Login

प्रेम पंख ❤️... भाग 36

पण मला नाही जमणार रोज एवढी तयारी करायला, खूप थकायला होतं, ऑफिसमध्ये नाही जमणार, साडी घालून काम



प्रेम पंख ❤️... भाग 36

©️®️शिल्पा सुतार
........

हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली, दुसऱ्या मंडपात आकाशला आधी हळद लागली, नंतर अदितीला हळद लागली, आई बाबा दोघ इमोशनल झाले होते, पूनम अविनाश इकडे येवून हळद लावून गेले,... "मग खुश ना आता अदिती?",

"हो पूनम दीदी",..

रात्री जेवणाचा कार्यक्रम होता, दोघी बाजूचे मंडळी छान गप्पा मारत बसले होते, गावचे वातावरण खूपच छान वाटत होतं, दोघीकडचे कुटुंब एकत्र झाले होते,

आकाश पूर्ण वेळ अदिती सोबत होता, त्याला काहीही हवं असलं की अदिती त्याला देत होती, त्या दोघांचं एकमेकाशी असलेलं घट्ट नातं सगळ्यांना समजत होतं, आई-बाबा खुश होते, चांगली आहे जोडी, नाही तर काही श्रीमंत मुलं खूप गर्विष्ठ असतात, आकाश एकदम साधा आहे मेन म्हणजे त्याला अदिती खूप आवडते हे महत्त्वाचं आहे,

"चल आता आकाश आराम करायचा आहे की नाही",.. पूनम

हो आलो... अदिती मी जातो, तो निघतच नव्हता.

त्याच्या कडे अविनाश बघत होते,... "चल आता उद्या सकाळी भेटेल परत तुझी अदिती",..

सगळे हसत होते.

दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त होता, सकाळपासून हॉलवर गडबड सुरू होती, अदिती लवकरच पार्लरला निघून गेली, तिकडून ती हॉलवर येणार होती, आकाशची पूर्ण तयारी झाली होती, तो बाहेर येऊन बघत होता,

"आता नाही भेटणार अदिती डायरेक्ट मांडवातच भेटेल",.. अविनाश

"पप्पा का नाही आले ते बघतो आहे मी जिजु",.. त्याने फोन लावला

" येतोच आहोत आम्ही पाच मिनिटात",.. राहुल सर

पाच मिनिटांनी मोना मॅडम, राहुल सर आले, सगळे स्वागताला पुढे गेले, राहुल सरांचा मूड चांगला होता त्यामुळे सगळ्यांना बरं वाटलं, ते सगळ्यांना येऊन भेटत होते, अदितीच्या वडिलांशी त्यांनी ओळख करून घेतली, त्यांच्याशी बराच वेळ ते बोलत होते,

" आमच्या इथे साधाच हॉल आहे हा",.. बाबा

"असू द्या साधं वातावरण, किती छान वाटत आहे इथे, ही सगळी जमीन तुमची आहे का?",.. राहुल सर

"हो आमचीच आहे ही जमीन, त्या बाजूचा भाग आमचा आहे आणि ही भाजी लावली आहे याचा अर्धा भाग आमचा आहे",.. अदितीचे बाबा माहिती देत होते,

"मलाही एखादी जमीन घ्यायची आहे, असं सुंदर घर हे वातावरण मला खूप आवडलं",... राहुल सर

" कोणाला विकायची असेल तर सांगतो मी तुम्हाला",.. बाबा

हो नक्की..

चहापाणी झालं, सगळे मंदिरात गेले, तिथून वाजत गाजत ते हॉलवर येणार होते, सगळ्या कार्यक्रमात राहुल सर आणि मोना मॅडम यांनी भाग घेतला होता, त्यामुळे दोघी आजी पूनम विकी अविनाश खुश होते, आकाशही त्यांना काय हवं नको ते बघत होता,

वरात हॉल कडे यायला निघाली, सगळेजण खूप एन्जॉय करत होते, घोड्यावर बसलेला आकाश खूप रुबाबदार दिसत होता, मोती कलर ची शेरवानी त्याने घातली होती त्यावर रेड दुपट्टा होता,

अदिती तयार होऊन हॉलच्या रूममध्ये बसली होती, लाल रंगाचा शालू तिच्यावर खुलून दिसत होता, माफक मेकअप आणि ज्वेलरी घालून ती खूपच सुंदर दिसत होती, आई काकू येऊन तिची नजर काढून गेल्या, सगळ्यांची खूपच धावपळ होत होती, मैत्रिणी खूपच उत्साही होत्या, वरात जशी हॉल जवळ आली तशी सगळ्या खाली नाचायला पळाल्या,

अदितीला खूप धडधड होत होतं, खाली किती लोक आहेत, लवकरही येत नाही आहे हा आकाश, एक तरी साडी खूप हेवी होती आणि दागिन्यांनी खूप गरम होत होतं,

आई आत मध्ये आली,.. "टेन्शन नको घेऊ अदिती, हे सरबत पी थोडं" ,

अदितीला बरं वाटत होतं,.. "आई मला खूपच टेन्शन आलं आहे",.

"काही वाटणार नाही बघ आता चल खाली जावं लागेल तुला",.. आई

अनु मनीषा तिला घ्यायला आल्या, चल लवकर अदिति आकाश आला आहे खाली, अदिती मैत्रिणींसोबत खाली गेली, आकाशचं स्वागत झालं होतं, ती आकाश सोबत हात धरून स्टेज कडे निघाली होती,

"अदिती पप्पा आले आहेत",.. अदिती आकाश राहुल सरां जवळ गेली त्यांच्या पाया पडल्या, राहुल सरांनी दोघांना जवळ घेतलं, तुमच खूप अभिनंदन, खूप सुखी रहा,

"थॅन्क्स पप्पा तुम्ही आले, खूप छान वाटत आहे ",.. आकाश

मंगल अष्टक सुरू झाले, खूप वेगळच वातावरण तयार झाल होत, अदिती आकाश भारावून गेले होते, आधी रजिस्टर लग्न झाल होत तरी हे मंत्र हे वातावरण खूप छान होते, लग्न लागलं, सप्तपदी झाल्या, पुढच्या पूजा सुरू झाल्या, पूनम मदतीला होती, पूजा झाली, आकाशने अदितीला मंगळसूत्र घातला, गुरुजी सोबत ते दोघ अगदी मना पासून पूजा करत होते, सगळ्या पूजा झाल्या, जेवण झाले,

"चला आता मला निघाव लागेल",.. राहुल सर मोना मॅडम निघाले,

"तुम्ही इकडे लग्नाला आले खूप बरं वाटलं",.. बाबा

"आता तुम्ही सगळे या तिकडे आपण अदिती आणि आकाशच रिसेप्शन ठेवणार आहोत" ,.. राहुल सर

" हो नक्की येऊ आम्ही",..

" मी करतो तुम्हाला फोन",.. राहुल सर

दोघी आजी त्यांच्यासोबत गेल्या, अविनाश जिजू, पूनम विकी बाकी होते, आम्ही ही निघतो आहोत लगेच..

अदिती रूममध्ये आवरत होती, तिने तिची बॅग भरली होती अनु तिची मदत करत होती,

" माझ्या लग्नाला येशील ना ग तू? का आता सासरी गेली तर तिकडचीच होशील",..अनु

" येईल ग मी दोन दिवस आहेत ना मध्ये, मी नाही तरी उद्या संध्याकाळी इकडे वापस येणारच आहे, मग तुझं लग्न झालं की वापस जाईल",..अदिती

" राहुल सर म्हणत होते तिकडे तुझं रिसेप्शन आहे तेव्हाच त्यांनी तारीख काढली तर",..अनु

" नाही आम्ही सांगू तसं त्यांना",..अदिती

दोघी खाली आल्या ,खाली निघायची तयारी सुरू होती,.." अनु अवघड वाटत ग हे अस आई बाबांना सोडून दुसर्‍या घरी जण, तस आधी पिजीत होती मी पण हे आज वेगळ वाटत ",..

" मला ही आता पासून रडू येत आहे",.. अनु

" येते ग ",.. अदिती अनु एकमेकींना भेटल्या दोघी रडत होत्या

अदिती आकाश आई बाबांचा नमस्कार करायला वाकले, आई बाबा दोघांच्या डोळ्यात पाणी होतं, अदिती रडत होती आकाश त्या तिघांची समजूत काढत होता,.. "हे अस करुन कस चालेल अदिती, पुरे आई बाबांना त्रास होईल, रडू नका",

अमित रडत होता, अदिती त्याला जावून भेटली, खूप इमोशनल झाले होते सगळे,

आकाश अदिती निघाले, गाडी पर्यंत सगळे सोडायला आले होते, मैत्रिणी पण रडत होत्या, अदितीला ही काही सुचत नव्हत, अचानक अस वाटत होत नको जायला सासरी, आई कडे होतो तेच ठीक होत, आकाश तिची काळजी घेत होता, तो खाली उतरून सगळ्यांशी बोलत होता, समजवत होता त्यांना,

गाडी निघाली आकाश अदिती जवळ येऊन बसला, अदिती अजूनही रडतच होती, पुनम समजावत होती तिला, आकाश आल्यामुळे ती तिच्या जागेवर गेली.

" पुरे आता अदिती काय असं किती त्रास करून घेणार? तू म्हणत असशील तर मग आपण दोघं इथेच थांबू या का तुझ्या घरी, इथेच काहीतरी काम बघतो मी, सांगून देवु घरच्यांना की माझी बायको रडते खूप आम्हाला नाही जायचं इथून",.. आकाश

आता अदिती हसत होती, तिने आकाशला मारलं.

"असच छान हसत रहा माझी गोड बायको",.. आकाश

" आकाश हळू बोल, सगळे ऐकतील",.. अदिती

"काय प्रॉब्लेम आहे, आता तर सांगू शकतो ना आपण सगळ्यांना तू माझी बायको आहे ",.. आकाश

आदिती लाजली होती, हो रे पण गोड काय

"आहेच तू गोड.. वेगळीच दिसते आहे तू लग्न झाल्यापासून, मंगळसूत्र छान दिसते तुला ",.. आकाश

पुरे आकाश..

अविनाश जीजू पूनम विकी सगळेच अदितीशी बोलत होते, तिला कम्फर्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करत होते, जरा वेळाने सगळेच थकले, विकी झोपला, अविनाश आणि पूनम बोलत होते त्यांचं त्यांचं, आकाश अदिती हातात हात धरून बसलेले होते,

"वेगळच वाटत आहे ना आज अदिती",.. आकाश

"हो खूप छान वाटत आहे, कसलीही भीती नाही आता",.. अदिती

"तरीसुद्धा मी तुला म्हटलं येशील का आज रात्री गार्डनमध्ये गप्पा मारायला तर तू येणार नाही",.. आकाश

"अरे मग असं कसं सोबत राहायचं नाही सांगितलं तरी सुद्धा गुपचूप भेटणार",.. अदिती

"आता तर डबल लग्न झालं आहे आपलं, आता काय प्रॉब्लेम आहे ",.. आकाश

" आकाश उद्या पूजा आहे, त्यानंतर मी परत घरी येईल अनु च लग्न आहे नंतर मी तिकडे येईल, मग भेटू आपण ",.. अदिती हसत होती

" अजून काही कारण नाहीत का?, माझ्या पासून एवढ लांब थांबायचं नाही अदिती ",.. आकाश

"अरे आता हे काय मी ठरवलं आहे का? घरचे सांगतात तसं करावं लागतं, तू येशील का अनुच्या लग्नाला ",.. अदिती

" हो येईल मग आपण सोबत घरी जाऊ",.. आकाश

अदितीने हळूच आकाशच्या खांद्यावर डोकं टेकवलं, आकाशने तिला आधार दिला,

" आता खरं वाटत आहे ना आपलं लग्न झालं ते, मंत्रविधी मंगळसूत्र कुंकू खूप फरक पडतो ना ",.. अदिती

" हो म्हणूनच मी म्हणत होतो की वैदिक पद्धतीने लग्न करून घेऊ, आता तुला वाटत आहे ना तू माझी बायको आहेस, मनातलं हेच गिल्ट जायला पाहिजे नाहीतर आपण बरेच दिवस सोबत होतो पण तेव्हा एकमेका जवळ यायची हिंमत झाली नाही ",.. आकाश

" हो बरोबर आहे",.. अदिती

घर आलं पूनम अविनाश विकी उतरून आत गेले, आकाश अदितीला आत मध्येच बसायला सांगितलं, ते स्वागताची तयारी करत होते, पाच मिनिटांनी अदितीला बोलावलं राहुल सर मोना मॅडम पण आलेले होते, दोघी आजी अविनाश पुनम विकी हजर होते, पूनमने अदितीला ओवाळलं माप ओलांडून कुंकू मिश्रित पावलाने अदिती आत मध्ये आली, दोघांनी देवाला नमस्कार केला, सगळ्यांच्या पाया पडायला ते बाहेर आले

" मला राहुल सरांची भीती वाटते आहे आकाश",.. अदिती

"जे होईल ते होईल चल आता आशीर्वाद घेऊ",.. दोघी आजींच्या पाया पडल्या, ते राहुल सर आणि मोना मॅडम जवळ आले, त्यांच्या पाया पडल्या, मोना मॅडम ने दोघांना जवळ घेतलं, खूप सुखी राहा, राहुल सरही खुश वाटत होते, त्यांनी दोघांना आशीर्वाद दिले, अविनाश पूनमच्याही पाया पडले,

राहुल सरांनी आकाश अदिती अविनाश पूनम चौघांना जवळ बोलवलं,.. "हे बघा अविनाश आणि अदिती माझ्या मनात तुमच्या दोघांविषयी काहीही राग नाही, त्यामुळे मला घाबरून जाऊन राहायचं नाही",

ठीक आहे सर..

"सर नाही तुम्ही पण दोघं मला पप्पा म्हणा",.. राहुल सर

सगळ्यांना आनंद झाला होता, आकाश विचार करत होता हे आश्चर्य कस काय झालं? नंतर विचारू मम्मीला, चला पण जे झालं ते चांगलं झालं, पप्पांचा राग गेला,

जेवण झालं सगळे थकले होते,

"आम्ही निघतो आता",.. राहुल सर मोना मॅडम जात होते

" आता कशाला जात आहे राहुल, उद्या सकाळीच पूजा आहे",.. आजी

ठीक आहे ते पण थांबले,

"चला जा आराम करा पूनम अदितीला तिच्या रूममध्ये घेऊन जा" ,.. आजी

पूनम अदितीला आत सोडून आली

" आकाश तू जा तुझ्या रूममध्ये, अदिती पूजेनंतर येईल तुझ्या रूममध्ये",.. आजी

आकाशला जीवावर आलो होत, आजी आत गेल्या, राहुल सर मोना मॅडम ही आत गेले,

" दिदी पाच मिनिट भेटू का अदितीला?",.. आकाश

जा..

अदिती तिच्या रूम मध्ये आवरत होती, बॅग उघडुन ड्रेस घेत होती, अचानक आकाश आत आला,.." आकाश काय करतो तू इथे? ",

" एवढी काय दचकते कोणी व्हिलन आल्या सारखा, मी इथे राहणार आज",... आकाश

"नाही आकाश.. दीदी म्हटली उद्या पूजा आहे मग रहाता येईल सोबत",... अदिती

आकाशने पुढे येवून अदितीला मिठी मारली, कपाळावर किस केल, तो अदिती कडे बघत होता,.. "केवढ टेंशन घेतेस, झोप आता, की येते माझ्या जवळ ",..

" जा ना आकाश ",.. अदिती हसत होती

आकाश रूममध्ये गेला.

पुनम अदितीला मदत करत होती, तिने दागिने काढून कपडे बदलले, आरामात झोप सकाळी पूजा आहे, मी येते उठवायला,

खूप थकल्यामुळे अदितीला लगेच झोप लागली

सकाळी पूजेची सगळी तयारी झाली होती हिरव्या साडीत अदिती खूप सुंदर दिसत होती, पूनमने तिची तयारी करून दिली होती,

अदितीचे बाबा ही तिला घ्यायला आले होते, ते राहुल सरांबरोबर बोलत बसले होते,

गुरुजी पूजेला आले,

"चला पूजेला बसा आकाश अदिती",.. आजी बोलवत होत्या

आकाश समोर बसलेला होता, सोफ्यावरून तो अदिती कडे बघत होता, आदिती आकाश पूजा झाल्यानंतर तुम्हाला चहा नाश्ता मिळेल,

दोघं पूजेला बसले अजूनही आकाश तिच्याकडेच बघत होता,

"आकाश पूजा समोर आहे",... अदिती

"ही पूजा करायची आहे मला ",.. आकाश

"काहीही बोलू नको पूजा सुरू होणार आहे ना आता ",.. अदिती हसत होती,

" एवढी छान तयारी कोणी करून दिली",.. आकाश

" पूनम दीदीने",.. अदिती

"आता लग्नानंतर तू अशीच राहणार आहे का?",.. आकाश

"अशी म्हणजे कशी",.. अदिती

"ही साडी ज्वेलरी वगैरे ",.. आकाश

"तुला आवडते का मी साडी नेसलेली",. अदिती

" हो खूप छान दिसते तू ",.. आकाश

" पण मला नाही जमणार रोज एवढी तयारी करायला, खूप थकायला होतं, ऑफिसमध्ये नाही जमणार, साडी घालून काम ",.. अदिती

" घरी आल्यावर नेसायची साडी ",.. आकाश

काहीही...

"तुम्ही दोघांनी इकडे लक्ष द्या पुजेकडे ",.. गुरुजी हाक मारत होते, पूजेला सुरुवात झाली.

पूनम जवळ येवून बसली, ती काय हव नको ते बघत होती, पूजा झाली, नैवेद्य दाखवला, अदिती मदत करत होती पूनमला, तिच्या मागे आकाश फिरत होता,

" आकाश अदिती तुम्ही पुढे बसा बर इथे धावपळ होते आणि गर्दी झाली इकडे ",.. पूनम

" मी मदत करते ना दीदी",.. अदिती

"तुझं ठीक आहे ग पण आकाश बघ जरा, आजी आकाश ला बोलव तिकडे",.. पूनम

"चल अदिती आपण तिकडे जावू ",..आकाश

पूनम अदिती खूप हसत होत्या.

🎭 Series Post

View all