Login

प्रेम आणि संयम....भाग 2

प्रेमाने तुटलेली नाती जुळतात
प्रेम आणि संयम....भाग 2

‘माझं काही चुकत असेल तर त्याने ते प्रेमाने सांगावं वाटायचं, हिंसा करून सांगण्यात काय अर्थ आहे. उलट नात्यात दुरावा निर्माण होतो.’ हे तिला त्याला सांगाव वाटायचं, पण बोलण्याची सोय असेल तर ती बिचारी बोलेल ना.

काहीही झालं तरी ती प्रेमानेच वागत होती, तिला याचा खूप त्रास होत होता.
“तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे” असं झालं होतं. पण मनात कुठेतरी आशा होती की याचा शेवट नक्की छान होणार.
दिवस जात होते, कधी चांगले कधी वाईट. पण अनघाच्या मनात आशेचा किरण अजूनही टिमटिम करत होता.

समीर ऑफिसमधून निघाला समोरच्या बसने त्याच्या बाईकला धक्का मारला तो खाली पडला खूप लागलं होतं. नेहमीप्रमाणे अनघा त्याची वाट बघत होती, तिला फोन आला सगळं काम सोडून ती हॉस्पिटलमध्ये आली.
दोन्ही पायाला फ्रॅक्चर होतं. दवाखान्याचा खर्च, त्याचा ट्रीटमेंटचा खर्च सगळा अनघाने एकटीने केलं.
खूप तारांबळ उडाली होती तिची, पण तिने खूप संयम ठेऊन केल.

समीर सहा महिने बेडवर होता. त्याला स्वतः उठून चालता येत नव्हतं. अनघाने त्याला ब्रश करण्यापासून ते त्याचं जेवण, त्याच्या पायाची मालिश सगळं सगळं अगदी छान केलं, दिवसभर करून थकून जात होती, पण कधीच कुणाला बोलली नव्हती.

कुठे चिडचिड नव्हती की तक्रार नव्हती.  समीरला रोजची तिची काम दिसत होती, ती सगळं त्याच्यासाठी खूप प्रेमाने करत होती. समीरचं मनपरिवर्तन होऊ लागलं. आता तो तिच्यावर चिडत नव्हता. तिच्यासोबत प्रेमाने वागू लागला होता.
समीर थोडा बरा झाल्यानंतर एक दिवस अनघा त्याला बगिच्यात घेऊन गेली. समीरला मनोमन त्याची चूक कळली, तो मनात विचार करू लागला.
‘मी अनघावर किती अत्याचार केले, तिला घालून पाडून बोललो, तिला मारहाण केली पण ती एकाही शब्दाने बोलली नाही की कधी उलट उत्तर दिलं नाही, किती तो तिचा संयम.’

“अहो काय विचार करताय.”

“मी तुझ्याशी असा वागत आलो आणि तरी देखील आज तू माझ्यासोबत इथे आहेस. मी खूप वाईट वागलो पण तू नेहमी माझ्याशी चांगलंच वागली.”


“प्रत्येक गोष्ट हिंसा करून मिळवता येत नाही, तुम्ही हिंसा केली मी ही जर तेच केलं असतं तर आज आपण इथे एकत्र नसतो. हिंसेपेक्षा अहिंसा कधीही चांगली.”