प्रेम लग्नानंतरचे भाग - ५ (अंतिम भाग)
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा अडचणींचा काळ येतच असतो. पण त्यावर मात करून तुम्ही कसे पुढे जाता यावरती तुमचा आयुष्य अवलंबून असतं. तसंच काहीसं अभय आणि स्वातीच्या बाबतीतही झालं होतं.पण त्यांनी त्यातून मार्ग काढून एका चांगलं आयुष्य जगण्याचा निर्णय घेऊन ते तसंच जगतं होते.
अडचणी अनेक आल्या होत्या. पण त्यातूनही दोघे एकमेकांसोबत उभे राहिले होते.आणि दोघेही एकमेकांसोबत जगू लागले. कारण दुःख काय असतं? हे दोघांनी पाहिलं होतं. ह्या अनोख्या प्रेमाला त्या दोघांनी पुरेपूर साथ देऊन जपलं होत. त्यांनी ठरवलं की आधी आपण आपल्या मुलांचा विश्वास दोघांनी जिंकायचा आणि मग आपण हे नातं आणखी पुढे न्यायच.
त्यानुसार स्वातीने सुद्धा वंशिकाच्या मुलाला आपलं मानलं. वेदांत आणि स्वातीचं खूप जमू लागलं. वेदांतला पण वाटायचं आपल्याला एक बहीण असती तर... स्वातीच्या मुलींमध्ये समीक्षा मध्ये त्याला आपली सख्खी लहान बहिण दिसली.
जे प्रेम त्याला वंशिकाकडून मिळायला हवं होतं ते त्याला अर्थातच स्वातीकडून मिळत होत. दोघीही स्वभावाने वेगवेगळ्या होत्या. त्याने कधीच आपल्या आईची आणि स्वातीची तुलना केलीच नाही.तिला कायम हृदयाच्या एका कप्प्यात जपून ठेवलं. आणि स्वातीच्या गोड स्वभावामुळे तिने त्याच्या हृदयाच्या कप्प्यातील स्वतःची वेगळी जागा निर्माण केली होती. तो कायम तिला म्हणजे स्वातीला आई अशीच हाक मारायचा.
खर आई आणि मुलाचा बॉण्ड कसा असतो? किंवा ते नातं कसं असतं?हे त्या दोघांकडे बघून प्रत्येकाला शिकण्यासारखं होतं. वेदांत शाळेतून आला किंवा कॉलेजमधून आला की प्रत्येक गोष्ट तो स्वातीला शेअर करायचा अगदी मैत्रिणीसारखं. दोघांचेही नातं अगदी पारदर्शक बनलेलं होतं. यासाठी स्वातीने तेवढे कष्टही घेतले होते. आणि वेदांतने तेवढी तिला साथही दिली होती.
वेदांतला जसं आईचं प्रेम हवं होतं. आणि त्याला ते मिळालं होतं. तसंच समीक्षालाही वडिलांचे प्रेम हवं होतं. आणि समीक्षाला पण वडिलांचे प्रेम मिळू लागलं होत
अभय आणि समीक्षाचं नातं खरंच अगदी दृष्ट लागण्याजोगं होतं.
अभय आणि समीक्षाचं नातं खरंच अगदी दृष्ट लागण्याजोगं होतं.
एका वडिलांना आपल्या मुलीकडून जी अपेक्षा असते आणि मुलीला जी वडिलांकडून अपेक्षा असते...ते दोघेही अगदी व्यवस्थित पूर्ण करत होते.आणि त्यांच्या नात्यांमध्ये तेवढी सहजता नक्कीच होती.
ह्या चौघांचं कुटुंब बाहेर गेलं तरी आदर्श कुटुंब होतं. कधी यांना कोण म्हणणारच नाही की ह्या दोघांची वेगवेगळी फॅमिली आहे. आणि ही एकमेकांची सावत्र मुल आहेत. किंवा मग सावत्र आई-वडील आहेत. कारण सख्यांपेक्षा जास्त हे एकत्र होते. आणि मुळात त्यांच्या नात्यांमध्ये सावत्र हा शब्दच नव्हता. आणि कुणी त्याचा उल्लेखही करत नव्हते ते... किंबहुना त्यांना माहिती असून देखील त्या शब्दाचा कधीच त्यांच्यावरती परिणामही झाला नव्हता.
वंशिका असताना पण कधी तिला वेदांत विषयी तिला जेवढा लळा नव्हता तेवढा स्वातीला वेदांत विषयी वाटायचं. आणि अभयला समीक्षा बद्दल. समीक्षाने तर वडील म्हणजे काय असतात? हे अनुभवलं ही नव्हतं. त्यामुळे तिचा आणि अभयचं नातं सहाजिक होतं. पण स्वाती आणि वेदांत तसं वेगळं होतं. पण तरीसुद्धा दोघे आई आणि मुलगा म्हणून अगदी मेड फॉर इच अदर होते. जणू काही एकमेकांसाठी बनलेलेच.
चौघ ही एकमेकांच्या प्रेमामध्ये अनोख्या बंधनात इतके बांधले गेले होते की... स्वातीचं आणि अभयचं नातं देखील आता खूप पुढे गेलेलं होतं. नवरा बायको म्हणून ज्या वाटेवरती त्यांचं नातं हवं ती वाट त्यांनी धरलेलीच होती.
आता अशी परिस्थिती होती की अभय -स्वाती शिवाय आणि स्वाती- अभय शिवाय जगू शकत नव्हते.
त्यांच प्रेमच इतकं होतं आणि एकमेका वरचा विश्वास ही....की त्यावर त्यांनी स्वतःच्या मुलांचा देखील विश्वास जिंकला.. आधी त्यांनी स्वतःच्या मुलांचा विश्वास जिंकला. आणि त्यानंतर एकमेकांचा नात्याला सुरुवात केली होती. प्रत्येक नातं ते हळूहळू एक एका पायरी गणिक पुढे जात होते.
स्वातीने वेदांत आणि समीक्षा दोघांनाही सारखेच संस्कार दिलेले होते. जे काही असेल ते दोघांना सारखंच असायचं. अभय सुद्धा लाड करायचा आणि जिथे ओरडायचं तिथे ओरडायचा. दोघेही शिस्त लावण्याच्या बाबतीत कधीही एकमेकांच्यामध्ये अजिबात येत नव्हते.महालाड हा त्यांनी कधीच केलेला नव्हता. शिस्त ती शिस्त, काळजी ती काळजी , प्रेम ते प्रेम...या तत्त्वावरती चालणारे ते होते.
दोघेही आपल्या मुलांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायचे आणि मुलांमध्ये कधीही भेद आणि भांडण नव्हती. कारण मुलांना जे काही हवे ते आई-वडिलांकडून कायमच समान मिळत होत.
शाळेमध्ये अगदी पालक आणि शिक्षक मिटींग असू दे, किंवा मग कोणताही कार्यक्रम असू दे...प्रत्येक ठिकाणी त्यांचे आई-बाबा हे असायचेच.सगळ्यांना माहिती असलं तरी यांच्या वागण्यातून तसं कधीच जाणून आलं नव्हतं.
समीक्षा ला आणि वेदांतला बरं नसताना अभय आणि स्वाती जातीने लक्ष देत होते. कधीच हे काम तुझं आहे, किंवा हे काम माझं आहे..हा मुलगा तुझा आहे किंवा ही मुलगी तुझी आहे.. असा भेदभाव त्यांच्यात कधीच नव्हता. मुळात त्यांनी मुलांना आपलं मानलं होतं. आपलंसं केलं होतं. आणि मुलांनी सुद्धा त्यांना आपलसं मानून आपलसं केलं होतं.
तसा हा काळ सोपा नव्हता. कारण घरातले काही म्हणत नसले..त्या दोघांचं काही नसलं.. तरी सुद्धा हा समाज! जो त्यांना व्यवस्थित जगून देत नव्हता.त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावून भाष्य करण त्यांना खूपच रुचकर वाटायचं. पण त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती मात केलेली होती. शिवाय आपल्या मुलांना या प्रसंगांमधून कसं जायचं हे सुद्धा शिकवलेलं होतं.
आज त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या शिकवणीमुळे आणि सोबतच त्यांच्या संस्कारांमुळे टॉप लेव्हल चे एम. बी. बी. एस, एम. डी. डॉक्टर झाली होती.
आणि अभय आणि स्वातीचा उर अभिमानाने भरून आलेला होता.
कारण त्यांनी केलेल्या कष्टाचा सार्थक झालेल होत. त्यांची प्रेम कथा ही एक अनोखी प्रेमकथा होती. जी लग्नानंतर बहरलेली होती. आणि खऱ्या अर्थाने अनेकांना शिकवण देऊन जाणारी होती.
"एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे,
त्यात मोजमाप लागत नाही कुठल्या भावनांचे,
ना अंदाज लागतात कुठल्या क्षणांचे,
फुलते एक वेल अनं गळूनं पाने पडती,
तरीही झाड उभे अशा त्या सगळ्या आठवणींचे,
असा हा संसार फुलला,
आणि बहरले प्रेम लग्नानंतरचे||"
त्यात मोजमाप लागत नाही कुठल्या भावनांचे,
ना अंदाज लागतात कुठल्या क्षणांचे,
फुलते एक वेल अनं गळूनं पाने पडती,
तरीही झाड उभे अशा त्या सगळ्या आठवणींचे,
असा हा संसार फुलला,
आणि बहरले प्रेम लग्नानंतरचे||"
समाप्त:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा