प्रेम पालवी भाग 4

प्रेम पालवी सुंदर प्रेम कथा
प्रेम पालवी भाग 4

©️®️शिल्पा सुतार

"आदित्य प्लीज मी सांगितल होतं मला वेळ हवा आहे . बाजूला हो." ती मागे सरकत भिंतीला टेकली. तो समोर उभा होता. तिच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला होता. हा अजिबात ऐकत नाही. त्याने तिच्या गालाला हात लावुन गुलाबाची पाकळी काढली. ती बघत होती.

"किती घाबरली आहेस. घाम बघ किती आला. एसी वाढवु का?"

तिने आरश्यात बघितल.

"तुला काय वाटल?" तो खूप हसत होता. तिने त्याला पाच सहा फटके मारले.

"मला तुझ्याशी लग्न नव्हत करायच. तू अशक्य आहेस. माझ्याशी बोलू नकोस." ती रागाने फुल आवरत होती. त्याने तिला हळूच मिठीत घेतल." थँक्यु सानू. तू माझ्यासाठी नेहमीच खूप करते."

ती बाजूला झाली.

"अस लाजायचं नाही. आपण मिठी मारू शकतो."

"मी म्हणेल तेच होईल." ती म्हणाली.

"बर बाई."

तिने कपडे बदलले. ती झोपली. आदित्य तिच्या बाजूला येवून बसला.

"तू इथे झोपायच नाही." ती म्हणाली.

"मग मी कुठे जाणार? हा माझा कॉट आहे. मी इथे झोपणार." आदित्य उशी नीट करत म्हणाला.

"अजिबात दादागिरी चालणार नाही." ती म्हणाली.

"तुला झोपायच तर झोप माझ्या बाजूला. मी काही करत नाही." तो अजूनही हसत होता.

"काही नको. थोड्या वेळा पूर्वी बघितल कसा वागतोस ते." ती खाली चादर टाकून झोपली. थोड्या वेळाने तिची पाठ दुखायला लागली. ती हळूच त्याच्या बाजूला येवून झोपली. मधे उशी ठेवली. त्याला जाग होती. तो काही म्हणाला नाही. विचित्र परिस्थिती आम्ही अडकलो नाहीतर आमचं चांगल पटत.

दुसर्‍या दिवशी बाकीचे पाहुणे गेले. आता घरी आई, बाबा, सानिका, आदित्य होते. याच्या घरचे खूप चांगले आहेत. जेवतांना आईनी विषय काढला. "तुम्ही दोघ फिरून या."

सानिका आदित्य कडे बघत होती. "आई तिकडे पुण्याला आम्ही एकटे असू तेव्हा जावू, इथे तुझ्या जवळ आहे तर राहू दे ना."

"ठीक आहे पण सानिका काय म्हणेल?"

तो तिच्याकडे बघत होता. "ठीक आहे मग आम्ही जातो फिरायला."

"नाही, नको. म्हणजे आदित्य बरोबर म्हणतो आहे. तिकडे एकट असू तेव्हा जावू." सानिका म्हणाली.

" तू येशील ना पुण्याला सानू?" त्याने मुद्दाम आई समोर विचारल.

ती हो म्हणाली.

रात्री ते त्यांच्या खोलीत होते. सानिका आवरत होती. आदित्य मुद्दाम करतो. तिची बडबड सुरू होती. तो तिला लांबून बघत होता.

सानिका खूप छान मैत्रीण आहे. कॉलेज मधे असतांना आमची आवड ही एक होती. ती माझी नेहमी काळजी घ्यायची. मला कोणती भाजी आवडते, लिंबाच लोणच आवडत ते तिला माहिती होत. ती माझ्यासाठी डबा आणायची. कोणाशी भांडण झाल की ती पुढे असायची. मला सावरायची. माझ्या नोट्स पूर्ण करायला मदत करायची. दोघ इंजिनिअर झालो. मी पुढे एमबीए केल. तिकडे जॉब लागला. मला साक्षीपेक्षा सानिकाची जास्त आठवण यायची. सानू माझ्यावर प्रेम तर करत नव्हती ना? सारखी माझ्या मागे असायची. अरे हो मला समजल नाही. कुठे त्या साक्षीच्या नादी लागलो. सुंदर म्हणाल तर सानू काही कमी सुंदर नाही. वागणं बोलणं चांगल.

"सानू तू झोपली का?" त्याने आवाज दिला.

"नाही."

"थोड बोलायच होतं."

"बोल ना." ती उठून बसली.

"तुला आठवत का माझ त्या स्पायडर गँग सोबत भांडण झाल होत. हाताला लागल होत."

"हो तू तसा भांडणात पटाईत आहेस." ती म्हणाली.

"मी हॉस्पिटल मधे होतो. तू पूर्ण वेळ माझ्या सोबत होती. माझी काळजी घेत होतीस." तो तिच्याकडे बघत होता.

"हो बरोबर आहे. तुला किती लागल होतं अजूनही हातावर वळ असतिल ना?" ती काळजी युक्त प्रेमाने म्हणाली. .

"माझी भाजी तू खायची. मला आवडता डबा द्यायची."

"हो ना तू उपाशी रहायला नको म्हणून."सानिका हसत म्हणाली.

"त्या रमेश सोबत तू भांडली होती. त्याने माझी बाईक पंचर केली होती म्हणून."

"हो ना तुझ्यासाठी काय काय नाही केलं." सानिका सहज म्हणाली.

"हेच म्हणतो आहे तू हे का केल? "त्याने विचारल.

"म्हणजे ?"

"तुला माझी इतकी काळजी का होती?"

"ते असच. आपण सोबत होतो ना. एकमेकांना ओळखत होतो. तुला लागल तर मला त्रास होतो. म्हणजे कोणाला लागल तर त्रास होतोच ना." सानिका गडबडली.

"सानू तू माझ्यावर प्रेम करतेस ना." तो तिच्याकडे बघत होता.

तिने खाली बघितल.

"सांग ना."

"नाही." ती हळूच म्हणाली. तिची हिम्मत होत नव्हती.

"तु खोट बोलते आहेस."

"नाही आदित्य."

"मान्य का करत नाही. तुझा डिवोर्स कसा झाला? तो ही लगेच. तू कोणावर तरी प्रेम करते अस नवर्‍याला सांगितल ना. मला ते समजल होतं." आदित्य म्हणाला.

"नाही आदित्य."

त्याने तिला दोघी हाताला धरलं. जवळ ओढल. तो तिच्या कडे बघत होता. जोरात श्वास घेतल्याने तिची छाती वर खाली होत होती. तिने कशी तरी सुटका करून घेतली. ती त्या बाजूला सरकून झोपली. ती खर तर घाबरली होती. तिने डोक्यावरून पांघरुन घेतल.

सांगू का याला तूच माझ सर्वस्व आहे. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी जगु शकत नाही. नको मला त्याची भिती वाटते. तो मला जवळ घेईल. हे लग्न अचानक झाल. मला थोडा वेळ हवा आहे.

"ठीक आहे सानू तू मान्य करत नाही. मी शोधून काढेल. तू माझी आहेस. आपण एकमेकांवर प्रेम करतो अशी दूर राहू नकोस."

ती त्याचा आवाज ऐकत होती. तिने उत्तर दिलं नाही.

"मला बळजबरी आवडत नाही. तुला वाटल तेव्हा सांग मी वाट बघेन." तो झोपला होता. थोड्या वेळाने तिने पांघरुन बाजूला केल त्याच्याकडे बघितल. तो अगदी निरागस दिसत होता. तिला त्याच्या केसातून हात फिरवायची इच्छा झाली. नको हात कसा लावणार. ती ही झोपली.

ती सकाळी लवकर उठली. आंघोळ करून तयार झाली. तो बघत होता. ही खूपच फ्रेश दिसत होती. "सानू आय एम सॉरी. मी तुला उगीच बोललो. तू तुझा वेळ घे. तू माझ्या सोबत पुण्याला येशील का? यायच असेल तर तुझ्या ऑफिस मधे ट्रान्सफर लेटर दे."

ती काही म्हणाली नाही. ऑफिस मधे आली. सगळे तिला भेटत होते .अभिनंदन करत होते.

लंच ब्रेक मधे तिची मैत्रीण पूनम भेटली. "तुझ प्रेम होत तोच हीरो तुला मिळाला वॉव. मग आता खुश ना. "

"मी त्याच्याशी भांडले. आम्ही बोलत नाही. त्याला माहिती नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे. तस तो मला विचारत होता मीच काही सांगितल नाही."

"अस का करतेस? मोकळ रहा ना. ज्याचे स्वप्नं बघितले तो मिळाला. अजून काय हवं. "

"पूनम मी पुण्याला ट्रान्सफर करून घेवू का? त्याच्याकडे रहायला जावु?" सानिकाने विचारल.

"हो जा ना आणि त्याच्याशी प्रेमाने वाग."

तिने ट्रान्सफर साठी अर्ज केला. तिला आत बोलावलं. कारण विचारल. होईल हे काम.

🎭 Series Post

View all