©️®️शिल्पा सुतार
........
........
संध्याकाळी तिच्या वेळेवर अदिती ऑफिस मधून निघाली, आकाश तिची वाट बघत होता, चल अदिती,... अदिती कार मधे बसली,..
"अविनाश सर कुठे आहेत?",.. अदिती
"ते लवकर गेले आज घरी, त्यांना बाहेर जायचं होत, चल आज आपण फिरून येवू, बाहेर जेवू , तुला ड्रेस घेवू या", .. आकाश
अदिती हसत होती,.. "आता का? एवढ चांगला आहे जसा तू? ",
"मग आहेच मी चांगला, काय करणार बायको रुसली माझी, शॉपिंगच्या नावाने खुश ह",.. आकाश
" नको मला ड्रेस आहेत खूप" ,.. अदिती
"अस चालणार नाही ",.. आकाश
दोघ शॉप मध्ये आले, छान ड्रेस घेतले,
" तुला घे ना आकाश काहीतरी ",.. अदिती
" नको मला काही ",.. आकाश
"स्वतःला काही घेत नाही तू ",.. अदिती
दोघ जेवायला गेले, छान मोठ हॉटेल होत,
" एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये नको आकाश, मला दडपण येत ",.. अदिती
" आता काय अदिती, रिलॅक्स रहा",.. आकाश
दोघ आत आले, काय आवडत तुला अदिती? अदिती आकाशने मिळून जेवण मागवल,
दोघ जेवत होते, निशांत तिथून जात होता, तो ही त्या हॉटेल मध्ये आला होता, त्याने या दोघांचे गुपचुप फोटो काढून घेतले, तो त्यांच्या टेबल जवळ आला,
" हाय आकाश, हाय... तो अदितीला बोलला",..
"आज एकदम रिलॅक्स मूड मध्ये आकाश? , झालेली दिसते ऑर्डर सबमिट, बाय द वे काँग्रॅच्युलेशन छान जोडी आहे तुमची",.. निशांत
"हे बघ निशांत आम्हाला एकटं सोड आणि प्लीज इथून जा",.. आकाश
"हो डिस्टर्ब नाही करणार मी तुम्हाला जास्त, इथे वेगळीच तयारी दिसते आहे, ओळख नाही करून देणार का?, नमस्कार वहिनी ",.. तो अदिती कडे बघत होता,
" निशांत प्लीज ",.. आकाश
" कधी करताय लग्न? ",.. निशांत
अदिती गडबडली, निशांत अजूनही अदिती कडे बघत होता, छान आहे मुलगी. अदिती आकाश कडे बघत होती, आकाश चिडला... " निशांत मी काय सांगतो आहे समजलं ना, प्लीज लिव्ह अस अलोन, आपला काहीही संबंध नाही, कशाला बोलतो आहेस तू आमच्याशी",..
" रिलॅक्स आकाश, काय करतोय मी, ओके एन्जॉय, येतो मी खूप अभिनंदन तुमच",.. निशांत
निशांत गेला, आकाश शांत पणे जेवत होता, अदिती काळजी करत होती,
"आकाश हा सांगून देणार नाही ना कोणाला",.. अदिती
"सांगितल तर सांगितल अदिती, काय करतोय आपण? जेवतो आहे ना, काळजी करू नको",.. आकाश
दोघ वापस आले, अदिती अजूनही विचार करत होती,.." मला वाटतं असं वाटतं आहे आकाश की हा निशांत नक्की सगळ्यांना सांगून देणार आहे",
" चांगलं होईल मग आपलं काम सोपं होईल, कोणी मला विचारलं तर मी सरळ सांगून देईल की मला अदितीशी लग्न करायचं आहे, तू कशाला काळजी करते आहेस कुठल्या गोष्टीची, मी आहे ना, नाही तरी आता तुझ्या घरून तर होकार आहे",.. आकाश
अदिती विचार करत होती हे पण ठीक आहे,.." आकाश पण त्यांना समजलं आपण सोबत राहतो तर ",
" समजलं तर समजलं, आपण रूम मेट्स आहोत, आपलं आयुष्य आहे आपण कसे राहतोय काय करतोय हे आपल्यावर आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, आराम कर आता अदिती ",... आकाश
निशांतने अदिती आकाशचे फोटो अविनाश सर आणि राहुल सरांना पाठवून दिले, अविनाश सर फोटो बघत होते,
"काय आहे फोनमध्ये सारखं अविनाश?",.. पुनम विचारत होती
अविनाशने पूनमला फोटो दाखवले, अदिती आकाश जेवण करत आहे हॉटेलमध्ये, दोघ एकमेकांकडे बघत होते,... आपण विचारावं का त्यांना?, एवढ्या रात्री सोबत, पण छान दिसता हे सोबत, जोडी छान आहे.
"नको जावू दे सांगायच तेव्हा सांगतील ते ",.. अविनाश
राहुल सर फोटो बघत होते, ही तर अदिती आहे, आकाश बरोबर एवढ्या रात्री हॉटेलमध्ये काय करते आहे? , काय आहे नक्की? ,हा आकाश असच फिरतो आहे तिच्या सोबत की त्याला ही पूनम सारखच सामान्य लोकांशी लग्न करायच आहे, त्यांना राग आला होता,
आकाश कडून माझ्या खूप अपेक्षा होत्या, त्या रितीकाला तो नाही बोलला तेव्हा समजायला हव होत मला, काय करू आता, बोलून बघतो मी आकाश सोबत हे अस चालणार नाही मला
आकाश अदिती ऑफिस मधे आले, जरा वेळाने अविनाश सर आले, काम सुरू होते नेहमी प्रमाणे, राहुल सरांनी आकाशला फोन करून घरी बोलवून घेतल,
"पप्पा आता का मी थोड बिझी आहे",.. आकाश
"तस महत्वाच काम आहे माझ",.. राहुल सर
"ठीक आहे येतो",.. आकाश
आकाश अविनाशच्या केबिन मधे गेला,.. "मला पप्पा बोलवत आहेत घरी, मी जरा जावून येतो",..
"काय झालं?",.. अविनाश
"काय माहिती?",.. आकाश
"आकाश एक मिनिट मला तुला एक गोष्ट सांगायची आहे",.. अविनाश
"काय झालं जिजु?" ,.. आकाश
त्यांनी आकाशला हॉटेल मधला त्या दोघांचा फोटो दाखवला, आकाश बघतच बसला, अविनाश सर गप्प होते, त्यांनी काहीच विचारलं नाही.
आकाश जरा वेळ शांत बसला,.. "जीजू मला अदिती सोबत लग्न करायचं आहे आणि अदितीने पण मला होकार दिला आहे, काल आम्ही दोघं डिनरला गेलो होतो, निशांत भेटला होता मला हॉटेलमध्ये, उगीच त्रास देतो आहे तो, त्याने पप्पांना तर नसेल पाठवला ना हा फोटो? ",
"पाठविला आहे म्हणूनच तर राहुल सरांनी तुला भेटायला बोलावलं आहे, तेही घरी",.. अविनाश
" काय करू आता मी जीजू? ",.. आकाशला टेंशन आल होत.
" जा जाऊन भेटून ये, तुला जे वाटतं आहे ना आणि जे आयुष्यात करायचं आहे ते स्पष्ट बोल, काय होईल सुरुवातीला ते चिडतील पण तुझं तर सांगून होईल, मी आहे तुझ्या बाजूने, शक्य तितकी मदत करेन मी तुला ",.. अविनाश
" ठीक आहे मी जाऊन येतो, अदितीला काही सांगत नाही अजून, तुम्ही अदिती कडे लक्ष द्या",.. आकाश
आकाश निघाला तो घरी आला आज मोना मॅडम आणि राहुल सर दोघं घरी होते, आकाश जाऊन समोर बसला, राहुल सर ऑर्डर बद्दल सुरुवातीला विचारत होते, ते झाल्यानंतर त्यांनी आकाशला अदिती आणि त्याचा फोटो दाखवला,.." काल बाहेर गेला होता का तू कुठे आकाश? ",
" हो पप्पा मी अदिती सोबत डिनरला गेलो होतो",.. आकाश
"तू ओळखतो का तिला? ऑफिसमध्ये झाली का ओळख तुमची?",.. राहुल सर
"आम्ही कॉलेज पासून सोबत आहोत दोघं, आम्ही दोघे एकमेकाला पसंत करतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे",.. आकाश
"तुला माहिती आहे आकाश हे शक्य नाही ",.. राहुल सर
" का शक्य नाही पप्पा? ",.. आकाश
" पुनम सारखं तू करू शकत नाही अविनाशही आपल्याकडेच कामाला होता",.. राहुल सर
" काय वाईट झालं पूनमचं? आपण सगळे जितके चांगले नाही जितके अविनाश जिजू चांगले आहेत, हे तर आता तुम्हाला माहिती आहे ",.. आकाश
"कसल चांगला आहे तो अविनाश? इमोशनल पर्सन आहे, आवडत नाही मला",.. राहुल सर
" त्यांचा काही त्रास नाही पण आपल्याला, दिला तर फक्त आधारच दिला आहे त्यांनी, बरं झालं तुम्ही विषय काढला पप्पा तुम्ही त्यांना अजूनही एक्सेप्ट का केल नाही, काय अपेक्षा आहे तुमची आता त्या दोघांकडून",.. आकाश
"त्या दोघांकडून काहीही अपेक्षा नाही, पण तुझ्याकडून खूप अपेक्षा होती आणि तू सुद्धा माझा अपेक्षाभंग केला आहे आणि एक सांगतो अविनाशला तर मी सोडलं पण तुला मी सोडणार नाही, अदिती सोबतच हे लग्न मला मान्य नाही आणि हे जमणार नाही ",.. राहुल सर चिडले होते
" मला माफ करा पप्पा पण तुम्ही पण हेच केलं आहे ना? तुम्ही केलं तर चांगलं नाही केलं तर वाईट असं आहे का",..आकाश
" माझ्यासोबत समोर मोठ्या आवाजात बोलायचं नाही आकाश आणि मी काय केलं काय नाही ते सांगू नकोस, तुला काय करायचं आहे आयुष्यात ते बघ, नुकसान करून घेतो आहे तू स्वतःच",.. राहुल सर
" सॉरी पप्पा मला काहीही सांगू नका",.. आकाश
" माझं ठरलं आहे आकाश तुझं लग्न माझ्या मनाप्रमाणेच होणार आहे, माझा मित्र आहे एक इंडस्ट्रियल त्याची मुलगी लग्नाची आहे, तयार व्हायच लग्नाला, जा आता त्या अदितीला ऑफिस मधून काढून टाक, नवीन सुरुवात कर ",.. राहुल सर
"ते शक्य नाही पप्पा",... आकाश मोना मॅडम कडे बघत होता.
त्या काहीतरी बोलणार होत्या, पण राहुल सरांनी त्यांना गप्प केलं
"जर तुला माझा ऐकायचं नसेल तर तुला या घरात रहाता येणार नाही आकाश, ऑफिसमध्ये काम करता येणार नाही तुला आणि अदितीला मी ऑफिस मधनं काढून टाकीन, बघू मग ती करते का तुझ्याशी लग्न, तू मालकाचा मुलगा आहे श्रीमंत आहे म्हणून ती तुझ्या मागे मागे करते",.. राहुल सर
" हे कोणी सांगितलं तुम्हाला की ती माझ्या मागे करते मागे करते, तिचा होकार मिळवण्यासाठी मी काय काय केलं माझं मलाच माहिती",.. आकाश
" एवढं मागेच लागायचं होतं तर मग चांगली मुलगी नव्हती दिसली का तुला ",.. राहुल सर
" काय बोलतात तुम्ही पप्पा? चांगली म्हणजे काय? अदितीत काय कमी आहे, फक्त ती गरीब आहे एवढी तिची चूक आहे का? , हुशार किती आहे ती, माझ प्रेम आहे तिच्यावर, आमच पटत एकमेकांशी ते महत्वाचं नाही का? ",.. आकाश
"आपली एम्पलोय आहे ती, आपल्याकडे नोकरी करते त्या ऑफिसमध्ये ती एकटी मुलगी आहे त्याच्यामुळे तुला तिच्याकडे बघून बघून तिच्याविषयी काहीतरी स्पेशल भावना असतील, बाहेर जा बाहेर फिर दोन चार लोकांना भेट बघ चांगले लोक भेटतील तुला",.. राहुल सर
" पप्पा आम्ही दोघं कॉलेज पासून सोबत आहोत हे मी तुम्हाला आधीच सांगितलं",.. आकाश
" तेव्हापासून ती मागे आहे का तुझ्या? ",.. राहुल सर
"तुमच्याशी बोलणं अशक्य आहे मी जातो आहे",.. आकाश
"माझ्या प्रश्नाचे उत्तर दे आकाश तुला हे लग्न करता येणार नाही",.. राहुल सर
"मी अदिती सोडून कोणाशी लग्न करणार नाही",.. आकाश
"ठीक आहे मग आता ऑफिसमध्ये जायची काही गरज नाही, तू घरी ही राहू शकत नाही, तू तुझी व्यवस्था बघून घे आणि तुझ्या अदितीलाही घेऊन जा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कारची चावी, फ्लॅटची चावी इथे ठेवून जा",.. मोना मॅडम परत मध्ये बोलायचं प्रयत्न करत होत्या, त्यांच्यावरही राहुल सर ओरडले
" राहुल जरा एक मिनिट ऐकून तरी घे, असं एवढं तडका फडकी निर्णय नका घेऊ ,तुम्ही दोघं चिडलेले आहात, आकाश थांब खाली खाली बस",.. मोना मॅडम
" मोना याच्याशी बोलून काही उपयोग नाही, आपण काही सांगतो तर त्याला ऐकायचं नाही, उलट उत्तर देतो आहे तो मला, बाहेरच्या जगाची काही माहिती नाही, मालकाचा मुलगा म्हणून ऑफिसमध्ये बसतो तो म्हणून असे उद्योग सुचतात, जाऊ दे जरा त्याला बाहेर, जगाची ओळख होईल, चांगले वाईट लोक समजतील, येईल गुपचूप घरी",.. राहुल सर अजूनही ओरडत होते.
" राहुल प्लीज तुम्ही भेटा तरी अदितीला, आकाशला अस घराबाहेर काढू नका ",.. मोना मॅडम
" नेहमी भेटतो मी अदितीला, अकाऊंटच काम करते एमबीए झाल आहे तीच, याच्या केबिन समोर बसते, याच्या मागे मागे असते पूर्ण दिवस, त्या दिवशी पण ऑफिसमध्ये याच्या चहा नाष्ट्याची व्यवस्था करत होती, मला बघून दचकली ती",.. राहुल सर
" तुमचे विचार समजले आहेत मला पप्पा, मी येतो",.. त्याने बँकेचे कार्ड कारची चावी फ्लॅटची चावी समोर टीपॉय वर ठेवली आकाश निघाला, चालत बस स्टॉप वर आला, तिथून तो त्याच्या फ्लॅट वर आला, त्याने अविनाश सरांना फोन केला
" काय झालं आकाश? काय म्हटले सर?",.. अविनाश
" पप्पांना माहिती आहे सगळं, त्यांना मी आणि अदिती लग्न करतो हे मान्य नाही",.. आकाश
अविनाश सरांना धक्का बसला.. आता काय पुढे?
" माहिती नाही आता राहुल सर ऑफिसमध्ये येतील आणि अदितीला बाहेर काढतील, त्याआधी तुम्ही प्लीज अदितीला घरी यायला सांगा",.. आकाश
म्हणजे??
" पप्पांनी मला आणि अदितीला नौकरी वरुन काढल",.. आकाश
अविनाश सर शॉक मधे होते,..." हो लगेच सांगतो अदिती ला, थांब तू दोन मिनिट",.. अविनाश सर बाहेर आले, अदिती काम करत होती, अदिती हे घे आकाश सोबत फोनवर बोल
" काय झालं आहे आकाश? कुठे आहेस तू? ",.. अदिती
" अदिती तू तुझं सामान घे आणि घरी ये",.. आकाश
" काय झालं आहे? ",.. अदिती
" सांगतो तू नीघ लगेच घरी ये, आटोप, प्लीज ",.. अदितीने तिचं सामान घेतलं
"कुठे चालली आहे अदिती?",.. सुरेश विचारत होता
" माहिती नाही सुरेश मला घरी बोलावलं आहे",.. अदिती
अविनाश सरांनी टॅक्सी बोलवली अदिती निघाली, अविनाश सरांनी परत आकाशाला फोन लावला
" निघाली अदिती, काय झालं आता सांगणार का आकाश?",.. अविनाश
" पप्पांनी मला घरा बाहेर काढल, मला आता ऑफिसमध्येही येता येणार नाही",.. आकाश
" काय म्हटले राहुल सर",.. अविनाश
" पप्पा चिडले होते खूप त्यांना माझं लग्न दुसरीकडे करायचं आहे मी नकार दिला",.. आकाश
"मी काय करू आता इथे एकटा आकाश? अस कस घराबाहेर काढल? ",.. अविनाश
" मला अदिती सोबतच राहायचं आहे जीजू, पैसा काय जातो येतो , मन जुळणे महत्वाच असत, त्यांना वाटत अदिती माझ्याशी पैशा साठी लग्न करते आहे, ते खूप बोलले मला आणि अदितीला ",.. आकाश
" अरे बापरे काय अस? अदिती किती साधी आणि चांगली मुलगी आहे",.. अविनाश
" हो ना पण आता त्यांना कोण सांगेन",.. आकाश
" आता काय करणार आहात मग तुम्ही दोघं? ",.. अविनाश
" माहिती नाही आता अदिती घरी आली की बोलतो तिच्याशी",.. आकाश
" तिच्या घरी माहिती आहे का? ",.. अविनाश
" हो माहिती आहे त्यांना काही अडचण नाही ",.. आकाश
" संध्याकाळी येतो मी तिकडे पूनमलाही घेऊन येतो ",.. अविनाश
" दोघी आजींना अजून काही सांगू नका",.. आकाश
ते दोघे बोलत असताना विकी ऑफिसमध्ये आला, भेटू मग संध्याकाळी, इकडे विकी आला आहे.
"काय झालं आहे जीजू मला पप्पांनी इथे जॉईन व्हायला सांगितलं, दुसरा लॉट महत्त्वाची आहे तर तिकडे मदत कर अस सांगितल, मी आजपासून इथे बसणार आहे, आकाश कुठे आहे? ",.. विकी
अविनाश जीजू काही म्हटले नाही
"काय झालं आहे जीजू?",.. विकी
"तू आकाशलाच फोन करून विचारून घे",.. अविनाश
विकीने आकाशला फोन लावला,.." आकाश मला तुझ्या युनिट मधे जॉईन व्हायला सांगितला आहे पप्पांनी, आकाश काय झालं? तू कुठे बसणार आहे यापुढे? तू त्या सिक युनिटला जाणार का?",..
"नाही विकी मला पप्पांनी घराबाहेर काढलं आहे, मी नाही येणार आता ऑफिसला",.. आकाश
" काय? का पण? काय झालं आहे?",.. विकी
" मला अदितीशी लग्न करायचं आहे ते पप्पांना मान्य नाही",.. आकाश
" अदिती कुठे आहे ",.. विकी
" आता निघाली आहे ती तिकडनं, तिला पण जॉब वरनं काढला आहे पप्पांनी",.. आकाश
" बापरे कठीण झालं आहे हे आणि तुमचं कधी ठरलं हे लग्नाच? काय आहे तुमची स्टोरी? छान आहे पण अदिती ",.. विकी
एवढ्या टेन्शनमध्येही आकाशला हसायला येत होतं, सांगेन नंतर...
"मी बोलू का पप्पांशी",.. विकी
"काही उपयोग नाही आहे विकी, तुला ही बोलतील ते, ही ऑर्डर महत्त्वाची आहे आपल्यासाठी, तू जिजुं सोबत काम कर",.. आकाश
" मला काहीही माहिती नाही या कामाचं",.. विकी
" मला फोन करत रहा मी तुला ऑनलाईन सपोर्ट करतो, निशांतला तेच हवं होतं की आपल्या घरामध्ये फूट पडायला पाहिजे म्हणून त्यांनी लगेचच ॲक्शन घेतली",.. आकाश
" आता हा निशांत कोण आहे",.. विकी
" असाच एक मूर्ख दुश्मन, त्याच्यामुळे झालं आहे हे सगळं नाहीतर मी सगळं शांतपणे घरी सांगणार होतो एवढा प्रॉब्लेमच आला नसता",.. आकाश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा