'ह्यांना मी आवडते ना? मग असं का बरं शांत राहतात? मी तर खूप प्रेम करते, ते करतात का? काहीच समजत नाहीये.'
नेहाच्या डोक्यात विचारांचं काहुर माजलं होतं.
आज प्रेमाचा दिवस होता. चौदा फेब्रुवारी. नेहाची मैत्रीण स्मिता, तिला तिच्या नवऱ्याने छान गिफ्ट दिलं होतं. सुंदर डिजाईन असलेलं असं मंगळसूत्र होतं. त्याचा छान विडिओ बनवला होता आणि लिहिलं होतं
व्हॅलेंटाइन डे गिफ्ट फ्रॉम माय स्वीट हबी. थोड्यावेळाने स्मिताने अजून एक विडिओ स्टेटसला ठेवला. हार्ट शेपचे फुगे रुममध्ये पसरवले होते. स्मिता आणि तिच्या नवऱ्याचा कपल फोटो रुममध्ये लावला होता. स्मितासाठी लाल रंगाचा गाऊन घेतला होता. तिने तोच घातला होता. थँक्स माय लव्ह फॉर सरप्राईज अँड फॉर वंडरफुल गाऊन. लव्ह यु सो मच डार्लिंग. नेहा तो विडिओ पुन्हा पुन्हा बघत होती.
व्हॅलेंटाइन डे गिफ्ट फ्रॉम माय स्वीट हबी. थोड्यावेळाने स्मिताने अजून एक विडिओ स्टेटसला ठेवला. हार्ट शेपचे फुगे रुममध्ये पसरवले होते. स्मिता आणि तिच्या नवऱ्याचा कपल फोटो रुममध्ये लावला होता. स्मितासाठी लाल रंगाचा गाऊन घेतला होता. तिने तोच घातला होता. थँक्स माय लव्ह फॉर सरप्राईज अँड फॉर वंडरफुल गाऊन. लव्ह यु सो मच डार्लिंग. नेहा तो विडिओ पुन्हा पुन्हा बघत होती.
मनातल्या मनात म्हणत होती.
'किती लकी आहे ही स्मिता. तिचा नवरा किती जीव लावतो. छान छान सरप्राईज देतो. चॉकलेट डे होता तेव्हा देखील चॉकलेटचा किती मोठा बॉक्स दिला होता. टेडी डे होता तेव्हा देखील किती मोठा टेडी आणून दिला होता. नाही तर प्रशांत त्यांना तर काहीच पडली नाही. नेहा डबा झाला का? माझा रुमाल कुठे आहे? आज मीटिंग आहे, उशीर होईल? बस हेच असतं. सतत आपलं काम. जास्त काही नाही कमीत कमी एक गुलाबाचं फुल तर देऊच शकतात ना? स्मिताचं आयुष्य किती छान आहे , रोमँटिक नवरा आहे. किती प्रेम करतो. प्रशांतना मी आवडते ना? आवडत असते तर त्यांनी देखील माझ्यासाठी हे सर्व केलं असतं. नक्की प्रेम करतात ना?' स्वतःच्या आयुष्याची बरोबरी ती स्मिताच्या आयुष्याशी करू लागली.
दिवसभर डोक्यात हेच विचार चालू होते.
दिवसभर डोक्यात हेच विचार चालू होते.
नेहा आणि प्रशांत दोघांच्या लग्नाला सहा महिने झाले होते. घरात प्रशांत,नेहा,सासू विजया आणि सासरा मनोहर हे होते. नेहा आणि प्रशांत दोघांचं अरेंज मॅरेज होतं. प्रशांत अबोल होता. खूपच शांत स्वभाव, अव्यक्त असाच राहणारा आणि नेहा बडबडी. तोंडाचा पट्टा चालूच. विजया आणि नेहा दोघी सासू सुनांचे चांगलं पटायचे. नेहा आल्यापासून प्रशांत खुश राहू लागला होता. नेहाचा स्वभाव त्याला खूप आवडू लागला होता, फक्त फरक हाच होता की तो बोलून व्यक्त व्हायचा नाही. सारं काही मनात साठवून ठेवणारा असा स्वभाव.
दोघेही एकमेकांना समजून घेत होते. नव्याचे नऊ दिवस भुरळ पाडणारे होते.
कॉलेजमध्ये होती तेव्हा तिला ह्या दिवसाचे फार अप्रूप वाटायचे.
नेहाला अनेक मुलांनी प्रपोज केलं होतं; पण तिने कधी कोणाला होकार दिला नाही. आई वडील निवडतील त्याच मुलाशी लग्न करणार हे तिने ठरवलं होतं.
नेहाला अनेक मुलांनी प्रपोज केलं होतं; पण तिने कधी कोणाला होकार दिला नाही. आई वडील निवडतील त्याच मुलाशी लग्न करणार हे तिने ठरवलं होतं.
कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं.
नेहा कॅम्पसमध्ये बसली होती. एक मुलगा एका मुलीला गुलाबाचे फुल देऊन प्रपोज करत होता.
नेहा ते मन लावून पाहत होती.
तितक्यात स्मिता आली.
"नेहा मॅडम हे असं दुसऱ्याचे प्रेम किती दिवस पाहणार?"
"जोपर्यंत लग्न होत नाही." नेहा.
"काय?"
"मी ठरवलं आहे, व्हॅलेंटाईन डे तर माझ्या नवऱ्यासोबतच साजरा करणार."
"व्हॉट? आर यू सिरीयस नेहा?"
"होय, तू जे ऐकलं बरोबर ऐकलं. हा दिवस फक्त नी फक्त माझ्या नवऱ्यासोबतच साजरा करणार आणि अश्या मुलाशी लग्न करणार जे माझे आई बाबा पसंत करतील."
"नेहा, कोणत्या जमान्यात वावरत आहेस? टिपिकल जुन्या विचारांची आहेस. आताच्या जमान्यात असा विचार करणारी तू एकटीच आहेस."
"स्मिता, मी अरेंज मॅरेजच करणार."
"आणि समज तुझ्या नवऱ्याला ह्या सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसला तर?"
"ए काहीही बोलू नको हं."
"नेहा, प्लिज बी प्रॅक्टिकल. एकतर म्हणतेय अरेंज मॅरेज करणार. तुला माहीत आहे का? त्याचा स्वभाव कसा असेल?"
"मला चांगलाच नवरा भेटणार आणि तो माझ्यावर खूप प्रेम करणार."
"ग्रेट, मॅडम तुमच्या कॉन्फिडन्सला सॅल्युट." स्मिता.
नेहा हसत होती.
"नेहा, मी तर मस्त लव्ह मॅरेज करणार आणि अश्या मुलालाच हो म्हणणार जो मला खुश ठेवेल. यु नो ग्रीन फ्लॅग."
आणि तसंच झालं. स्मिता कामाला लागली, ती खऱ्या प्रेमात पडली.
कामात तिचा एक फ्रेंड होता निखिल त्याला ती खूप आवडू लागली.
दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न केलं. ती खूप छान आयुष्य जगत होती. आधी स्मिताचे लग्न झालं आणि नंतर नेहाचे. दोघीही एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या.
नेहाला ते आज सगळं आठवत होतं.
'स्मिता जे बोलली अगदी तसंच झालं. प्रशांत का नाही तसे?.
काय काय स्वप्न होती. स्मितासारखा प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे होता का? बोलू का मी प्रशांतसोबत? नाही, ह्या अश्या गोष्टी सांगायच्या असतात का? त्यांनी स्वतःहूनच सगळं करायला हवं ना. जाऊ दे नाही बोलत. माझ्या एकटीचाच दिवस आहे का हा?'
ती उदास झाली होती.
तिला स्मिताचा फोन आला.
'स्मिताचा फोन उचलू की नको?'
सासूबाई आल्या.
"अगं फोन कधी पासून वाजतोय. उचल फोन."
"हो आई."
"हॅलो स्मिता."
"हॅलो नेहा. कशी आहेस?"
"मी मस्त."
"बरं काय मग आज काय स्पेशल? लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे काय म्हणतोय." स्मिता.
सासुबाईसमोर काय बोलणार?
"थांब हं आवाज येत नाही. मी करते तुला कॉल बँक."
"हम्म, ठीक आहे." स्मिता.
नेहा बेडरूमध्ये गेली.
विचारांची जुळवा जुळव करू लागली.
काय सांगू स्मिताला?
क्रमशः
अश्विनी ओगले.
जोडीदाराकडून किती अपेक्षा होत्या. नेहाची किती तरी स्वप्न होती. पूर्ण होतील?
पुढील भाग जरूर वाचा.
अश्विनी ओगले.
जोडीदाराकडून किती अपेक्षा होत्या. नेहाची किती तरी स्वप्न होती. पूर्ण होतील?
पुढील भाग जरूर वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा