प्रेम पंख ❤️... भाग 35
©️®️शिल्पा सुतार
........
........
आजच सेकंड लॉट जाणार होता,
"आजचा दिवस महत्त्वाचा आहे तो व्यवस्थित पार पडायला पाहिजे",.. आकाश
"निशांत आहेस मध्ये मध्ये गडबड करायला" ,... अविनाश
"बघू आपण त्याच्याकडे तुम्ही काळजी करू नका जीजू",.. आकाश
पण असं काही झालं नाही, व्यवस्थित गाडी भरली गेली, कामाची धावपळ सुरू होती, आकाशही बिझी होता, राहुल सर कंपनीत आले, त्यांनी बघितला आकाश खूपच काम करत होता, ते काही बोलले नाही, अविनाश जाऊन भेटले त्यांना, राहुल सर ऑर्डरची स्टेटस विचारत होते, अविनाश जीजू माहिती देत होते,
संध्याकाळी नेहमीप्रमाणे अविनाश आणि आकाश ऑर्डर घेऊन कंपनीत गेले आणि सक्सेसफुली ऑर्डर सबमिट केली,
आता खूप बरं वाटत होतं आकाशला, आता गावाला जायला मोकळ आपण, उद्या सकाळी निघावं लागेल, अदिती वाट बघत असेल,
"आकाश आता आपण टेंशन फ्री झालो , उद्या निघू आपण ",.. अविनाश
"हो पण, त्या आधी मला एकदा पप्पांशी बोलायचं आहे, ते हवे आहेत मला लग्नाला यायला, मी घरी जातो आणि मग येतो तिकडे",.. आकाश
ठीक आहे..
आकाश राहुल सरांकडे गेला, राहुल सर मोना मॅडम जेवत होते, आकाश आला मोना मॅडमने लगेच आकाशला जेवायला वाढलं,
"पप्पा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, उद्या आम्ही जातो आहोत सगळे अदितीच्या गावाला लग्नासाठी, तुम्ही पण चला आमच्यासोबत ",.. आकाश
राहुल सर काही म्हटले नाही, ते शांतपणे जेवत होते,
आकाश मोना मॅडम कडे बघत होता,
" राहुल आकाश काय म्हणतो आहे, अस नको करू मोकळ बोल ",.. मोना मॅडम
"मला जमणार नाही मी हे आधी सांगितलं आहे, परत परत त्या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही आणि ह्याने सेकंड लॉट साठी जी मदत केली त्याबद्दल थँक्यू, तुला तुझी सॅलरी मिळुन जाईल, यापुढे त्या कंपनीत इंटरफेअर करायचं नाही, थर्ड लॉटचा काम मी माझं माझं करेल, तिकडे एक मॅनेजर नेमणार आहे मी, अविनाश आणि विकीलाही सांगून देईल की मध्ये मध्ये जर आकाशची मदत घेतली तर त्यांनाही काढून टाकेल, तसंही आता विकीच कॉलेज सुरू होईल तो येणारच नाही ऑफिसमध्ये"",.. ते उठून आत चालले होते
"पप्पा प्लीज अस नका करू, नका घेवू तुम्ही मला कंपनीत पण राग सोडा ना, लग्नाला चला आमच्या सोबत, मला आशीर्वाद हवा आहे तुमचा, अदिती चांगली आहे पप्पा, मला कोण आहे तुमच्या शिवाय, प्लीज राग सोडा, आधी पासून तुम्ही जे सांगितल ते मी ऐकल, ही एक गोष्ट तुम्ही मला माझ्या मना प्रमाणे करू द्या " ,.. आकाश
राहुल सर आत चालले गेले,
"मी निघतो मम्मी, तुम्हाला घ्यायला येवू उद्या" ,.. आकाश
" ठीक आहे मी बोलते राहुलशी, काळजी करू नकोस आकाश",.. मोना मॅडम
आकाश घरी निघाला ,
मोना मॅडम आत मध्ये आल्या,.." असं काय करतो आहेस राहुल तू? तुला खरंच आकाशचा राग आला आहे का? की त्यांने फक्त तुझा ऐकलं नाही म्हणून तू त्याला असं करतो आहेस? एवढं काय झाल आहे? चांगली मुलं आहेत ते दोघं, मी स्वतः भेटली आहे अदितीला आणि एखाद्या श्रीमंत घरची मुलगी जरी करून आणली असती आपण तर काय फरक पडला असता, आपण काय हुंडा मागणार आहोत का? कि तीकडुन खूप आलं असतं आणि अदिती येते आहे तर काहीच मिळणार नाही, असे विचार आहेत का तुझे?",
"काहीही काय मोना",.. राहुल सर
" मग काय म्हणणं आहे तुझ ? तुला अदिती का नाही आवडत? आणि अविनाश ही का नाही आवडत? तसं बघितलं तर अविनाश आणि अदिती खूपच चांगले आहेत, समजा ते दोघ गरीब नसते आणि खूप श्रीमंत असते तर तुला लगेच आवडले असते का? आपले मुलं सुखी आहेत हे जास्त महत्त्वाचं नाही का? समजा आकाशच एखाद्या श्रीमंत मुलीशी लग्न झालं आणि ती नाही झाली आकाश बरोबर ऍडजेस्ट आणि डिव्होर्स घ्यावा लागला तर काय महत्त्वाचा आहे हे दोघं सुखी राहणं की आपला हट्ट, प्लीज हट्ट सोड राहुल आणि लग्नाला चल",.. मोना मॅडम
राहुल सर विचार करत होते.
" आकाशच्या डोळ्यात पाणी होत निघतांना , असं करू नको, थोडे दिवस मुलं विचारतील आपल्याला, नंतर एकदा सगळं मुलांच्या हातात गेले तर त्यांना काय आठवेल आपले वडील आपल्याशी असं वागले होते, आता मी तुला जे सांगायचं ते सांगितलं आहे, या व्यतिरिक्त तू विचार कर, उद्या मी जाते आहे लग्नाला, तु येणार असशील तर आपण लग्नाच्या दिवशी सकाळी जाऊ दोघं, मला असं वाटतं आहे की तू राग सोडून मुलांना मोठ्या मनाने माफ करा, अदितीच आपल्या घरात स्वागत कर, एक अतिशय हुशार सून मिळते आहे आपल्याला ",... मोना मॅडम खूप बोलल्या
राहुल सर विचार करत होते,.." मी जरा जास्त बोललो का आकाशला? , तो ही माझ्या साठी महत्वाचा आहे, ठीक आहे आता त्यांनी त्यांच त्यांच ठरवलं आहे तर माझं काही म्हणणं नाही",..
"म्हणजे तू येणार आहे का लग्नाला राहुल? ",.. मोना
" हो मी पण येणार आहे लग्नाला",.. राहुल सर
"मी फोन करून सांगू का मग आकाशला",.. मोना
" हो सांगून दे पण उद्या लगेच जमणार नाही, आपण परवा सकाळी जाऊ लग्नाच्या वेळेवर आणि लग्न झाले की निघून येऊ आणि मी त्यांच्या जास्त मिक्स होणार नाही आता याबाबतीत तू मला जबरदस्ती करू नको",.. राहुल सर
" ठीक आहे",.. मोना मॅडम खूप खुश होत्या, राहुल तू चांगला डिसिजन घेतला, त्यांनी लगेच फोन हातात घेऊन आकाशला फोन लावला.
आकाश रस्त्यातच होता,.." काय झालं आहे मम्मी? ",
" तुझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, मी तुला सांगितली तर काय देशील मला? ",.. मोना मॅडम
" तुम्ही जे म्हणाल ते मम्मी ",.. आकाश
" तुझे पप्पा लग्नाला यायला तयार आहेत, पण ते उद्या येणार नाही परवा येतील, डायरेक्ट लग्नाच्या ठिकाणी आणि जास्त बोलणार नाही ते",.. मोना मॅडम
" ठीक आहे काही हरकत नाही ते लग्नाला येतील हेच माझ्यासाठी खूप आहे, ही खूप आनंदाची बातमी दिली तुम्ही",.. आकाश खुश होता.
आकाशने आदितीला फोन केला, अदितीच्या दोघी हातांवर पायांवर मेंदी होती, अमितने फोन उचलला,.." ताईच्या हातावर मेहंदी आहे मी तिच्या कानाला लावतो फोन जिजु ",
" काय करतो आहेस आकाश? मी आज तुझ्या फोनची किती वाट बघितली, झाल का सेकंड लॉटच सबमिट",.. अदिती
" हो झाल व्यवस्थित, आज खूप बिझी होतो मी ",.. आकाश
"चला म्हणजे आता काही टेन्शन नाही, तुझ खूप अभिनंदन, तू खूपच मेहनत घेतो आकाश",.. अदिती
"मी आता घरी जातो आहे",.. आकाश
" खूप वेळ झाला ",.. अदिती
" हो ना.. अदिती अजून एक आनंदाची बातमी आहे, पप्पा आपल्या लग्नाला यायला तयार झाले, मी आत्ताच घरी गेलो होतो, पप्पा मला खूप बोलले, यायला नकार दिला त्यानंतर मी मम्मीला सांगितलं होतं की पप्पांशी बोला, आता त्या बोलल्या पप्पा लग्नाला यायला तयार आहेत पण ते लग्नाच्या दिवशीच डायरेक्ट हॉलवर येतील थोड्यावेळ थांबून जातील",.. आकाश
" अरे वा खूप आनंदची बातमी दिली, थोडा वेळ का होईना पण राहुल सर येत असतील तर बरं होईल, हळूहळू जाईल त्यांचा राग ",.. अदिती
" हो ना माझ्यासाठी पण ही खूप आनंदाची बातमी आहे",..आकाश
" होईल आता हळू हळू नीट ",.. अदिती
" मी तुला खूप फोटो पाठवले आहे ते बघ आकाश",.. अदिती
" हो बघितले दुपारी, खूपच सुंदर दिसते आहेस तू म्हणून जास्त बघितले नाही, नाहीतर मला काही काम सुचलं नसतं",.. आकाश
" काहीतरी तुझं आकाश",.. अदिती
"आता तुझ्या कडे नुसत बघून मन भरत नाही",.. आकाश
आकाश..
"उद्या कधी तिकडे येवु अस झालं आहे मला, माझ्या सोबत घरी जातांना माझी बायको असेल, तुझ्या शिवाय करमत नाही मला आता",.. आकाश
" आकाश उद्या लवकर ये",. अदिती
"तिकडे कसा झाला प्रोग्राम",.. आकाश
" खूप मजा आली सगळ्यांची , माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या, खूप धमाल केली, मला तुमच्या सगळ्यांची खुप आठवण येत होती, मी पूनम दीदी आजींना फोन केला होता, खूप गप्पा केल्या आम्ही त्या ऑनलाईन होत्या प्रोग्राम मधे",.. अदिती
" अरे वा एन्जॉय करा, मी पण आता खूप खुश आहे अदिती, ऑफिस ही काम झालं आहे, उद्या सकाळी निघतो आम्ही, तुला कधी बघू असं झालं आहे",.. आकाश
दुसऱ्या दिवशी हळद होती त्यासाठी आकाशच्या घरचे सगळे येणार होते, अदितीने दोन-तीन वेळा पूनमला फोन केला होता.... " आम्ही सकाळीच निघतो आहे उद्या",..
आकाश घरी आला तो सगळ्यांना सांगत होता पप्पा लग्नाला यायला तयार आहेत, सगळे आश्चर्यचकित झाले होते, काय झालं नक्की सगळे विचारत होते, आजी खुश होत्या, आकाश सगळ सांगत होता.
"चला आता जेवून घ्या आणि आकाश तुझी बॅगभर आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे ",... आजी आकाशला बॅक फिरायला मदत करत होत्या, सगळे नवीन कपडे घेतले का? अदितीच्या साड्या दागिने घेतले का?
"हो घेतले आहे आजी",.. पूनम
खूप धावपळ होत होती, आकाश खुश होता येताना माझ्यासोबत अदिती असेल,
" अजून विचार कर आकाश आजची रात्र आहे तुझ्या कडे",.. अविनाश सारखे चिडवत होते, आकाश हसत होता,
मला रहायच आहे अदिती सोबत त्या साठी काहीही झाल तरी चालेल, आकाश ला झोप येत नव्हती तो परत परत अदितीचे फोटो बघत होता, खूप गोड दिसते आहे ही,
सकाळी लवकरच ते सगळे निघाले अदितीने लोकेशन आणि पत्ता पाठवला होता आदिती कडे कामाची खूप गडबड होत होती, काकांचे दोन-तीन रूम साफ करून या लोकांसाठी उतरवण्यासाठी तयार ठेवले होते, त्यात व्यवस्थित कॉट सगळे व्यवस्था होती समोर भाजीचा मळा होता, अगदी निसर्गाच्या सानिध्यात घर होतं, बंगलाही छान होता म्हणून तेच घर आकाशच्या घरचे नाव उतरण्यासाठी निवडलं होतं,
राहुल सर उद्या येतील म्हणून सगळ्या आनंदात होता,
"बाबा मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्हाला वाटतं तसं राहुल सर तुमच्याशी बोलले नाही तर काळजी करू नका, त्यांच्या मूडच काही सांगता येत नाही ",.. अदिती
"नाही, अदिती मला माहिती आहे एवढे मोठे उद्योगपती आहेत ते, ते येत आहेत तेच खूप आहे, मी नाही मनाला लावणार, ते बोलले तर बोलेल पण त्यांचा मान आपण व्यवस्थित राखला पाहिजे",.. बाबा
"बरोबर आहे",.. अदितीला टेन्शन आलं होतं राहुल सरांचं.
अदितीच्या हातावरची मेहंदी खूप छान रंगली होती, आकाश आणि सगळे पाहुणे आल्यानंतर संध्याकाळी दोघांना हळद लावणार होते, दुपारूनच मैत्रिणी यायला सुरुवात झाली होती,
बस मध्ये या सगळ्यांची खूप मजा येत होती, आकाशला सगळे चिडवत होते, त्यात अविनाश जीजू पुढे होते, दोघी आजी आकाशची बाजू घेत होत्या, मुद्दामून आकाशचा फोन वाजवत होते ते, आकाशला वाटायचं अदितीचा फोन आला आहे, पूनम खूप हसत होती,
गाडी गावाजवळ आली, सगळे बाहेरची गंमत बघत होते, मोठे मोठे हिरवेगार शेत होते आजुबाजुला, एकदम शांतता, छान वाटत होतं, गावाबाहेरच घ्यायला लोक आले होते, ते बसमध्ये चढले, बस अदितीच्या शेतात आली, तिथेच त्यांच घर होते, सगळे उतरले स्वागत झालं, त्यांनी दिलेल्या बंगल्यात सगळे आत गेले,
आकाश बघत होता... कुठेच अदिती दिसली नाही.
जरा वेळाने अदितीच्या घरचे सगळे आले, आई बाबा काका काकू अमित सगळे स्वागत करत होते, चहापाणी घेऊन आले होते, ते छान बोलत बसले जरा वेळ,
जिची वाट बघत होतो ती अदिती आली नव्हती, दुपारच जेवण झाले,
आकाशने अदितीला फोन केला.. कुठे आहेस तू?
" घरातच आहे मैत्रिणीं जवळ",.. अदिती
"तू का नाही आली इकडे आम्हाला भेटायला",.. आकाश
"मी बघितल तुला बस मधून उतरताना, छान दिसतो आहेस तू" ,.. अदिती
आकाश हसत होता,.. "आमच काय मला भेटायच तुला आत्ता",..
"नाही येऊ देत कोणी मला, फ्रेंड्स अडवतात , आता तू इकडे येऊन बघशीलच आकाश किती गर्दी आहे ते",.. अदिती
"मला माहिती नाही, मला तुला आता भेटायचं आहे, इकडे ये" ,.. अदिती
" अरे नाही जमणार येवु देत नाही कोणी",.. अदिती
"मी बोलणार नाही मग ",.. आकाश
"ठीक आहे हिम्मत असेल तर तू आत मध्ये ये मग मला भेटायला ",.. अदिती
"जर मी आता आलो तुला भेटायला तर मला काय देशील?",.. आकाश
तेवढ्यात अदितीचा फोन मैत्रिणींनी ओढून घेतला, काय म्हणता आहे जिजाजी? आता बोलायचं नाही अदितीशी, लग्नानंतरच बोलायचं, सगळ्या आकाश सोबत बोलत होत्या, आकाश हसत होता... त्याने फोन ठेवून दिला.
संध्याकाळी अदिती आकाश यांना सोबतच हळद लागणार होती, अतिशय सुंदर लाईट पिवळ्या रंगाची साडी अदिती नेसली होती, त्याच्यावर फुलांची ज्वेलरी होती, मैत्रिणी सगळ्या तिला तयार करत होत्या, कधी बाहेर जाऊ आणि आकाश दिसेल असं झालं होतं तिला,
आकाशनेही कुर्ता पायजमा घातला होता, आजी पूनम अविनाश विकी सगळे रेडी होते, मांडवात जायचं होतं, ते निघाले, सगळे आकाशकडेच बघत होते, सोफ्यावर येऊन बसले ते, अदिती अजूनही दिसत नव्हती,
फोटोग्राफर आले आकाशला ते शेताच्या बाजूने घेऊन गेले, सोबत पूनम दीदी विकी अविनाश होते, अदिती तिथे मैत्रिणींसोबत उभी होती, यांना सगळ्यांना बघून अदिती पुढे आली, सगळे अदिती कडे बघत होते, खूपच सुंदर दिसत होती ती, अदिती मुद्दाम आकाश कडे बघत नव्हती,
फोटोग्राफरने दोघांना बोलवलं, शेतात झाडाच्या कडेने फोटोसेशन सुरू होतं, हिरव्यागार झाडीत पिवळ्या साडीत मुळात सुंदर अदिती एकदम उठून दिसत होती, आकाश तिला बघत बसला,
आता आकाशचे आणि तिचे फोटो सोबत काढत होते,
"काय झालं आहे आदिती तू मुद्दाम माझ्याकडे बघत नाही ना, किती गोड दिसते आहेस तू ",.. आकाश
"असं काही नाही आकाश",.. अदिती हसत होती
"ठीक आहे मी बघून घेईन, नाही तरी आता एकच दिवस आहेस तू इकडे, त्यानंतर तुला माझ्यासोबतच राहायचं आहे, तेव्हा काय करशील, पण तू आज खूप सुंदर दिसते आहेस, काय जादू झाली या 7-8 दिवसात माझी बायको खूप सुंदर दिसायला लागली ",.. आकाश
आकाश पुरे.. अदिती खूप हसत होती, मध्येच आकाशच्या बोलण्यामुळे ती लाजली होती, खूप छान नॅचरल फोटो येत होते दोघांचे, अदिती आकाश वर प्रेमाचा रंग आधीच चढला होता, आकाश खूप खुश होता, तो अदितीचा हात धरून सगळीकडे फिरत होता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा