प्रेम पालवी भाग 5 अंतिम

प्रेम पालवी सुंदर प्रेम कथा
प्रेम पालवी भाग 5 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

आदित्यची सुट्टी संपली. तो निघणार होता. तो बॅग भरत होता. ती बाजूला उभी होती. काकू ही होत्या. नंतर त्या किचन मधे गेल्या. तो सानिका जवळ आला. तिला हलकी मिठी मारली.

"मी पंधरा दिवसांनी येतो सानू. नीट रहा. माझा विचार कर. तू स्वतःला आणि मला ही एवढी मोठी शिक्षा देवू नकोस. प्रेम असेल तर ते सांगितल ही पाहिजे."

ती काही म्हणाली नाही. तो गेला. तिला अजिबात करमत नव्हतं. ती त्याचा फोटो बघत बसायची. त्याचा फोन यायचा घरचे बोलायचे. ती ऐकायची. तिला फोन दिला की थोडसं बोलायची. मधे दोन चार दिवस ती आईकडे ही राहून आली.

आदित्यचा फोन आला. "माझी ट्रान्सफर झाली."

"अरे वाह मी तुला घ्यायला येतो. तयारी करून ठेव."

तो शनिवारी आला. ते लगेच पुण्याला आले. खूपच छान फ्लॅट होता. दोघांचा संसार. ती सगळीकडे बघत होती.

"घर आवडल."

"हो."

"तुला हव तस सजव."

आदित्य तिला घरकामात मदत करत होता.

"इथून ऑफिसला कस जायच? " तिने पत्ता सांगितला. तो समजावत होता.

तो तयार झाला. ती दोन दिवसांनी जॉईन होणार होती. तो नाश्त्याला आला. फॉर्मल ड्रेस मधे तो कमाल दिसत होता. अगदी रूबाबदार. ती त्याच्याकडे बघत होती. "चहा." त्याने आवाज दिला.

"हो देते."

"सावकाश काम कर. मी चांगला दिसतोय ना. म्हणजे हा शर्ट ठीक आहे ना."

"हो आदित्य."

"काही वाटल तर सांग." तो हसत होता. ती पटकन डबा भरायला उठली. सुट्टीच्या दिवशी ते बाहेर फिरून आले रस्ता क्रॉस करतांना तिने आपोआप त्याचा हात धरला. त्याचा आधार वाटत होता. तो खूपच चांगला होता.

आज तिला ऑफिस होत. ती तयार होती. ती त्याच्या सोबत ऑफिस मधे गेली. दुसर्‍या दिवशी पासून कॅब होती.

दोघ थोड समजुतीने घेत होते. थोड बोलत होते . ती त्याची काळजी घेत होती. घरकाम परफेक्ट होत. तो ही तिच्याशी प्रेमाने वागत होता. तिला फरक जाणवत होता.

ऑफिस मधून तिने आईला फोन केला. "कशी आहेस सानू?"

"आई मी मजेत आहे."

"आदित्य कसा आहे?"

"आई तो खूप चांगला आहे. आधी पेक्षा समजूतदार. खूप सांभाळून घेतो."

"तू ही नीट रहा बेटा. एकमेकांना समजून घ्यायच. जपायच. लग्न झाल ना आता निभावून ने."

त्यांच्या ग्रुप मधले एक दोघे पुण्यात होते. त्यांच्याकडे पार्टी होती. सानिका, आदित्य तिकडे गेले. पार्टीत साक्षी आली. आदित्य हाक मारत तिने एकदम त्याला मिठी मारली.

त्याने तिला बाजूला केल.

"काय झाल आदित्य. तू माझ्याशी बोलत नाहीस. "

"हेरॉईन व्हायची हौस झाली का?"

"ते ही काम सुरू आहे."

" मी लग्न केल." आदित्य म्हणाला.

" मला समजल सानिका सोबत ना. दुसरी कोणी मिळाली नाही का? ही आधीपासून तुझ्या मागे होती. काय ग तुला बरोबर चान्स मिळाला. लक्ष्यात ठेव आदित्य माझा आहे." ती सानिका कडे बघत म्हणाली.

"पुरे साक्षी तिला काही बोलू नकोस."

"आदित्य मला सिरियल मिळाली. थोड्या दिवसात शूटिंग सुरू होईल. ते जग खूप वेगळं आहे. भारी एकदम पार्टी असतात. तू येशील का माझ्या सोबत. "

" साक्षी मला तुझ्यात आणि त्या जगात काही इंट्रेस्ट नाही."

"तु किती बोर आहेस. "

" दुसर्‍याकडे तमाशा नको. तुझा आमचा काही संबंध नाही. आता सानिका माझी बायको आहे. तिचा अपमान झालेला मला चालणार नाही."

"तु मला अस करतोस ते ही हिच्यासाठी. काय हिच्यात एवढं? तिच्यापेक्षा मी किती सुंदर आहे." साक्षी म्हणाली.

"काय करायच त्या बाह्य सौंदर्याला. तुझ मन किती खराब आहे. तुला प्रेम म्हणजे काय ते समजल नाही साक्षी. तुझ्या गुणांमुळे तू एकटी पडली. एन्जॉय. तु काय गमावल ते तुला नंतर समजेल. आम्ही निघतो."

सानिका आदित्य कार मधे गप्प होते.

आदित्यने माझी बाजू घेतली. त्या साक्षीला चांगल खडसावले ते बर झाल.

घरी आल्यावर आदित्य कपडे बदलत होता. सानिकाने त्याला मिठी मारली. त्याने ही तिला जवळ घेतल." थँक्यु." ती म्हणाली.

आदित्यने चहा केला. तो बाल्कनीत बसुन चहा घेत होता. सानिका त्याच्या जवळ बसली. त्याने तिला चहाचा कप दिला.

दोघ गप्प होते. काय हव ते न मागता समजत. ही काळजी हे प्रेम खरच छान आहे.

"आदित्य तू चांगला आहे."

"काय झाल आता मी काय केल?" त्याने हसत विचारल.

"अरे मी तुझ्या बाजूने बोलते आहे."

"बर सांग, थांब मीच सांगतो. मी चांगला आहे, हुशार आहे, ऑफिसला जातांना भारी दिसतो. न मागता सगळ आणतो. हो ना." तो म्हणाला.

ती हसत होती.

"तुझ माझ्यावर प्रेम आहे पण तु सांगत नाही. हेच तुझ्या मनात आहे ना." आदित्य म्हणाला.

सानिका लाजली होती. "अस काही नाही आदित्य."

"मला एवढे तर माणसं समजतात. "

"आदित्य थँक्यु."

"आता का?"

"तू माझ्याशी लग्न केलं. आई बाबा आता रीलॅक्स आहेत. माझ्या पहिल्या लग्नानंतर ते खूप टेंशन मधे होते. लहान पणापासुन माझ्या मनात तुच होता. तुझ साक्षीच जमलं. मी बाजूला झाले. आई बाबांनी बळजबरी लग्न लावलं. तिथे मन लागल नव्हतं. नवरा सारखा विचारत होता काय प्रॉब्लेम आहे. आम्ही शारीरिक, मानसिक रित्या कधी एकत्र आलोच नाहीत. एक दिवस घरी आम्ही दोघ होतो. तो जवळ आला. मी त्याला दूर लोटले. माझ तुझ्यावर प्रेम होत त्याला सांगितल. त्याने मला मारलं. आम्ही एकमेकांशी बोलायचो नाही. थोड्या दिवसानी मी माहेरी आले ती कायमची. तो कधी भेटायला आला नाही. घटस्फोट झाला."

आदित्यने तिला जवळ घेतल. "माझ्या ही खूप चुका झाल्या. पण आता नाही फक्त आणि फक्त तू मी आणि आपला संसार. माझ्या सोबत राहशील का सानू? "

"हो. मी फक्त तुझी आहे. माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे." ती त्याच्या मिठीत शिरली.

दोघ खुश होते. त्याने तिला उचलून घेतल. आत आले. तो जवळ येत होता. तिने डोळे मिटून घेतले.

मी तुझी आहे, फक्त तुझी. माझ्या तनमनावर फक्त तुझाच हक्क आहे. दिवस रात्र तुझे विचार माझ्या मनात होते. हे प्रेम नाही ही साधना आहे. आपण एकत्र आलो कायम साठी. आता कधीच दूर जावू नकोस. आदित्य आय लव यु.

तो त्याचा हक्क गाजवत होता. ती त्याच्या प्रेमात चिंब भिजली होती. बाहेर सुंदर चंद्र प्रकाश होता. ती खिडकीतून त्या चंद्राकडे बघत होती. आज ती ही तितकीच सुंदर दिसत होती. तिच्या चेहर्‍यावर आलेले केस त्याने मागे केले. तिला मिठीत घेतल. सानू लव यु टु.

पौर्णिमेच्या रात्री
चंद्र मज खुणावतो
मधु चंद्राची रात
गोड प्रेमाने रंगवतो

येता शहारा अंगाला
हुरहूर लागते मनाला
घे ना सख्या कुशीत
या वेड्या जीवाला.

🎭 Series Post

View all