प्रेम लग्नानंतरचे भाग - ३
अशातच काही दिवस गेले आणि अचानक वंशिकाला काही त्रास होत होता. चक्कर येणे किंवा अशक्तपणा येणे असं काहीतरी होऊ लागलं. सतत आजारी राहू लागली.
तिच्या तब्येतीची तक्रार सतत सुरूच होती. पण वेदांत मोठा होत होता आणि त्याला तिची गरज आहे. हे पाहून तिने त्याकडे मात्र दुर्लक्ष करायला सुरुवात केली.अभय तिला ओरडायचा पण ती अजिबातच ऐकायची नाही. तस त्याने तिला सांगणं सोडून दिलं होतं.
वंशिका चा मुलगा हळूहळू मोठा होत होता.आता मुलगा सातवी आठवीला असताना वंशिकाला ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं. आणि घरच्यांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. कोणालाच विश्वास बसत नव्हता. अभयसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. अजून वेदांत ही लहान होता. आणि त्यामध्ये हे असं काहीतरी कळलं होतं.
त्या दिवसानंतर तर अभय पूर्ण शांत शांत राहू लागला. पण वंशिका मात्र त्याला बोलतं करत होती. त्याला या गोष्टीचा धक्का बसला होता. मानसिक रित्या तो खूपच खचला होता. पण त्यातून वंशिका मात्र त्याला वर काढत होती.वंशिकाच त्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबाबत समजावत होती.समजून सांगत होती. आणि समजून घेत होती.
पण या काही काळामध्ये मात्र तिच्या सासऱ्यांमध्ये जमीन अस्मानाचा बदल झालेला होता. जसा वंशिका बद्दल त्यांना कळलं... तसं त्यांनी घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून टाकलं होतं.शेवटच्या काही दिवसांमध्ये तरी तिला आनंदी वातावरण, हसत खेळत वातावरण भेटू दे... म्हणून घरातले सगळे नियम, बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बदलून टाकलेल्या होत्या. सगळ्यांसाठी हा धक्का होता. आत्तापर्यंतचे त्याचे बाबा हे आता तिचे बाबा झाले होते. ती त्यांची सून नव्हती तर मुलगी झाली होती.
वंशिकाला कधी कधी वाटायचं की,' या घरासाठी आणि हे घर बदलायला म्हणून तिला आधीच काहीतरी झालं असतं तर बरं झालं असतं.' पण आता कमीत कमी हे थोडे दिवस तरी हे सगळे क्षण तिला आनंदात घालवता येणार होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी तिची आठवणींची ओंजळ पूर्णपणे भरून जाणार होती. ती तशीच रिती राहणार नव्हती. पण यासाठी तिचा जीव मात्र दावावर लागलेला होता.
पण तिने मात्र स्वतःला समजावलं. कधी ना कधीतरी जायचं आहे. वाईटातून काहीतरी चांगलं घडतं हे तिच्या घरातल्यांना माहितीच होतं. पण त्यासाठी असं काहीतरी व्हावं हे मात्र त्यांना मान्य नव्हतं.पण शेवटी नशीब आणि नियती यांचा खेळ आणि फेरा कधी कोणाला चुकला आहे का?
वंशिकाने घरातल्या सगळ्यांची मनाची तयारी करून घेतली होतीच. शिवाय तिने तिच्या मुलाची म्हणजे वेदांत ची देखील तयारी केली होती की,' परत तुला तुझी आई दिसणार नाही.'
पण मुलगा खूप समजदार होता. अभय चे सगळे गुण त्याच्यामध्ये आलेले होते. सोबत वंशिकाचे सुद्धा.... पण तो अगदी दोघांसारखा मनमिळावू,सालस, गोड आणि समजूतदार होता.
खरंतर वंशिका आणि अभयला कधी कधी स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटायचा. की त्यांनी नेमकं कुठलं पुण्य केलं होतं ?की त्यामुळे त्यांना इतका छान मुलगा मिळाला होता. पण अभय मात्र खूपच हळवा होऊन जायचा. कारण इथून पुढच्या क्षणांमध्ये वंशिका कुठल्याच गोष्टीत त्याची भागीदार असणार नव्हती.
अभयचं आणि वंशिकाचं नातं पती-पत्नीचं होतच. एकमेकांच्या कर्तव्यात दोघेही वाटेकरी होते. पण तितकंसं प्रेम मात्र असं काही अलीकडे राहिलेलं नव्हतं. पण एकमेकांना सांभाळून घेऊन त्यांनी आत्तापर्यंत संसार केलेला होता.
त्यांच्या लग्नाला दहा वर्षांच्या वरती झाली होती. पण तरीसुद्धा दोघे एकमेकांना समजून घेऊन एकमेकांसोबत राहत होते. प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी करणं, बाकीच्या गोष्टी होत्या. पण असं नॉर्मल रिलेशन असं त्यांच्यात काही राहिल नव्हतं. याला कारण म्हणजे आधीचं घरातलं वातावरण आणि त्याप्रमाणे बदलत गेलेले दोघांचे स्वभाव.
पण अभय बऱ्याच वेळा खूपच हळवा व्हायचा. आणि तिला म्हणून जायचा की,' सप्तपदीची सात वचन एकत्र राहण्यासाठी घेतली आणि आयुष्याच्या अर्ध्यावरती सोडून का निघालीस?' पण ती मात्र त्याला अगदी प्रॅक्टिकल पणे आणि समजूतदारपणे उत्तर द्यायची.' हे आयुष्य आहे. असंच चालायचं. कोणासाठी कोणाचं आयुष्य जगायचं थांबत नसतं.आपापल्या परीने पुढे जावंच लागतं. आयुष्यामध्ये प्रत्येकाची रिप्लेसमेंट असतेच. ठराविक काळासाठी म्हणून एखादी व्यक्ती आयुष्यात येते. ती आयुष्याचा अनुभव देऊन जाते. आणि खऱ्या अर्थाने जगायला शिकवते.' यावरती अभय फक्त हसून तिला मिठीत घ्यायचा. पण ते हसू किती वरवरचं आणि खिन्न पणातलं आहे हे तिला सुद्धा माहिती होतं.
बघता बघता दिवस सरले आणि वेदांत आठवीतच असताना वंशिका गेली. सगळ्यांनी मनाची तयारी करून घेतली असली... तरी सुद्धा अर्थातच प्रत्येकाला हे स्वीकारायला जड जात होतं. थोडी थोडकी नाही आयुष्याची इतकी वर्ष सगळे एकत्र होते. तिची पोकळी भरून काढायला थोडासा वेळ तरी जाणारच ना!
एकत्र कुटुंब असू दे किंवा मग विभक्त कुटुंब असू दे पण तिथे एखादा माणूस आलेला खपून जातो पण गेलेला अजिबातच खपत नाही.आलेल्या माणसाने वर्दळ होते. गर्दी होते. पण ते सगळं एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातं. पण माणूस गेलेला कधीच खपत नाही. कारण तिथे पोकळी निर्माण होते. आणि इथे तसंच काहीसं झालं होतं.
घरातल्या प्रत्येकालाच हे सत्य स्वीकाराला बराच वेळ गेला. पण वेदांत मात्र इतका समजूतदार होता. की आपल्या आजी-आजोबांची आणि वडिलांची तो खूपच काळजी घेत होता. घरातल्यांना तर त्याचं अप्रूपच वाटायचं. इतका लहान असून तो इतका समजूतदारपणे वागतोय म्हणून.
अभयच्या आई-वडिलांनी त्याला खूपच साथ दिली. घरातल्या सगळ्यांनी सुद्धा त्याला समजून घेतलं. त्याला यातून बाहेर पडायला मदत केली. पण शेवटी रिकामी जागा ही रिकामीच असते ना! प्रत्येक छोटे- छोटे घालवलेले क्षण, त्यांच्या आयुष्यातली ती सुखदुःख, बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या त्याला आठवत होत्या.पण वेदांत कडे बघून तो हळूहळू हे सगळं विसरून जात होता.
वंशिकाला जाऊन आता बरेच महिने झाले होते. तिचं भरणी श्राद्ध सुद्धा घालण्यात आलं होतं. कारण भरणी श्राद्ध केल्याशिवाय वर्ष श्राद्ध करता येत नाही. त्यामध्ये ती सवाष्णपणी गेली असल्यामुळे अर्थातच बाकीचे दानधर्मही तिच्या सासू-सासऱ्यांनी आणि आई-बाबांनी एकत्र मिळून केले होते.त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू हटायचं नाव घेत नव्हते.
कारण इतकं सगळं असून ,इतके शिकलेले असून श्रीमंता घरची असून सुद्धा ती अगदी समजूतदारपणे वागत होती. थोडं थोडं इकडे- तिकडे व्हायचं. ते काय प्रत्येक घरामध्ये होतच असतं.पण तिने कधीही वेगळं राहण्याचा विषय घेतला नव्हता. हे प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जायचं. आणि ते पुन्हा पुन्हा स्वतःला भाग्यवान समजायचे की, 'अशी मुलगी त्यांच्या आयुष्यात होती. पण इतक्या लवकर गेली. म्हणून त्याचं दुःखही व्हायचं.'
सहा महिने झाले होते आता वंशिकाला जाऊन. पण आता एकत्र कुटुंब जरी असलं तरी पण मुलासाठी आई आणि वंशिकाच्या नवऱ्यासाठी बायको शोधणे गरजेचे होतं.
वेदांतला आईची गरज आणि अभयला जीवनसाथीची गरज होती. आणि हे प्रत्येकाला समजत होतं.
वेदांतला आईची गरज आणि अभयला जीवनसाथीची गरज होती. आणि हे प्रत्येकाला समजत होतं.
जस वंशिकाला जाऊन सहा महिने झाले. तस अचानकच वंशिकाच्या माहेरच्यांनी अभयच्या दुसऱ्या लग्नासाठी स्वातीचा प्रस्ताव अभयच्या घरच्यांपुढे ठेवला. सुरुवातीला अभय नाहीच म्हणत होता. पण दोन्ही घरातल्यांनी मिळून त्याला समजावलं. वेदांतची काही या गोष्टीसाठी ना नव्हती. कारण तो तितका समजूतदार होताच.आणि शेवटी अभय आणि स्वातीच लग्न करायचं ठरवलं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा