Login

प्रेम म्हणजे काय असतं?..

प्रेम म्हणजे काय असतं ही सांगणारी कविता
प्रेम म्हणजे काय असतं?


प्रेम म्हणजे काय असतं?
अलवार रेशीम सुंदर भावना
प्रत्येकाच्या अंतरी दाटलेल्या
अल्लड अशा तरल कामना

प्रेम असे सुरेल तराणे
छेडे अंतरीचे प्रीत गाणे
येता ते जीवनी घेऊन
येई अधरांवर गोड हसणे

घेई गुज अंतरीचा ठाव
दूर जाता दाटे विरहाचे भाव
जीवन दोन घडीचा डाव
त्यास तारी प्रेमरूपी नाव

रंग, रूप, जात, धर्म याला
नसे प्रेमात काहीच वाव
निस्सीम, निस्वार्थ आणि
निरपेक्ष असावे प्रेमाचे भाव

नसावे वासनेचा कोणताही
कसलाही त्यात लवलेश
असावा फक्त आणि फक्त
प्रेमाचे अन् प्रेमाचेच भाव शेश

विश्वास, गैरसमजूतीला तिथे
नसावे काही त्यास थारा
नित्य अविरत बरसाव्यात
जीवनी वर्षारूपी प्रेम धारा

नको चित्ती कोणतीही प्रेम
मिळवण्याची हव्यास प्रवृत्ती
असावी प्रेमात त्याग अन्
समर्पणाची दिलदार वृत्ती

प्रेम सुखद, नितळ अनुभव
देवाने दिलेली अनमोल भावना
प्रेमाचा केला कदर,केली साधना तर
संकट व परिस्थितीशी करू सामना

प्रेमाचा करू नये अनादर
नाही तर ठरेल ते मारक
खऱ्या प्रेमाची पारख
आयुष्य बनेल तारक