Login

प्रेम तुझा रंग कसा

प्रेमावरील कविता नक्की वाचा
ओळखु कसा मी रंग तुझा
सांग न प्रेम तुझा रंग कसा
प्रेमाचे तर असतात रंग अनेक
पण तुझा तो रंग कसा

कसे ओळखू तुला
काय आहे तुझी छटा
दे न रे काही उत्तर मला
एखादी तरी खूण मला

म्हणतात प्रेमात पडताच
कवीला ही कविता सुचतात
तीच आहे का रे ओळख तुझी

की प्रेमात पडताच झोप होते नाहीशी
ही आहे ओळख तुझी
काय आहे तुझी ओळख पटव ना रे जरासा
मी ही बघेन मग एक पडून प्रेमात त्या

अनुभवेन रंग सारे आणि साऱ्या त्या छटा
रंगून जाईन मी ही मग प्रेमात तुझ्या
0