प्रेमासाठी वाट्टेल ते...
आज मन फारच बेचैन झाले होते . मी म्हणजे मीरा आज खूप म्हणजे खुपच टेन्शन मध्ये होते . कारण आज माझ्या लाडक्या नकुल बरोबरची ती आजची सकाळची वादा - वादी . असं आधी कधीच केलं नव्हते त्यांन माझ्या सोबत . रागात बोलायचा .. पण मला आवडायचे त्याचे रागावने . . कारण मी खुपच प्रेम करते ना त्याच्यावर म्हणुन असेल कदाचीत .तसं तो देखील तितकंच प्रेम करतो माझ्यावर
मात्र आज त्याने सकाळी कहरच केला.. . . जाऊ दे मी देखील ठरवलं आज संपूनच टाकते सगळं - हो टाकतेच संपून! मग कधीच बोलणार नाही तो असं .कारण मी त्याच्यावर इतके प्रेम करते की, त्या साठी वाट्टेल ते करू शकते..
मी रागारागाने माझ्या रूम मधे गेले . . बेड वर बसुन बराच वेळ विचार केला . शेवटी मनाशी पक्की गाठ बांधली. दाखवतेच नकुलला की मीरा काय चीज आहे ते . ?
रूम भर नजर फिरवली पण .नक्की काही सुचलं नाही . . मग वर फॅन दिसला . आता निर्णय घेतला . . करतेच . . . मग त्या नकुलला समजेल . . मी बाजुला असलेले माझे आभ्यासचे टेबल फॅन खाली आणले . जेमतेम फॅन पर्यंत हात पोहचत होता . मी पुर्ण तयारी केली पण सगळ्यात महत्वाची वस्तु तिथे नव्हती ती म्हणजे साडी ती आणण्या साठी हळुच रूम बाहेर पडले . . हळूहळू आवाज न करत आई - बाबाच्या खोलीत शिरले . भिंतीवर त्यांचा फोटो लावला होता . . मी त्या फोटो कडे पहिले आणि माझ्या भावना अनावर झाल्या. वाटल यांनी मला इतकं प्रेमानी वाढवले कधी कधी घरातील साधे एक काम देखील करू दिले नाही . . बाबानी तर कधीच नाही . . आणि हा नकुल? . . त्याचाच बोलण्या वरून आज मी हे पाऊल उचलत आहे . काय करू त्या वेळेस माझा स्वाभिमान जागृत झाला होता ना. मग मी आई बाबांचा विचार का करू ?
असा विचार करत मी आईच्या कपाटा जवळ गेले.आवाज न करता ते उघडले . आईने गोदडी शिवन्यासाठी ठेवलेली एक जुनी साड़ी काढली व हळुच कपाट बंद केले व माझ्या खोलीत आले . .
आता मात्र विचाराचे काहूर माझ्या मनात उठले. . कसं करू ? मला जमेल का . . ? डोळ्यासमोर कधी नकुल तर कधी आई - बाबा .. जसं जसी मी साड़ी घेऊन टेबलावर चढले तेंव्हा तर ... कीती विचार . . . आई - बबा.. शाळा..मोबाईल.. फेसबुक.. इन्स्टा.. सेल्फी..नकुल. आई बाबा . . . . . . . .
थरथरत्या हातानेच शेवटी मी फॅनला हात लावला आईची जुनी साड़ी होतीच हातात . . त्या साडीने तो सर्व फॅन अगदी व्यवस्थित पुसुन काढला. . आणि शेवटी मी नकुल दादाला खोटं ठरवलं .कारण आज सकाळीच तो आई बाबा समोर मला चिडवत होता की,मीरा घरात एक सुद्दा छोटसं कामही करत नाही म्हणुन . तिच्या खोलीत सगळीकडे त्या कपाटावर,टेबलवर,फॅनवर इतकी धूळ आहे ती कधी साफ़ करत नाही . .
म्हणून माझ्या लाडक्या नकुल दादाला दाखऊन देण्यासाठी आज माझ्या खोलीतील फॅनची साफ़ - सफाई केली बाकी काही नाही .
सत्यकथेवर आधारित . .
- चंद्रकांत घाटाळ
संपर्क -७३५०१३१४८०

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा