक चांगला मुहूर्त शोधायला सांगते." आनंदाने ती.
"काहीही काय गं? प्रेम करायला आम्हाला मुहूर्ताची गरज पडली नाही आणि आता लग्नाला कशाला मुहूर्त? मला आता सोनियाला सोडून क्षणभरही राहवत नाहीये." तिच्याकडे बघून तो.
"डॅड?" त्यांच्या गप्पांचा फड रंगला असताना स्वीटी आत आली.
"मला तसे नव्हते म्हणायचे. माझ्यामुळे सोनियाने खूप सफर केलेय ना, म्हणून तिच्यापासून वेगळे नाही रहायचेय असं म्हणायचं होतं मला." मोहन.
"यू आर राईट." प्रीती हसली. पण माई कितीही स्ट्रॉंग दाखवत असली तरी सध्या ती तितकी स्ट्रॉंग नाहीये. इतके दिवस ती बेशुद्धावस्थेत होती. तो बॅकलॉग भरून काढायचा आहे म्हणून हे मुहूर्ताचे कारण. तुमचीही काही कामे पेंडिंग असतील ना, ती या दिवसात पूर्ण करून घ्या." ती.
"दूरदृष्टीची आहेस. तुझे बोलणे ऐकून आईची आठवण झाली. प्रीती तू जन्माला आलीस नि अगदी त्याच वेळी आई गेली. तू म्हणजे आईचा पुनर्जन्म असशील का गं?" त्याचा स्वर कातर झाला होता.
"गॉड! रिअली? प्रीती तू म्हणजे मग तर माझी आजी झालीस ना?" मोहनला तसे हळवे बघून स्वीटीने जोक मारण्याचा प्रयत्न केला.
"इट्स नॉट फनी हं. मी फक्त माझ्या माईची प्रीती आहे." ती नाक उडवून म्हणाली.
"मी पण माझ्या डॅडची स्वीटी आहे. हो ना डॅड, तूच सांग तुला जास्त कोण आवडतं? प्रीती की स्वीटी?" स्वीटीने त्याला यक्षप्रश्न केला.
"सिली गर्ल. हा प्रश्न मला कधी पडणार नाही कारण तुम्ही दोघीही माझ्या आहात. एकीत माझं रक्त वाहतेय तर दुसरीत माझा श्वास! दोघांना वेगळं नाही करता येणार, गॉट इट?" स्वीटीच्या डोक्याला एक टपली मारून तो म्हणाला.
"बरं, चला झोपूया आता. स्वीटी उद्या सकाळी आपण घरी जातोय." मोहन खुर्चीवरून उठत म्हणाला.
"ओके. उद्यापासून मी सुद्धा कामाला लागते." प्रीती.
"मी पण. मला डॅड साठी खूप सारी शॉपिंग करायची आहे." स्वीटी.
"आणि तुझ्यासाठीदेखील. तुलाही लवकर लग्न करायचे आहे ना?" हसून प्रीती म्हणाली त्यावर स्वीटी लाजली.
"आधी डॅडच्या लग्नाचा बँड वाजेल नंतर आपल्या." प्रीतीला डोळा मारून ती म्हणाली.
प्रीतीने तिच्याकडे डोळे मोठे करून बघितले.
प्रीतीने तिच्याकडे डोळे मोठे करून बघितले.
"इन्स्पेक्टर कृष्णा तुझ्यात किती गुंतलाय हे माहितीये मला. " तिला कोपराने मारत स्वीटी.
"अजून तसे काही नाहीये गं. चल झोपूया. बाबा गुडनाईट." प्रीती सामान्यपणे बोलत असली तरी लाजेने लाल झालेला तिचा चेहरा मोहनच्या नजरेतून सुटला नाही. त्यावर नंतर बोलायचे म्हणून तो गप्प राहिला.
*******
"डॅड, तुझी आर्टरूम किती भारी आहे. किती सुंदर रेखाटलं आहेस सगळं? इट्स अमेझिंग!"
मोहन आणि स्वीटी त्यांच्या बंगल्यावर परतले होते.
त्या दिवसानंतर आज पहिल्यांदा स्वीटी मोहनच्या आर्टरूम मध्ये प्रवेशली होती. सोनियाची विविध रूपं असलेली त्याची चित्रे बघून ती भारावली होती.
"डॅड, तू मला लहानपणी ड्रॉईंग करायला लावायचास तेव्हा मला ते किती बोअर व्हायचे. आता कळतेय तू मला हातात ब्रश देण्याचा प्रयत्न का करायचास ते. मला ड्रॉईंग कधीच जमले नाही पण प्रीतीने मात्र तुझा गुण अगदी जशाचा तसा घेतलाय नाही? तिच्या आर्टरूम मध्ये किती सुंदर सुंदर चित्रे आहेत."
तिच्या बोलण्यामुळे मोहनच्या ओठावर हलके स्मित उमटले. प्रीतीच्या बोटातील जादू त्याने प्रत्यक्षात बघितली होतीच की.
"स्वीटी प्रीती तुझ्या आणि समीरबद्दल काय बोलत होती? आर यू रिअली सिरीयस अबाऊट समीर?" त्याला काल रात्रीचे त्या दोघींचे बोलणे आठवले आणि त्याने विषयात हात घातला.
"ॲक्च्युअली डॅड, आय एम सॉरी!" ती खाली बघत म्हणाली.
"सॉरी? फॉर व्हॉट?" तो.
"कारण माझ्या आणि समीरच्या नात्याबद्दल मला सर्वप्रथम तुला सांगायचे होते. तुझ्या चेहऱ्यावरचा माझ्यासाठी असलेला हॅपीनेस मला बघायचा होता. पण मी तुला सांगायला घरी येण्यापूर्वीच प्रीती इथे आली आणि मग तो विषयच बाजूला पडला." खाली भहर स्वीटी.
"इट मिन्स तुला तो खरंच आवडतो तर." मोहन.
"त्यादिवशी मी त्याला लग्नासाठी विचारले होते." आपली नजर वर करून ती म्हणाली.
"स्वीटी, माय डार्लिंग डॉटर! किती लवकर मोठी झालीस तू? आयुष्याचे निर्णय घ्यायला लागलीस आणि मी तुला आजवर माझी इवलीशी परीच समजत राहिलो." त्याच्या डोळ्यात पाणी आले.
"डॅड, तू रागावला आहेस माझ्यावर?"
"नो स्वीटहार्ट, आय एम सो हॅपी फॉर यू!" तिच्या मस्तकावर ओठ टेकवत तो म्हणाला.
"मग तुझ्या डोळ्यात पाणी?"
"आनंदाश्रू आहेत गं वेडे. लेक मोठी झालीये याचा आनंद आणि ती आता मला सोडून जाईल याचे दुःखही." तो डोळे पुसत म्हणाला.
"असे असेल तर मी आत्ताच समीरला लग्न कॅन्सल झाले म्हणून सांगते."
"नो नो डिअर. अगं वेडाबाई एका बापाच्या मनाची अवस्था आहे ही. तुला नाही कळायची. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. समीर चांगला मुलगा आहे. आवडला मला." तिच्याकडे पाहत तो म्हणाला तशी लाजून ती मोहनच्या मिठीत शिरली.
"डॅड, थँक यू! आय लव्ह यू."
"डॅड लव्हज यू टू बेटू." तिच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला.
"आणि ते प्रीतीबद्दल काय बोलत होतीस?" जेवणाच्या टेबलवर मोहन स्वीटीला विचारत होता. त्याच्या स्वरात एक अधीरता होती.
"ते त्या इन्स्पेक्टर बद्दल बोलताय का? ॲक्च्युअली आय एम नॉट शुअर बट आय थिंक की त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. ही इज सो मच केअरिंग. प्रीतीची खूप काळजी घेतोय असं मला दरवेळी जाणवत होते." ती.
"येस, यू आर राईट. मला तेव्हा लक्षात आले नाही पण आता कळतेय. दे बोथ लव्ह्ज इच अदर. त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते ते." मोहनच्या डोळ्यात चमक होती.
"डॅड पण मला एक कळत नाही की इतकी सक्सेसफुल बिझनेस वूमन lअसलेली प्रीती एका साध्याशा इन्स्पेक्टरच्या प्रेमात कशी पडली?"
"एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर डिअर! आणि सोनिया नाही का माझ्यासारख्या कफल्लकाच्या प्रेमात पडली होती.
"डॅड, तुम्ही हिरा आहात हे मॉमला माहित असावं." स्वीटी.
"त्या इन्स्पेक्टरमध्ये एक स्पार्क आहे हे प्रीतीनेही ओळखले असावे. शेवटी सोनियाची लेक ती. तिचीही नजर एका व्यापारीची आहे हे विसरू नको बरं."
मोहन म्हणाला त्यावर स्वीटीने त्याला हसून टाळी दिली.
"यू आर ॲब्स्यूल्यूटली करेक्ट डॅड." तिने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
"यू आर ॲब्स्यूल्यूटली करेक्ट डॅड." तिने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा