Login

कॉलेजातली तू सुंदर तरुणी

You are Preety Girl Of College And Every Boy Wants You

तुझे मोल जाणती
माझ्यासारखेच तरुण किती
तुझ्या नयनांच्या जळी
पोहण्यास मीन झाले किती

तुझे रूप यौवनाचा वसा
मृदु गर्विष्ठ सोनचाफा जसा
सुगंधात त्या न्हाण्यासाठी
वेडे पीर झाले किती

कशी वर्णू तव कुंतल किमया
फास जणू तो तरुण हृदया
स्वखुशीने तो फास लावण्या
आतुर प्रेमवीरांची रांग किती

तुझ्या एका कटाक्ष्यासाठी
माझ्यासारखे ऊठूनी येती प्रभाती
कॉलेजच्या बाकावरती,
कॅन्टीन मध्ये, कट्ट्यावरती
तुझ्याच गप्पा रंगती
सांगू मी कशा आणि किती किती?