©️®️शिल्पा सुतार
........
........
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून अदिती ऑफिसला जायला रेडी होती ,
आकाश तयार होता,.. "मी पण निघतो अदिती" ,
"हो फोन कर मला नंतर ",.. अदिती
अदिती ऑफिसला पोहोचली, काय काम करायचं आहे ते ती समजून घेत होती,
"ट्रेनिंग आहे का सर अदिती साठी? ",..
"नाही काही गरज नाही, पूर्वी केल तिने काम आपल्या कडे, माहिती आहे तिला काम, उगीच वेळ वाया नका घालवू, खूप हुशार आहे अदिती, ती इथे आहे तेवढे दिवस फायदा करून घ्या ",.. सर बाहेर आले,
अदिती उठून उभी राहिली.. गुड मॉर्निंग सर
" गुड मॉर्निंग.. झाली का कामाला सुरुवात अदिती?",.. सर
"हो सर करते आहे आता काम",.. अदिती
" काही वाटल तर विचार ",.. सर
हो..
काही विशेष अवघड नव्हतं हे काम अदिती साठी , छान वाटत होत इथे, मी आता तिकडे आकाशच्या कंपनीत बोलवलं तरी जाणार नाही, या सरांनी नेहमी मला मदत केली आहे, यांच काम सोडणार नाही,
आकाशलाही त्याच्या मित्राच्या संदीपच्या फॅक्टरीत जायचं होतं फॅक्टरी बघायला, तो तिकडे पोहचला, दोघं मित्र बराच वेळ बोलत होते, काय झालं ते आकाश सांगत होता,
"तुझे पप्पा जास्त दिवस तुझ्याशी नाराज राहणार नाही आकाश, काळजी करू नको" ,... संदीप
"कुठे आहे तुझी ती दुसरी कंपनी?",.. आकाश
"थोडी दूर आहे पण तिथे काम नाही सुरू होणार लगेच, सीक युनिट नीट करायची म्हणजे खूप खर्च आहे" ,.. संदीप
" अरे पण मग मला काय करता येईल संदीप ? बजेट नाही माझ एवढ, काही तरी काम हव मला",.. आकाश
" जर तुझी काही हरकत नसेल तर तू मला जॉईन होतो का? ",.. संदीप
" पण मी कधीच नोकरी केलेली नाही, मला काहीच माहिती नाही काय करायचं",.. आकाश
" नोकरी असं नाही एज अ पार्टनर, सल्लागार म्हणून जॉईन हो, जमल तर थोडी इन्व्हेस्टमेंट कर",. संदीप
" मी विचार करून सांगतो चालेल का? ",.. आकाश
ठीक आहे...
"चल आपण तुझी ही फॅक्टरी बघून घेऊ, काय काय काम करतो आहे ते बघून घेऊ ",.. आकाश
दोघ फॅक्टरी बघत होते, छान होती छोटी होती जरा
"हे बघ संदीप मी करेन तुला मदत बिझनेस वाढवायला, काही सुधारणा कराव्या लागतील ",.. आकाश
" तू म्हणतो तस करून घेवू, मी पण तुला प्रॉफिट मधुन ही काही रक्कम देईन आणि दर महिन्याला पैसे देईन ",.. संदीप
" मी आता काम सुरू करणार नाही पंधरा दिवसानी करेन",.. आकाश
ठीक आहे
"यायला जायला वेळच बंधन नको मला, तिकडे हि आमच्या ऑफिस मधे सपोर्ट करावा लागेल मला, मी माझ सेपरेट काम करेन",. आकाश
" ठीक आहे कोणी कोणाच बॉस नसेल, पण इथला सेल वाढला पाहिजे, नवीन ऑर्डर मिळाल्या तर बर होईल ",. संदीप
" ठीक आहे मी करेन प्रयत्न ",.. आकाश
दोघांचं काम सुरू झालं, आकाश त्याला जॉईन झाला तर फायदाच होणार होता, आकाशला बरेच लोक ओळखत होते, राहुल सरांच नाव मोठ होत,
आकाश तिथल काम समजून घेत होता, दुपारी तो घरी आला, मग अविनाश विकी सोबत सेकंड लॉटच काम करत होता तो, अदिती घरी नव्हती तर बोर होत होतं.
"थोड अकाऊंटच काम आहे आकाश, अदिती करत होती तो हिशोब पूर्ण झाला नाही, काय करू या? ",.. अविनाश
"इकडे पाठवता येईल का तुम्हाला ते काम, अदिती नाही तर मी करेन",.. आकाश
"खूप फाईल आहेत",.. अविनाश
"पप्पांना विचार विकी, ते म्हणतील तर मेन ऑफिस मध्ये पाठवून दे ते काम",.. आकाश
"ठीक आहे मी सांगतो",.. विकी
विकीने राहुल सरांना फोन केला, त्यांनी अनुला ते काम दिल
" सर मी सुट्टीवर जाते आहे एक दोन दिवसात, माझ लग्न आहे आणि ते काम काय आहे हे समजायला मला थोडे दिवस लागतील, मी सुट्टीवरून आल्यावर करेन काम चालेल का? ",.. अनु
" ठीक आहे तुम्ही राहू द्या ते काम, सांगतो मी",.. राहुल सर
अनु विचार करत होती अदितीच काम आहे हे ती करत नाही का? काय झाल?... तिने अदितीला फोन लावला
" ऑफिस मधे आहे नंतर बोलते",.. अदिती
" अग पण तू ऑफिस मधे आहेस तर तुझ काम माझ्या कडे कस आल? ",.. अनु
कोणत?
"आकाशच्या कंपनीतल",.. अनु
" करते संध्याकाळी फोन",.. अदिती
"काही प्रोब्लेम आहे का?",.. अनु
"हो... संध्याकाळी भेटशील का बस स्टॉप जवळ कॉफी शॉप मधे तेव्हा सांगते ",.. अदिती
हो..
आजचा अदितीचा ऑफिस मधला दिवस छान गेला, काम लगेच सुरू झालं होतं त्यामुळे अदिती खुश होती, हे असं राहुल सर तिच्याशी चिडून वागले होते, त्यामुळे तिला कसंतरीच वाटत होतं, आता स्वतःचं काम होतं तर बरं वाटत होतं, आता आकाशचे घरचे काहीही करो, परत बोलवलं तरी मी हा जॉब सोडणार नाही, आकाश चांगला आहे पण , मेहनती आहे, त्याच्यासोबत रहायच आहे मला, आकाशच्या विचाराने तिला चांगल वाटत होत.
अदिती संध्याकाळी कॉफी शॉपला आली, तिने अनुला फोन केला...
" येते आहे मी पाच मिनिटात",.. अनु
तिने आकाशला फोन केला.. "मी जरा अनुला भेटून येते, तिचा फोन आला होता" ,
"हो चालेल",.. आकाश
" मी तिला सांगते आहे सगळं",.. अदिती
"हो चालेल आता काय सगळ्यांनाच माहिती झालं आहे",.. आकाश
अनु आली... काय झालं अदिती?
अदिती सगळं सांगत होती,.. "राहुल सरांना समजलं आकाश आणि माझ्याबद्दल, त्यांनी आम्हाला दोघांना ऑफिस बाहेर काढलं, आकाशला घराबाहेर काढलं",
" आता कुठे आहे मग आकाश? ",.. अनु
" माझ्यासोबत रहातो आहे ",.. अदिती
" बरं नशीब तुझ्याकडे रहायला जागा होती नाहीतर त्याला हॉटेलवर थांबावं लागलं असतं, पुढे काय ठरवलं आहे, तू कुठे जॉब करतेस मग आता ",.. अनु
" जुन्या सरांकडे, कॉलेज मध्ये होती तेव्हा जॉब करत होती ना ते सर, आता हे दोन दिवस जॉबला गेल्यानंतर मी सुट्टी घेणार आहे, आम्ही घरी जाणार आहोत आई-बाबांच्या म्हणण्याप्रमाणे तिकडे लग्न करणार आहोत नंतर मी परत ऑफिसला जॉईन होईल, आकाशही काहीतरी बिजनेसच बघतो आहे ",.. अदिती
" सौरभ तर नाही ना ऑफिस मधे? नाही तर आकाश परत चिडेल तुझ्या वर ",.. अनु
" नाही दिसला आणि आकाश काही चिडका नाही तो खूप प्रेम करतो माझ्यावर.. इतकच आहे ",.. अदिती
" ओह हो फूल आकाशची बाजू घेतेस ",.. अनु
" अरे मग खरच चांगला आहे तो ",.. अदिती हसत होती
" कधी झालं हे सगळं भांडण? , राहुल सर खूप चिडले का? ",.. अनु
" दोन दिवसांपूर्वी मी आणि आकाश बाहेर गेलो होतो तेव्हा निशांतने बघितलं, कालच समजलं त्यांच्या घरी, आणि त्यांना मी पसंत नाही",.. अदिती
" का? एवढी हुशार आणि चांगली तू ",.. अनु
" मी मागे पण तुला सांगितलं होतं की आपण सामान्य कुटुंबातले, त्यांची अपेक्षा असेल की आकाशच लग्न त्यांच्या तोला मोलाच्या घराण्यात व्हायला हवं ",.. अदिती
" एकमेकांवरच प्रेम.. मुलांचा आनंद काही महत्त्वाचा नाही का? ",.. अनु
" काय माहिती काय विचार करतात ते ",.. अदिती
" तू घरी कधी सांगितलं",.. अनु
" मी एक दोन दिवसातच सांगितलं, आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही ग, घरचे साधे चांगले आहेत आपल्या ",.. अदिती
" हो बरोबर.. काळजी करू नको कसली, होईल नीट पण मला खूप आनंद झाला आकाश आणि तू, मला आधीपासूनच वाटत होतं की तू होकार द्यावा, तुमच्यासाठी खुश आहे मी, कधी जाते आहे तू गावाला? ",.. अनु
" मी दोन-चार दिवसात निघेल ",.. अदिती
" तुझं काम मला आलं होतं अकाउंट मेन ऑफिसला",.. अनु
" जाऊदे आता ते जे करायचं ते करू दे. आकाश मला म्हटलं तर मी करून देईल, पण माझं हे इकडे ऑफिसचं कामही भरपूर आहे आणि हे लोक ओळखीचे आहेत आता मी हे काम नाही सोडणार अनु ",.. अदिती
" तू लग्नाला येशील का माझ्या? ",.. अनु
" हो नक्की येईल",.. अदिती
" बहुतेक माझ्या आधी तुझं लग्न होऊन जाईल ",.. अनु
अदिती हसत होती,.." माझं लग्न झालं तर मी आकाश सोबत तुझ्या लग्नाला येईल",..
दोघी छान बोलत होत्या,
" लग्नासाठी काय काय खरेदी झाली अनु? ",.. अदिती
" अजून काहीच नाही केली खरेदी, गावी गेल्यानंतर बघू",.. अनु
" तू काय काय घेणार आहेस? ",.. अदिती
" माहिती नाही आकाश म्हणत होता साड्या दागिने घे, पूनम दीदी येणार आहेत त्यांच्यासोबत रविवारी जाणार आहे मी शॉपिंगला, तु जर इथे असशील तर येशील का? ",.. अनु
" येईल ना मी म्हणजे मलाही बघता येईल डिझाईन, पण मी इथून काही घेणार नाही, बुटीक मधल्या ब्रँडेड साड्या खूप महाग असतात, आणि दागिने आई बाबा असतिल तेव्हा घेईल, तुझा नवरा आकाश आहे अगं बाई, माझ साध काम ",.. अनु
" असं काही नाही अनु, आमच काय सुरु आहे आम्हाला माहिती, आम्हाला दोघांना घराबाहेर काढलेल आहे आणि किती जरी काही असलं तरी जपून वापरायची आपल्याला सवय आहे, मी पण साध्याच साड्या घेणार आहे, आणि छोट मंगळसूत्र, मी करते मग तुला फोन",.. अदिती घरी आली, आकाश तिचीच वाट बघत होता
" काय झालं आकाश तू जाऊन आला का त्या फॅक्टरीत? ",.. अदिती
"हो पण खूप खराब आहे ती फॅक्टरी खूप पैसे लागतील नीट करायला आणि बराच वेळ ही जाईल, सध्या एवढी इन्व्हेस्टमेंट करायला माझ्याकडे पैसे नाहीत",.. आकाश
"मग काय ठरवलं आहे?",.. अदिती
"माझा मित्र आहे ना तो म्हणतोय की मला जॉईन हो सल्लागार आणि पार्टनर म्हणून , मी त्याला त्याचा बिजनेस वाढवायला मदत करायची ऑर्डर मिळवून द्यायची सुधारणा करायची कंपनीत, त्या बदल्यात तो मला प्रॉफिट मधले काही टक्के पैसे देईल आणि दर महिन्यालाही पैसे देईल ",.. आकाश
" चांगलं आहे काही हरकत नाही पण तुला जमेल ना रोज त्याच्या ऑफिसमध्ये वेळेवर जायला? ",.. अदिती
" मी सांगितलं आहे त्याला की जॉब नाही आहे हा, मला जरा वेळा माझ्याप्रमाणे ठेवाव्या लागतील कारण मला दुसऱ्या लॉट साठी अविनाश जीजू आणि विकीलाही सपोर्ट करावा लागेल, गुपचूप आपल्या फॅक्टरीतही जाव लागेल, निशांतचा डाव मला पूर्ण होऊ द्यायचा नाही, त्याला असं वाटतं आहे की पप्पांनी मला घराबाहेर काढलं म्हणजे दुसऱ्या लाॅटला प्रॉब्लेम येईल, मलाही ऑर्डर काहीही करून सक्सेसफुल झालेली बघायची आहे, तसे अविनाश जीजू करू शकतात पूर्ण काम, पण ते किती करतील ",.. आकाश
" हो ना तू सपोर्ट कर त्यांना दुसरं काम थोडं कमी झालं तरी चालेल आणि अकाउंटच काय म्हणत होती अनु? माझं अकाउंटचं काम तिला दिलं का सरांनी? ",.. अदिती
" हो मला पण फोन आला होता अविनाश जीजूंचा ती करते आहे का मग ते काम? ",.. आकाश
" नाही तिला नाही जमणार ती आता दोन चार दिवसांनी गावाला जात आहे पंधरा दिवस सुट्टीवर आहे ती",.. अदिती
" तुला जमेल का? ",.. आकाश
" माहिती नाही आता हे दोन दिवस तर नाही जमणार त्यानंतर पंधरा दिवस सुट्टीवर आहोत आपण घरी आणून ठेवलं तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करेन मी",.. अदिती
"कंप्यूटर लागेल ना तुला त्यासाठी ",.. आकाश
" हो माझाच लागेल आणि त्याच्यावर माझा हात बसला आहे",.. अदिती
" मी विचारतो त्या कामाचं काय झालं आणि मग सांगतो तुला, कसा होता तुझा आजचा पहिला दिवस? ",.. आकाश
" खूप छान गेला दिवस ओळखीचे होते बरेच लोक आणि कामही माहिती होतं मला, पूर्वी करायची ना मी त्यांच्याकडे काम",.. अदिती
" काय प्रॉडक्ट आहे त्यांचं? ",.. आकाश
अदिती सगळी माहिती देत होती त्यांच्या कामाची, खुश वाटत होती ती आज,.." आकाश पण मला लगेच हा जॉब सोडता येणार नाही",.
" ठीक आहे काही जॉब सोडायची गरज नाही, जरी इकडे पप्पा आपल्याशी नंतर बोलतील तरीसुद्धा तू तुझा तिकडे जॉब कंटिन्यू करू शकते, आता नकोच येऊ तू माझ्या कंपनीत एम्पलोय म्हणून आता मालकीण म्हणूनच असू दे तू तिकडे",... आकाश
"अरे पण अजून पप्पा चिडलेलेच आहेत नको बोलायला आपण असं",.. अदिती
" बरोबर आहे तुझं, करू मेहनत आपण, माझ्या बिझनेसची मालकीण होशील ना तू? ",.. आकाश
हो... अदिती हसत होती
" आकाश मला अजून तुझ्याशी गोष्ट बोलायची आहे ",.. अदिती
" काय झालं आहे अदिती? ",.. आकाश
"मी ज्या ऑफिस मध्ये काम करते आता तिथे सौरभ नाही सांगून देते आधीच",.. अदिती
आकाश उठून अदिती जवळ आला, त्याने तिचा हात हातात घेतला,.. "अदिती आय एम सॉरी, मी नाही आहे असा संशयी, मला माफ करणार का, आधी मी उगीच गैरसमज करून घेतला होता, माझं फक्त न फक्त तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्यासाठी मी असा चिडत होतो, त्यात तू कोणाशी बोलू नये असा माझा विचार नव्हता, फक्त तू माझ्यापासून दूर नको जायला असं मला वाटत होतं ",.. आकाश
" मला माहिती आहे ते आकाश, तू चांगला आहेस खूप, पण मला आता आपल्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज नको आहेत, मला भीती वाटते तू माझ्यावर चिडशील, आणि आता मी तुझ्या पासून दूर नाही राहू शकत",.. अदिती
" असं काहीही होणार नाही अदिती, मी तुला सोडून कुठे जाणार नाही, चिडणार नाही मी, तू अजिबात माझ्या स्वभावाची काळजी करू नको मी कुठलाही गैरसमज करून घेणार नाही, सॉरी ",.. आकाश
अदितीने पुढे होऊन त्याला मिठी मारली, तिला आता बर वाटत होत.
......
......
आज पुनम आकाश अदिती अनु खरेदीला जाणार होते, नाश्त्याच्या टेबलवर दोघी आजी बसलेल्या होत्या, दोघींच्या मनात चेहऱ्यावर खूप प्रश्न होते, काय सुरू आहे तुमच? आकाश कुठे आहे? बरेच दिवस झाले तो घरी येत नाही , आधी त्याला इकडे बोलवा, फोन वर ही तो नीट सांगत नाही, घरातही वेगळी शांतता आहे, काही झालं आहे का? तुम्ही आम्हाला काही सांगत नाही, आज जोपर्यंत आम्हाला सत्य समजणार नाही तोपर्यंत आम्ही दोघी नाश्ता करणार नाही, आम्ही उपोषणाला बसत आहोत,
अविनाश विकी आणि पूनमच्या चेहऱ्यावर हसू होतं, "आजी काहीही झालेलं नाही, आकाशला अदितीशी लग्न करायचा आहे, त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे",
"त्यात काय प्रॉब्लेम होण्यासारखं? ही तर आनंदाची गोष्ट आहे ना, आम्हाला माहिती होतं त्या दोघांना लग्न करायचं आहे ते",.. दोघी आजी
"त्यांचं लग्न पप्पांना मान्य नाही तर पप्पांनी आकाशला घराबाहेर काढलं, आकाश अदिती सोबत राहतो आहे",.. पूनम
" काय झालं तो इकडे नाही येऊ शकत का घरी? असं कसं घराबाहेर काढलं? हे काय एकट्या राहुलच घर आहे का? आपलं पण घर आहे आम्हाला हे मान्य नाही, आकाश आणि अदिती इकडेच राहतील",.. आजी
" नाही पप्पांनी त्याला नाही सांगितलं आहे ",.. पूनम
" ऑफिसमध्ये येतो का आकाश?",.. आजी
" नाही येत ऑफिसमध्ये फक्त फोनवरून मदत करतो",.. विकी
" आम्ही बोलू का राहुलशी? ",.. आजी
" हो बोल आजी तुझंच ऐकतात पप्पा ",.. पूनम
" काय ठरत आहे आकाशच पुढे? अदितीच्या घरच्यांना बोलवून घ्या, लग्न ठरवून टाका त्यांचं, लगेचच करून घ्या, ऑफिसमध्ये नसेल जाऊ द्यायचं तर नका जाऊ देऊ म्हणा पण या घरी तर राहू द्या त्या दोघांना, आकाश अदिती आमच्या सोबत रहाणार नाही तर आपण सगळे त्यांच्या फ्लॅट वर जावु सोबत राहू सगळे ",.. आजी
" हो आजी तुम्ही दोघी म्हणाल तस करू पण त्या आधी नाश्ता करा गोळ्या घ्या चला पटकन, नंतर आजी तू सावकाश पप्पांना फोन कर",.. पूनम