आज त्याने पक्का निर्णय घेतला होता. भले नोकरी सोडावी लागली तरी चालेल पण हे शहर सोडून जायचं. पण देवाच्या मनात काहितरी चांगल व्हाव त्याच्या बाबतीत असं होत. ज्यामुळे त्याची बदली पुन्हा एकदा भारतात करण्यात आली. त्याचं यू के मधील काम संपलं होतं. तर कंपनीने त्याला पुन्हा भारतात पाठवल. हे त्याच्यासाठी खूपच आनंदाचं कारण होत.
तो म्हणजे विश्रुत. कंपनीच्या कामानिमित्त तो यू के ला राहायला आला होता. आता त्याला पुन्हा भारतात जायची संधी मिळाली होती. भारतात त्याची बायको आणि कुटुंब राहतं. त्याची बायको एम बी ए करत होती. त्यामुळे तो तिला यू के ला त्याच्यासोबत घेउन आला नव्हता. ट्रान्स्फर ऑर्डरची ईमेल मिळताच त्याने त्याची परत जाण्याची तयारी सुरू केली.
त्याने त्याचे शर्टस् वगेरे बॅगेत भरायला सुरुवात केली. तेंव्हा त्याच्या लक्षात आलं त्याच्याकडे फिकट पिवळ्या रंगाच्या छटा असलेले शर्टस् जास्त आहे. किंवा पांढरे शर्ट जास्त आहेत. तसे तर त्याच्याकडे जवळपास सगळया रंगाचे शर्टस् आहेत. पण ते दोन रंग जरुरी पेक्षा जास्त आहेत. त्यांचं त्याला हसु आलं.
पण त्या सोबत आठवली ती पण सुर. म्हणजे सुरभी. तिला पांढरा शुभ्र रंग फार आवडायचा. सुरुवातीला इथ आल्यावर त्याला हा देश हे शहर नविन होत. त्यावेळी त्याची मैत्री झाली सुरभी सोबत. जेंव्हा कधी तो तिला भेटायला जायचा तेव्हा तो ऑफ व्हाईट किंवा सुपर व्हाईट रंगाचे शर्टस् घालून जात. तेव्हा ती त्याच्या केसातून मजेने हात फिरवत त्याचे केस विसकटायची. त्याची चेष्टा करत म्हणायची,
" तुला हा रंग छान दिसतो. हँडसम दिसतो तू या शर्ट मध्ये."
कदाचित तिच्या असं म्हणल्यामुळे त्याला देखील तो रंग आवडू लागला होता. तिचं बोलणं आठवतच तो ऑफ व्हाईट शर्ट बॅगेत पॅक करत होता. आता देखील तिचं बोलणं कानात घुमले. तस् आपसूकच त्याचा हात त्याच्या केसांत फिरवला गेला. चेहेऱ्यावर हसु पसरलं.
त्याने एकवार सगळी कडे नजर फिरवली. या घरात राहून त्याला घराविषयी आपलेपणा जाणवला होता. बऱ्या पैकी सामान त्याने आवरले होते. डायनिंग टेबलवर वरची फ्रुट बास्केट पण रिकामी झाली होती. काल रात्री त्यानें ज्यूस ब्रेड आणि इतर सामान त्याने संपवलं होत. थोडा कोरडा खाऊ शिल्लक होता. तो आज रात्री तो संपवू शकत होता. त्यामुळे त्याला त्याचं टेन्शन आलं नव्हत.
जितका वेळ तो पॅकिंग करण्यात घालवेल तितक्या वेळ त्याला झोपायला उशिर होईल. दोन दिवसांनी त्याला फ्लाईट पकडायची होती.त्याच्या घरापासून एअरपोर्टवर जायला त्याला चार तासाचा प्रवास करावा लागणार होता. कदाचित स्नो फॉल होण्याची शक्यता होती. त्याने मोबाईल फोन वर वेदर फोरकास्ट बघितला होता. सकाळी लवकरच निघू. असं मनाशी ठरवलं.
त्याला हे शहर, हा देश सोडून निघून जायचं होत. त्याआधी त्याला इतर बरीच काम संपवायची होती. बँकेत जायचं होत. कंपनीतील काम त्याने विक डेज मध्येच संपवली होती. त्या आधी त्याला बँकेत जायचं होत. इथ पैशाचे व्यवहार सोपे आणि सहज करता यावे म्हणून त्याने इथल्या लोकल बँकेत खातं उघडलं होत. तर जाण्यापूर्वी ते खात बंद करायचं होत. शिल्लक पैसे काढून घ्यायचे होते. त्यासाठी बँकेत जायचं होत. बँकेतील कन्सर्न मॅनेजर या काळात त्याचा मित्र झाला होता तर त्याला देखील भेटायचं होतं.
सगळी कामं वेळेत कशी पुर्ण करायची या विचारात तो पॅकिंग करत होता. मनातल्या मनात सुरभीचा विचार पिंगा घालत होता. सुरभी त्याच्याच कंपनीत नोकरीला होती. त्याच्या प्रॉजेक्ट मध्ये देखील तिचा सहभाग होता. कामाच्या निमित्ताने त्यांची भेट व्हायची. दोघं भारतीय असल्याने गाठी भेटी वाढल्या होत्या.
सुरभी फायनान्स डिपार्टमेंट मध्ये होती. बँकेच्या मॅनेजरनेचं त्याची ओळख सुरभी सोबत करून दिली होती. त्याला कधी गरज पडली तर सुरभी त्याला मदत करू शकते. कधी कामाच्या निमित्ताने, कधी त्याच्या स्वतः च्या कामाच्या निमित्ताने भेट व्हायची.
गाठी भेटी वाढल्या तशी त्यांच्यातील मैत्री देखील अधिकच वाढू लागली होती. त्यांच्यातील कॉमन दुवा म्हणजे दोघांनाही चहा प्यायला आवडत. कामाच्या ठिकाणी तर जास्त करून कॉफी प्यायला जाणं व्हायच. पण भारतीय पद्धतीचा अस्सल चवीचा चहा प्यायची इच्छा झाली तर शहराच्या दुसऱ्या टोकाला एक इंडियन रेस्टॉरंट होत. तिथं त्यांच्या आवडीचा चहा मिळायचा. ते दोघं तिथं खास चहा प्यायला म्हणून जायचे.
त्यांच्या भेटी वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे सुरभीचा तीन वर्षांचा मुलगा. सुरभीचा नवरा मानव एका प्लेन क्रॅश मध्ये गेला. त्यामुळे ती एकटीच मुलाचा सांभाळ करत होती. त्याच्या सोबत वेळ घालवण्याच्या निमित्ताने तर कधी घरासाठी काही सामान खरेदी करण्याच्या निमित्ताने बाहेर जाणं व्हायचं.संध्याकाळी पार्क मध्ये बसुन आरवला खेळताना बघणं हा त्याचा छंद झाला होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा