प्रेम असावं कधीही
पूर्ण निरपेक्षित...
कुठलिही गोष्ट नसावी
त्यात कधीच अपेक्षित...
पूर्ण निरपेक्षित...
कुठलिही गोष्ट नसावी
त्यात कधीच अपेक्षित...
प्रेमात नसावी
कुठलीच मोहमाया..
स्वार्थाची नसावी
कुठलीच पडछाया..
कुठलीच मोहमाया..
स्वार्थाची नसावी
कुठलीच पडछाया..
प्रेमात वृत्ती असावी
फक्त देण्याची..
प्रेमाच्या बदल्यात
हाव नसावी घेण्याची..
फक्त देण्याची..
प्रेमाच्या बदल्यात
हाव नसावी घेण्याची..
प्रेमात असावी
त्याग करण्याची वृत्ती...
नसावी त्यात कुठलीही
घाणेरडी बुद्धी...
त्याग करण्याची वृत्ती...
नसावी त्यात कुठलीही
घाणेरडी बुद्धी...
प्रेम भावना टिपाव्यात
निशब्द मनाने...
प्रेम करता यावे
निर्मोही हृदयाने...
निशब्द मनाने...
प्रेम करता यावे
निर्मोही हृदयाने...
प्रेमात दुसऱ्या प्रति
माया असावी..
पण वासना मात्र
बिलकुल नसावी...
स्वाती पाटील...
माया असावी..
पण वासना मात्र
बिलकुल नसावी...
स्वाती पाटील...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा