Login

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -७२

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!

प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -बहात्तर.


"फक्त मिठीतच राहणार आहेस की जरा इकडेतिकडे बघणार सुद्धा?" त्याने हसून विचारले.

'काय वेडी आहे मी? असा कसा स्वतःवर कंट्रोल राहत नाही.' मनात स्वतःला दोष देत ती पटकन त्याच्या बाजूला झाली. टेबलवर असलेल्या ग्लासातील पाणी घटाघटा प्यायली.

आता प्रीती बऱ्यापैकी निवळली होती तिचा रागही मावळला होता. तिने त्या खोलीत सभोवार नजर फिरवली आणि ती परत एकदा शॉक झाली.

संपूर्ण खोली लाल फुग्यांनी सजवलेली होती. "वॉव! रेड बलून्स! माझ्यासाठी?" ती खूष होऊन म्हणाली. बाजूलाच टेबलावर तिचा आवडता ब्लॅक फॉरेस्ट केक होता.

"कृष्णा काय आहे हे सगळं?" ओठावर भली मोठ्ठी स्माईल घेऊन तिने विचारले.

"का? तुला आवडलं नाही का?" तो.

"अरे नाही. खूप सुंदर आहे सगळं." ती म्हणाली.

"तुझ्याइतकं नक्कीच नाही. तुला माहितीये? खूप सुंदर दिसते आहेस तू." तिला कॉम्प्लिमेंट देत तो म्हणाला.

"तुझे आत्ता माझ्याकडे लक्ष गेले ना?" नाक फुगवून ती म्हणाली.

"मघाशी बोललो असतो तर असा रागाने लाल झालेला चेहरा मला कुठे बघता आला असता?" मिश्किल हसत तो.

"अस्सं होय?" ती त्याला मारायला धावली तसा त्याने तिचा हात पकडला.

"प्रीती, मला तुला काही सांगायचे आहे."

"सांग ना." त्याच्या डोळ्यात बघत ती.

"मला हे सांगायचे आहे की.. " ती तिच्या जवळ जात म्हणाला.
"काय?" त्याच्या जवळ येण्याने तिच्या हृदयाची स्पंदने जास्तच वाढायला लागली.

"की.. आपण आधी केक खायचा का?" तिच्या गालावरची बट हलकेच कानामागे करत तो म्हणाला.

"हां. खाऊया की." त्याला मागे ढकलत ती.
दोघांनी मिळून केक कापला आणि एकमेकांना भरवला.

"केक ची टेस्ट तर एकदम भारी आहे पण कृष्णा, नेमकं कोणत्या आनंदात आपण केक खातोय?" त्याच्याकडे बघून ती.

"खरं तर तुला पटणार नाही, पण आज आपली अनिव्हर्सरी आहे म्हणून हा केक." तिला एक पिस भरवत तो उत्तरला.

"अनिव्हर्सरी?"

"हम्म. ॲक्च्युली सहा महिन्यापूर्वी आपण एकमेकांना पहिल्यांदा भेटलो होतो." तो.

"माईचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो." ती.

"हो, आणि तेव्हाच बघताक्षणी तू मला फार आवडली होतीस. ती सिच्यूएशन वेगळी होती पण माझ्या हृदयात तुझ्यासाठी काहीतरी वाजायला लागले होते."

"माईचा ॲक्सिडेंटचा दिवस आपण सेलेब्रेट करतोय?" ती खिन्न हसून म्हणाली.

"तसे नाही. ऐक ना, त्यांचा अपघात की खूप दुःखद घटना होती पण त्यावेळी आपण भेटलो, मी तुझ्या प्रेमात पडलो नंतर तुलाही मी आवडायला लागलो हे एक चांगलेच घडले ना." तिच्याकडे बघून तो.
त्यांचे ऐकून तिने ओठ रुंदावले.

"तुला काहीतरी सांगायचे होते ना?" प्रश्नार्थकपणे ती.

"हो. पण इथे नाही. बाहेर जाऊया?" त्याने विचारले.

ती हसली. " काय रे, माई आणि निकी तुझ्यात सामिल आहेत का? माई घरी आली हे तुला निकीनेच सांगितले ना?" उठता उठता ती.

"निकीला बिचारीलाच माझी काळजी!" तो लहानसे तोंड करून म्हणाला. त्याचा चेहरा बघून तिला हसू आले.

तेवढ्यात त्याला एक फोन आला. आणि त्याच्या चेहऱ्यावरदेखील स्मित फुलले.

"जायचं?" तिच्यासमोर हात पुढे करत तो म्हणाला.

"काय रे? आज जरा जास्तच जवळीक साधायचा प्रयत्न करत आहेस हं." ती हात न देता तशीच चालत म्हणाली.

"का ग? मी जवळ असलेला तुला आवडत नाहीये का?" तिला कोंडीत पकडत त्याने विचारले. त्यावर ब्लश करत ती गप्पपणे त्याच्यासोबत खोली बाहेर आली.

एका प्रायवेट सेक्शन मध्ये त्याने आधीच टेबल बुक केला होता. तिथली अरेंजमेंट बघून प्रीतीला त्यांचे कौतुक वाटले.

"सगळं प्री प्लॅन्ड होतं हां. मला सोडून सगळ्यांना ठाऊक होतं. माईला सुद्धा. म्हणून ती मी ऑफिसला जायच्या वेळी माझ्याशी बोलण्यात वेळ घालवत बसली. तुझ्याशी चुकामुक होऊ नये म्हणून. बरोबर ना."

"हो, बट ट्रस्ट मी, आमचे हे कालच ठरले. माझ्या मनात मात्र मी इथून गेल्यापासून ठरवले होते."

"कृष्णा, तुझा हा अंदाज आवडला मला. आपल्यासाठी कोणी इतकं काही करतो ही फीलिंग किती सुंदर आहे नाही? माई आणि राधाईनंतर माझ्या आयुष्यात मिहीर अंकल आणि समीर हेच दोन महत्त्वाची माणसं होती. पण तू भेटलास नि अवघं चित्रच बदलून गेले. तुझ्या प्रेमात कशी पडले मला कळलेच नाही, पण हे सारं काही मला आवडतेय. सुखावणारे वाटतंय. थँक यू सो मच!"

त्याने तिचा तो भावनिक क्षण मनात कोरला आणि तेव्हाच खिशातून एक सुंदरशी डायमंड रिंग तिच्या समोर पकडली.


"प्रीती, मला तू खूप आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करतो हे तुला माहिती आहे तरी सुद्धा मला परत तुला हे सांगायचे आहे.
आय लव्ह यू सो मच! माझ्याशी लग्न करून माझ्या प्रेमाशी करारबद्ध होशील का? माझ्या हातांच्या बेड्यात तुला रहायला आवडेल ना? माझ्या हृदयाच्या तुरुंगात तुला आयुष्यभरासाठी कैद करून तू त्यातून बाहेर निघू नयेस म्हणून ती चावी दूर कुठेतरी समुद्रात फेकून दिली तर त्या कारावासात माझ्याशी रममाण होशील का?"
तो त्याच्या अंदाजात बोलत होता.

त्याच्या अनपेक्षित विचारण्याने तिचे गुलाबी गाल आणखीनच आरक्त झाले होते.

"मला उत्तर हवेय प्रीती."ती काही बोलत नाहीये हे बघून तोच म्हणाला.

"माय गॉड ऑफिसर, तुम्ही चक्क मला प्रपोज करताय?" ती त्याच्याकडे बघून हळूच म्हणाली.

"तुला हा प्रश्न पडलाय?" तो.

"ना, मला नाही. तुमच्या गर्लफ्रेंडला पडेल ना. तुम्ही तर तिला सहा महिन्यांनी लग्नासाठी विचारणार होतात. एका हातात पोस्टिंग लेटर आणि हातात वेडिंग रिंग असं काहीतरी तुमचं ठरलं होतं ना बहुतेक? मग हे काय मध्येच?" ती डोळे मिचकावून म्हणाली.

"ॲडव्हान्स बुकिंग!" तो हसून म्हणाला.

"म्हणजे?"

"म्हणजे मी माझ्या गर्लफ्रेंडला हे सांगायला विसरलो की माझा ट्रेनिंग पिरेड सहा महिन्यांचे नाही तर दोन वर्षांचा आहे. तेव्हा बोलताना एक्साईटमेंट मध्ये सहा महिने बोलून गेलो."

"व्हॉट? दोन वर्ष? कृष्णा तुझ्याशिवाय दोन वर्ष मी कशी राहू?" तिचा फुललेला चेहरा अचानक कोमेजून गेला.

"म्हणूनच तर तुला मी आत्ताच विचारतो आहे. दोन वर्षांनी तिला विचारेल." हलके हसून तो उत्तरला.

"तुला गंमत सुचतेय?" डोळ्यात पाणी आणून ती विचारत होती.

"नाही गं वेडाबाई. मी तुला सिरीयसली विचारतोय. तू हो म्हणशील तर आपण सहा महिन्याच्या आत काय पुढच्याच महिन्यात लग्न करू. खरंच." तिचे डोळे पुसत तो म्हणाला.

"काही नको, मी दोन वर्ष वाट पाहायला तयार आहे." ती स्फुन्दत होती.

"आणि या दोन वर्षात मी दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडलो तर?" तो तिला चिडवत होता.

"तसे करण्याचा विचारही करू नकोस. डोन्ट फर्गेट की आयपीएस ऑफिसरची होणारी बायको आहे मी तुला असं सोडणार नाही." त्याच्या शर्टची कॉलर पकडत ती म्हणाली.

"मला सुटायचेही नाहीये." तिच्या गळ्यात दोन्ही हातांनी विळखा घालून तो म्हणाला.
दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या होत्या. त्या नजरेतील प्रेम आरपार दिसत होते.

"कृष्णा आय लव्ह यू टू." त्याची कॉलर सोडून मिठीत विसावत ती म्हणाली.

"आय लव्ह यू लॉट!" तिच्या केसावर ओठ टेकवून तो म्हणाला.

ती तशीच त्याच्या मिठीत होती. तिथून बाहेर निघावर असे वाटत नव्हते. आत्ता कुठे प्रेमाची कबुली दिली आणि आता दोन वर्षांचा हा दुरावा. तिचे डोळे पुन्हा भरून आले.

"प्रीती, प्लीज रडू नकोस ना. हवे तर आपण एंगेजमेंट करून ठेऊया." तिला खुर्चीवर बसवत तो म्हणाला.

"नको, दोन वर्षांनी मला चालेल. तेव्हा मग डायरेक्ट लग्नाचा ग्रँड सेरेमनी करू. आता मला तुझे आयपीएस ऑफिसरचे स्वप्न पुर्ण झाल्यावरच आपल्या नात्याला पुढे न्यायचे आहे." ती म्हणाली.

"तोवर किमान ही रिंग तरी घालशील? म्हणजे मी तुझ्याजवळ आहे असे कायम मला वाटत तरी राहील."

तो थोडा भावनाविवश झाला तसे तिने तिचा हात समोर केला. त्याने तिच्या बोटात अंगठी घातली आणि मग तिच्या हातावर हलकेच आपल्या ओठांची मोहर उमटवली.

"प्रीती, यू आर ओन्ली माईन, फॉरेव्हर!" तिच्या निळ्या डोळ्यात बघत तो म्हणाला. तिने आपला हात सोडवून त्याचा उमटलेल्या मोहरेवर ओठ टेकवून स्मित केले आणि नजरेनेच होकार दिला.

त्यानंतर त्याने तिच्या आवडीच्या पदार्थांची ऑर्डर दिली.

"आता घरी जायचं?" खाऊन झाल्यावर तिने विचारले.

"नाही, आपल्याला आजचे डिनर एकत्र करायचे आहे." तो.

"म्हणजे?"

"म्हणजे माझी फ्लाईट रात्री अकराची आहे. तोपर्यंत तुला माझ्यासोबत राहायचे आहे. मग डिनर तर सोबतच करावे लागेल ना?" तो किंचित हसला.

"बापरे! कृष्णा तू तर फुल प्लॅनिंगने इथे आलाहेस. तुला माईची भीती नाही वाटली?" ती आश्चर्याने विचारत होती.

"अगं भीती काय वाटायची? मी काल रात्रीच त्यांच्याकडून परमिशन घेतली होती आणि जेव्हा त्यांना भेटायला पहिल्यांदा घरी आलो होतो तेव्हाच त्यांना तुझ्याबद्दल सांगून मागणी घातली होती की. तेव्हा त्या अनकॉंशीअस असल्या तरी त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीबद्दल बोललेले कळत होते." तो हसून म्हणाला.

"किती छुपे रुस्तम आहात तुम्ही दोघं? मला तर काहीच ठाऊक नव्हतं. घरी परतल्यावर माईसमोर मला किती लाजायला होईल अरे." विचार करूनच तिचे गाल लाल झाले होते.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********

🎭 Series Post

View all