Login

प्रेम की मैत्री भाग ३

प्रेम की मैत्री भाग ३
' आता कोण आलं ? इतक्या उशिरा ? अपार्टमेंट ऑनरला तर त्याचं पेमेंट आधीच दिलं आहे. मग आता यावेळी कोण असेल ? ' विचार करतच त्याने स्क्रीन ओपन केला.

त्याने इंटर कॉम बघितला तर स्क्रीन समोर सुरभी उभी होती. शेजारी आरव. अंगात लाँग कोट, हातात पर्स, डोक्याला मफलर. बाहेर थंडी होती. त्यामुळें तिचे गोरे गाल लाल झाले होते. त्याने चटकन खाली जाऊन दरवाजा उघडला.
तिला घरात घेत तो म्हणाला,

" सुर तू ? आता इथ यावेळी ? " त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता.

" हॅलो अंकल."

" हाय लिटिल मचकिन " त्याला हाय फाय देत विश्रुत म्हणाला.

त्यावेळी त्याने त्या दोघांच त्याच्या घरी अपेक्षित केलं नव्हत. ज्या दिवशी त्याच्या कंपनीतील त्याचा शेवटचा वर्किंग डे होता तेव्हा काम झाल्यावर त्याने तिला नेहमी प्रमाणे कॉफी प्यायला बोलावलं होतं. पण का कोण जाणे तिने यायला नकार दिला होता. त्याने देखील तिला त्याच्या सोबत चालायचा आग्रह केला नव्हता. तो त्या दिवशी कॉफी प्यायला नेहमीच्या कॅफे मध्ये गेला. त्याने कॉफी पण ऑर्डर केली. पण तिच्याशिवाय त्याला कॉफी देखील कडूच लागली. तो कॉफी न पिता घरी गेला होता.

" हाय, असच दरवाज्यात उभे करणारं आहेस् का ? "

" तुला कधी पासूनच घरात येण्याची परवानगी घ्यावी लागली ?"

" म्हणूनच न विचारता आले."

ते तिघ घरात आले. विश्रुत फक्त तिचा प्रेसेन्स फील करत होता.

" विशू, चहाचे सामान आहे की सगळं संपवलं आहेस् ?"

तिने तिचं सामान डायनिंग टेबलवर ठेवलं होतं. आता किचन टॉप जवळ उभी राहून ती त्याला विचारत होती,

तिला समोर बघून त्याला सुचायच बंद झालं होतं. मनात विचार होते त्यांची शेवटची भेट कशी झाली होती.

कंपनीतल काम करून तो निवांत होता.त्याने तिला फोन केला होता.तेव्हा तिने नकार दिला होता.त्या दिवसा नंतर आज् त्यांची भेट होत होती. तिला समोर बघून त्याला खूप आनंद झाला होता. तिच्यावर तो नाराज झाला होता, हे देखील विसरून गेला होता. तिच्या येण्याने घरात नवा उत्साह संचारला आहे असचं त्याला वाटतं होत.

खुप दिवसांनी त्याने तिच्या परफ्यूमचा गंध श्वासात भरून घेतला होता. आरव त्याची ड्रॉइंग बुक घेवून रंगवत बसला होता. तिच्या प्रश्नाने तो भानावर आला.

" चहा पावडर नेहमीच्या डब्यात आहे. मिल्क पावडर शेल्फ मध्ये आहे थोडीशी."

त्याने किचन मधला पसारा बऱ्या पैकी आवरला होता. त्याने शेजारच्या कपाटातून चहाचे सामान काढून दिले. सुरभी ने नुकतीच किराणा सामान भरल होत. तर तिच्या सोबत चहा करण्यासाठीं दूध होत. तिने दोघांच्या साठी चहा बनवला. आरव साठी चॉकलेट मिल्क बनवलं. चहाच्या सुगंधाने त्याचं मन प्रसन्न झालं. सुरभी ने चहा कपात गाळला. तिच्या सामानातून खारी काढली. प्लेट मध्ये सजवली.

चहा आणि खारी घेऊन ती लिव्हिंग रूममध्ये आली तर तिथं आरव एकटाच बसला होता. तिने आरवला अंकल बद्दल विचारलं. तर अंकल बाल्कनी मध्ये उभे होते. समोर कापूस् पडल्यासारखा बर्फ पडू लागला होता. तो तेच बघत उभा होता.

" विशू चहा."

" आज चहा सोबत खारी नसली असती तरी चाललं असतं !"

" आता ज्या सवयी आहेत त्या आहेत. उगाच कशाला मोडायच्या ?" ती हसून म्हणली.

" आता काही सवयी मोडाव्या लागतील."

" ह्मम. आता तूझ्या शिवाय चहा प्यायची सवय करुन घ्यावी लागणार." ती म्हणली.

त्या दोघांची नजर एकमेकांच्या नजरेला मिळाली. जणु काही तरी शोधत आहेत. पण ते मिळतं नाही. स्वतःला सावरत त्यांनी दोघांनी स्वतःची नजर एकमेकांच्या पासुन हटवली. स्वतःला व्यवस्थित सावरलं. चहाचा घोट घेत नजरेने एकमेकांना बघत होते.

" अजुन किती पॅकिंग बाकी आहे तुझं ? "

" बऱ्यापैकी आवरून झालं आहे."

" मग आज शेवटचं एकमेकांच्या सोबत बसुन चहा घेऊ ! "

बाजूच्या चेअर वर आरामात बसत तिने त्याला विचारलं ,

" विशू तुला यू के ला येऊन किती दिवस झाले असतील ?"

" एखाद वर्ष होऊन गेलं असेल." तो आरामात म्हणाला.

" मला चांगलं आठवत आहे. तुला इथ येऊन पंधरा महिने बारा दिवस झाले आहेत."

तिच्या बोलण्यावर त्याच्याकडे बोलायला काहीच शिल्लक नव्हत. फायनान्स डिपार्टमेंट मध्ये नोकरीला असणारी सुरभी गणिताच्या बाबतीत कच्ची कधीच नव्हती. तिच्या हिशोबावर शंका घेणं त्याला कधी जमलंच नसतं.
तिचं बोलणं सुरूच होत.

" तू जेव्हा कधी भेटलास , आपल्या भेटी कधी मोजक्याच होत्या. तसं बघायला गेलं तर आपल्या मोजक्या भेटीचा काळ खूप काही मोठा नाही ना ! "