प्रेम लग्नानंतरचे भाग - ४
अभयसाठी स्वाती सारखी मुलगी उत्तम राहील.असं वंशिकाच्या घरच्यांचं मत होतं. त्यामुळे लगेचच अभय आणि स्वातीचं लग्न लावून देण्यात आलं.तसे दोघेही अगदी एकमेकांना समजून घेणारे असे समजूतदार होते. अभय मुळातच शांत आणि सुस्वाभावी,मनमिळाऊ होता. त्यामुळे त्याला काही प्रश्न नव्हताच. प्रश्न होता तो फक्त स्वाती या घरात मिसळून जाण्याचा.
पण तशी स्वाती ही खूप गोड आणि अतिशय शांत, सालस होती आणि तिचं लग्न झालेलं होतं. एक मुलगी झाल्यानंतर तीनच वर्षात स्वातीचा पती अपघातामध्ये गेला होता. तिच्या सासरची परिस्थिती थोडीशी वेगळीच होती. सगळ्याचा दोष तिला आणि तिच्या मुलीला देण्यात आला. तसं तिने सासर सोडलं होतं. पण ती अधून मधून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायची. त्यांना वाटेल ती आणि लागेल ती मदत कोणतीही तक्रार न करता करत होती. पण त्या लोकांना मात्र त्याची किंमत नव्हती.
आणि याच कारणामुळे ती तिच्या माहेरी राहत होती. स्वातीची मुलगी आता पाचवीला होती. तिला देखील लहान वयामध्ये खूप समज होती. पण वंशिकाच्या माहेर च्या घरच्यांनी ठरवलं स्वातीच्या मुलीला स्वाती पासून वेगळं करायचं नाही. वंशिका गेल्यानंतर थोडेच दिवसात त्यांच्या डोक्यामध्ये हे सगळं आलं होतं. कारण नाही म्हटलं तरी सुद्धा वेदांतला आईची गरज होती आणि स्वातीच्या मुलीला म्हणजेच समीक्षा ला बाबांची गरज होती.
समीक्षा बाबाविना पोरकी होती तर वेदांत आईविना पोरका होता.त्यामुळे दोघांनाही एकमेकांचं दुःख चांगलंच माहीत होतं. त्यात दोघेही एकटेच होते. ना भाऊ ना बहीण... त्यामुळे ती खंत काय असते ही देखील त्यांना माहिती होत. परिस्थितीने ते आता एकमेकांसारखेचं झालेले होते.
स्वाती सोबत तिची मुलगी अभयच्या घरी राहील आणि शिकेल असा प्रस्ताव वंशिकाच्या आई-वडिलांनी ठेवलेला होता. यावर अभयच्या घरच्यांनी हा प्रस्ताव मान्य केलेला होता. आणि वंशिकाच्या घरच्यांनी देखील अभय ला समजावून सांगितलं होत. अभय आणि स्वातीला आत्ता एकमेकांची खऱ्या अर्थाने गरज होती. एकमेकांच्या मुलासाठी त्यांना त्यांच्या संसारापेक्षा जास्त त्यांच्या मुलांच्या भवितव्याची काळजी होती.
आईविना मुलगा वाया जाऊ शकतो आणि बाबाविना मुलगी...दोघांना जरी समज असली तरी सुद्धा हा समाज मात्र त्यांना व्यवस्थित जगू देत नाही. आणि अर्थातच जर का दोन स्त्रिया म्हणजे आई आणि मुलगी किंवा अगदी सासू आणि सून किंवा, असं कोणत्याही स्त्रिया जर का एकत्र असतील.... त्याही पुरुष नसताना....त्यावेळेला मात्र हा समाज त्यांच जगणं नकोस करून टाकतो.
म्हणजे एखाद्या पुरुषाची बायको गेली तर त्याला सावरायला अख्खं जगं उभं असतं पण जर का एका स्त्रीचा नवरा गेला तर तिला उध्वस्तं करायला अख्खं जगं उभं असतं. अशीच तर परिस्थिती आहे ही.आणि तसं काहीसं यातलं कोणाच्याही बाबतीत होऊ नये म्हणून घरातल्यांनी लगेचच हा निर्णय घेतला होता.
तशी समीक्षा अभयच्या घरामध्ये मिक्स व्हायला काही फार वेळ लागणार नव्हता. कारण मुळातच अभयला मुलीची ही नेहमी कमी भासायची. पण वंशिकाच मत होतं की, 'मी एका आपत्त्या वर थांबणार.' त्यामुळे त्याने कधी हा विषय परत काढलाच नव्हता. त्यामध्ये वंशिकाचही म्हणणं बरोबर होतं. कारण तिला अर्थातच वेदांतच्या वेळेला खूपच त्रास झाला होता. त्यामुळे सगळ्यांनी तिला समजून घेतलं होतं.
पण अभयच्या मनात नेहमी यायचं की,' दगडालाही पाझर फुटेल. पण त्याच्या बाबांना फुटणार नव्हता. आणि तो वंशिका मुळे नक्कीच फुटला.' यासाठी तो कायमचं तिचे आभार मानून ऋणी राहणार होता तिच्या उपकारांमध्ये. पण ती मात्र आता इथे नव्हती. पण तिला आपल्या आठवणीच्या कप्प्यामध्ये त्याने बंदिस्त करून ठेवलं होतं. कारण आता तो स्वाती सोबत नवीन संसार थाटणार होता.
स्वाती बद्दल आणि तिच्या मुली बद्दल अभयची काही हरकत नव्हती. घरच्यांनी अभयच आणि स्वातीचं लग्नं करून दिलं. आणि वंशिकाच्या घरच्यांनी स्वातीलाही आपली मुलगी मानलं. कारण मुळातच स्वाती बद्दल असं झाल्यानंतर त्यांनी तिच्यासाठी दुसरं स्थळ शोधायचा खूपच प्रयत्न केला होता. पण मनासारखं कोणीच भेटत नव्हतं. आणि त्यातच वंशिकाच असं झालं.
वंशिका गेलेली त्यांना कमी होतीच. पण स्वातीचा स्वभाव खूप गोड होता आणि स्वाती त्यांच्या पाहण्यातली होती. त्यामुळे स्वाती बद्दल त्यांना सगळं काही माहीत होतं. मुळात स्वाती मुलीसारखी नाही तर मुलगी म्हणूनच वावरत होती. त्यामुळे काही प्रश्नच नव्हता.
पहिले काही दिवस स्वाती आणि अभयला एकमेकांच्या आयुष्यामध्ये रुळायला थोडंसं अवघड गेलं. कारण इतक्या वर्षांची सवय किंवा ती कमी थोडेसे इकडेतिकडे होत असतात. तसच काहीसं त्यांच्या बाबतीतही झालं होतं. पण खऱ्या भावनेचे रूपांतर हे प्रेमात कधी ना कधी होतच ना...
हळूहळू अभयच आणि स्वातीचं मित्र-मैत्रिणींचा नातं तयार झालं.दोघेही मित्र मैत्रीण म्हणून राहू लागले. कारण अर्थातच त्यांच्यासाठी प्रायोरिटीला त्यांची मुलं होती. त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. वंशिकाला जे अवघड गेलं ते स्वातीला गेलं नाही. कारण मुळात आता सगळंच अगदी अलबेल आणि अगदी नॉर्मल होतं. घरातले सगळे मिळून- मिसळून आणि एकमेकांच्या मतांचा आदर करून, एकमेकांना प्रायोरिटी देऊन वागत होते.
जे वंशिकाला फेस करायला लागलं होतं ते स्वातीला लागलं नाही. पण दोघींमध्ये कधीही कोणीच तुलना केली नाही. आणि हे स्वातीला सुद्धा जाणवायचं.तिने सुद्धा तिच्या पहिल्या नवऱ्यामध्ये किंवा अभय मध्ये कधीच तुलना केली नव्हती. कोणीही म्हटलं की हे दुसर लग्न आहे. तरीसुद्धा घरातले कायम त्या दोघांच्या बाजूने उभे राहायचे.आणि मुळात त्यांची मुलंही त्यांच्या बाजूने असायची.
तसा सुरुवातीला दोघांमध्ये अवघडलेपणं होत. पण ते अवघडलेपणं नंतर दूर झालं. दोघांनी एकमेकांसोबत मैत्री केली. मग दोघांचा असं झालं की,' तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना.' दोघांचं एकमेकांशिवाय पान सुद्धा हलत नव्हतं.
मैत्रीचं नातं हळूहळू प्रेमामध्ये बदलू लागलं.
म्हणतात ना,'आयुष्याच्या कोणत्या वळणावर कधी कोणाला कोणावर प्रेम होईल... हे सांगता येत नाही.' असंच स्वाती नि अभयचं झालं होतं.
म्हणतात ना,'आयुष्याच्या कोणत्या वळणावर कधी कोणाला कोणावर प्रेम होईल... हे सांगता येत नाही.' असंच स्वाती नि अभयचं झालं होतं.
आयुष्यात प्रेम हे प्रेमच असतं.दोघांच्या आयुष्यामध्ये पहिलं नातं हे वेगवेगळ होतं. त्यांचं स्थानही वेगवेगळ होतं. त्यांची ती जागा हृदयाच्या एका कप्प्यामध्ये तशीच होती. त्याला कधीच ठेच पोहोचणार नव्हती. पण हे दुसरं नातं ही अगदी छान मिक्स होऊन तयार झालेलं होतं.
पहिल्या अनुभवामध्ये त्यांनी लग्नानंतरचे प्रेम असलं... तरी सुद्धा त्यांच्या संसारात आणि संसाराच्या वेली वरती नंतर फुल उमललेली होती. पण आता मात्र संसाराच्या वेलीवर उमललेल्या फुलांसोबत त्यांना संसार करायचा होता. आणि ते अगदी एकत्र येऊन...आणि समजूतदारपणे हे सगळं करत होते.
दुःखातून पोळून दोघांच्या आयुष्यामध्ये आत्ता कुठेतरी सुख आलं होतं. रखरखत्या वाळवंटामध्ये एखादा पाण्याचा तुषार किंवा झरा मिळावा तसंच काहीसं त्यांच्या या आयुष्यामध्ये झालं होतं. आणि काटेरी झुडपामध्ये त्यांना कुठेतरी ओलावा मिळाला होता.
अभय आणि स्वाती समीक्षा नि वेदांतला अगदी भरभरून प्रेम देत होते. त्यांना आई-वडिलांची कमी कधीच भासणार नाही असं नातं तयार झालं होतं त्यांच्यात. घरातले सगळे त्यांना अगदी बरोबरीने वागणूक देत होते
कोणासोबतही कुठलाही भेदभाव कधीच नव्हता. त्यामुळे त्यांचं नातं अधिक फुलत होतं. आणि फुलत होतं. आणि याचा सगळ्याचा परिणाम हा अभय आणि स्वातीच्या नात्यावरतीही होत होता.
खऱ्या अर्थाने आता ते नवरा बायको म्हणून जगत होते. त्यांच्यामुळे मुलांचा आयुष्य सावरलं नव्हतं...
तर मुलांच्या मुळे त्यांचा आयुष्य सावरलं होतं.असं त्यांना कधी कधी वाटून जायचं. आणि त्यांच्याच विचारावर त्यांना हसू यायचं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा