©️®️शिल्पा सुतार
........
........
अदिती घरातुनं निघाली, आई बाबा अमित अदिती सगळेच रडत होते,.. "अमित वेळेवर औषध घे, आई बाबा तुम्ही काळजी करू नका, होईल बरोबर" ,
"तुला जर पैसे लागत असतील तर सांग, खूप अडचण काढू नको",.. बाबा
"नाही बाबा",.. अदिती
"यावेळी तुला सोबत न्यायला काहीही पदार्थ केले नाही",.. आई
"काही हरकत नाही आई घरात काय चाललं आहे ते मला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या",.. अदिती
" कधी येशील परत ताई? ",.. अमित
" येईल मी लागून सुट्ट्या आल्या की, मला रोज व्हिडिओ कॉल कर अमित आणि अभ्यासाचं टेन्शन घेऊ नको. नीट बरं वाटल्यावरच कॉलेजला जा, पायावर ताण येईल असं काही करू नको आणि तू कुठल्या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला गेला होता ते सगळे डिटेल्स मला पाठव, बघू आपण काय होतंय ते",.. अदिती
" ठीक आहे",.. अमित
आई-बाबा अदितीला स्टैंड वर सोडायला गेले, अनुच्या घरून तिच्या साठी पार्सल घेवून काका आले होते, ते बाबांशी बोलत होते, लगेच बस मिळाली, अदितीच्या डोळ्यात पाणी होतं, परत कधी यायला मिळेल माहिती नाही, गाडी निघाल्यावर तिने आकाशला मेसेज केला.. की ती निघाली आहे
" मी येऊ का स्टैंड वर घ्यायला? ",.. आकाश
" नाही पीजी जवळच गाडी थांबते, काळजी करू नको आकाश",.. अदिती
"घरी पोहोचली की फोन कर",.. आकाश
रात्री ती घरी आली, अनु खूप चौकशी करत होती.. "ठीक आहे ना गं अमित आता?",..
"खूपच लागल आहे अग त्याला, होईल बरं" ,.. काय काय झालं ते ती सांगत होती
" अनु हे घे तुझ सामान",. दोघी खाली जेवायला गेल्या, घरून आणलेली पोळी भाजी होती, खालून भात वगैरे घेतला
जेवल्यावर तिने आकाशला फोन लावला
"आलीस का घरी अदिती? ",.. आकाश
"हो अर्धा तासा पूर्वी आली मी घरी",.. अदिती
"हो अर्धा तासा पूर्वी आली मी घरी",.. अदिती
"जेवण झालं का?",.. आकाश
"हो.. तू काय करतो आहेस आकाश?",.. अदिती
"मी पुस्तक वाचतो आहे",.. आकाश
"आज सुट्टीचा कुठे गेला नाहीस का?",.. अदिती
"नाही असं इतर वेळीही मी कुठे जात नाही, आठवडाभर बिझी असतो तर आराम करतो ",.. आकाश
" तुझ जेवण झालं का? ",.. अदिती
" हो झालं आहे",.. आकाश
" चालेल मग उद्या भेटू ऑफिसमध्ये",.. अदिती
" ठीक आहे आराम कर",.. आकाश
अदितीशी बोलून आकाशला खूप छान वाटत होतं, घराचं सांगितलं आहे त्या एजंटला, उद्या जावं लागेल घर बघायला, अदिती बरोबर कसा राहणार आहे मी इमॅजिन होत नाही, खूपच आनंदात होता आकाश
......
......
अदिती विचार करत होती.. अनुला अजून सांगितलं नाही आहे मी आकाश बद्दल, तशी वेळ येणार नाही सांगायची, अजून आम्ही दोघांनीही घरी सांगितलं नाही, बहुतेक मी इथेच राहील अनु सोबत, अदितीला झोपच येत नव्हती, उद्या ऑफिस मध्ये आकाश भेटेला तर काय बोलणार आहे मी त्याच्याशी? त्याला मी आता सर म्हणू की आकाश म्हणू, तिला तिचं तिचं हसू येत होतं, त्याच्या कडे बघायच म्हणजे वेगळ वाटत, जर कॉलेज मधे आम्ही सोबत असतो तर आता पर्यंत काही वाटल नसत, आता अचानक आम्ही लग्न केल, वाटल ही नव्हत, आकाश खूप डेसटपरेट आहे, मला भिती वाटते आहे विचार करून मी त्याच्या सोबत... , वेळ आहे अजून, घरी माहिती नाही, त्यांना काय सांगणार, आई बाबा चिडतील का?, काय माहिती....
सकाळी लवकर आवरून अदिती ऑफिसमध्ये गेली, आकाश अजून आलेला नव्हता, सगळे मुलं तिच्या आजूबाजूला जमले होते, काय झालं होतं ते अदिती सगळ्यांना सांगत होती, अमित बद्दल सांगत होती,
यश लांब उभ राहून सगळं बघत होता, हा यश आजही माझ्याशी बोलणार नाही का? ,.. जाऊ दे,
आकाशला आज ऑफिसला यायची वेगळीच घाई झाली होती, सगळ्यांच्या आधी तो डायनिंग टेबलवर हजर होता, आजी आली त्यांना आश्चर्य वाटलं, पूनम अविनाश आले ते दचकले, विकी आला.." बापरे आज तू एवढ्या लवकर तयार आहेस आकाश?, तब्येत ठीक आहे ना तुझी?, काय विशेष? रोज सगळे तुला बोलवून बोलवून थकतात" ,
" काही विशेष नाही, ऑफिसमध्ये काम नाहीत का काही ? लवकर तयार झालं म्हणजे काही विशेषच असेल का?",.. आकाश
अविनाश हसत होते, आज सोमवार म्हणजे अदिती आली असेल
दोघं ऑफिसला आले, समोर अदिती काम करत होती, नेहमीप्रमाणे अविनाश तिच्याशी बोलायला गेले, आकाश हसून आत मध्ये चालला गेला.
" कशी आहे तुझ्या भावाची तब्येत? ",.. अविनाश
" आता व्यवस्थित आहे घरी सोडलं आहे ",.. अदिती
" सगळं अचानकच झालं नाही",.. अविनाश
"हो त्या दिवशी तुम्ही नव्हते वाटतं ऑफिसमध्ये",.. अदिती
रोजचे काम सुरू झाले, अदिती आल्यामुळे सुरेशही खुश होता, तो आणि अदिती समोर बसत होते, खूप बोर झालं अदिती तू नव्हती तर.
आता शॉप फ्लॉवर मध्ये खूप काम असायचं, सारखे सगळे तिकडे ये जा करत असायचे, एकदा डिझाईन फायनल झाली की धावपळ होणार होती, बाकीचे मुलं मशीन वर काम करत होते, खूप मशीनचा आवाज होतो म्हणून शॉप फ्लोर आणि इकडे ऑफिस मध्ये दरवाजा आता हल्ली बंद करून घेत होते, सात आठ दिवसाचा हिशोबाचं काम पेंडिंग होतं, त्यात जुन्या कंपनीचा हिशोबही अदिती कडे आला होता, ती बरीच बिझी होती, बरेच दिवस तिला हे काम पुरणार होतं.
आकाशला एजंटचा फोन आला,.. "एक छान फ्लॅट अवेलेबल आहे, तुम्ही म्हणतात तसंच टू बीएचके आहे, फर्निष्ट आहे, फायनल करायचं असेल तर संध्याकाळी या",
" ठीक आहे ",.. आकाश
" कोण राहणार आहे घरात? फॅमिली का मुलं मुलं",..
"नाही मी माझी बायको",.. आकाश
"ठीक आहे मग फॅमिली आहे तर",..
"येतो संध्याकाळी मी",.. आकाश आतून बघत होता अदिती बिझी होती, त्याला केव्हाच अदितीशी बोलायचं होतं त्याने अदितीला बोलावलं, अदितीला वेगळीच धडधड होत होती, काय करू फाईल घेऊन आत मध्ये जाऊ की अशीच जाऊ?
अदिती आत मध्ये गेली, आकाश हसत होता तिच्याशी, कशी आहेस अदिती? , बस
ती समोर बसली
" कसा आहे अमित आता? ",.. आकाश
" ठीक आहे तो, होते आहे ठीक हळूहळू तब्येत" ,.. अदिती
"त्या लोकांचं डिटेल्स मिळाले का ट्रेकिंग वाले",.. आकाश
"हो पाठवणार आहे अमित",.. अदिती
" त्यांना आपण नोटीस पाठवू",.. आकाश
" हो चालेल",.. अदिती
" आज तु ऑफिसला आली आहे तर खूप बरं वाटतं आहे",.. आकाश
अदिती काही म्हटली नाही,
"संध्याकाळी जायचं का मग घर बघायला? ",.. आकाश
"म्हणजे? ",.. अदितीला धक्का बसला
" त्या दिवशी बघितल ना तू त्या सोसायटीत घर आहे आपल, तिकडेच टू बीएचके चा फ्लॅट बघतो आहे मी, आपल्या दोघांना राहायला",.. आकाश
अदितीला समजतच नव्हतं काय रिऍक्ट व्हाव,.." आपण सोबत राहायचं आहे का?",
"आपलं झालं आहे ना लग्न, तुझा विश्वास आहे ना? ",.. आकाश
"हो आहे विश्वास, पण घरी सांगितलेलं नाही ना कोणाला, त्यांना समजल तर, मला भिती वाटते ",.. अदिती
" कसली भीती? माझ्या सोबत रहायची की घरी समजल तर अस वाटतय तुला? ",.. आकाश हसत होता
" आकाश प्लीज... घरी समजल तर? , एकदा सांगितल असत घरी आकाश",. अदिती
" काळजी करू नको अदिती, मला समजत आहे तुला काय वाटतय ते, आपण सोबत रहाणार आहे फक्त, घरी सांगितल्यावर मॅरीड लाइफ सुरु करु, तुला कम्फर्टेबल ठेवायच आहे मला, तुला नाही आवडत ना पी जी त",.. आकाश
"तस नाही तिथे अनु आहे ",.. अदिती
" इथे मी असेल तुझ्या सोबत डोन्ट वरी",.. आकाश
तोच प्रॉब्लेम आहे, भीती वाटते दिवस रात्र याच्या सोबत ओह माय गॉड,.. "तुला घरी नाही जावं लागणार का आकाश ?, घरचे विचारणार नाही का? रोज कुठे राहतो ते, माझ्या घरचे तर पाच मिनिट मला सोडणार नाही ",
" जावं लागेल मला मधून मधून घरी, तसेही मी बऱ्याच वेळा फ्लॅटमध्ये राहतो इथे कामाला उशीर झाला की तिकडे जावं लागतं",.. आकाश
" मग तू घरी नसला की मी एकटी राहायचं का?",.. अदिती
"पी जी पेक्षा चांगला आहे ना ते, घरचं जेवण मिळेल, कंफर्ट असेल तर स्वतःच घर असेल",.. आकाश
हा असेल सोबत.. त्याचाच विचार करून अदितीला खूपच धडधड झाली, मला असं राहता येणार नाही आकाश सोबत, घरी काही माहिती नाही, काय करू? याला हो नाही म्हणायची हिम्मत नाही माझी, चीडेल तो, जाऊ त्याच्या सोबतच राहायला, जाऊ दे, आता झालं आहे लग्न.
" काय झालं आदिती काही प्रॉब्लेम आहे का?",.. आकाश
"नाही आकाश मी येईन तिकडे राहायला पण मला त्या आधी अनुला सगळं सांगावे लागेल" ,.. अदिती
" अनुच्या घरचे आणि तुझ्या घरचे जवळचे आहेत का ओळखीचे?, नको सांगू तिला काही, तिने ऑफिस मध्ये सांगितल तर गडबड होईल ",.. आकाश
"हो बरोबर आहे मग काय सांगू ",.. अदिती
"सांग या ऑफिस जवळ घर घेते आहे यायला जायला त्रास होतो ",.. आकाश
ठीक आहे
" मला तुझ्या सोबतच राहायचं आहे अदिती ",.. आकाश तिच्या कडे बघत होता, अदिती उठली.. मी जाते..
" संध्याकाळी मला विचारल्याशिवाय घरी जाऊ नको आपण जाऊ तिकडे घर बघायला ",.. आकाश
" ठीक आहे",.. अदिती बाहेर आली, याच्या सोबत रहायच म्हणजे काही सुचणार नाही, त्यात ती अनु अस सहज मला सोडणार नाही, काय करू?
अविनाश सर शॉप मधुन आत मध्ये येत होते, त्यांनी अदितीला बघितलं,.. "काय झालं आदिती? चेहरा कसा झाला तुझा? काही प्रॉब्लेम आहे का?",
"नाही सर",.. अदिती
"आकाश काही बोलला का? ",.. अविनाश
"नाही",.. अदिती तिचं काम करत होती, काय करू आता मी? तिला आकाश सोबत राहायचं टेन्शन आलं होतं, घरी खोटं बोलावं लागेल, अनुला काही सांगता येणार नाही , अनु एकटी राहील, किती चिडेल ती माझ्यावर, आकाश नसेल तर मी एवढ्या मोठ्या घरात एकटी राहील, काय हे असं?
लंच ब्रेक झाला आदिती नेहमीप्रमाणे सगळ्यांबरोबर डबा खात होती, तिचा फोन वाजत होता, आकाशचा फोन होता, कसा काय उचलणार फोन, तो फोन घेऊन बाजूला गेली
"अदिती आत मध्ये ये, तुझ्यासाठी डबा आणला आहे, तुला नाही आवडत ना ते मेसच जेवण, पोळी भाजी येऊन घेऊन जा",.. आकाश
अदिती आत मध्ये केली, आकाश बसलेला होता,... "तुला नाही जेवायचं का?",.
"जेवतो आता अविनाश जिजू येतील, वरचा चपटा डबा तुझा आहे",.. आकाश
आदितीने डबा घेतला,.. थँक्स, मी जाते
ठीक आहे, अदिती बाहेर आली जेवायला बसली
" कोणाचा डबा आहे अदिती?",.. सुरेश विचारत होता
" आकाश सरांनी दिला मला डबा",.. अदिती
तो काहीच म्हटलं नाही, छान होती भाजी पोळी, आदितीने तोच डबा खाल्ला,
संध्याकाळी जायचं कसं आदिती सोबत घर बघायला? अविनाश जिजूंना काय सांगायचं? मोठ्या ऑफिस मधुनं राहुल सरांचा फोन आला मीटिंगसाठी, आकाश खुश होता चार वाजता मिटींगला गेल्यानंतर आपण तिकडेच थांबू, अदितीला बोलवुन घेऊ तो निघाला,
अदिती काम करत होती,
" मी मेन ब्रँचला जातो आहे अदिती, मीटिंग आहे, मी करतो तुला संध्याकाळी फोन, मग जावू आपण घर बघायला",.. आकाश
ओके
आकाश मिटींगला निघून गेला, नेहमीप्रमाणे संध्याकाळी आदिती घरी गेली, आकाशचा अजून मेसेज आलेला नव्हता, अनु आलेली होती खूप बोलत होती ती, अदितीला कसं तरी वाटत होतं काय सांगणार आता अनुला? थोडे दिवसांनी तिला एकट राहायचं आहे,
आकाशचा फोन आला.. खाली ये मी आलेलो आहे
"अनु मी जरा जाऊन येते",.. अदिती
"कुठे चालली आहेस अदिती? ",.. अनु
"आकाश आला आहे खाली त्याच्याबरोबर थोड काम आहे ",.. अदिती
"डिनरला चालली आहे का तू?, ओहो",.. अनु
"नाही ग थोडं काम आहे सांगितल ना ",.. अदिती
"ठीक आहे लवकर ये",.. अनु
"ड्रेस तर ठीक आहे ना माझा?",.. अदिती
"तुला असा अचानक प्रश्न का पडला अदिती? , काय प्लॅन आहे नक्की? ",.. अनु
" सांग ना कशी दिसते आहे मी? ",.. अदिती
"छान दिसते आहेस तू, सिम्पल रिलॅक्स ",.. अनु
" जाऊ का अशी",.. अदिती
हो
अदिती खाली आली, रस्त्याच्या त्या बाजूला कार मध्ये आकाश बसलेला होता, रोज ऑफिस मध्ये चुडीदार घालत होती अदिती, आज कुर्त्यामध्ये वेगळीच छान फ्रेश दिसत होती अदिती,.. अशी अजुन सुंदर दिसते ही
अदिती आली आत येवून बसली,
" जायच ना ",.. आकाश
हो,
ती आणि आकाश निघाले,.. "आज वेगळीच दिसते आहेस तू अदिती, एकदम सुंदर, कुठून घेतला हा ड्रेस, अजून घे तुला असे ड्रेस ",..
अदिती हसत होती, आकाश ही ना, अति बोलतो
ते बिल्डिंग मध्ये आले, एंजट आलेला होता, पाचव्या मजल्यावर या, दोघ गेले, घर खूप छान होत, दोघ घर बघत होते,.. "सध्या रेंटने घेवू घर आपण अदिती",
" हो चालेल ",.. अदिती
" पसंत आहे आम्हाला घर",.. आकाश
" मी साफसफाई करून घेतो, पुढच्या आठवड्यात रहायला या तुम्ही" ,..
ठीक आहे, चला आठ दिवस आहेत अजून,
अविनाश सरांचा फोन आला होता, आकाश बोलत होता... येतो दहा मिनिटात
दोघ निघाले, आकाशने अदितीला पी जी जवळ सोडल,.. "मला जाव लागेल अदिती, खर तर डिनरला जायचा विचार करत होतो मी ",
" काही हरकत नाही ",.. अदिती
अदिती आत मध्ये आली, अनू खालीच होती,.. "काय ग लगेच आली पण तू मला वाटलं आता रात्रीच येशील ",..
" नाही ग थोडं ऑफिसचं काम होतं ते झालं आणि लगेच आली, आकाशलाही घरी जायचं होत, अनु मला तुला एक गोष्ट सांगायची आहे ",..अदिती
" काय झालं?, आकाश काही बोलला का? लग्न करताय तुम्ही?",.. अनु
"थांब ग जरा, मी इथून दुसरीकडे राहायला जाते आहे",.. अदिती
" म्हणजे? काय हे असं अदिती? इथे काय करणार आहे मी एकटी? ऑफिस जवळ घर घेते आहे का तू तिकडे?",... अनु
हो..
" काय गरज आहे अदिती? मी काय करणार आहे इथे एकटी? मी पण येते तिकडे, थोडे दिवस तू केला बसने प्रवास आता मी करेन ",.. अनु
" नको चांगल नाही अस, हे पी जी छान आहे तू इथे रहा",.. अदिती
" तुला माझ्यासोबत राहायचं नाही का अदिती? कुठे गेली होती तू आत्ता आकाश सोबत? तिकडंन आल्यानंतरच मला असं करते आहे ना, मी नाही बोलणार तुझ्याशी ",.. अनु खूपच नाराज होती
अदितीला खूप वाईट वाटत होतं, काय सांगणार आता हिला.. अनु सॉरी... पण मला आकाश सोबत राहायला जाव लागेल, आमचं लग्न झालं आहे, एक ना एक दिवस तर दूर जाव लागेल, होईल सवय अनुलाही.... अदिती विचार करत होती
अनु प्रचंड चिडलेले होती ती अदितीशी बोलतच नव्हती,.." अनु बोल ना माझ्याशी, राग सोड, हे बघ जेवढे दिवस मी इथे आहे तोपर्यंत आपण धमाल, करू प्रिया मनीषा आहेत का आता आपल्या सोबत, असेच एक ना एक दिवस तर वेगळं व्हावं लागेल आणि काय सांगावं जर अनु तुझं लग्न झालं तर सहा महिन्यात तूच मला सोडून जाशील ",..
"असं काहीही होणार नाही अदिती, तुझ लग्न होईल आधी, आकाश बघ किती अधीर आहे, तूच मला त्रास देते आहे मला सोडून एकटी दुसरीकडे राहायला जाते आहे ",.. अनु
" माझ्या हातात असतं तर मी गेलीच नसती अनु ",.. अदिती
" काय तुझ्या हातात नाही अदिती? तुझं लाईफ आहे तू डिसिजन घे, ऑफिस जवळच कशाला घर घ्यायचे तुला? ",.. अनु
" अगं खूप उशीर होतो ऑफिसमध्ये, एकटीला यायचं कंटाळा येतो तो यशही माझ्याशी बोलत नाही आता हल्ली",.. अदिती
" ठीक आहे अदिती तू बघ तुझं, विकऐंडला तर भेटशील ना?",.. अनु
हो नक्की",.. नाही तरी वीकेंडला आकाश घरी जाईल, तेव्हा मी एकटीच असेल तेव्हा अनुकडे येत जाईल.
........
........
वाचकांचे खूप आभार... पुढचे भाग 5-6 दिवसांनी येतील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा