रात्र झालेली, जोरदार पाऊस चालू , रेल्वे उशिरा येणार, एकटीच घरी जायचे आणि मोबाईल बंद ,जान्हवीला या सगळ्याचं टेंशन येत होतं.
मल्हार त्यातला त्यात ओळखीचा होता त्यामुळे त्याला \"मोबाईल देता का,बाबांना कळवते\" असं म्हणू शकली.
मल्हारने आपला मोबाईल जान्हवीला दिला.
बाबांना फोन करताच तिकडून बाबा "बोल मल्हार " असं म्हणाले.
जान्हवीला थोडे आश्चर्यच वाटते.
जान्हवीने बाबांना सांगितले - "काळजी करू नका. पाऊस चालू आहे. माझा मोबाईल बंद आहे. गाडी उशिरा येणार आहे. मला यायला उशिर होईल."
जान्हवीचे बाबा - " पण हा मल्हार चा फोन आहे."
जान्हवी बाबांना म्हणाली - " हो दोघे स्टेशन वर आहोत आम्ही."
बाबा - " मग काय काळजी नाही. त्यांना वेळ असेल तर विचार , रात्री उशिर झाला तर घरी सोडतील का? हवी तर विनंती करतो मी त्यांना. तू त्यांना फोन दे. "
जान्हवी "बाबा त्याची काही गरज नाही."
बाबा - " तू त्यांना फोन दे मी बोलतो."
तिने फोन दिला.
बाबा म्हणाले -" बेटा मल्हार, एक विनंती आहे. रात्र झालीय , उशीर झालाय. गाडी उशीरा येणार आहे. तुला वेळ असेल तर जान्हवीला घरी सोडशील का?"
मल्हार -" हो बाबा. . .. तुम्ही काळजी करू नका. मी सोडतो ."
मल्हार जान्हवीला म्हणाला, "तुम्हाला सुखरूप घरी सोडण्याची जवाबदारी बाबांनी माझ्यावर सोपवली. चला मी तुम्हाला सोडतो."
जान्हवीला रागच आला .
"मी माझी जाईन एकटी ."
एवढ्यात रेल्वे अजून पंधरा मिनिटे उशिरा येणार अशी घोषणा झाली.
खुपच मोठ्याने विजेचा लखलखाट आणि कडकडाट झाला
आता मात्र जान्हवी मल्हारला म्हणाली - "आता काय करायचे?"
मल्हार जरा गालात हसत म्हणाला - " मी सोडतो म्हणालोय "
जान्हवी विचारते-" पण जाणार कसे?"
मल्हार म्हणाला - " कॅब बुक करतो. तुमची तयारी असेल तर."
जान्हवी नाईलाजाने का होईना हो म्हणाली.
मल्हारने कॅब बुक केली कारचे दार उघडून जान्हवी बसल्यावर दार लावून स्वतः ड्रायव्हर जवळ पुढे बसला .
जान्हवीला आता तो जरा सज्जन वाटला.
कारमध्ये गाणे लागले होते -
एक लड़की भीगी-भागी सी
सोती रातों में जागी सी
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है
दिल ही दिल में जली जाती है
बिगड़ी-बिगड़ी चली आती है
मचली-मचली घर से निकली
पगली सी काली रात में
मिली इक अजनबी से...
बिगड़ी-बिगड़ी चली आती है
मचली-मचली घर से निकली
पगली सी काली रात में
मिली इक अजनबी से...
तन भीगा है, सर गीला है
उस का कोई पेंच भी ढीला है
तनती झुकती, चलती रुकती
निकली अंधेरी रात में
मिली इक अजनबी से...
मल्हार गाणी ऐकत हसत होता.
इतक्यात गाडी मधल्या एसी मुळे भिजलेल्या जान्हवीला शिंका यायला लागल्या.
मल्हारने मागे वळून जान्हवीला आपला रूमाल दिला. एसी बंद केला.
जान्हवीला बरे वाटत नाही हे डॉक्टर मल्हारला लक्षात आले. जान्हवीला खुपच थंडी वाजत असल्याने त्याने आपला कोट तिला काढून दिला व तिने कोट घातला.
बाबा घरा बाहेर जान्हवीची वाट पहात उभे होते. गाडी दिसताच. बायकोला हाक मारली, " अगं! जान्हवी आली."
जान्हवी उतरली.
मल्हार म्हणाला - " येतो आता. हिच गाडी घेऊन जातो."
बाबा म्हणाले - " इथे दारा पर्यंत आलास. थोड्या वेळाकरता घरात ये मल्हार"
सगळे घरात गेले.
"जान्हवीला ताप आहे" आई म्हणाली.
मल्हारने चेक केले .
पहिल्यांदा जान्हवी चा हात हातात घेऊन डॉक्टर मल्हार लाच शहारे आले होते.
अनायसा खिशात गोळी होती. लगेच दिली. जान्हवीला लगेच घ्या म्हणाला ,"थोडं फिकं खा. भात किंवा खिचडी आणि आराम करा." असं सांगितलं.
डॉक्टर असल्यामुळे जान्हवीने ऐकले. कोट काढून मल्हारला परत दिला.
बाबांनी मल्हारचे मनःपूर्वक आभार मानले.
जान्हवीला भात आणि साधे वरण कालवून आई ने खायला दिले.
मल्हारसाठी आले घालून चहा आणि भजी घेऊन आली. "घे हो बाळा गरमगरम बरे वाटेल "
बाबांनी मल्हारला विचारले- "घरी कोण असते तूझ्या? घर कुठे आहे?"
मल्हार म्हणाला - " माझ्या घरी आई, वडील, काका, काकू, बहिणी , भाऊ, आजी, आजोबा आमचा 10 जणांचा परिवार आहे. एकत्र कुटुंब आहे. तुम्हीआला होतात ना, हॉस्पिटल मध्ये ,तिथून पुढेच घर आहे माझे."
"वा छानच."
बाबांनी जान्हवीला विचारले - "मुलाखतीचे काय झाले जानू?"
जान्हवी जेवण करता करता म्हणाली "उद्या कळवतो म्हणाले. मुलाखती मुळेच उशीर झाला निघायला. त्यात रेल्वे उशिरा, जोरदार पाऊस, लाईट गेलेले आणिअंधार. "
जान्हवीचे बाबा मल्हारला म्हणाले "देवासारखाच धावून आलास रे बाबा.. आभार मानावे तितके कमीच आहेत तुझे. आता जेवण करूनच जा."
मल्हार म्हणाला - "गाडी बाहेर थांबवली आहे. मी पुन्हा कधी येईन."
बाबा ,"हो नक्कीच ये."
मल्हार गेला. मग जान्हवीच्या लक्षात आले की रूमाल राहिला.
जान्हवीची तब्येत बरी नव्हती म्हणून ती लगेच झोपली.
बाबा, आजी, आई - तिघेही म्हणतात. मल्हार चांगला मुलगा आहे. कसा वेळेला धावून आला. देवासारखा. आता ही लगेच तपासून गोळी दिली. चांगला डॉक्टर आहे. जवाबदारी घेऊन जानू ला सुखरूप घरी आणून सोडले कॅबमधे वगैरे.
आजी म्हणाली - "दत्ता अरे या नाही त्या रूपात त्याचे थोडे ऋण फेडले पाहिजे. बोलाव एकदा जेवायला घरी त्याला."
मल्हार घरी पोहोचला. आज जान्हवीच्या घरी जाऊन आला त्या आठवणीत होता.
जान्हवीने त्याच्या मोबाईल वरून फोन केला. त्या मोबाईलला स्पर्श केला. म्हणून तो मोबाईल ला म्हणाला \"तू किती भाग्यवान आहेस जानू नी तुला स्पर्श केला आहे. \"
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®
इरा राज्यस्तरीय करंडक
कथामालिका
कथामालिका
जिल्हा - संभाजीनगर / औरंगाबाद.
प्रेमकथा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा