©️®️शिल्पा सुतार
........
........
आकाश त्याच्या रूम मध्ये गेला त्याला झोप येत नव्हती, अदितीशी बोलावसं वाटत होत, त्याने तिला फोन केला , दोघ बराच वेळ बोलत होते,
"आज तुला घरी आल्यावर छान वाटत असेल ना आकाश",.. अदिती
"हो खरच छान वाटतं आहे",.. आकाश
"तो फ्लॅट.. त्यांना सांगून द्यावे लागेल की नको आहे, लग्ना नंतर इकडे राहायच ना? ",.. अदिती
"हो इकडे राहू, उद्याच करतो फोन एका महिन्याचे भाडं भरलं आहे नंतर खाली करून चावी देऊन टाकू",.. आकाश
"हो माझं खूप सामान आहे तिकडे",.. अदिती
"आपलं लग्न झाल्याशिवाय खाली करायचं नाही, उद्या तू जाणार मग तुझ्या घरी",.. आकाश
हो..
"मग आपली भेट लग्नां नंतर होईल",.. आकाश
हो..
" तुझे कपडे घ्यायचे बाकी आहेत लग्नासाठी ",.. अदिती
" हो मी जाणार आहे पूनम दीदी सोबत, फोटो पाठवीन नंतर तुला तिकडे",.. आकाश
" आराम कर आता बराच वेळ झाला आहे, उद्या सकाळी आई बाबा येतील तर मलाही लवकर उठायचं आहे",.. अदिती
" अदिती गार्डन मधे बसायच का जरा वेळ",.. आकाश
" नाही आकाश मला रूम बाहेर येता येणार नाही, कोणी बघितल तर? आधीच सगळे बोलता आहेत आपल्याला, ते हसतील ",.. अदिती
" घाबरते काय मी काही करतो का तुला? आपण सोबत होतो इतके दिवस, झोपले असतिल ते, चल ना, गप्पा मारू थोड्या ",.. आकाश
नको..
" काय यार माझी बायको तिकडे मी इकडे ",.. आकाश
" थोडे दिवस",.. अदिती
" मला झोप येत नाही ",.. आकाश
बाय आकाश..
अदिती प्लीज.. थांब
अदिती उठली, तिने उठून तिची रूम लॉक करून घेतली, उगीच आकाश आला तर? तिला हसू येत होत, हट्टी पणा करतो तो,
सकाळी लवकरच अदितीच्या आई-बाबांचा मेसेज आला की आम्ही निघालो आहोत, अमितला खूप वाटत होतं की त्यानेही यायला पाहिजे, पण त्याच्या पायामुळे त्याला येता आलं नाही,... आम्ही येतो रात्रीपर्यंत ताईला घेऊन अमित.
सगळे नाश्त्याच्या टेबलवर हजर होते, अदिती खूपच वाट बघत होती, कुठल्याही क्षणी आई बाबा येतील, सगळे अदिती कडे बघत होते,
" वाटतं अस मुलींना, ती दूर राहते ना आई-बाबांपासून",... आजी समजावत होत्या,
अदिती आजींकडे प्रेमाने बघत होती, बाहेर गाडी थांबली अदितीचे आई बाबा आत मध्ये आले, अदिती जाऊन त्यांना भेटली, घरातले सगळे मेंबर भेटत होते, दोघी आजी खुश होत्या,
सगळे नाश्ता करायला बसले,
"आधी खाऊन घ्या आरामशीर मग बोलत बसू ",.. आजी
अदितीच्या आई-बाबांना आकाश खूप आवडला होता, छान आहे मुलगा, स्वभाव चांगला आहे, सगळ सांभाळून घेणारा आहे, आकाश बाबांशी छान बोलत होता, नाश्ता झाला
"तुम्ही मुहूर्त बघितला आहे का?",.. आजी
"हो आजपासून पुढच्या दहा दिवसाचा मुहूर्त आहे",..बाबा
" काय काय कार्यक्रम करायचे",.. आजी
" मेहंदी, आदल्या दिवशी हळद असेल, लग्न, मग लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा करूया",.. आई
" हॉल वगैरे बघितला आहे का? ",.. आजी
"हो आपल्या घराजवळचाच हॉल आहे, तो घेऊया पुढे मंदिर आहे मागे हॉल आहे, छान आहे तो हॉल पण तसा साधाच आहे तुमच्या मानाने",.. बाबा
" आमचं तुमचं असं काही नाही आपण आता एक आहोत तुम्ही जसं ठरवाल तसं आम्हाला चालेल",.. आजी
आजी आणि आई बाबा बोलत होते, बाकी कोणी मधे बोललं नाही, सगळं ठरलं, बाबांनी फोन करून हॉल दोन दिवसासाठी बुक केला,
" तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला आमच्या घरी उतरावे लागेल, कारण तिथे हॉटेलची वगैरे सोय नाही",.. बाबा
" चालेल आम्ही घरी येऊ तुमच्याकडे",.. आजी
" आमच्या सगळ्यांचे घर एकत्र केले तर व्यवस्थित सोय होईल",.. बाबा
"काही हरकत नाही",.. आजी
फ्रेश होण्यासाठी अदिती आई आत रूम मध्ये गेल्या,
" मला तुम्हाला दोघांना बघून खूप आनंद झाला आहे, आई तुला आवडला ना ग आकाश? ",.. अदिती
"नाव ठेवायला जागा नाही मुलगाही चांगला आहे आणि घरचे तर खूपच छान आहेत, मोठं घर आहे",.. आई
आई आणि अदिती बोलत होत्या, तिने साड्या खरेदी केल्यास दागिने घेतल्याचं सांगितलं, माझी नणंद आली होती सोबत, जरा वेळाने अदिती आई बाहेर आली
सगळे बघत होते अदिती तिच्या आईच्या मागे मागे फिरत होती, मुलं किती जरी मोठे झाली तरी आई-वडिलांसाठी लहानच असतात,
बाबा आकाश अविनाश सोबत बोलत होते, त्यांनी राहुल सरांबद्दल विचारलं, ते नाराज असल्याचं समजलं, जरा वेळाने मोना मॅडम घरी आल्या, सगळे त्यांच्याशी बोलत होते, त्यांनी पसंती दर्शवली, खर्चाची काळजी करू नका सांगितलं, जरा वेळाने त्या गेल्या,
अविनाश विकी ऑफिसला निघाले,.. "आम्हाला जाव लागेल, खूप काम आहे ",
ठीक आहे..
" तुम्ही कोण कोण येणार आहात लग्नाला? घरातले सोडून अजून नातेवाईक येतील का?",.. बाबा
"नाही बाकीचे नातेवाईक येणार नाहीत आम्ही सगळे घरचेच येऊ",.. आजी
दुपारी जेवण झाले,
" चला आता सगळं ठरलं आहे, आम्हाला निघावं लागेल अमित एकटा आहे घरी, या तुम्ही सगळे",.. बाबा
अदिती तीच सामान घेवून आली,
आकाश निघाला त्यांच्यासोबत,.." मी जरा त्या घरून अदितीची बॅग घेतो आणि मग जरा वेळ ऑफिसला जाऊन परत येतो",
पूनम आजी बाहेर पर्यंत आल्या होत्या,.. "अदिती एन्जॉय कर आई कडे ",
" हो दिदी",.. अदिती
आकाशच्या गाडीत अदिती होती आणि दुसऱ्या टॅक्सीत आई-बाबा होते, ते निघाले.
आकाश गप्प होता,.. "जाण गरजेच आहे का अदिती?, मला बोर होईल ",
" अरे मग लग्न आहे ना आपल, तू येशील ना मला घ्यायला ",.. अदिती
"अदिती मला रोज फोन करायचा, व्हिडिओ कॉल करायचा, माझ्या मेसेजला लगेच उत्तर द्यायचं, नाहीतर बघ, याचा बदला मी नंतर घेईन ",.. आकाश
अजून काही.. अदिती हसत होती
" तू नको जाऊस गावाला अदिती",.. आकाश.
"असं काय आकाश? मी तिकडे गेली नाही तर आपलं वाजत गाजत लग्न कस होईल",.. अदिती
" काही गरज नाही वाजत गाजत लग्नाची, आपलं लग्न झालं आहे",.. आकाश
" पण ते सांगायची हिम्मत आहे का आपल्यात? सगळ्यांना वाटतं आपलं लग्न झालं नाही",.. अदिती
" सांगू का बोल त्यांना",.. आकाश
"नको उगाच हिम्मत नको दाखवू",..अदिती
" तू जाते आहे तर मला करमत नाही",.. आकाश
" तू तुझं काम कर थोडे दिवस",.. अदिती
" हो मग नंतर वेळ मिळणार नाही ना",. आकाश
आकाश.. पुरे
"तुला समजल?... फिरायला कुठे जायचं आपण दोघांनी?",.. आकाश हसत होता,
"माहिती नाही",.. अदिती
" हे नाही चालणार सांगून ठेव, बुकिंग करून घेऊ",.. आकाश
" ठीक आहे तू मला डिटेल्स पाठव मी निवडून तुला सांगेन",.. अदिती
" आता काय बाबा बॉसला सगळे डिटेल्स द्यावे लागतात, बॉस म्हणेल ती जागा निवडायचं",.. आकाश
" अदिती एक बोलायच होत, आपले पैसे आहेत ना सेव्हिंग अकाऊंटला, ते आपल्या लग्ना साठी वापर, तुझ्या बाबांना आधीच अमितचा खुप खर्च आहे ",.. आकाश
" हो मी पण तोच विचार करत होती मी विचारणारच होती तुला ",.. अदिती
घर आलं अदितीने नवीन घरून पटकन तिची बॅग घेतली, आकाश पुढच्या खोलीत बसलेला होता, त्याने पुढे येऊन अदितीला मिठीत घेतलं, अदितीला पण गावाला जाताना कसतरी वाटत होतं, स्वतः ची काळजी घे आकाश,
" एक आठवडा फक्त",.. आकाश हळूच बोलला, अदिती लाजली होती
" नीट राहा आकाश काळजी करू नको आणि लवकर ये आपल्या लग्नाला, मी तुझी वाट बघेन",.. अदिती
आई बाबा खालीच होते टॅक्सीत, अदिती टॅक्सीत येऊन बसली,... "चला निघतो आम्ही आकाश",.. बाबा
"करा फोन तुम्ही पोहोचले की",..आकाश
टॅक्सी गेली तरी आकाश तिकडेच बघत होता, अदितीच्या डोळ्यातही पाणी होतं, आई-बाबांना तिची अवस्था समजली, खूपच प्रेमात आहे दोघं एकमेकांच्या, असेच छान रहा, बराच वेळ अदिती गप्प होती.
जरा वेळाने ती आई बाबांशी बोलत होती, तिने अमितला फोन केला, आई बाबा आता खुश होते, घरी गेल्यावर काय काय करायचं आहे ते सगळं आदिती ठरवत होती, आईला काय काय खायचे पदार्थ हवे ते ती सांगत होती,
रात्री घरी पोहोचले ते, खूप छान वाटत होत पण आता थोडे दिवस मग सासरी जाणार मी, ती अमितला जावून भेटली, अमित खुश होता, अदिती त्याच नाव घेत होती, आज शेजारी काकू कडे जेवण होत, सगळे त्यांच्या कडे जमले, आई मदत करत होती,
" लग्नाची तयारी करावी लागेल आपल्याला आता" ,.. आई
"हो ताई उद्या पासून सुरुवात करू, तुम्ही करून या बाहेरचे काम मी बघेन घरात",..
अदितीला सगळे विचारत होते आकाश बद्दल, कसा आहे आकाश? त्यांच घर? , फॅक्टरी आहे का? , ऑफिस मोठ आहे का? किती कार आहेत घरी? , कुठे भेट झाली? , कोणी कोणाला लग्नाच विचारल?...
अदिती थकली होती उत्तर देऊन
"ताई जिजुंचा फोटो दाखव",.. अमित
"चल व्हिडिओ कॉल करु आपण त्यांना",.. अदिती
अदितीने फोन लावला, आकाश घरी रूम मध्ये होता,.. "पोहोचले का तुम्ही सगळे?",
हो..
"अरे हा कोण आहे?",.. आकाश
अदितीने अमितशी ओळख करून दिली
"आता पटकन बर व्हायच अमित, इकडे यायच आहे तुला आमच्या कडे, पुढच्या वर्षी इथे रहा, इकडे घेवू तुझ ॲडमिशन" ,.. आकाश
खूप वेळ बोलत होते अदिती आकाश अमित
जेवण झालं, ते घरी आले,
\"ट्रेकिंगच्या लोकांकडून पैसे मिळाले आहेत ते नंतर वापस करून टाक अदिती ",.. बाबा
" ठीक आहे बाबा मी सांगते आकाशला, लग्नाच्या खर्चाच कस करू या, माझ्या कडे आहेत थोडे पैसे बाबा तुम्ही ते घ्या ना ",.. अदिती
"आम्ही साठवले थोडे पैसे, आहेत सध्या ",.. बाबा
" नाही माझे ही पैसे घ्या, मी ऐकणार नाही तुमचे पैसे लागतील अमित साठी, अजून त्याची ट्रीटमेंट सुरू आहे शिक्षण सुरू आहे",.. अदिती
" ठीक आहे थोडे पैसे घेवू पण तुझे ",.. बाबा
"आपल्याला खरेदीला जाव लागेल" ,... आई
"केली खरेदी तिकडे आई",.. अदिती
" असु दे आपण घेवू साड्या थोडे दागिने ",.. आई
" काय करायचे इतके? ",.. अदिती
" तशी रीत असते, आमची ही इच्छा आहे तशी",.. आई
" ठीक आहे पण कधी नेसणार मी इतक्या साड्या उगीच घेवून ठेवायच्या ",.. अदिती
" एक दोन साड्या घे बाकीचे ड्रेस घे ",.. आई
दुसर्या दिवशी सगळ्या मैत्रिणी भेटायला आल्या होत्या, प्रिया मनीषा अनु सगळ्यांना फोन करून झाले,.. अनु कधी येते तू?
" मी उद्या येते आहे",.. अनु
अनुच लग्न आहे , अदितीच ही लग्न आहे, ते ही आकाश सोबत सगळ्या खुश होत्या
कधी येताय इकडे प्रिया. मनीषा?,
प्रियाच लग्न झालं होत, मनीषा येणार होती, मैत्रिणींना दोन लग्न अॅटेन करायचे होते, अदिती नंतर लगेच दोन दिवसानी अनुच लग्न होत लग्न म्हणून सगळ्या उत्साही होत्या, सगळ्या जमलो की पार्टी करू..
हो
आकाश आज घरूनच काम करत होता, नको जायला सारखं फॅक्टरीत, पप्पांना समजलं तर परत प्रॉब्लेम येईल, एक तर आत्ता आजीमुळे घरी जाता आलं, रात्री घरी जाताना तो थोडावेळ फॅक्टरीत गेला, अगदी दहा मिनिटं सगळं व्यवस्थित नजरेखालून काढल, मग तो अविनाश विकी सोबत घरी गेला,
"आकाशची खरेदी बाकी आहे पूनम",.. आजी
"हो आपल्याला काय काय घ्यायचं ते बघायला हव आजी, पुढे आपल्याकडे असतिल कार्यक्रम, त्याची तयारी करावी लागेल",.. पूनम
अनु गावाला आली होती, त्यांची पण लग्नाची तयारी जोरात सुरू होती, अदिती आई-बाबांसोबत जाऊन खरेदी करून आली, जास्त ड्रेसेस घेतले होते तिने, ऑफिसला जायला सिम्पल मंगळसूत्र घेतलं होत, लग्नाची तयारी जवळ जवळ पूर्ण झाली होती,
लग्नाच्या दोन दिवस आधी ऑर्डरचा सेकंड लॉट जाणार होता त्यामुळे आकाश अविनाश विकी खूप बिझी होते
"तू आधी गावाला जा आकाश, आम्ही नंतर येऊ",..अविनाश
"नाही हे सेकंड लॉटच काम झाल्याशिवाय मी ही गावाला जाणार नाही, लग्नाच्या आदल्या दिवशी गेले तरी पुरेसं आहे",.. आकाश
पूनमच्या आग्रहावरून आकाश आणि ती दोन-तीन तासात जाऊन पटकन खरेदी करून आले होते , पुनमची लग्नाची तयारी सुरू होती, मोना मॅडम मधून मधून येत होत्या,
अदिती रोज आकाशला फोन करत होती, तिला माहिती होतं आकाशची खूप धावपळ होते आहे,
आई बाबांसोबत अदिती इकडे रमली होती, अमित सोबत ती एन्जॉय करत होती,
आज अदितीच्या हाताला मेहंदी काढायचा कार्यक्रम होता, सगळ्याच मैत्रिणी गावाला आलेल्या होत्या, खूप धमाल येत होती, दुपारपासून रात्रीपर्यंत कार्यक्रम होते, सगळे विचारत होते कसं ठरलं तुमचं लग्न? अदिती काही सांगतच नव्हती, चिडवुन चिडवुन मैत्रिणी अर्ध्या झाल्या होत्या, कॉलेज पासून आकाश फूल फिदा होता अदिती वर,
"गप्प बसा ग आई ऐकेल",.. अदिती
"ऐकु दे, माहिती आहे आता सगळ्यांना",.. मनीषा
लाजून लाजून अदिती अर्धी झाली होती, किती लाजतेस अदिती, नंतर साठी ठेव थोड... प्रिया चिडवत होती, अदिती हसत होती, आकाशच्या विचारांनी तिला खूप छान वाटत होत, उद्या येतील घरचे आणि आकाश, ती खुश होती.
अदिती अग किती हसते पुरे आता, आईने पुढे येवून तिची नजर काढली, दोघी भेटल्या एकमेकींना, अदिती आईच्या डोळ्यात पाणी होत,
पुरे आता काकू चला मेहंदी लावायला, आज रडायला परमिशन नाही,...
दुपारी मेहंदी वाल्या ताई आल्या, अदितीने खूपच छान हिरवा ड्रेस घातला होता, मैत्रिणींनी छान तयारी करून दिली होती, काही गरजच नव्हती एवढी तयारी करायची सुंदर दिसते आहे अदिती, खूप फोटो काढले होते, बरेच फोटो आकाश पूनमला पाठवले अदितीने
कामाच्या गडबडीत ही आकाशच्या चेहर्यावर छान स्मॉइल होत फोटो बघून, केवढी वेगळी सुंदर दिसते आहे अदिती,
पूनमने लगेच व्हिडिओ कॉल केला, दोघी आजी पूनम छान बोलत होत्या सगळ्यांशी,
"खूपच छान दिसते आहेस तू अदिती, छान मेहंदी काढ हातावर",.. आजी
"हो बघू आता हिची मेहंदी किती रंगते",.. प्रिया
"रंगेलच अदितीची मेहंदी खूप, आकाशच खूप प्रेम आहे तिच्यावर",.. आजीने बाजू घेतली, मेहंदी काढायला सुरुवात झाली होती
मैत्रिणींनी डान्स करायचे ठरवले होत, एकेक नंबर प्रमाणे कोण डान्स करेल असं सगळे ठरवत होते, अदितीला सारखं वाटत होतं की आकाशचा व्हिडिओ कॉल यावा पण सेकंड लॉटच खूप टेन्शन होतं त्यामुळे तो सकाळपासून नीट शांत बोलला ही नव्हता अदिती सोबत,
बारीक मेहेंदी काढा, आकाशच नाव टाका डिझाईन मधे, हो त्याला दिसल नाही पाहिजे, अदिती शोधायला सांग नंतर आकाशला नाव, गाणे जोरात वाजत होते, मैत्रिणी एन्जॉय करत होत्या,
अदितीने तिचा फोन अमित जवळ देऊन ठेवला होता, जर आकाशचा फोन आला तर मला पटकन दे बाकी कोणाला देऊ नको असं सांगून ठेवलं, सगळे खूपच त्रास देत होते अदितीला म्हणून असं सांगितलं.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा