प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -सत्तर.
"एक मिनिट. तू खरंच रागावला आहेस, होय ना? कृष्णा आय एम सॉरी. तुला कॉल करावा असं कित्येकदा वाटलं पण नाही केला."
"का?"
"कारण माझ्या डोक्यात तुझा विचार आला की नेहमी तूच मला कॉल करतोस. मग या दोन दिवसात का नाही केलास?" तीच त्याला जाब विचारत होती.
"कारण प्रीती, यावेळी तू कॉल करशील या अपेक्षेत मी होतो. एनिवेज झोपूया आता. गुडनाईट." त्याने फोन ठेवलादेखील.
ती हाताशपणे मोबाईलकडे पाहत राहिली. नंतर डोळे बंद करून स्वतःला बेडवर झोकून दिले.
कुठेतरी चुकलीय ती, हे तिला जाणवत होते.
कुठेतरी चुकलीय ती, हे तिला जाणवत होते.
"सॉरी डिअर. पण तुलाही आपल्याबद्दल रिअलाईझ व्हायला हवे ना? आज तू हर्ट झालीस. तुला दुखावलेलं मला कधीच नाही आवडणार, पण काय करू? सॉरी, रिअली सॉरी." मोबाईल मधील प्रीतीच्या फोटोला बघून कृष्णा बोलत होता. बोलता बोलता नकळत त्याने ओठ तिच्या फोटोवर टेकले आणि त्यालाच त्याचे हसू आले.
"ऐक ना, तुझे हे दुखावणे काही तासापुरतेच. त्यानंतर तुला एक सुंदरसे सरप्राईज मिळेल. थोडी वाट बघ." त्याचे ओठ रुंदावले होते.
"कृष्णा, झाली का रे पूर्ण तयारी?" देवकी (कृष्णाची आई) आत येत विचारत होती. तिच्या डोळ्यात पाणी होते.
"हो आई. आणि हे काय? असे डोळ्यात पाणी नको ना आणू. मी काही लढाईवर नाही निघालोय. ट्रेनिंग साठी जातोय." तिच्या डोळ्यातील पाणी पुसत कृष्णा म्हणाला.
"हो रे. मला माहितीये माझा मुलगा खूप शूर आणि हुशार आहे. पण तरी आईचे काळीज तुला नाही कळायचे." ती.
आई, हे दिवस लवकरच संपतील आणि तुझा कृष्णा जेव्हा आयपीएस ऑफिसर बनून परतेल तेव्हा सर्वात जास्त तूच खूष असशील." तिला त्याने घट्ट मिठी मारली.
******
'मी खूप हर्ट केलं का कृष्णाला?' प्रीती स्वतःलाच विचारत होती. तिने डोळे मिटले पण झोप जणू पळाली होती. मनात उगाच विचारांचे काहूर भाजले तशी ती उठली आणि सोनियाच्या खोलीत गेली.
"माई." तिने आवाज दिला.
"प्रीती? झोपली नाहीस अजून?" कुशीवरून वळत सोनियाने विचारले.
"माई, तुला काही सांगायचे आहे." प्रीती.
"प्रीती, सकाळी बोलू या ना. मी औषध घेतलं ना त्यामुळे आता मला झोप येते आहे." सोनिया.
"माई, प्लीज मला तुला आता सांगायचे आहे." प्रीतीच्या आवाजात एक अर्जव होते.
"बोल." जांभई देत सोनिया उठून बसली.
"माई, तो कृष्णा.."
"त्याचं काय आता?" सोनियाने मध्येच अडवले.
"ऍक्च्युली माई, मला आवडतो तो." तिने डोळे मिटून एकदाचे सांगितले.
"काय?"
"अगं, म्हणजे.. त्याची खूप मदत झाली मला. तू ॲडमिट असताना त्याने खूप हेल्प केली होती. आणि पुन्हा कोल्हापूरला असताना पण त्याची मदत झाली. बाबांना शोधण्यासाठी देखील त्याने त्याच्या परीने खूप प्रयत्न केले." ती आठवून आठवून सांगत होती.
"म्हणून तुला आवडतो तो?" सोनिया.
"नाही.. म्हणजे हो. म्हणजे, तसा खूप चांगला आहे. माई त्याला तू भेटशील ना तर तुलाही तो आवडेल."
"मला आवडून काय करायचे आहे? प्रेमात तर तू पडली आहेस ना त्याच्या?" सोनिया मिश्किल हसत म्हणाली.
"माई, तुला कळलं?" तिच्याकडे आश्चर्याने बघत प्रीती.
"प्रीत, प्रेम खूप सुंदर भावना असते. म्हटलं तरी नाही लपवता येत. आणि तुला तर मुळीच लपवता येत नाहीये. तुझ्या डोळ्यात किती स्पष्टपणे दिसते आहे हे. आय एम हॅपी फॉर यू डिअर." सोनिया.
"माई, तुला राग तर नाही ना आला?" तिच्याजवळ येत प्रीती हलकेच म्हणाली.
"राग? वेडे, मी खूप आनंदी आहे अगं. ज्या कोल्हापूरच्या मातीत मी वाढले त्याच कोल्हापूरातील माणसाच्या तू प्रेमात पडलीस हा विचार करून मलाच खूप छान वाटत आहे." तिला मिठीत घेत सोनिया हसून म्हणाली.
"माई, थँक यू सो मच. खूप मस्त वाटतंय मला. आता शांत झोपेल मी." गोड हसून ती म्हणाली.
प्रीतीला सोनियाशी बोलून किती हलके झाल्या सारखे वाटत होते हे तिलाच ठाऊक होते.
******
"इतक्यात दोन मुहूर्त अगदी शुभ आहेत. त्यानंतर मात्र सहा महिने तरी असा मुहूर्त शोधून सापडणार नाही."
पंचांग बघत गुरुजी सांगत होते तसा समीर टूनकण उडी मारून त्यांच्यासमोर आला.
पंचांग बघत गुरुजी सांगत होते तसा समीर टूनकण उडी मारून त्यांच्यासमोर आला.
"अरे व्वा! दोन मुहूर्त आहेत ना, मग दोन्हीही फिक्स करा." अधीरतेने तो म्हणाला.
"
ए, तू गप रे गधड्या. असे मोठ्यांच्या मध्ये मध्ये बोलू नकोस." माही त्याला खोटे खोटे रागावत म्हणाली.
"
ए, तू गप रे गधड्या. असे मोठ्यांच्या मध्ये मध्ये बोलू नकोस." माही त्याला खोटे खोटे रागावत म्हणाली.
आज सकाळीच मिहीरने गुरुजींना घरी बोलावले होते आणि ते पंचांग बघून मुहूर्त शोधत होते. त्यांनी इतक्यात दोन मुहूर्त आहेत असे म्हटल्यावर समीरचा चेहरा उजळला होता.
"हे बघा, पहिला मुहूर्त अगदी पंधरा दिवसानंतर आहे. खूपच शुभ दिवस आहे तो. त्या दिवशी मंगल कार्य आयोजित करायचे असेल तर अतिउत्तम!"
"आणि दुसरा?" माही काही बोलण्यापूर्वीच समीर.
"हम्म. दुसरा मुहूर्त दोन महिन्यांनी आहे. त्यानंतर मात्र पुढचे सहा महिने काही योग नाहीये." गुरुजी.
"दुसरा मुहूर्त माझ्यासाठी बुक करा." समीरचा उतावळेपणा बघून तुषार आणि मिहीर हसत होते.
"क्या बात है बेटाजी? बहुत उछल रहे हो." त्याच्या पाठीत हलके मारत तुषार म्हणाला तसा समीरचा चेहरा आणखी ब्लश करायला लागला.
"गुरुजी, या मुहूर्तापैकी कोणता ठरवायचा ते आम्ही तुम्हाला कळवतो. आता याची पत्रिका बघून, याच्या आयुष्यात कोणी आहे की नाही? ते सांगा जरा."
मिहीरची पत्रिका त्यांच्यासमोर ठेवत माहीने विचारले.
"पत्रिका उत्तम आहे. सगळी यशाची शिखरं गाठून झालीत." पत्रिकेचे बारकाईने निरीक्षण करत गुरुजी म्हणाले.
"वाह,गुरुजी इतकं चांगलं सांगत आहात. कुणाची आहे गं ताई ही पत्रिका?" मिहीरने आश्चर्याने विचारले.
"कोणाची काय? तुझीच आहे." माही.
"माझी? माझी पत्रिका कशाला दाखवत आहेस? आणि मुळात ती केव्हा तयार केली?" मिहीरला एक धक्का बसला.
"मीच मागे गुरुजींकडून करवून घेतली होती. आता गप्प रहा आणि गुरुजी काय सांगतात ते ऐकू दे." त्याला दमटावत माही.
"गुरुजी, किती दिवस हा असा एकटाच राहणार आहे? त्याला कधी कुणाची सोबत मिळणार आहे की नाही?" माही.
"ताई, काय चाललंय तुझं?"मिहीर म्हणाला.
त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून माही गुरुजींच्या चेहऱ्याकडे पाहत होती. डोळे बारीक करून ते पुन्हा पत्रिका पाहत होते आणि पुढच्याच क्षणी त्यांचे ओठ रुंदावले.
"पंधरा दिवसांनी कोणीतरी येईल आयुष्यात. अशीच समदुःखी, समवयस्क.. प्रेमाच्या वणव्यात होरपळलेली व्यक्ती. मनात आणलं तर जोडीदाराची ईच्छा पूर्ण होईल." गुरुजी प्रसन्न हसून म्हणाले. तुषार आणि समीर आ वासून त्यांच्याकडे बघत होते.
"ताई उगाच कसल्या फंदात पडू नकोस. मी निघतो ऑफिसला." असे म्हणून मिहीर बाहेर निघूनही गेला.
माहीच्या चेहऱ्यावर आनंद होता. "गुरुजी हे खरं आहे?" तिने प्रसन्नवदनाने विचारले.
"हो. शुक्र त्यांच्या राशीत पदार्पण करत आहे. येणाऱ्या पंधरा दिवसांनंतरचा मुहूर्त हा राजयोग आहे. सगळ्यांच्या कामना त्या दिवशी पूर्ण होतील." गुरुजी विश्वासाने बोलत होते.
असे काही खरंच असते यावर माहीचा विश्वास नव्हता पण तरीही तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता.
******
माई, मी ऑफिसला निघते गं. तू तुझी औषधं नीट घे आणि आराम कर." आपली ऑफिस बॅग घेत प्रीती सोनियाला म्हणत होती.
"प्रीती मी काय म्हणते, आता ऑफिसमध्ये नाही पण ॲटलीस्ट मी घरून तरी काम करू शकते ना? माझा लॅपटॉप मला देऊन जा आणि ऑफिसच्या इतक्या दिवसातील सगळ्या घडामोडी जरा मला मेल कर ना." सोनिया तिला म्हणाली.
"माई, अजिबात नाही. तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे. किमान या महिनाभर तरी तू ऑफिसचा विचार करू नकोस. नंतर मग तू आणि तुझे ऑफिस सोबत आहातच की."
"प्रीती.."
"माई, उगाच हट्ट करू नकोस हं. गोड बोलण्यासोबत मला रागावताही येतं बरं. चल निघते मी." सोनियाला मिठी मारून ती दारात पोहचली. तिचे दरवाज्याजवळ पोहचणे आणि आणि दाराची बेल वाजणे दोन्ही क्रिया एकाच वेळी घडल्या.
आत्ता कोण असेल म्हणून तिने दार उघडले आणि ती एकदम शॉक झाली.
"कृष्णा? तू अचानक? इथे? तुला तर आज जायचे होते ना?" ती आश्चर्याने प्रश्नावर प्रश्न विचारत होती.
"अगं, हो हो. आधी आत तर येऊ देत. की बाहेरूनच हाकलणार आहेस?" तो मिश्किल हसत म्हणाला.
"हं? हो ये ना आत." ती बाजूला होत म्हणाली. चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव अजूनही तसेच होते.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा