प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -एकाहत्तर.
भाग -एकाहत्तर.
'आत्ता कोण असेल?' म्हणून तिने दार उघडले आणि ती एकदम शॉक झाली.
"कृष्णा? तू अचानक? इथे? तुला तर आज जायचे होते ना?" ती आश्चर्याने प्रश्नावर प्रश्न विचारत होती.
"अगं, हो हो. आधी आत तर येऊ देत. की बाहेरूनच हाकलणार आहेस?" तो मिश्किल हसत म्हणाला.
"हं? हो ये ना आत." ती बाजूला होत म्हणाली. चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव अजूनही तसेच होते
"अरे कृष्णा? अचानक कसे येणे केलेस?" राधामावशी बाहेर येत म्हणाली.
"सोनिया मॅमना भेटायला आलोय." तो हसून म्हणाला.
"ए, हाय चार्मिंग बॉय!" तेवढ्यात निकीही बाहेर आली.
प्रीती आळीपाळीने तिघांकडे बघत होती. यांच्यात काहीतरी शिजत आहे असे तिला वाटले.
"पाणी?" पाण्याचा ग्लास समोर करत निकी.
"थँक्स." पाण्याचा घोट घेत तो.
"सोनिया मॅम?" त्याचा प्रश्न.
"माईला भेटायचे आहे ना, चल माझ्यासोबत." प्रीती.
"तू ऑफिसला निघालीस बहुतेक. मी भेटतो. तू जाऊ शकतेस." एक गोड हसू देत कृष्णा तिला म्हणाला.
'हा मला अव्हॉइड करतोय का?' ती स्वतःच्या विचारात होती तोवर निकी त्याला सोनियाच्या खोलीत सोडून आली.
"कृष्णा? अरे कुठाय हा?" बाजूला बघत प्रीती.
"अगं, आत्तूच्या रूममध्ये आहे. गप्पा मारतोय." निकीने ओठ रुंदावले आणि ती तिच्या खोलीत गेली. राधामावशी देखील स्वयंपाकघरात गेली.
'असे का वागत आहेत सगळे?' तिच्या कपाळावर आठी पडली.
"माई, मी ऑफिसला जातेय गं." ती मुद्दामच सोनियाच्या खोलीत सांगायला गेली.
"अरे, तू गेली नाहीस का अजून?" सोनियाने तिच्याकडे बघून विचारले.
"नाही, आता निघते." प्रीती.
"प्रीती एक मिनिट. माझे कपाट उघडतेस?" सोनिया विनवणीच्या सुरात म्हणाली.
कपाळावर आठी घेऊन तिने कपाट उघडले.
"तिथे लेफ्ट साईडला एक पिशवी आहे त्यातला ड्रेस काढ बघू." सोनिया.
प्रीतीने पिशवीतून ड्रेस बाहेर काढला. तिच्या निळाशार डोळ्यांना मॅचिंग होणारा एक सुंदर असा निळ्या रंगाचा लॉन्ग वन पीस ड्रेस तिथे होता.
"वॉव! माई खूप सुंदर आहे. कुणासाठी?" प्रीती ड्रेसकडे आणि नंतर सोनियाकडे बघून म्हणाली.
"अर्थात तुझ्यासाठी. आज हाच ड्रेस घालून जा." सोनिया.
"माई, मी ऑफिसला निघालेय. कुठल्या पार्टीला नाही." प्रीती.
"प्रीत, ही सोनप्रीतच्या सीईओची ऑर्डर आहे. तू हाच ड्रेस घालून जा. अँड धिस इज फायनल." सोनिया आता तिला आदेश देत होती.
"माई काय गं?" प्रीती.
"प्रीत, माझ्या बड्डेचे हे तुझे रिटर्न गिफ्ट आहे गं. घालून जा ना प्लीज?"
सोनियाने प्लीज म्हणताना डोळ्यात एवढे आर्जवतेचे भाव आणले की प्रीती नाही म्हणूच शकली नाही.
सोनियाने प्लीज म्हणताना डोळ्यात एवढे आर्जवतेचे भाव आणले की प्रीती नाही म्हणूच शकली नाही.
ती तो ड्रेस घेऊन तिच्या खोलीत गेली आणि चेंज करून ड्रेसला साजेसा हलका मेकअप, मॅचिंग कानातले आणि गळ्यात देखील एक नाजूकसा डायमंडचा सेट घातला.
*****
"माई येते गं मी." प्रीती पंधरा मिनिटात तयार होऊन सोनियाच्या खोलीत आली.
कृष्णा तिला कळणार नाही अशाप्रकारे डोळ्याच्या कोपऱ्यातून तिरक्या नजरेने तिला न्याहाळत होता. नाजूकशी प्रीती खूपच गोड दिसत होती. तिला बघून तो तर एकदम फ्लॅटच झाला पण त्याने तसे काही जाणवू दिले नाही.
"बरं." म्हणून सोनियाने मान डोलावली आणि पुन्हा ती कृष्णाशी बोलण्यात व्यस्त झाली.
"माई, मी निघते." दोन मिनिटांनी प्रीती तिथेच घुटमळत म्हणाली. कृष्णाचे जाऊ दे पण माईने साधे सुंदर दिसतेस असे म्हटले नाही याचा तिला राग येत होता.
"अरे, तू अजूनही इथेच आहेस का? मला वाटलं गेली असशील. बरं आता आहेसच तर कृष्णाला सोडतेस का त्याच्या हॉटेलवर?" सोनियाने तिच्याकडे पाहून म्हटले तसे तिने डोळे बारीक करून रागाने पाहिले.
"अगं, म्हणजे आमचं बोलणं आटोपलेय. आता तसा तो जाणारच होता म्हणून तुला विचारत आहे." सोनिया मंद हसून म्हणाली.
"हं." प्रीती रागावून बोलली खरी, पण तो सोबत येणार म्हणून तिची कळी खुलली होती.
"प्रीत, अगं कृष्ण काय मला एकट्याला भेटायला नाही आलाय. तुलासुद्धा भेटायला आला आहे की. त्याला हॉटेलला सोडशील तर तेवढीच त्याला तुझी कंपनी मिळेल." सोनिया हसून म्हणाली.
"माई, मला उशीर होतोय. याला यायचं असेल तर पटकन चल म्हणावं." मनातला आनंद चेहऱ्यावर येऊ न देता प्रीती.
"प्रीत आज ऑफिसला माझ्याकडून तुला सुट्टी डिक्लीअर केली आहे. मी मिहीरला कॉल करून ऑलरेडी कळवलेय. आजचा दिवस केवळ तुझा आणि कृष्णाचा."
सोनिया तिच्याकडे एकटक बघत बोलली तसे चमकून प्रीतीने तिच्याकडे पाहिले.
"अगं मी खरंच बोलतेय. एवढ्या लांबून तो काय केवळ मला भेटायला नाही आला." मिश्किल हसत ती म्हणाली त्यावर प्रीतीने कृष्णाकडे रागाने एक नजर टाकली.
"कृष्णा लवकर जा बाबा आता. तोफेच्या तोंडी लागल्यावर काय होते हे कळेलच तुला. निघ. नाहीतर ती आणखी चिडायची." सोनिया कृष्णाला म्हणाली तशी प्रीती तणतणत बाहेर आली.
"अहो मॅडम, मला पण तुमच्या सोबत यायचं आहे." म्हणत कृष्णा तिच्या मागे मागे गेला.
कारचे दार उघडताच कृष्णा ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला.
"आज मी ड्राईव्ह करतो. तू बाजूला बस." कृष्णा तिच्याकडे बघून म्हणाला. तिने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला आणि हाताची घडी घालून बाजूला बसली.
कारमध्ये ती अजूनही गप्पच होती. त्याच्याकडे बघतदेखील नव्हती. खिडकीतून बाहेर बघताना तिच्या मोकळ्या सोडलेल्या केसातील बट गालावर येऊन विसावत होती आणि ते बघून कृष्णा आणखी फिदा होत होता.
"प्रीती सॉरी ना. अजूनही रागवली आहेस का माझ्यावर?" ड्राईव्ह करता करता तो बोलत होता.
प्रीती मात्र तोंड फुगवून बसली होती. त्याच्या अशा अचानक येण्याने ती आनंदीत होतीच पण चेहऱ्यावरून मात्र तसे भाव काही दाखवत नव्हती.
हॉटेलला पोहोचल्यावर त्याने काल पार्किंग एरियात लावली आणि स्वतः उतरून मग तिच्या बाजूचे दार उघडले.
"स्वीटहार्ट प्लीज कम." आपला हात समोर करत तो म्हणाला.
"स्वीटहार्ट प्लीज कम." आपला हात समोर करत तो म्हणाला.
ती मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून हाताची घडी तशीच ठेवून उतरली.चेहऱ्यावरचा फुगा अजूनही मोठाच दिसत होता. तिला तसे बघून कृष्णाला गालात हसू येत होते पण स्वतःवर नियंत्रण ठेवून तो आत गेला आणि त्याच्या मागोमाग प्रीतीही गेली.
"खायला काही मागवूया? त्याने प्रश्न केला. तिने त्यावर मानेनेच नकार दिला
रिसेप्शनवरून खोलीच्या चाव्या घेऊन तो पुढे झाला. चकार शब्दही न बोलता प्रीती त्याच्या मागे मागे गेली.
"वेलकम!" त्याने हसून खोलीत तिचे स्वागत केले.
"आता बोलणारच नाहीयेस का माझ्याशी? सॉरी म्हणालो ना यार. तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून मी काल तुला तसं बोललो. तू हर्ट झालीयेस त्याबद्दल खरंच व्हेरी व्हेरी सॉरी!"
छोटूसा चेहरा करून कान पकडून तो तिच्यासमोर उभा होता आणि इतका वेळ फुगा फुगवून बसलेली प्रीती खुदकन हसली.
छोटूसा चेहरा करून कान पकडून तो तिच्यासमोर उभा होता आणि इतका वेळ फुगा फुगवून बसलेली प्रीती खुदकन हसली.
"असे कोणी सरप्राईज देतात होय? तुला बघून मला तर एकदम धक्काच बसला." ती त्याला म्हणाली.
"वेडू, सरप्राईजेस धक्का बसण्यासाठीच असतात." तिच्या नाकाला चिमटीत पकडत तो म्हणाला.
"हम्म. कृष्णा तुला बघून मला खूप आनंद झाला. आय एम सो हॅपी." तिच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब खाली ओघळले.
"वेडाबाई, हॅपी झाल्यावर कोणी रडतं का?" तिचे अश्रू पुसत म्हणाला. खरे तर त्याच्या डोळ्यात देखील पाणी आले होते.
तो जवळ आला आणि आवेगाने प्रीतीने त्याला मिठी मारली. "कृष्णा,आय रिअली मिस यू. तुला कल्पना नाहीये मी किती मिस केलं तुला. प्रत्येक क्षणी मला तुझी आठवण येत होती पण तू कामात असशील म्हणून मी कॉल नाही केला. सॉरी."
त्याच्या मिठीमध्ये ती रडत रडत बोलत होती.
त्याच्या मिठीमध्ये ती रडत रडत बोलत होती.
"ए वेडाबाई, तो विषय संपला ना आता. आणि मलाही तुझी खूप आठवण येत होतीच की. म्हणूनच तर शेवटी तुला भेटायला आलो." तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो.
"अरे हो, तुला तर आज जायचं होतं ना?" अचानक तिला आठवून त्याच्या मिठीतून बाहेर येत ती म्हणाली.
"जायचं तर आहेच. जाण्यापूर्वी तुला भेटायचं होतं म्हणून मी आलोय. आज रात्री पुणे टू हैदराबाद फ्लाईटने जातोय." तो.
"तू माझ्यासाठी पुण्याला परत आलास? मला वाटलं की तू फक्त माईलाच भेटायला आला आहेस." प्रीती.
"त्यांना भेटायचे होतेच पण तुलाही भेटायचे होते." तिच्या जवळ जात त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.
त्याच्या त्या स्पर्शाने शहारली ती. डोळे मिटून स्वतःला तिने त्याच्या मिठीत बंधिस्त करून टाकले.
"फक्त मिठीतच राहणार आहेस की जरा इकडेतिकडे बघणार सुद्धा?" त्याने हसून विचारले.
'काय वेडी आहे मी? असा कसा स्वतःवर कंट्रोल राहत नाही?' मनात स्वतःला दोष देत ती पटकन त्याच्या बाजूला झाली. टेबलवर असलेल्या ग्लासातील पाणी घटाघटा प्यायली.
आता प्रीती बऱ्यापैकी निवळली होती तिचा रागही मावळला होता. तिने त्या खोलीत सभोवार नजर फिरवली आणि ती परत एकदा शॉक झाली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा)
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा)
कृष्णाला असे अवचित भेटून तुम्हीही शॉक झालात ना? कशी वाटली या दोघांची भेट? कमेंट्स द्वारे नक्की कळवा.
पुढील भाग लवकरच!
फोटो गुगल साभार.
पुढील भाग लवकरच!
फोटो गुगल साभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा