©️®️शिल्पा सुतार
........
........
अदिती पूनम रूम मध्ये आले..
" काही लागलं तर सांग अदिती, मी बाजूच्या रूम मध्ये आहे, तुझ्यासाठी नाईट ड्रेस घेऊन येते थांब",.. पूनम नाईट ड्रेस घेऊन आली
"थँक्यू पुनम दीदी",.. अदिती
"छान आहेस तू अदिती, आकाशला ओळखते ना आधीपासून",.. आकाश
"हो आम्ही कॉलेज पासून सोबत होतो",... अदिती
आराम कर..
पुनम रूम मध्ये गेली,.." आज कशी काय आली अदिती इकडे? , आकाशने डेअरींग केल ",
" मीच म्हटलो चल घरी अदिती, एकटी रहाते ती, इतक्या रात्री अशी आमच्या सोबत नको जायला तिच्या पी जि त",.. अविनाश
" हो ना, बरोबर आहे, कष्ट करून काम करते ती, छान आहे पण ",.. पूनम
"हो.. खूप हुशार आणि मेहनती आहे ती, खरच छान मुलगी आहे ",.. अविनाश
अदितीने कपडे बदलले, तिला नवीन घर असल्यामुळे झोप येत नव्हती,
आकाशचा मेसेज आलेला होता.. "आवडलं का घर? तुला सकाळी सगळं घर फिरून दाखवेन",
" खूप मोठे आहे तुमचं घर, याच्यात तर आमच्या गावाची एक गल्ली बसेल, तुझी रूम कुठे आहे आकाश? ",.. अदिती
" वरती आहे रूम",.. आकाश
"तुझे आई बाबा झोपले आहेत का? राहुल सर कुठे आहेत ?",.. अदिती
" नाही ते इथे राहत नाही दुसरीकडे राहतात",.. आकाश
"अस कस पण? म्हणजे?.. आय एम सॉरी, मी नव्हत अस बोलायला पाहिजे",.. अदिती
"काही हरकत नाही, सांगेन नंतर अदिती ",.. आकाश
" इथे कोण कोण आहे? ",.. अदिती
" माझ्या दोघी आजी, पूनम दीदी, अविनाश जीजू, विकी आणि आता तू आणि मी ",.. आकाश
अदितीला एकदमच लाजायला झालं होतं, बापरे सासरी आलो आपण, लग्नाच विसरले होते मी,
" आराम कर अदिती सकाळी जायचं आहे ना ऑफिसला परत",.. आकाश
हो..
सकाळी अदिती उठून रेडी होती ती रूममध्येच बसलेली होती, तिने अनुला फोन केला
" झाली का झोप मॅडम? तू आकाशच्या घरी आहेस का?",.. अनु
"हो करमत नाही इथे, तू ऑफिसला निघालीस का? ",..अदिती
"हो.. कस आहे त्याच घर? राहुल सर काही म्हटले नाही का? ",.. अनु
"नाही ते नाहीत इथे",.. अदिती
"मग कोण आहे घरी? आकाश का फक्त, ओह माय गॉड अदिती ",.. अनु
" आहेत ग बाकीचे, काहीही काय, ते सोड तू आज जाणार का सुहीत जिजुंना भेटायला",... अदिती
" हो जाणार आहे",.. अनु
" कोणता ड्रेस घातला आहेस फोटो पाठव",.. अदिती
" जा बाबा आज मला तुझी गरज होती तू आकाश कडे जावून बसली ",.. अनु
" सॉरी ना.. पाठव फोटो ",.. अदिती
अनु ने फोटो पाठवला..
" कमालीची सुंदर दिसते आहेस तू, केव्हा भेटताय तुम्ही? , काही खरं नाही त्या सुहीतच, आज बहुतेक लग्न करणार तो तुझ्याशी, माझी मैत्रीण परत दिसेल की नाही मला ",.. अदिती
" पुरे झाल अदिती, एक तर मला काहीही सुचत नाही आज, काही बोलू नको" ,.. अनु
" राग सोड अनु, एन्जॉय कर, संध्याकाळी भेटू आपण, काय बोलण झाल ते सांग मला, तुझे काय प्रश्न असतिल तर विचारून घे लाजू नको",.. अदिती
" तू हवी होती सोबत, मला समजत नाही काय करू ते ",.. अनु
काळजी करू नकोस,
"हो... संध्याकाळी ये घरी लवकर, नाही तर परत जाशील आकाश कडे, तो काही सोडणार नाही तुला अदिती ",.. अनु
हो... अदिती हसत होती.
पूनम आली,.." झोप आली का अदिती आमच्याकडे? ",
हो दीदी..
"चल मी तुला सगळं घर दाखवते",.. पूनम
खूपच मोठ आणि छान घर होतं, गार्डन पासून हॉल, किचन, खाली बेडरूम होत्या, वरती बेडरूम होत्या, कुठून कुठे जातोय ते समजत नव्हत.
त्या दोघी वरती आल्या, आकाशच आवरून झालं होतं, त्या आकाशच्या रूममध्ये आल्या, खूपच मोठा बेडरूम होतं त्याचा, आमच्या गावाच्या घरापेक्षा मोठा, छान टेरेस होतं, स्टडी रूम, खूपच छान, पूनम खूप बोलत होती, सगळं सांगत होती घरच्यांबद्दल, तिला अदिती आली तर छान वाटत होत,
आकाश अदितीकडे बघत होता, फ्रेश दिसते आहे ही अशी सकाळी, अदिती मुद्दाम दुसरीकडे बघत होती, पूनम मॅडमला समजले तर? काय करतो आहे हा आकाश
"चल आकाश नाश्ता करायचा आहे ना?",.. ते तिघे खाली आले खाली
दोघी आजी, विकी, अविनाश डायनिंग टेबल जवळ बसलेले होते, पूनमने दोघी आजीं सोबत अदितीची ओळख करून दिली
" किती छान आहेत या दोघी आजी, मेन म्हणजे त्यांचं पटत होतं",..
"तू काय करते आहेस इकडे अदिती?",.. विकी
" तू ओळखतो का अदितीला? ",.. आजी
"हो मी काल गेलो होतो ना ऑफिसला, ती समोरच बसते आकाशच्या केबिन समोर",.. विकी
दोघी आजी आदितीची चौकशी करत होत्या, खूप आवडली त्यांना पण साधी आणि सुंदर अदिती.. "कुठे राहते तू? कधीपासून ऑफिसला जॉईन झाली आहेस?, घरी कोण कोण आहे तुझ्या? भावाला लागलं होतं ना?.. तो ठीक आहे का आता?",..
" बापरे आदिती आता तुझं काही खरं नाही, दोघी आजींकडून तुझा इंटरव्यू आहे",.. विकी चिडवत होता
" आकाश तुझ्यासोबत होता का ग कॉलेजमध्ये ?",..आजी
"हो ",..
" कसा होता तो कॉलेजमध्ये वागायला ?",..आजी
सगळे ऐकत होते..
बापरे आता आकाश बद्दल काय सांगणार? घरात जितका चांगला शांत दिसतो हा तितकाच कॉलेज मध्ये भांडकुदळ चिडका होता तो, म्हणजे अजूनही आहे, अगदी आता 10 दिवसा पुर्वी किती ओरडत होता मला, .. अदितीला तिच तिच हसू येत होतं, ती काही बोलली नाही
"काय झालं आदिती सांग ना कसा आहे होता आकाश कॉलेजमध्ये?",.. आजी
"मला विशेष माहिती नाही आकाश सरांबद्दल ते सीनियर होते ",.. अदिती
" आकाश जरी सीनियर होता तरी ओळख होती ना तुमची? ",.. आजी
" विशेष नाही",.. नंतर कोणी काही विचारलं नाही
अदितीला काही सुचत नव्हतं, कधी एकदाच इथून जाऊ असं झालं होतं तिला,
नाश्ता आला,
"अदिती तुला येतो का स्वयंपाक? ",.. विकी,
आकाश ऐकत होता,
"हो थोडा येतो म्हणजे पूर्ण नाही, मी घरी जास्त राहिली नाही",.. अदिती
" शिकतात नंतर मुली सगळ, विकी तू नाश्ता कर तुला जायच ना फॅक्टरीत",.. आजी
सगळे हसत होते..
"बापरे मी विसरलो होतो, जिजु.. आकाश मदत करा, अदिती तू येतेस का त्या फॅक्टरीत माझ्या सोबत",.. विकी
" नाही... कोणी येणार नाही, तुझ्या टीम सोबत काम कर तू",.. आकाश
अविनाश पुनम आत मध्ये गेले, विकी आत तयारी करायला गेला, आकाश तयार होता,
दोघी आजी आकाश आणि अदिती समोर बसलेले होते, आकाश गप्प होता, दोघी आजी बोलत होत्या,.." काय झालं आहे आज आकाश? एकदम गप्प",
" काही नाही दादी ",.. आकाश
त्या डोळ्यांनीच विचारत होत्या अदिती बद्दल? आकाश हसत होतं, त्यांना समजलं, त्या काही म्हटल्या नाही,
"आकाश अदितीला आपल मागच गार्डन दाखव",.. आजी
आकाश अदिती मागच्या बाजूला आले, मागे स्विमिंग पूल होता, त्याच्या बाजूला गार्डन होत , बसायला जागा होती, दोघ तिथे बसले
"किती छान वाटत इथे गार शांत",.. अदिती
"तुला आवडल घर, आपली रूम ",.. आकाश
"हो छान आहे",.. अदिती
" माहिती नाही आपण इथे राहू की नाही",.. आकाश
"काही हरकत नाही",.. अदिती
" तुला स्विमिंग येत का आकाश?",..
हो..
तुला?
"नाही कुठे शिकणार, आमच्या गावत सोय नव्हती काही",.. अदिती
" दोन तीन दिवसात आपल घर मिळेल, तू या वीक एंडला तिकडे शिफ्ट होते का?",.. आकाश
हो..
" मी येईन तुला घ्यायला आपण नेवू सामान ",..आकाश
हो चालेल... अदिती
" अदिती आज तू सोबत आहेस खूप छान वाटतय, मला तुझ्या सोबत रहायच आहे ",.आकाशने पुढे होवुन तिचा हात हातात घेतला
अदिती घाबरली,.." कोणी आतून बघितल तर? आकाश प्लीज ",
" नाही दिसत हा भाग आतून अदिती डोन्ट वरी आणि आपल्याला आपल मॅरेज सर्टिफिकेट ही मिळाल आहे, आपण नवरा बायको आहोत एवढ घाबरू नकोस ",.. आकाश
" कुठे आहे बघु",.. अदिती खुश होती
"माझ्या कडे आहे मी दाखवेल तुला ऑफिस मधे",.. आकाश
"\"तिकडे का ठेवल? ",.. अदिती
" माझ्या बॅग मधे आहे ",.. आकाश
अच्छा
" अनुच लग्न जमतय आकाश, चांगला आहे मुलगा",.. अदिती
" बर झालं ती ऐकटी राहणार नाही",.. आकाश
"हो ना मी खुश आहे तिच्या साठी",... अदिती
" अदिती आपण कधी घरी सांगू या? ",.. आकाश
" मी सांगते तुला आकाश, मला टेंशन येत" ,... अदिती
" तुझ्या घरचे चिडतील का? ",.. आकाश
"माहिती नाही, आई बाबा खूप समजूतदार आहेत माझे ",..अदिती
आकाश ऐकत होता
" आपण अस घरी न सांगता एकत्र रहाण चांगल आहे का? आकाश मला टेंशन येत ",.. अदिती
"आपल लग्न झाल आहे अदिती, तू म्हणशील तर वैदिक पद्धतीने ही करून घेवू लग्न, पण सगळ्यांना सांगितल्यावर करू अस लग्न, अस मला वाटत होत, तुला काय वाटतय ",.. आकाश
हो चालेल... अदिती
"तुला कंफर्टेबल ठेवायच आहे मला, आता अनु नसेल काय करशील एकटी घरी? त्या पेक्षा आपण सोबत राहु, तुझा विश्वास आहे ना माझ्या वर ",...आकाश
" हो आकाश, माझा आहे विश्वास, मला ही रहायच आहे तुझ्या सोबत, तुला राग तर नाही ना आला ",..अदिती
"नाही तुझा कशाला येईल राग, मला पूर्वी पासून तू खूप आवडते अदिती, तुला माहिती नाही माझ्या तुझ्या साठी च्या भावना ",.. आकाश तिच्या कडे बघत होता, अदिती काही म्हटली नाही,
" मी बोलते लवकर माझ्या बाबांशी",.. अदिती
" अदिती आज तू खूप फ्रेश सुंदर दिसतेस सकाळी सकाळी",.. आकाश
अदिती लाजली होती
आकाश बघत होता गोड दिसते ही अशी लाजतांना
अविनाश जिजु फोन करत होते,.. चल अदिती जिजु बोलवता आहेत,
दोघ आत गेले, सगळे आतून बघत होते, आकाश अदिती छान बोलत येत होते, आजी पूनम कडे बघत होत्या
" येता आहात ना तुम्ही ऑफिसला? की थांबताय इथे, मी जातो नाही तर पुढे ",.. अविनाश
येतो आहे..
"लंच बॉक्स घ्या, अदिती तुझा डब्बा दिला आहे सोबत, माहिती नाही पण तुला आवडेल की नाही आमच्या भाज्या ",.. पूनम
" छान असतात तुमच्या भाज्या, आवडतो मला डबा",.. अदिती
" म्हणजे?.. तू खाऊन पाहिला की काय? , आकाश देतो का तुला डबा ",.. पूनमला माहिती होतं की आकाश तिला डबा देतो तरी तिने मुद्दामून विचारलं
आकाश गप्प उभा होता,
अदितीला ही समजलं की ती काय बोलली आहे ते,.. "नाही म्हणजे एकदा खाल्ला होता ",
" रोज देईन मी तुला डबा अदिती, आकाश कडून घेत जा ",.. पूनम हसत होती
थॅन्क्स दीदी
"चला आता नाहीतर आपल्या आधी राहुल सर ऑफिसमध्ये येतील आणि आपण कोणीच नाही बघून चिडतील",.. अविनाश
"अदिती येत जा ग घरी",.. आजी
अदिती जाऊन आजींना भेटली, त्यांच्या दोघींच्या पाया पडल्या, पूनमला जाऊन भेटली.
आकाश गाडी चालवत होता, अविनाश सर बाजूला बसले होते, अदिती विकी मागे बसले होते, विकी खूप ऑफिस कामाबद्दल बोलत होता, माहिती विचारात होता, अदिती सांगत होती, मशीन बद्दल बरच माहिती होती तिला.
"अकाऊंट हिशोब हॅन्डल करते अदिती तरी हीच लक्ष आहे ऑफिस मध्ये, खूप हुशार आहे अदिती, कॅपेबल आहे ती पूर्ण कंपनी हॅन्डल करू शकते",.. आकाशला छान वाटत होत
आदिती आकाश अविनाश ऑफिसमध्ये आले,
"कुठे होती अदिती आज उशीर झाला का तुला?",.. सुरेश
हो.. अदिती काही बोलली नाही
काम सुरू होते, सगळे बिझी झाले, जवळ जवळ काम पूर्ण झाल होत शेड्यूल्ड प्रमाणे, चला फार फरक नाही,
आकाश टीम वर खुश होता
अदितीला बाबांचा फोन येत होता, काय करू? उचलू का फोन? , आकाश मागच्या वेळी ओरडला होता पर्सनल फोन वर बोलत होती तर, तिने बघितल कोणी नव्हत केबिन मध्ये, आकाश बहुतेक शॉप फ्लोअर वर असेल, पटकन बोलून घेते, तिने फोन उचलला... बोला बाबा
" आत्ताच डॉक्टर कडे जाऊन आलो, अमितला घेऊन गेलो होतो, चांगली आहे त्याची तब्येत, अजून प्लास्टर काढलं नाही पायाच, यासाठी फोन केला होता की ते ट्रेकिंग वाल्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला आहे मला, अकाउंट डिटेल्स वगैरे घेतले आहेत, ते येऊन अमितला बघून गेले",..
"बरं झालं बाबा काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी, मी संध्याकाळी फोन करू का? ऑफिसमधनं जास्त वेळ बोलता येत नाही",.. अदिती
" हो चालेल ",.. त्यांनी फोन ठेवला, अमितला बरं वाटत आहे, हे ऐकून अदितीला बरं वाटलं,
आकाश शॉप फ्लोर मधुन आला,.. अदिती आत मध्ये ये
अदिती आत गेली,.." आपलं घर रेडी आहे, तुला आता केव्हाही तिकडे राहायला जाता येईल",
" ठीक आहे मी एक दोन दिवसात जाते तिकडे, मला एकटीला करमेल का तिकडे? ",.. अदिती
"मी असेन ना तिकडे तुझ्या सोबत",..
"मी तुझ्या सोबत रहाते हे जर तुमच्या घरी समजल तर",.. अदिती
"समजल तर समजू दे, मला काहीही फरक पडत नाही, मला तुझ्या सोबत राहायच आहे अदिती, अदिती तुला मी आवडतो का? एकदाही तू काही बोलली नाहीस माझ्या बद्दल ",.. आकाश
आकाश तिच्या कडे बघत होता, अदितीला समजत नव्हत काय कराव,.. मी जाते
" अदिती अस चालणार नाही ",.. आकाश
अदिती हसत होती, ती बाहेर आली, बापरे काय होणार मी तिकडे आकाश सोबत रहायला गेली तर? , हा मला अस त्रास देणार आणि मला कॉलेज पासून आवडतो हा आकाश, एवढच आहे की मी उगीच हो बोलत नव्हते त्याला, तेव्हा अभ्यास आता करीयर महत्वाचा होत, एक तर तो श्रीमंत खूप फरक त्यांच्यात आमच्यात, आता काय होईल पुढे, त्या लोकांना मी आवडेल का, घरचे बाकीचे चांगले आहे, राहुल सर काय म्हणतील? , आकाश महत्वाचा आहे माझ्या साठी, तो म्हणेन ते ऐकेन मी,... अदिती खुश होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा