प्रेम पालवी भाग 3

प्रेम पालवी सुंदर प्रेम कथा
प्रेम पालवी भाग 3

©️®️शिल्पा सुतार

" बाबा माझा घटस्फोट झाला आहे तुम्हाला माहिती आहे ना."

"जुन्या गोष्टी विसर नवीन सुरुवात कर बेटा. "

तिला काय करावं काही समजत नव्हतं. आई आली.

" आई अगं काय आहे हे? " ती रडत होती.

"बेटा बाबा म्हणता आहेत ते बरोबर आहे. आदित्य चांगला मुलगा आहे. तुमच्या दोघांचं लग्न व्हायचं जर विधात्याने ठरवलं असेल तर होईल. बघ म्हणजे तू विचार कर."

आता रूम मध्ये आदित्य आणि ती होती. "सानू मी काय म्हणतो आहे."

ती खिडकीत जाऊन उभी राहिली. तो तिच्या बाजूला उभा होता.

"मला माहिती आहे हे अचानक झालं आहे. पण तू मला ओळखत नाही का? तुझा नकार असेल तर मी बळजबरी करणार नाही. पण एवढं सांगतो की आपण सोबत सुखी राहु. आपण बेस्ट फ्रेंड आहोत. माझ तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील का?"

"आदित्य. "

"तुझं काय म्हणणं आहे मोकळं सांग. "

"माझा घटस्फोट झाला आहे .तुला चालेल का हे? "

"मला माहिती नाही का हे. " तो म्हणाला.

"तु तुझ नुकसान करतो आहेस." तिला कसतरी वाटत होत.

"अजिबात नाही उलट मी योग्य निर्णय घेतो आहे. "

"मला वेळ हवा आहे. "

"तुला हवा तेवढा वेळ घे काही हरकत नाही. पण प्लीज लग्न कर. "

ती जरा वेळ एकटी बसली होती. मला हेच तर हव होतं. आदित्य माझ्या स्वप्नातला राजकुमार आहे. तोच म्हणतो आहे लग्न कर. हे योग्य आहे का? लग्न करू का? तिने होकार दिला.

लगेच बैठक बसली. आजच लग्न होईल. तिचे आई-बाबा खरेदीला गेले होते. साड्या दागिने घेतले. तीन तासाने सानिका तयार होवून बाहेर आली.

सोज्वळ रूप, साधी छान सुंदर दिसत होती. साडी नीट नेसलेली. चेहर्‍यावर गोडवा. थोडासा मेक अप. मोजके दागिने घातलेली.

सानिका, आदित्य मंगलाष्टकासाठी उभे राहिले. लग्न लागलं. वरमाला घालतांना खूप मजा आली. आदित्य गुडघ्यावर आला. तिने त्याला वरमाला घातली. तो तिच्या कडे बघत होता. तिने हळूच समोर बघितल त्याने वरमाला घातली.

सगळ्या पूजा झाल्या. त्याच्या जवळ बसतांना पूजा करतांना तिला खूप कसंतरी वाटत होतं. हाताला हात लावतांना हात थरथरत होते. तीच त्याच्यावर प्रेम होत पण अस अचानक लग्न म्हणजे खूपच झाल.

"सानू काय झालं?"

"काही नाही."

" मग अशी घाबरू नकोस. सगळं नीट होणार आहे."

त्यांचा ग्रुप खूप उत्साही होता. सगळ्यांच्या मनात या दोघांनी नेहमी सोबत रहावं असं होतं. त्यामुळे लगेच चिडवा चिडवी सुरू झाली. आदित्य खुश होता. सानिका तिच्या विचारात होती.

आदित्य एक स्वप्नं होतं. आज ते पूर्ण झालं. जे हव होत ते मिळालं. तो माझा आहे. तरी मन का उदास आहे.

दुसर मन ऐकत नव्हतं. ते बंड करत होत. मी अनलकी आहे. आदित्यच नुकसान होईल.

"शेवटी झालं ना लग्न. तुमच खूप अभिनंदन." तिची मैत्रीण दोघांशी बोलत होती.

सानिका शांत बसली होती. मंगळसुत्र घालतांना, कुंकू लावताना तो तिच्याकडे बघत होता. ती अजूनही खाली बघत होती. इतर पूजा झाल्या. जेवणाची पंगत बसली. सगळे खुश होते.

निघायची वेळ झाली. "आई बाबा झाल ना तुमच्या मना सारखं? बाबा मी तुमच ऐकल. येते मी."

"सानु तिकडे नीट रहा बेटा. मनातून सगळं काढ. खूप चांगले लोक मिळाले. त्यांना जप. नीट रहा."

ती रडत होती.

"सानू तू आदित्य सुखी रहा बेटा." त्यांनी आशीर्वाद दिला.

"हो आई."

ती कार मधे बसली. आदित्य तिच्या घरच्यांशी बोलत होता.

"सांभाळा तिला, चिडली आहे. "

" तुम्ही काळजी करू नका काका, काकू." त्याने पाया पडल्या.

ते निघाले. त्याने तिला पाण्याची बाटली दिली. तिने पाणी घेतलं.

"रडू नकोस सानू." त्याने तिचा हात हातात घेतला. तिने काढून घेतला.

"आदित्य मला हे चालणार नाही. मला या लग्नात काही इंट्रेस्ट नाहिये. लांब थांबायच." ती चिडली.

"ठीक आहे शांत हो. तु मला ओळखत नाही का? किती चिडणार आहेस?" तो शांत पणे म्हणाला.

"आपली ओळख आहे किंवा नाही आता काय ते. तुझी गर्लफ्रेन्ड होती तेव्हा तू माझ्याशी बोलत होतास का? आता ती पळाली तर मी आठवली." सानिका चिडली होती.

आदित्य हसत होता. "अस का? भांडण करायचं का सानू? तु आता तरी माझ्याशी नीट वागणार आहेस का?"

"माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. मी तुझ्या सोबत पुण्याला येणार नाही. तुझ्या सोबत राहणार नाही." तिने असहकार दाखवला.

"कोणी सांगितल तू पुण्याला येणार अस? तुला इथे रहायच आहे. आई बाबांची सेवा करायची." तो चिडवत होता. तिला समजल. ती बाजूला सरकून बसली. तुझ्याशी बोलायला नको.

घर आल, दोघ गप्प बसले. दोघांना ओवाळून घरात घेतल.

ती आत गेली फ्रेश झाली. तुला बाहेर बोलवलं आहे. पुढचे गेम होते.

"काकू मला हे जमणार नाही."

"बेटा आता झाल ना लग्न, मोकळ रहा. आज तू आम्हाला मदत करून खूप उपकार झाले."

"काकू काय बोलताय." ती त्यांना भेटली.

"मला आई म्हण बेटा."

अंगठी शोधायच्या खेळात दोनदा आदित्य जिंकला. "तुला भांडायची हौस आहे ना सानू. मग दे टशन. जिंकून दाखव." तो म्हणाला.

ती त्याच्याकडे बघत होती. सगळे तिला सांगत होते यावेळी तरी पटकन अंगठी शोध.

"मीच जिंकणार सानू. तुला मी म्हणतो ते ऐकाव लागेल." त्याने चॅलेंज दीलं.

अंगठी पाण्यात टाकली. सानिका पटकन शोधत होती काहीतरी हाताला लागल. तो आदित्यचा हात होता तो तिला अंगठी देत होता. तिने ती घेतली सगळ्यांना दाखवली. सगळे टाळ्या वाजवत होते. ती त्याच्याकडे बघत होती. थँक्यू.

"मग आता भांडण?" त्याने विचारल.

"मिटलं." ती म्हणाली.

" माझ्याशी नीट वागणार?"

हो.

दुसर्‍या दिवशी पूजा होती. सानिका तयार होती. साडी, मंगळसूत्र, दागिने घालून ती अतिशय सुंदर दिसत होती. ती बाहेर आली. आदित्य तिच्याकडे बघत होता. तिने मुद्दाम लक्ष नाही अस दाखवल. पूजा झाली. बरेच पाहुणे जेवायला होते. सानिका ही कामात होती. खूप मदत करत होती. घरचे तिच्यावर खुश होते.

रात्री त्यांच्यासाठी रूम सजवली होती. सानिका खाली पाहुण्यांमधे होती. काकूने तिला तयार करून वरती पाठवलं. थोड्या वेळाने आदित्य आला. तो रूमच डेकोरेशन तिच्याकडे बघत होता. ती नॉर्मल होती. केलेली तयारी काढत होती. "आदित्य माझी बॅग आण खालून."

"ही तयारी तू केली?"

"मी कशाला करेल."

" मला वाटल की मी अंगठी शोधून दिली म्हणून गिफ्ट की काय?" तो हसत म्हणाला.

"काहीही. आदित्य माझी बॅग कुठे आहे? मला कपडे बदलायचे आहेत."

"तुला साडी छान दिसते. हा रंग. दागिने सगळच छान आहे. तू खूप गोड दिसते आहे." तो पुढे पुढे येत होता. तिला काय कराव समजलं नाही.

🎭 Series Post

View all