Login

प्रेम की मैत्री भाग २

प्रेम की मैत्री भाग २
पार्क मध्ये बसुन सूर्यास्त बघत त्यांच्या खुप गप्पा होत. चहा आणि खारी एन्जॉय करत किती तरी विषय बोलले जात. सुरभीचं विधवा असणं, आणि तिचं विश्रुत सोबत बाहेर फिरणं यामुळें त्यांच्या कलिग मध्ये चर्चा सुरू झाली होती. पण त्यांच्या मैत्रीत काही फरक पडला नव्हता.

बोलण्यात मानवचा उल्लेख बऱ्याच वेळा व्हायचा. सुरभीच मानव वर नितांत प्रेम होत. ही गोष्ट विश्रुतला माहीत होती. पण त्याच्याही नकळत तो सुरभिला पसंत करू लागला होता. हे आकर्षण आहे. हे त्याला माहित होते. पण अलीकडेच त्याचं तिला न्याहळण वाढलं होतं. तिला भेटणं, तिच्याशी बोलणं वाढलं होतं. त्याचं मन तिच्याकडे झुकू लागलं होतं.

ती आधुनिक पद्धतीने हेअर स्टाईल करायची. त्यामुळे गालावर एखादी तरी बट रेंगाळायची. आधी तर बोलताना कधी तरी तो त्या बट ला बोटाने कानामागे सरकवत. पण आता हल्ली त्याचं आकर्षण वाढलं होतं. तिच्याशी बोलताना ती मुजोर बट त्याला त्याच्या तर्जनी वर गोलाकार फिरवायची सवय जडली होती. ती सवय सुटता सुटत नव्हती. त्याचं वागणं मैत्रीच्या मर्यादे पलीकडचं आहे ते कळत होत. पण वागणं आवरता येत नव्हत.

एक दिवस असच ते दोघं चहा पीत होते. आज मॉल मध्ये फिरणं झालं होतं. तर आरव प्ले झोन मध्ये खेळत होता. ते दोघं त्याला लांबून बघत स्नॅक्स एन्जॉय करत होते. बोलताना विश्रुत सहज म्हणाला,

" सुर तूझ्या नजरेतून मी मानवला बघितलं आहे. तो अगदीं जवळचा वाटतो. पण एक सांगु हल्ली मानवच तुझ्या मनावरचं गारूड थोड कमी होत आहे. माझ्या मैत्रीचा रंग तूझ्यावर चढू लागला आहे."

ते ऐकुन तिचे डोळे वेगळ्याच रंगाने चमकले. फ्रेंच फ्राईज खात ती म्हणाली,

" विशु, माझं आणि मानव च लग्न अरेंज मॅरेज होत. आम्ही दोघं शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने यूके मध्ये आलो. एका विवाह संस्थेच्या कार्यक्रमात आमची भेट झाली.घरच्यांच्या समंतीने आमचं लग्न झालं. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होत. लैला मजनू सारख म्हणु शकतो तू." त्याच्या आठवणीने तिचा स्वर भावूक झाला होता. ती स्वतःला सावरत म्हणाली,

" माझा आरव माझ्यासाठी मानव कडून मिळालेलं प्रेमाचं गिफ्ट आहे. एक अमूल्य भेट. तोच माझ्या जगण्याचा आधार आणि जगण्याचं धेय्य म्हणजे त्याला घडवणं. आम्ही दोघांनी बाळाची खुप स्वप्न बघितली आहेत. मला आमची सगळी स्वप्न पुर्ण करायची आहेत. म्हणून तर सगळ्यांच्या विरोधात जाऊन इथ एकटी राहत आहे. मला खात्री आहे मानव जिथं कुठं असेल, मला नेहमी सपोर्ट करत असेल."

सुरभीच मानव वर नितांत प्रेम आहे. तिच्या आयुष्यात मानवची जागा कोणीच नाही घेऊ शकत.हे त्याला समजतं होत. पण त्याचं मन तिच्याकडे झुकत होत. पण हे चुकीचं आहे. त्याचं लग्न झालं आहे. त्याची बायको भारतात त्याची वाट बघत आहे. याची देखील त्याला जाणीव होती. त्यामुळे हे आकर्षण अधिक वाढू नये म्हणून त्याने भारतात परण्याचा निर्णय पक्का केला होता. त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते. आज ते फळाला देखील आले होते.

सतत सुरभीला भेटत राहिलो तर तिच्यात अधिक गुंतून जाऊ. एकाच शहरात राहून तिला टाळता येणं अशक्य होत. त्याला त्याच्या बायकोची अधिकच आठवण येऊ लागली होती. त्याला साध्या तिचीच अधिक गरज होती. त्याने जेव्हा सुरभीला तो भारतात परत जाणारं आहे हे सांगत होता, तेव्हां सुरभीने त्याला विचारलं ,

" विशू तू तूझ्या बायकोला सृष्टीला इकडून परत जाताना काय भेट घेउन जाणारं आहेस् ?"

तिच्याकडून आशा कोणत्याही प्रश्नांची अपेक्षा नसल्याने तो गोंधळला होता. त्याला अस विचारात अडकलेलं बघून ती म्हणाली,

" विशू असा कसा रे तु विसर भोळा, आपण जेंव्हा कधी दूरच्या गावाहून आपल्या घरी परत जातो तेव्हां घरच्यांनसाठी आपल्या प्रिय जनांच्या साठी काहितरी भेटवस्तू घेउन जातो ना ! म्हणून विचारलं तु सृष्टीला इकडून काय घेऊन जाणार आहेस ? तिला काय आवडत ? "

" तिला तर पेस्ट्री आवडते." तो म्हणाला.

" अरे बाबा,पेस्ट्री आवडते म्हणून काय पेस्ट्री घेऊन जाणार आहेस का ? "

" मग काय घेऊन जाऊ ?"

"  पेस्ट्री तर नाही नेता येणार. त्यापेक्षा तु बेकरी पदार्थ बनवण्याचे पुस्तक घेवून जा. काही पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुला त्या पुस्तकात मिळतील. पण त्यासाठी तिला स्वतःला काम करून पदार्थ बनवावे लागतील. त्यापेक्षा तू इकडून तिला आवडणारी तिच्यासाठी खास एखादी भेट वस्तू घेऊन जा." ती त्याला सुचवत म्हणली.

त्याला गोंधळात पडलेलं बघुन एक दिवस तिनेच सृष्टी साठी एक पुस्तक आणि तिला आवडणारी हॅण्ड मेड शॉल आणि पर्स त्याला आणून दिली. त्याला हातात देताना म्हणाली,