प्रेम लग्नानंतरचे भाग - १
"तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्या बलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपतेः तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥"
ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्या बलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपतेः तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥"
सगळीकडे मंगलाष्टकांचे सुर घुमू होऊ लागले.
सोबतच सनई चौघडे वाजू लागले.जेवणाच्या पंगती उठू लागल्या आणि अर्थातच फोटोग्राफर फोटो काढण्यामध्ये दंगही झाला. नवीन नवरा नवरी एकमेकांच्या होणाऱ्या चोरट्यास्पर्शाने आणि एकमेकांच्या होणाऱ्या चोरट्या नजरांनी लाल गुलाबी झाले होते. प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं सुरू होतं. कारण आज अर्थातच अभय आणि वंशिकाच लग्न होतं.
तस अभयचं कुटुंब शिक्षित होतं पण मध्यमवर्गीय होतं. अभय डॉक्टर होता तर वंशिका ही प्राध्यापिका होती. आणि अभयच्या घरचे लोक शेती आणि छोटे मोठे बिजनेस करणारे होते.अभयच्या घरामध्ये त्याच्या वडिलांचे सगळं काही चालायचं.तिथं कोणाचं काहीसुद्धा चालत नव्हतं.म्हणजे थोडक्यात पुरुषप्रधान संस्कृती पाळणारे ते लोक होते.म्हणजे सुशिक्षित आणि सुसंस्कारित असले तरीसुद्धा अजूनही जुन्या विचारांचा पगडा हा त्यांच्यावरती होताच.
पण इकडे वंशिकाच्या घरी मात्र सगळच वेगळं होतं. कारण तिथे अर्थातच आधुनिक विचारांना प्राधान्य होतं. तसं वंशिकाच्या घरी सगळ्यांना सगळ्याच गोष्टीसाठी स्वातंत्र्य होतं. पण इकडे मात्र वंशिकाला कदाचित थोडसं अवघड जाणार होतं. पण तिच्या साथीला अभय मात्र होताच.
शेवटी सगळं झाल्यानंतर नवरा नवरी आणि घरातल्यांची जेवणं झाली आणि आता वेळ होती पाठवणीची... अर्थातच तिचे आई आणि बाबा दोघेही रडले. हाच क्षण कन्यादाननाच्या वेळी सुद्धा असाच झालेला होता. नाही म्हटलं तरी सुद्धा त्यांना जीवावरती आल होतच.कारण स्वतःच्या काळजाचा तुकडा ते जावयाच्या हवाली करत होते. आणि बघता बघता शेवटी वंशिकाची पाठवणी झालीच.
घरासमोर गाडी थांबली. छान पैकी घर सजवण्यात आलेलं होतं. रोषनाई केलेली होती. नव्या नवरीसाठी छान रांगोळी काढून सुस्वागतम लिहीण्यात आलं होतं. त्यांच्या दोघांच्या अंगावरून भाकरं तुकडा ओवाळून टाकून सोबतच गरम पाणी नि दूध हे देखील पायावरती टाकून दोघांना ओवाळण्यात आलं.
उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांडून ती आत येणार तोपर्यंत तिला नाव घेण्यासाठी आग्रह करण्यात आला.
"सनई चौघडे वाजू लागले,
नवीन आयुष्याचे नवीन सूर
चहूबाजूनी घुमू लागले,
अभय रावांसोबत नव्या आयुष्याचे
नि नव्या स्वप्नांची,
आस डोळ्यात घेऊन आले,
अभय रावांचं नाव घेते,
त्यांच्या साथीने आज या घरात,
पहिले पाऊल टाकते."
त्यानंतर अभयला आग्रह करण्यात आला. पण अर्थातच त्याच्या वडिलांच्या मताप्रमाणे, 'असले वाह्यात प्रकार नकोत!' म्हणून सगळ्यांना शांत बसावं लागलं. त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी वंशिका या घरात आली.लग्नानंतरचे खेळ झाले. दुसऱ्या दिवशी पूजाही झाली. देवदर्शन झालं. आणि आता वेळ होती ती म्हणजे पहिल्या रात्रीची...
वंशिकाला तयार करून त्याच्या खोलीमध्ये पाठवण्यात आलं.पहिली रात्र म्हटल्यानंतर जशी इतर मुलींच्या मनामध्ये धाकधूक असते तशीच तिच्या मनामध्ये सुद्धा होती. तिने खोलीमध्ये प्रवेश केला आणि पाहिलं.तर छान पैकी बिछाना हा फुलांनी सजवण्यात आलेला होता. बदामाच्या आकाराची नक्षीकाम करून त्यावरती गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या. मोगऱ्याच्या फुलांनी छान पैकी माळा करून त्यांची सजावट केलेली होती. ते सगळं पाहून तिच्या पोटात गोळाच आला.
तिच्या हातामध्ये अगदी सिरीयल मध्ये वगैरे दाखवतात तसा दुधाचा ग्लास वगैरे देण्यात आलेला होता.ती जशी चालत चालत समोर आली. आणि तिने तो ग्लास बाजूच्या टीपॉय वरती ठेवला. ती तशीच शांतपणे सगळं पाहत उभी राहिली.इतक्यातच दरवाजाचा आवाज झाला. आणि तिने पाहिलं तर अभय होता. त्याने हळुवार दरवाजा बंद केला. तो अलवार पावलं टाकत तिच्या जवळ आला.
अभय ने पाठीमागून तिला मिठी मारली. तसं त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिच्या साडी नेसल्यामुळे उघड्या पोटाला झाला.तसं एकदमच तिला पोटात गोळा आल्यासारखं वाटलं. सोबतच अंगावरती ही शहारा उमटला. हे त्याच्या लक्षात आलं तसं त्याने तिला आपल्याकडे वळवून घेतलं. आणि त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीने तिची हनवटी वरती केली. तिची नजर अजूनही झुकलेलीच होती. गाल अगदी टोमॅटो सारखे लाल झालेले होते. जणू गुलाबाचा सडाच पडला होता तिच्या गालावर... तो मात्र तिच्या या सल्लज चेहऱ्याकडे संमोहित होऊन पाहत होता.
"बायको अगं एवढी लाजलीस तर कसं व्हायचं माझं?कोण म्हणेल तुला की तू एवढी मोठ्या पदावरती काम करतेस...नाही म्हणजे तिथे तुला विद्यार्थी पण असेच बघत बसतात का? त्यांच्या लाजरा बुजऱ्या मॅडमना?" अभय तिची मस्करी करत खेचत म्हणाला.
तसं तिने लटक्या रागात त्याच्याकडे पाहिलं. या काही दिवसांमध्ये त्यांचं नातं चांगलंच बहरलं होतं. दोघांचं अरेंज मॅरेज असलं तरी सुद्धा फोन कॉल्स किंवा मेसेज वरती बोलणं होत होतं. त्यामुळे दोघे एकमेकांना समजून घेऊ लागले होते.
"माझे विद्यार्थी मला घाबरतात म्हणजे त्यांच्या मनात माझ्या विषयी आदरयुक्त भीती आहे." वंशिका त्याच्याकडे पाहून म्हणाली.तसं इतक्या वेळापासून तिच्या तोंडून आत्ता शब्द फुटलेले पाहून त्याला हसूच आवरलं नाही.
"अगं मला हेच तर तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. आपण काही एकमेकांना नवीन आहोत का? म्हणजे तस पण आपण एकमेकांना समजून घेतोयच ना? मग जे काही मनात असेल ते बोलून टाक. काही घाई नाहीये मला. मला असं म्हणायचं नाहीये की आज रितीप्रमाणे सगळेच होऊन जावं वगैरे...तू ज्या वेळेला मनापासून तयार असशील त्या वेळेला आपण आपल्या नात्याची सुरुवात करूया." असं म्हणत अभयाने तिच्या कपाळावरती ओठ टेकवले.
तो तिला सोडून बाजूला जाणार तोपर्यंत तिने त्याचा हात पकडला. आणि त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावरती मात्र प्रश्नचिन्ह होतं. त्याने नजरेने तिला,' काय?' असं विचारलं. तर तिने,' काही नाही.' म्हणत त्याला पटकन मिठी मारली.
त्याच्यासाठी हे अनपेक्षित होतं. ती मात्र त्याच्या छातीवरती डोकं ठेवून त्याच्या हृदयाची धडधड शांतपणे ऐकत होती. त्याने तिच्या डोक्यावरती आपले हात नेत केसातून हळुवारपणे फिरवायला सुरुवात केली.
"कसा असत ना ज्या वेळेला जोडीदार समजून घेणारा नसेल त्या वेळेला सगळं ठीक आहे. पण तो ज्या वेळेला समजूतदार असेल ना... त्या वेळेला आपणही एक पाऊल पुढे जावं. आता तुम्ही एक पाऊल पुढे आला आहात.. तर माझं ही कर्तव्य आहेच ना? मी तयार आहे आपल्या नवीन नात्यासाठी. आणि नवीन नात्याच्या नवीन सुरुवातीसाठी." असं म्हणत वंशिका गोड लाजली.
रात्रीच्या प्रहरात त्यांच्या प्रेमाच्या बहराला उधाण आलं होतं.अगदी नाजूक कळीच फुल व्हावं तसं तो तिला फुलवत होता. तिच्यातल्या तिला जागवत होता. आणि ती त्याच्यातल्या त्याला एकरूप होत होती. असं त्यांचं मनमिलन तर झालंच होतं पण आता ते खऱ्या अर्थाने एक झाले होते.
मध्यरात्री दोघे कधीतरी एकमेकांच्या कुशीमध्ये शांत विसावले.परत दुसऱ्या दिवशी दोघांचं नॉर्मल रुटीन सुरू झालं. तिची सुट्टी आता संपत आलेली होती. अर्थातच दुसऱ्या दिवशी तिला थोडीशी कणकण वाटली. त्रास जाणवला. पण सासूबाईंनी समजून घेतलं. आणि पुन्हा दोघांच्या नॉर्मल रुटीनला सुरुवात झाली.
लग्नाचे नवे नवे दिवस अगदी छान जात होते. जणू काही नव्याची नवलाई! दोघेही एकमेकांना समजून घेत होते
दिवसभर एकमेकांच्या विरहात आणि रात्र एकमेकांच्या मिठीत... असंच काही सुरू होतं. असेच काही दिवस गेले. पण खरी सुरुवात आणि खरी कसोटी तर आत्ता होती. लग्नानंतर वंशिकाला त्या घरात राहणं म्हणजे खूप मुश्किल झालं होत.
दिवसभर एकमेकांच्या विरहात आणि रात्र एकमेकांच्या मिठीत... असंच काही सुरू होतं. असेच काही दिवस गेले. पण खरी सुरुवात आणि खरी कसोटी तर आत्ता होती. लग्नानंतर वंशिकाला त्या घरात राहणं म्हणजे खूप मुश्किल झालं होत.
वंशिकाच्या माहेरी सगळं स्वातंत्र्य होतं. पण इथे मात्र सगळच विचित्र होतं. इकडे स्वातंत्र्य असूनही पारतंत्र्यातच जगतोय की काय?असं वाटत होतं.आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! अशी गत झाली होती इकडे आणि तिला तर इथे जगणंच मुश्किल होतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा